शासन व्यवहार

शासन व्यवहार

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
There are currently 778 names in this directory beginning with the letter H.
habeas corpus
Law बंदी प्रत्यक्षीकरण (न.)

habit
१ सवय (स्त्री.) २ सराव (पु.) ३ Biol. प्रकृति (स्त्री.)

habitability
निवासयोग्यता (स्त्री.)

habitable
निवासयोग्य

habitant
निवासी (सा.)

habitat
१ वसतिस्थान (न.) २ Biol. (natural home of plant or animal) निसर्गनिवास (पु.), प्राकृतिक वास (पु.)

habitation
१ वस्ती (स्त्री.) २ वास (पु.)

habitual
१ सराईत, अभ्यस्त २ नित्याचा

habitual drunkard
अट्टल दारुबाज (सा.)

habitual intemperance
नित्याचे अतिपान (न.)

habitually
१ सराईतपणाने २ नित्य

habitually negligent
Law नित्य निष्काळजी

habituate
सवय लावुन घेणे

hack
तुकडे तुकडे करणे

hack saw
धातू कापावयाची करवत (स्त्री.)

hackneyed
१ चोथाळलेला २ नीरस ३ (overmuch used) अतिप्रयुक्त

hackneyed expression
अतिप्रयुक्त वाक्यप्रयोग (पु.)

haematic
रक्तविषयक, रक्त-

haematology
Med. रुधिरशास्त्र (न.)

haemocytology
Med. रक्तपेशीशास्त्र (न.)

haemoglobin
Med. हेमोग्लोबिन (न.)

haemorrhage
रक्तस्त्राव (पु.)

haggle
घासाघीस करणे

hail
१ हाक (स्त्री.) २ वंदन (न.) ३ गारा (स्त्री.अ.व.) ४ वर्षाव (पु.)

hail
१ हाक मारणे २ वंदन करणे ३ ( to greet) स्वागत करणे ४ मूळचा ..... असणे (as in to hail from .... district मूळचा.... जिल्ह्याचा असणे) ५ गारा पडणे ६ Fig. वर्षाव करणे, वर्षाव होणे

hail storm
गारपीट (स्त्री.)

hailstone
गार (स्त्री.)

hair
केस (पु.), रोम (पु.)

hair do
केशभूषा (स्त्री.)

hair spring
बाल कमान (स्त्री.)

hale
धट्टाकट्टा

half
अर्धा भाग (पु.)

half
अर्ध, अर्धा, निम्मा

half
अर्ध

half average
अर्ध सरासरी

half average pay
अर्ध सरासरी वेतन (न.)

half blood
सावत्र भावंड (न.)

half blooded
१ सावत्र २ (having one parent of good and one of inferior stock) संकरजात

half brother
सावत्र भाऊ (पु.)

half hearted
अर्धचित्त

half heartedly
अर्धचित्ताने

half mast
अर्ध्यावर उतरवलेला

half measure
अपुरा उपाय (पु.)

half pay
अर्ध वेतन (न.)

half pay
अर्धवेतनी, अर्धपगारी

half sister
सावत्र बहीण (स्त्री.)

half time
अर्धकालिक

half tone
बिंदुमुद्रा (स्त्री.)

half truth
अर्धसत्य (न.)

half wit
अर्धवट (सा.)

half witted
अर्धवट

half year
अर्धवर्ष (न.)

half yearly
सहामाही, अर्धवार्षिक

hall
१ सभागृह (न.) २ दालन (न.), कक्ष (पु.) (as in dining hall भोजन कक्ष)

hall mark
प्रमाणचिन्ह (न.) (an official mark serving as proof of quality)

hallucination
मायाभास (पु.), भ्रम (पु.)

halo
Astron. तेजोवलय (न.)

halt
१ मुक्काम (पु.) २ विराम (पु.)

halt
१ थांबवणे, थांबणे २ मुक्काम करणे ३ अडखळणे

halting
मुक्काम (पु.)

halting allowance
मुक्काम भत्ता (पु.)

haltingly
अडखळत

halve
निम्मा करणे

hamlet
पाडा (पु.), वाडी (स्त्री.) (a cluster of houses in the country)

hammer
१ घण (पु.) २ हातोडा (पु.), हातोडी (स्त्री.)

hammer
१ घण मारणे २ हातोड्याने ठोकणे ३ stock exch. शेअर बाजारात दिवाळे वाजणे ४ धोशा लावणे

hammer out
परिश्रमपूर्वक तयार करणे

hammock
झोळीचा बिछाना (पु.)

hamper
१ खुंटवणे २ अडथळा आणणे

hand
१ हात (पु.), हस्त (पु.) २ हस्ताक्षर (न.) ३ (person's signature) सही (स्त्री.), स्वाक्षरी (स्त्री.) ४ (of a clock) काटा (पु.) ५ कर्मचारी (सा.) ६ मदतनीस (सा.) ७ अखत्यार (पु.) (as in in the hands of -च्या अखत्यारात)

hand book
निदेशपुस्तक (न.) booklet पुस्तिका brochure लघुपुस्तक hand out प्रसिद्धिका pamphlet पत्रिका souvenir स्मरणिका white paper श्वेतपत्रिका

hand cart
हातगाडी (स्त्री.)

hand grenade
हातबाँब (पु.)

hand line
हातगळ (पु.) (a fishing line without a rod)

hand out
प्रसिद्धिका (स्त्री.) handbook

hand over
हवाली करणे

hand pounded
हातकुटाईचा, हातसडीचा

hand pounded rice
हातसडीचा तांदूळ (पु.)

hand press
हातछपाई यंत्र (न.)

handbill
हस्तपत्रक (न.) bulletin

handcuff
हातबेडी (स्त्री.), हातकडी (स्त्री.)

handful
मूठभर (वस्तु इत्यादि)

handicap
लोढणे (न.), अडथळा (पु.)

handicap
अडथळा निर्माण करणे

handicapped
अधू

handicapped child
अधू बालक (न.)

handicraft
हस्तव्यवसाय (पु.)

handicraftsman
हस्तव्यवसायी (सा.)

handiwork
१ हस्तकाम (न.) २ (creation doing) कृति (स्त्री.)

