वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा
There are currently 27 names in this directory beginning with the letter Z.
z chromosome
झ रंगसूत्र य रंगसूत्राऐवजी वापरलेली संज्ञा, दोन्हीपैकी एक रंगसूत्र स्त्री संततीस जबाबदार असते.
zero point
शून्य बिंदू वनस्पतीला जिवंत राहून सहन करता येण्याजोगे ज्यास्तीत ज्यास्त व कमीत कमी तापमान, भिन्न वनस्पतीत हे बिंदू भिन्न असतात.
Zingiberaceae
शुण्ठी कुल झिंजिवरेसी आले (शुण्ठ), हळद, सुवर्णपुष्प, सोनटक्का (पांढरा), कोळिजन, वेलची इत्यादी वनस्पतींचे लहान कुल. याचा अंतर्भाव एंग्लर व प्रँटल आणि बेंथॅम व हूकर यांनी सिटॅमिनी गणात केला असून हचिन्सन यांनी झिंजीबरेलीझ या स्वतंत्र गणात केला आहे. प्रमुख लक
zonation
क्षेत्रीभवन हवामान, भूमी, भूपृष्ठाचा आकार इत्यादीतील फरकांमुळे वनश्रीत कमी जास्त आकारमानाचे वनस्पतींचे पट्टे निर्माण होण्याची प्रक्रिया, एकाच अक्षांशातील सारख्या हवामानामुळे वनश्रीचा मोठा पट्टा (कटिबंध) निर्माण होतो. तसे आपल्या पृथ्वी भोवती अनेक वानस्पतिक
zoogamete
चरगंतुक, चलयुग्मक स्थानांतर करणारी प्रजोत्पादक कोशिका, ही सकेसल किंवा आदिजीवासारखी असते. उदा. नेचे, शैवले, शेवाळी, काही कवक इ.
zoogloea
श्लेष्मावस्था सूक्ष्मजंतूंची विष्यंदी (चिकट) आवरणात गुरफटून राहण्याची अवस्था, बहुधा अशा वेळी पोषक द्रवात ते तवंगरुपात असतात.
zoophobous
प्राणिद्वेषी हानिकारक प्राण्यांपासून आपले संरक्षण करून घेणारी (वनस्पती), प्राण्यांना टाळणारी.
zygomorphic
एकसमात्र एकाच उभ्या पातळीने दोन सारखे भाग करता येणारा (अवयव), उदा. घेवडा, वाटाणा, गोकर्ण इत्यादींची फुले हे लक्षण पुष्पसूत्रात किंवा संक्षिप्त वर्णनात दाखविण्याकरिता .l. हे आंतरराष्ट्रीय चिन्ह वापरतात. floral formula.
zygomycetes
गंतुबीजुक कवक, झायगोमायसेटीज (झायगोमायसेटी) शैवलकवक वर्गातील (फायकोमायसेटीज किंवा फायकोमायसेटी) एक उपवर्ग, यामध्ये लैंगिक प्रक्रिया घडून आल्यानंतर गंतुबीजुक बनते. तसेच बीजुककोशात अनेक अलिंगी बीजुके बनतात. नव्या वर्गीकरणात शैवल कवकांचे आठ गण केले आहेत.
zygophyllaceae
गोक्षुर (गोखरु) कुल, झायगोफायलेसी सराटा (गोखरु), धमासा, हरमल व लिग्नम व्हिटी इ. द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा समावेश हल्ली भांड गणात (जिरॅनिएलीझमध्ये) करतात (एंग्लर व प्रँटल आणि बेंथॅम व हूकर यांच्या पद्धतीमध्ये), हचिन्सन यांनी माधवी गणात (माल्पिधिएसीमध
zygospore
गंतुबीजुक, युग्माणू एक किंवा अनेक प्रकले असलेल्या दोन सारख्या गंतुकांच्या संयोगाने बनलेली जाड आवरणाची प्रजोत्पादक कोशिका उदा. म्यूकर बुरशी.
zygote
रंदुक, युग्मनज, युग्मज स्त्री गंतुक व पुं गंतुक यांच्या संयोगाने बनलेली संयुक्त प्रजोत्पादक कोशिका, उदा. काही शैवले, कवक, नेचे, शेवाळी, नेचाभ व बीजी वनस्पती gamete.
zygotene
झायगोटीन न्यूनीकरण प्रकारच्या कोशिका विभाजनातील पूर्वावस्थेत समजात रंगसूत्रांच्या वक्ररुप जोड्या बनणे. meiosis.
zymase
किण्वद्रव्य किण्वात (व इतर काही कवकात) आढळणारा क्रियाशील कार्बनी निदेशक (वितंचक) पदार्थ. yeast, enzyme.
zymogen
पूर्ववितंचक, वितंचकपूर्व, पूर्वविकर वितंचकापूर्वीचा (पूर्ववर्ती) व निदेशक नसलेला पदार्थ proenzyme.