handle
१ (a part by which a thing is held) मूठ (स्त्री.), दांडा (पु.), (कप वगैरेचा) कान (पु.) २ (the fact that may be taken advantage of) साधन (न.)

handle
१ हाताळणे २ (to trade or deal in) व्यवहार करणे ३ वागवणे (as in to handle a person roughly एखाद्या व्यक्तीला वाईट वागवणे)

handloom
हातमाग (पु.)

handloom emporium
हातमाग वस्त्रभांडार (न.)

handloom weaving
हातमाग विणाई (स्त्री.)

handmade
हातबनावटीचा, हाताने केलेला

handmaid
दासी (स्त्री.)

handshake
हस्तांदोलन (न.)

handsome
१ (having a pleasing appearance) देखणा २ (generous) उदार ३ (suitable) यथोचित ४ (ample) पुष्कळ, मुबलक

handspun
हातकताईचा

handspun yarn
हातकताईचे सूत (न.)

handwork
हातकाम (न.)

handwriting
हस्ताक्षर (न.)

handy
१ हुकमी, हाताशी असलेला २ आटोपशीर

hang
१ टांगणे, लटकवणे, लटकणे २ फाशी देणे

hang free
रखडणे, मंदगतीने चालू असणे

hang in the balance
अनिर्णित अवस्थेत असणे

hangar
विमानघर (न.) (a shed for aircraft)

hanger
आलंबक (पु.)

hangings
पडदे (पु.अ.व.)

hangman
फाशी देणारा (पु.)

hank
Text. (दोरा वगैरेची) लड (स्त्री.)

hanker
तीव्र लालसा असणे

haphazard
१ असावचित्त २ (determined by chance) यादृच्छिक

haphazard
१ असावचित्ताने २ यदृच्छया

happen
घडणे

happening
घटना (स्त्री.)

happily
१ सुदैवाने २ सुखाने, खुषीने ३ सुयोग्य रीतीने

happiness
सुख (न.), समाधान (न.)

happy
१ सुखी, आनंदी २ सुयोग्य (as in happy expression सुयोग्य वाक्प्रयोग)

harangue
आवेशी भाषण (न.) (a vehement or noisy speech)

harangue
आवेशी भाषण करणे

harass
सतावणे

harassment
सतावणी (स्त्री.), गांजणूक (स्त्री.)

harbinger
अग्रदूत (पु.)

harbour
१ बंदर (न.) २ (a refuge or shelter) आसरा (पु.), थारा (पु.)

harbour
१ (to shelter) आसरा देणे, थारा देणे २ नांगर टाकणे

harbour dues
बंदर जकात (स्त्री.)

hard
१ कठोर २ कठीण ३ कडक, टणक ४ कष्टाचा

hard
जोराने, परिश्रमपूर्वक

hard and fast
पक्कन

hard cash
रोकड (स्त्री.)

hard currency
दुर्लभ चलन (न.)

hard earned
कष्टार्जित

hard facts
कठोर वस्तुस्थिति (स्त्री.)

hard headed
१ भावनाशून्य २ व्यवहारी

hard hearted
निष्ठूर

hard hit
संगीत असलेला

hard labour
सक्त मजुरी (स्त्री.)

hard money
नाणी (न.अ.व.) (metallic money)

hard water
Chem. दुष्फेन जल (न.)

harden
१ कठीण करणे, कणखर करणे २ दृढ होणे, कठोर होणे

hardiness
काटकपणा (पु.), कणखरपणा (पु.)

hardly
१ कष्टाने २ (scarcely) क्वचित (hardly...when..... नाही तोच)

hardness
१ कठीणता (स्त्री.) २ काठिण्य (न.) ३ दृढता (स्त्री.)

hardships
हालापेष्टा (स्त्री.अ.व.)

hardware
लोखंडी सामान (न.)

hardworking
कष्टाळू

hardy
चिवट, कणखर

harm
१ हानी पोचवणे, हानी करणे २ Law अपहानी पोचवणे, अपहानी करणे ३ इजा करणे

harm
१ हानि (स्त्री.) २ अपहानि (स्त्री.) ३ इजा (स्त्री.)

harmful
घातुक, हानिकारक

harmless
निरुपद्रवी

harmonious
१ सुसंवादी २ सुरेल, श्रुतिमधुर ३ एकोप्याचा

harmonise
१ मेळ घालणे २ सूर जमवणे

harmonium
बाजाची पेटी (स्त्री.)

harmony
१ सुसंवाद (पु.) २ स्वरमेळ (पु.) ३ एकोपा (पु.)

harness
१ जुंपणे २ उपयोगात आणणे

harness
ओढण (न., स्त्री.)

harp
तुणतुणे वाजवणे

harrow
१ Agric. वखरणे २ घाव करणे ३ Lit. Fig. व्यथित करणे

harrow
Agric. १ दाताळे (न.) २ वखर (पु. न.) ३ Lit. Fig. व्यथित करणे

harrowing
Agric. वखरणी (स्त्री.) कुळवणी (स्त्री.)

harsh
१ कठोर २ कर्णकटु ३ रुक्ष

harshness
कठोरपणा (पु.)

harvest
Agric. कापणी करणे

harvest
१ हंगाम (पु.) २ Agric. (season for reaping of corn or grains) कापणीचा हंगाम (पु.) ३ पीक (न.)

harvester
कापणी यंत्र (न.)

harvesting
Agric. कापणी (स्त्री.)

haste
घाई (स्त्री.)

hasten
घाई करणे, त्वरा करणे, जलद उरकणे

hastily
घाईघाईने

hasty
१ उतावळा २ अविचारी

hatch
१ अंडी उबवणे २ (कट, व्यूह) रचणे ३ खोदीव रेषा काढणे ४ अंड्यातून बाहेर येणे

hatch
खोदीव रेषा (स्त्री.)

hatchery
उबवणी केंद्र (न.)

hatchet
फरशी (स्त्री.) (a small axe)

hatching
रेखाछाया (स्त्री.) (shading in fine lines)

hate
द्वेष करणे

hate
द्वेष (पु.)

hateful
द्वेषजनक, द्वेषपूर्ण

hatefully
द्वेषपूर्वक

hatred
द्वेष (पु.)

haughty
मग्रूर

haul
१ (वाहनांच्या साह्याने) वाहून नेणे २ ओढून नेणे ३ जहाजाचा मार्ग बदलणे

haulage
१ (act or process of hauling) मालवाहणी (स्त्री.) २ (charges) वाहणावळ (स्त्री.)

haulage charges
वाहणावळ (स्त्री.)

have
१ ताब्यात असणे, जवळ असणे २ घेणे ३ असणे

have
सधन (सा.) (one who has possessions)

have not
निर्धन (सा.) (one who lacks possessions)

haven
१ बंदर (न.) २ आश्रयस्थान (न.)

hawk
फेरीने विकणे

hawker
फेरीवाला (पु.)

hawl
कोकलणे, गळा काढून रडणे

hay
वाळलेले गवत (न.)

hazard
१ जोखीम (स्त्री.) २ धोका (पु.)

hazard
धोक्यात घालणे

hazardous
१ जोखमी, जोखमीचा २ धोक्याचा

hazardous insurance
जोखमीचा विमा (पु.)

hazardous occupation
धोक्याचा व्यवसाय (पु.)

hazardously
जोखीमपूर्वक, जोखमीने

he
तो, (आदरार्थी) ते

head
१ मस्तक (न.), डोके (न.) २ (of department) अध्यक्ष (सा.), प्रमुख (सा.) ३ (of account) शीर्ष (न.) ४ (usu. in pl. - of a coin) चित (स्त्री.) ५ टोक (न.) ६ डोई (स्त्री.) (as in per head दर डोई)

head
प्रमुख

head of department
१ विभागाध्यक्ष (सा.) २ विभाग प्रमुख (सा.)

head of office
कार्यालय प्रमुख (सा.)

head office
मुख्य कार्यालय (न.)

head on
समोरासमोर

head on collision
समोरासमोर टक्कर (स्त्री.)

head works
प्रमुख बांधकामे (न.अ.व.)

headache
डोकेदुखी (स्त्री.)

headgear
टोपी (स्त्री.), रुमाल (पु.), शिरोवेष्टन (न.)

heading
मथळा (पु.), शीर्षक (न.)

headlight
शिरोदीप (पु.)

headline
ठळक मथळा (पु.)

headlong
मागेपुढे न पाहता

headman
प्रमुख (पु.)

headmaster
मुख्याध्यापक (पु.)

headmistress
मुख्याध्यापिका (स्त्री.)

headphone
शिरोश्रवणक (न.)

headquarters
मुख्यालय (न.)

headrace
अधिजलवाह (पु.)

headrace tunnel
Irrig. अधिजल भुयार (न.)

headstrong
हेकट

headway
प्रगति (स्त्री.) (to make headway मार्ग काढणे)

heal
१ बरा करणे, बरा होणे २ रोगमुक्त करणे ३ (जखम वगैरे) भरुन येणे

health
१ आरोग्य (न.) २ प्रकृति (स्त्री.) ३ स्वास्थ (न.)

health engineering
आरोग्य अभियांत्रिकी (स्त्री.)

health resort
आरोग्यस्थान (न.)

healthful
आरोग्यसंपन्न

healthy
निरोगी, निकोप

heap
१ रास (स्त्री.) २ ढीग (पु.)

heap
१ रास करणे २ ढीग लावणे

hear
१ ऐकणे २ Law सुनावणी करणे

hear in person
जातीने ऐकणे

hearafter
यापुढे, यानंतर

hearing
१ श्रवणशक्ति (स्त्री.) २ Law सुनावणी (स्त्री.)

hearsay
कर्णाएपकर्णी वृत्तांत (पु.), वदंता (स्त्री.)

hearsay
ऐकीव

hearsay evidence
Law ऐकीव पुरावा (पु.)

hearse
शववाहिका (स्त्री.)

heart
हृदय (न.), काळीज (न.)

heart beats
हृदयाचे ठोके (पु.अ.व.)

heart disease
हृदयविकार (पु.)

heart rending
हृदयभेदक

heartburning
१ जळफळाट (पु.) २ असूया (स्त्री.)

hearth
घरशेकोटी (स्त्री.)

heartily
मनःपूर्वक, कळकळीने

heartless
हृदयशून्य, निष्ठूर

hearty
१ हार्दिक, अंतःकरणपूर्वक २ आनंदी ३ यथेच्छ, मनसोक्त

heat
उष्णता देणे, तापवणे, उष्ण होणे, गरम होणे

heat
१ उष्णता (स्त्री.) २ Chem. Phys. उष्णता (स्त्री.), ऊष्मा (पु.) ३ दाह (पु.), उकाडा (पु.)

heat stroke
ऊष्माघात (पु.)

heat treatmetn
उष्णोपचार (पु.)

heat wave
ऊष्मालाट (स्त्री.)

heater
१ तापक (पु.) २ उष्णिका (स्त्री.)

heath
Bot. (waste land) ओसाड जमीन (स्त्री.)

heating
तापवणे (न.)

heatproof
उष्णतारोधक

heave
१ वर उचलणे २ निश्वास टाकणे ३ उचंबळणे ४ ऊर धपापणे

heaven
स्वर्ग (पु.)

heavenly
स्वर्गीय, दिव्य

heavens
आकाश (न.)

heaviness
जडपणा (पु.)

heavy
१ जड, वजनदार २ असह्य, दुःखद ३ अवजड (as in heavy industries अवजड उद्योग) ४ मोठा (as in heavy storm मोठे वादळ) ५ पुष्कळ (as in heavy rainfall पुष्कळ पाऊस)

heavy foliaged
घनपर्णी

heavy water
Chem. जड पाणी (न.)

heckle
प्रश्नांनी छेडणे

hectic
शर्थीचा, तुफानी

hedge
१ कुंपण (न.) २ (bushes planted as hedge) वई (स्त्री.)

hedge
१ कुंपण घालणे २ वई घालणे

heed
१ लक्ष (न.), अवधान (न.) २ पर्वा (स्त्री.)

heedless
१ दुर्लक्ष करणारा २ बेपर्वा

heedlessness
१ दुर्लक्ष (न.) २ बेपर्वाई (स्त्री.)

heel
१ टाच (स्त्री.) २ खूर (पु.)

hegemony
(leadership) धुरीणत्व (न.)

height
१ उंची (स्त्री.) २ श्रेष्ठत्व (न.) ३ (utmost degree) कळस (पु.), पराकाष्ठा (स्त्री.)

heighten
उंच करणे, उंचावणे, उंच होणे

heinous
अतिदुष्ट, अघोर

heir
Law वारस (सा.)

heir and devisee
Law वारस व मृत्युपत्राधिकारी

heir and legatee
Law वारस व मृत्युपत्रित दानग्राही

heir apparent
१ Law प्रत्यक्ष वारस (सा.) २ युवराज (पु.)

heir at law
Law विधिसंमत वारस (सा.)

heir by custom
Law रुढिसंमत वारस (सा.)

heir of the body
Law आत्मज वारस (सा.)

heir presumptive
Law गृहीत वारस (सा.)

heirless
वारसहीन

heirloom
Law (any furniture and other personal chattels which by law descend to the heir with the inheritance) वंशपरंपरागत वस्तू (स्त्री.अ.व.)

heirship
Law वारसा (पु.)

helicopter
हेलिकॉप्टर (न.)

helio
(used in comb.) सौर-

helio photographer
सौर छायाचित्रकार (पु.)

heliocentric
सौरकेंद्री

heliometer
तारांतरमापी (पु.)

helioscope
सौर दुर्बिण (स्त्री.)

helm
एshipping सुकाणू (न.)

helmet
शिरस्त्राण (न.)

helmsman
१ shipping सुकाण्या (पु.) २ कर्णधार (पु.)

help
साह्य देणे, मदत करणे

help
साहाय्य (न.), साह्य (न.). मदत (स्त्री.)

helper
मदतनीस (सा.)

helpful
साहाय्यशील, उपयोगी पडणारा

helpless
असहाय

helplessly
असहायतेने

helter-skelter
सैरावैरा

hem
मुरड (स्त्री.), टीप (स्त्री.)

hem
मुरड घालून शिवणे, टीप घालणे

hemisphere
गोलार्ध (पु.)

hemp
१ भांग (स्त्री.) २ सण (पु.) ३ ताग (पु.)

hence
१ अतएव, म्हणून २ येथून

henceforth
यापुढे

henceforward
यापुढे, इतःपर

henchman
पित्तू (पु.), बगलबच्चा (पु.)

her
तिचा

her
तिचा

herald
१ (forerunner) अग्रदूत (पु.) २ कुलचिन्ह (न.)

herald
ललकारी देणे

herb
वनस्पति (स्त्री.)

herbage
१ झाडपाला (पु.) २ Law (right of pasture) चराई अधिकार (पु.)

herd
खिल्लार (न.), कळप (पु.)

herdsman
गुराखी (पु.), खिल्लारी (पु.)

here
येणे, इकडे, या ठिकाणी

hereby
याद्वारा, याद्वारे

hereditament
दायाप्ति (स्त्री.), वारसाप्राप्त संपदा (स्त्री.)

hereditary
आनुवंशिक bequeathed मृत्युपत्रदत्त inherited वारशाने मिळालेला, वारसाप्राप्त legated मृत्युपत्रित

hereditary tenant
आनुवंशिक कूळ (न.)

hereditary tenure
आनुवंशिक धारणा अधिकार (पु.)

heredity
१ आनुवंशिकता (स्त्री.) २ वंशपरंपरा (स्त्री.)

herein
इथे, येथे, यात, या ठिकाणी

hereinafter
यात, यापुढे

hereinbefore
यात, यापूर्वी

heretofore
यापूर्वी, या अगोदर

hereunder
याखाली

hereupon
यानंतर

herewith
यासोबत, यासह

heritage
Law १ वारसा (पु.) २ वंशार्जित संपत्ति (स्त्री.) legacy

hermit
आश्रमवासी (पु.)

hermitage
आश्रम (पु.)

hernia
Med. अंतर्गळ (पु.)

hero
१ वीर (पु.) २ नायक (पु.) ३ विभूति (स्त्री.)

hero worship
विभूतिपूजा (स्त्री.)

heroic
वीरश्रीयुक्त, वीरश्रीचा

heroine
नायिका (स्त्री.)

heroism
मर्दुमकी (स्त्री.), वीरश्री (स्त्री.)

hers
possessive तिचा

herself
ती स्वतः

hesitant
अनिश्चयी, डळमळीत

hesitate
१ का कू करणे २ चाचरणे

hesitation
१ अनिश्चय (पु.), डळमळीतपणा (पु.) २ संदेह (पु.)

hessian
गोणपाट (न.) (coarse sacking of hemp or hemp and jute)

heterogeneity
१ बहुजिनसीपणा (पु.) २ बहुजातीयता (स्त्री.)

heterogeneous
१ बहुजिनसी २ बहुजातीय

heterogeneousness
heterogeneity

hew
१ तोडणे, कापणे २ घाव घालणे

hexagon
Math. षट्कोन (पु.)

hexagonal
षट्कोनी

heyday
१ बहर (पु.) २ भरभराट (स्त्री.)

hiccup
उचकी (स्त्री.)

hiccup
उचकी देणे, उचकी लागणे

hidden
१ लपवलेला, लपलेला २ प्रच्छन्न ३ अज्ञात

hide
लपवणे, लपणे

hide
कातडे (न.)

hideous
हिडीस

hideously
हिडीसपणे

hideout
लपून राहण्याची जागा (स्त्री.), लपण (स्त्री.)

hierarchy
अधिकारश्रेणी (स्त्री.)

higgle
घासाघीस करणे

high
१ उंच, उच्च २ (dignified, eminent) श्रेष्ठ ३ अतिशय

high
उंच

high
कमाल पातळी (स्त्री.)

high born
उच्चकुलीन

high bred
उच्चकुलीन

high class
१ श्रेष्ठ प्रतीचा २ उच्चवर्गीय

high commission
उच्च आयोग (पु.)

high court
उच्च न्यायालय (न.)

high degree
उच्च प्रमाण (न.)

high diligence
अतिशय सापेक्ष (पु.)

high explosive
अतिस्फोटक

high explosive
अतिस्फोटक पदार्थ (पु.)

high flown
(as language) अलंकारिक

high grade
१ उच्च श्रेणी (स्त्री.) २ उच्च प्रत (स्त्री.)

high handed
अरेरावीचा

high handedness
अरेरावी (स्त्री.)

high power
उच्चाधिकार- (as in high power committee उच्चाधिकार समिति)

high school
माध्यमिक शाळा (स्त्री.), प्रशाला (स्त्री.)

high seas
मुक्त सागर (पु.) (sea beyond territorial jurisdiction)

high sounding
अवडंबरी

high sounding words
शब्दावडंबर (न.)

high spirited
तडफदार, तेज

high strung
अतिहळवा

high temperature
१ खूप ताप (पु.) २ प्रखर तपमान (न.)

high tide
भरती (स्त्री.)

high time
फार वेळ (पु.)

high treason
घोर राष्ट्रद्रोह (पु.)

high water
high tide

highbrow
उच्चभ्रू

highbrow
उच्चभ्रू (सा.)

higher
१ उच्च, उच्चतर २ वरचा

higher authority
वरचा प्राधिकारी (सा.)

higher grade
वरची श्रेणी (स्त्री.)

higher secondary school
उच्च माध्यमिक शाळा (स्त्री.)

higher stage
वरचा टप्पा (पु.)

higher start
उच्चतर प्रारंभिक वेतन (न.)

highest
सर्वाएच्य, उच्चतम

highest bidder
सर्वाएच्य बोली बोलणारा (पु.) सर्वाएच्य बोलीदार (सा.)

highest rank
उच्चतम दर्जा (पु.)

highland
गिरिभूमि (स्त्री.)

highlight
ठळकपणे निदर्शनास आणणे

highlights
ठळक वैशिष्ट्ये (न.अ.व.)

highly
१ अत्यंत, अति २ गौरवपूर्वक

highly coloured
१ अतिरंजित २ गडद रंगाचा

highly inflammable
शीघ ज्वालाग्राही

highway
महामार्ग (पु.)

highway robbery
वाटमारी (स्त्री.)

highwayman
वाटमाऱ्या (पु.)

hike
पायी भटकणे

hill
टेकडी (स्त्री.)

hill allowance
गिरि भत्ता (पु.)

hill cattle
पहाडी गुरेढोरे (न.अ.व.)

hill station
थंड हवेचे ठिकाण (न.)

hillock
टेकाड (न.)

hilly
डोंगराळ

hilly country
डोंगराळ प्रदेश (पु.)

him
त्याला

himself
तो स्वतः

hind
मागचा, पाठीमागचा

hinder
विघ्न आणणे, बाधा आणणे bar

hindrance
विघ्न (न.), अडथळा (पु.)

hinduism
१ हिंदू धर्म (पु.) २ हिंदुत्व (न.)

hint
१ इशारा देणे २ सूचित करणे convey

hint
१ इशारा (पु.) २ सूचनिका (स्त्री.)

hinterland
पार्शवप्रदेश (पु.)

hire
१ भाड्याने घेणे, भाड्याने देणे २ मजुरीने लावणे

hire
भाडे (न.), किराया (पु.)

hire purchase
भाडे खरेदी पद्धति (स्त्री.)

hire purchase
भाडे खरेदी-

hire purchase agreement
भाडे खरेदी करार (पु.)

hireling
भाडोत्री(सा.), हस्तक (सा.)

hirer
१ भाड्याने घेणारा (पु.) २ भाड्याने देणारा (पु.)

his
त्याचा

his excellency
परमश्रेष्ठ

his excellency the Governer
परमश्रेष्ठ राज्यपाल (सा.)

his Majesty in Council
सपरिषद सम्राट (पु.)

histology
ऊतिशास्त्र (न.)

historian
इतिहासकार (सा.)

historic
ऐतिहासिक, ऐतिहासिक महत्त्वाचा

historic interest
ऐतिहासिक जिज्ञासा

historic significance
ऐतिहासिक महत्त्व (न.)

historical monument
ऐतिहासिक स्मारक (न.)

historical process
इतिहास प्रक्रिया (स्त्री.)

history
१ इतिहास (पु.) २ वृत्त (न.) ३ पूर्ववृत्त (न.)

history of service
सेवावृत्त (न.)

history sheet
पूर्ववृत्त पत्रक (न.)

history ticket
वृत्तक (न.)

histrionic
अभिनयासंबंधी, अभिनय-

hit
१ ठोकणे २ प्रहार करणे ३ टोला मारणे ४ लागणे

hit
१ ठोका (पु.) २ प्रहार (पु.) ३ टोला (पु.)

hitch
अडकवणे, जुंपणे

hitch
अडथळा (पु.)

hither
इकडे, या बाजूस

hither
इकडचा, इकडील

hitherto
आतापर्यंत

hive
१ मधुमक्षिकालय (न.) २ गजबजलेली जागा (स्त्री.)

hlinge
बिजागर (न.), बिजागरी (स्त्री.)

hoard
अपसंचय (पु.)

hoard
अपसंचय करणे, साठेबाजी करणे collect

hoarding
१ अपसंचय (पु.), साठेबाजी (स्त्री.) २ (a screen of boards for display of bills) जाहिरातफलक (पु.)

hoarse
घोगरा

hoax
फसगत (स्त्री.)

hoax
फसगत करणे

hobby
छंद (पु.)

hockey
हॉकी (स्त्री.)

hoe
१ कुदळ (स्त्री.) २ फावडे (न.)

hoe
कुदळीने खणणे, कुदळणे

hoeing
१ कुदळीने खणणे (न.) २ Agric. कुदळणी (स्त्री.)

hoist
१ उभारणे २ वर उचलणे

hoist
१ उच्चलन (न.) २ उच्चलनयंत्र (न.)

hoisting of flag
ध्वजारोहण (न.)

hold
१ धरणे, धरुन ठेवणे २ (as land, post etc.) धारण करणे ३ मावणे ४ समजणे, मानणे ५ (as an election) (निवडणूक) घेणे ६ (as a meeting) (सभा) भरवणे ७ निर्णय देणे

hold
१ पकड (स्त्री.) २ (of a ship) जहाजावरील कोठी (स्त्री.)

hold a lien
धारणाधिकार असणे

hold a sitting
बैठक भरवणे

hold a trial
न्यायचौकशी करणे

hold all
सर्वधर (पु.), प्रवासी बिस्तरा (पु.)

hold an office
पद धारण करणे

hold good
लागू असणे, लागू होणे, लागू पडणे

hold in abeyance
आस्थगित ठेवणे, आस्थगित करणे

hold over
१ (to postpone) तहकूब करणे २ Law (to continue in occupancy of land or exercise the powers of an office beyond the limits of the term set or fixed) अतिधारण करणे

hold up
१ रोखून ठेवणे २ थांबणे

holder
१ टाक (पु.) २ - धारी (सा.), धारक (सा.)

holder of a post
पदधारक (सा.)

holder of an office of profit
लाभपदधारक (सा.)

holding
धारणजमीन (स्त्री.)

holding company
सूत्रधारी कंपनी (स्त्री.)

hole
छिद्र (न.)

holiday
१ सुटी (स्त्री.) २ सण (पु.)

holiday allowance
सुटी भत्ता (पु.)

holiday camp
सुटी शिबिर (न.)

holiday with pay
सवेतन सुटी (स्त्री.)

hollow
खळगा (पु.)

hollow
पोकळ

hollow out
पोखरणे

holocaust
सर्वनाश (पु.)

holograph
स्वलेख (पु.), संपूर्ण आलेख (पु.)

holy
पावन, पवित्र

holy place
तीर्थक्षेत्र (न.)

homage
आदरांजली (स्त्री.) (respect or reverential regard)

home
१ गृह (न.), घर (न.) २ (native land) स्वदेश (पु.) ३ मूळ ठिकाण (न.)

home
१ (carried on in one's own country, domestic) देशांतर्गत २ मूळ (as in home state मूळ राज्य) ३ गृह- (to bring home to - च्या गळी उतरवणे)

home consumption
देशांतर्गत खप (पु.)

home guard
होमगार्ड (सा.)

home guards
होमगार्ड दल (न.)

home industry
गृह उद्योग (पु.)

home life
गृहजीवन (न.)

home made
१ घरगुती २ स्वदेशी

home of family
कुटुंबाचे मूळ ठिकाण (न.)

home police
गृहपोलीस (पु.)

home port
घर बंदर (न.)

home rule
स्वराज्य (न.)

home science
गृहविज्ञान (न.)

home town
स्वग्राम (न.), मूळ गाव (न.)

home trade
देशांतर्गत व्यापार (पु.)

homeless
गृहहीन, बेघर

homeopathy
homoeopathy

homestead
घरवाडी (स्त्री.), वास्तु (स्त्री.) (the land and buildings thereon occupied by the owner as a home for himself and his family)

homestead farm
घरशेत (न.)

homestead right
घरवाडी अधिकार (पु.), वास्तु अधिकार (पु.)

homework
गृहपाठ (पु.)

homicidal
मनुष्यवधासंबंधी

homicide
Law मनुष्यवध (पु.)

homily
उपदेशपाठ (पु.), बोधचऱ्हाट (न.)

homoeopathy
समचिकित्सा (स्त्री.)

homogeneity
१ एकजिनसीपणा (पु.) २ एकजातीयता (स्त्री.)

homogeneous
१ एकजिनसी २ एकजातीय

homogeneousness
homogeneity

homologous
१ समजातीय, समधर्मीय २ समरचनात्मक

honest
प्रामाणिक

honestly
प्रामाणिकपणे

honesty
प्रामाणिकता (स्त्री.), प्रामाणिकपणा (पु.), सचोटी (स्त्री.)

honey
मध (पु.)

honey been
मधमाशी (स्त्री.)

honeycomb
पोळे (न.), मोहळ (न.)

honorarium
मानधन (न.), मानद्रव्य (न.) salary

honorary
मानसेवी, मान-

honorary service
मानसेवा (स्त्री.)

honorific
सन्मानदर्शक

honorific
सन्मानोल्लेख (पु.)

honorific title
सन्मानदर्शक पदवी (स्त्री.)

honour
१ प्रतिष्ठा राखणे २ मान देणे, मान करणे, सन्मान करणे ३ गौरव करणे ४ (as cheques etc.) स्वीकारणे

honour
१ प्रतिष्ठा (स्त्री.), आदर (पु.) २ मान (पु.), सन्मान (पु.) ३ गौरव (पु.) ४ मानचिन्ह (न.), सन्मानचिन्ह (न.)

honour a cheque
धनादेश स्वीकारणे

honourable
माननीय, मानार्ह, सन्मान्य

honourable member
माननीय सदस्य (सा.)

honourable relations
सन्मान्य संबंध (पु.अ.व.)

honourably
मानाने

honourably acquitted
मानाने दोषमुक्त

honoured
१ सन्मानित २ स्वीकारलेला

honoured bill
स्वीकारलेली हुंडी (स्त्री.)

honours
१ Educ.(a grade of academic distinction awarded for high proficiency) सन्मान (पु.) २ सन्मानचिन्हे (न.अ.व.) (as in posthumous honours मरणोत्तर सन्मानचिन्ह)

hoodwink
टोपी घालणे, फसगत करणे

hoof
खूर (पु.)

hook
आकडा (पु.), गळ (पु.)

hook worm
जंत (पु.)

hooligan
मवाली (पु.), गुंड (पु.)

hooping cough
whooping cough

hooter
(गिरणी वगैरेचा) भोंगा (पु.)

hope
आशा करणे, आशा धरणे, आशा बाळगणे

hope
आशा (स्त्री.), उमेद (स्त्री.)

hopeful
आशादायक

hopefully
आशेने

hopeless
१ हताश २ हाताबाहेरचा (as in hopeless case हाताबाहेरचा रुग्ण) ३ (as a person) कुचकामाचा

hopelessly
हताशपणे

hopelessness
हताशपणा (पु.)

horde
टोळके (न.)

horizon
क्षितिज (न.)

horizontal
१ क्षैतिज, क्षितिजसमांतर, क्षितिज- २ आडवा ३ समस्तर

horizontal method
Com. समस्तर पद्धति (स्त्री.)

hormone
Med. संप्रेरक (पु.), हारमोन (पु.)

horn
१ शिंग (न.), शृंग (न.) २ (of a car) पोंगा (पु.)

horoscope
जन्मपत्रिका (स्त्री.), जन्मकुंडली (स्त्री.)

horrible
भयंकर, भयकारी

horrid
भयानक, भीषण

horrify
भीती निर्माण करणे

horror
अतिभय (न.), भयानकता (स्त्री.)

horse power
Mech. अश्वशक्ति (स्त्री.)

horse racing
घोड्यांच्या शर्यती (स्त्री.अ.व.)

horticultural
१ उद्यानविषयक २ बागायती

horticultural crops
बागायती पिके (न.अ.व.)

horticultural operations
उद्यानविषयक कामे (न.अ.व.)

horticulture
उद्यानविद्या (स्त्री.)

horticulturist
उद्यानविद्यावेत्ता (पु.)

hose
१ मोजा (पु.) २ लवचिक नळी (स्त्री.)

hosepipe
लवचिक नळ (पु.)

hosier
विणकाम विक्रेता (पु.)

hosiery
विणमाल (पु.), मोजेकाम (न.)

hospitable
आतिथ्यशील

hospital
रुग्णालय (न.) asylum उपचारगृह clinic चिकित्सालय dispensary दवाखाना infirmary अपंगालय nursing home शुश्रूषालय sanatorium आरोग्यधाम

hospital leave
रुग्णालयीन रजा (स्त्री.)

hospitalisation
रुग्णालयात ठेवणे (न.)

hospitalise
रुग्णालयात ठेवणे

hospitality
आतिथ्य (न.), पाहुणचार (पु.)

host
१ चमू (पु.) २ घोळका (पु.) ३ यजमान (पु.)

hostage
ओलीस ठेवलेला (पु.) (one kept in the hands of an enemy as a pledge)

hostel
वसतिगृह (न.)

hostile
१ शत्रुत्वाचा, वैरभावाचा २ (adverse) प्रतिकूल

hostile possession
प्रतिकूल कब्जा (पु.)

hostile witness
१ उलटलेला साक्षीदार (सा.) २ प्रतिकूल साक्ष (स्त्री.)

hostilities
युद्ध (न.)

hostility
वैर (न.), वैरभाव (पु.), शत्रुत्व (न.)

hot
१ उष्ण, गरम २ तापट ३ तिखट

hot plate
१ शेगडी (स्त्री.) २ आच तबकडी (स्त्री.)

hot pursuit
निकराचा पाठलाग (पु.)

hot spell
ऊष्माकाल (पु.)

hot spring
उष्ण झरा (पु.), उन्हाळे (न.)

hot tempered
शीघकोपी, तापट

hotbed
१ आढी (स्त्री.) २ Fig.(a place favourable to rapid growth or development) पोषस्थान (न.)

hotchpotch
काला (पु.), खिचडी (स्त्री.)

hotel
हॉटेल (न.) restaurant

hotel keeper
हॉटेलवाला (पु.)

hour
१ तास (पु.) २ वेळ (स्त्री.) ३ काळ (पु.) ४ (an occasion) प्रसंग (पु.)

hours
वेळा (स्त्री.अ.व.), तास (पु.अ.व.) (as in working hours कामाच्या वेळा, कामाचे तास)

housage
Law (a fee for housing goods) आगारशुल्क (न.)

house
१ घर (न.), गृह (न.) २ आवास (पु.) (as in house officer आवास अधिकारी) ३ (of Parliament or State Legislature) सभागृह (न.)

house
१ निवारा देणे २ जागेची सोय करणे

house accommodation
निवासव्यवस्था (स्त्री.)

house boat
गृहनौका (स्त्री.), शिकारा (पु.)

house breaker
Law घरफोड्या (पु.)

house breaking
Law घरफोडी (स्त्री.)

house master
गृहपर्यवेक्षक (सा.) (one who supervises over the government hostels for backward classes)

house of correction
सुधारगृह (न.)

house of legislature
विधानमंडळाचे सभागृह (न.)

house of people
लोकसभा (स्त्री.)

house patient
आवासी रुग्ण (सा.) (indoor patient)

house rent
घरभाडे (न.)

house rent allowance
घरभाडे भत्ता (पु.)

house surgeon
आवास शल्यचिकित्सक (सा.)

house tax
घरपट्टी (स्त्री.)

house trespass
Law गृह अपप्रवेश (पु.)

household
१ कौटुंबिक २ गृहोपयोगी, घरगुती

household
१ (family) कुटुंब (न.) २ परिवार (पु.)

household effects
घरगुती चीजवस्तू (स्त्री.अ.व.)

household furniture
गृहोपयोगी फर्निचर (न.)

household goods
गृहोपयोगी माल (पु.)

household servant
घरगडी (पु.)

household stuff
गृहसामग्री (स्त्री.)

householder
गृहस्थ (पु.)

housemaid
मोलकरीण (स्त्री.)

houseman
आवासी (पु.)

housewife
गृहिणी (स्त्री.)

housing
१ जागेची सोय (स्त्री.) २ गृहनिर्माण (न.)

housing board
गृहनिर्माण मंडळ (न.)

housing colony
गृहनिर्माण वसाहत (स्त्री.)

housing loan
गृहनिर्माण कर्ज (न.)

housing society
गृहनिर्माण संस्था (स्त्री.)

hover
१ घिरट्या घालणे २ तरंगणे

how
कसे, कोणत्या प्रकारे

how many
किती

how much
किती

however
तथापि, तरी, तसे असताही

howler
हास्यास्पद चूक (स्त्री.) (a stupid and ridiculous blunder)

howsoever
कोणत्याही तऱ्हेने, कितीही

howsoever otherwise
अन्यथा कोणत्याही तऱ्हेने, अन्यथा कसेही असले तरी

hub
१ (the nave of a wheel) हब (पु.) २ Fig. (central point of interest etc.) केंद्र (न.)

hubbub
गलका (पु.), गलबला (पु.)

huddle
दाटीवाटीने बसणे

huddle
गोंधळ (पु.)

hue
वर्णच्छटा (स्त्री.)

hue and cry
आरडाओरड (स्त्री.)

huge
बेफाट, अवाढव्य, भव्य

hull
१ (of rice) तूस (न.), टरफल (न.) २ (of a ship) सांगाडा (पु.)

hull
टरफले काढणे, सालपट काढणे, तूस काढणे, सोलणे

hullabaloo
हल्लकल्लोळ (पु.)

huller
टरफले काढण्याचे यंत्र (न.), सोलणी यंत्र (न.)

human
मानवी, मानव- माणुसकीचा

human dwelling
मानव वसतिस्थान (न.)

human law
मानवी विधि (पु.), मानवी कायदा (पु.)

human rights
मानवी अधिकार (पु.अ.व.)

humane
माणुसकीचा, भूतदयाशील

humanism
मानवतावाद (पु.), मानव्य (न.)

humanist
मानवतावादी (सा.)

humanistic
मानवतावादी

humanistic science
मानवविज्ञान (न.)

humanitarian
मानवतावादी (सा.)

humanitarianism
भूतदयावाद (पु.)

humanities
मानवविज्ञान (न.)

humanity
१ मानवजाति (स्त्री.) २ मानवता (स्त्री.)

humble
विनीत, नम्र

humbly
नम्रपणे

humbug
भंपकपणा (पु.)

humdrum
रटाळ

humid
दमट, आर्द्र

humidity
दमटपणा (पु.) आर्द्रता (स्त्री.)

humiliate
पाणौतारा करणे

humiliation
पाणौतारा (पु.)

humility
शालीनता (स्त्री.), नम्रता (स्त्री.)

humorous
विनोदी

humour
१ विनोद (पु.) २ मनस्थिति (स्त्री.) (to be in good humour चांगल्या मनस्थितीत असणे)

hundred
शंभर, शत, -शे

hundreds
शेकडो (लोक, वस्तु वगैरे)

hundredth
शतांश (पु.)

hunger
भूक (स्त्री.)

hunger bitten
क्षुधार्त

hunger strike
अन्नसत्याग्रह (पु.)

hungry
भुकेला, क्षुधित

hunt
१ शिकार करणे २ माग काढणे ३ शोध घेणे

hunt
१ शिकार (स्त्री.) २ माग (पु.) ३ शोध (पु.)

hunter
शिकारी (पु.)

hunting
शिकार (स्त्री.)

huntsman
शिकारी (पु.)

hurdle
१ आडचौकट (स्त्री.) २ अडथळा (पु.)

hurl
फेकणे

hurricane
तुफान (न.), प्रभंजन (पु.)

hurry
घाई करणे

hurry
घाई (स्त्री.)

hurt
१ दुखापत करणे २ नुकसान करणे ३ दुखवणे

hurt
Law दुखापत (स्त्री.) damage

hurt
दुखापत झालेला

hurtle
आदळणे

husband
पति (पु.), नवरा (पु.)

husbandman
कृषीवल (पु.) farmer

husbandry
शेतीकाम (न.), कृषिकर्म (न.) agriculture

hush
नीरव

hush
नीरवता (स्त्री.)

hush money
मुखलेप (पु.) (money paid to secure silence)

hush up
दाबून टाकणे

husk
तूस (न.)

husk
(to strip off the external covering, as of fruits and seeds) तूस काढणे

hut
खोपटे (न.), झोपडी (स्त्री.)

hutment
कुटीर (न.)

hutments
झोपडपट्टी (स्त्री.)

hybrid
१ संकर (पु.) २ संकरज (सा.)

hybrid
संकरित

hybridisation
संकरण (न.)

hybridise
संकर करणे, संकर होणे

hydrant
नळखांब (पु.)

hydration
सजलीकरण (न.)

hydraulic
१ जलविषयक २ द्रविक, द्रवचलित

hydraulic engineer
जलव्यवस्था अभियंता (सा.)

hydraulic engineering
द्रव अभियांत्रिकी (स्त्री.)

hydraulic section
जलव्यवस्था विभाग (पु.)

hydraulics
द्रवगतिशास्त्र (न.)

hydro-
(used in comb.) जल-

hydro-therapeutics
Med. जलचिकित्सा (स्त्री.) hydro therapy

hydrocele
Med. अंडवृद्धि (स्त्री.)

hydrodynamics
द्रवगतिकी (स्त्री.)

hydroelectric
जलविद्युत-

hydroelectric centre
जलविद्युत केंद्र (न.)

hydroelectric power
जलविद्युत शक्ति (स्त्री.)

hydroelectricity
जलविद्युत (स्त्री.), पाणवीज (स्त्री.)

hydrogen
Chem. हायड्रोजन (पु.)

hydrogen bomb
हायड्रोजन बॉम्ब (पु.)

hydrograph
जलआलेख (पु.)

hydrography
जलआलेखन (न.)

hydrology
जलविद्या (स्त्री.)

hydrometer
तरकाटा (पु.)

hydropathy
जलचिकित्सा (स्त्री.)

hydrophobia
Med. आलर्क (पु.), जलभी (स्त्री.)

hydrothermal
उष्णजलीय

hygiene
आरोग्यशास्त्र (न.)

hygienic
१ आरोग्यपूर्ण २ आरोग्यविषयक

hygienic report
आरोग्यविषयक प्रतिवेदन (न.)

hygrometer
आर्द्रतामापी (पु.)

hyperacidity
अत्याम्लता (स्त्री.)

hypercritical
अतिचिकित्सक

hyphen
सांधरेघ (स्त्री.), संयोगचिन्ह (न.)

hypnotic
संमोहनकारी

hypnotic
संमोहन द्रव्य (न.)

hypnotism
संमोहन विद्या (स्त्री.)

hypnotist
संमोहक (सा.)

hypocrisy
दंभ (पु.)

hypocrite
दांभिक (सा.)

hypothecate
Law तारणगहाण ठेवणे

hypothecation
Law तारणगहाण (न.)

hypothecator
Law तारणगहाणकर्ता (पु.)

hypothesis
१ गृहीतकृत्य (न.) २ प्रमेय (न.)

hypothetical
गृहीतकृत्यात्मक

hysteria
उन्माद (पु.)

hysteric
१ उन्मादासंबंधी २ उन्मादग्रस्त hysterical