वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
There are currently 31 names in this directory beginning with the letter X.
x
एक्स, क्ष एकगुणित रंगसूत्रांची संख्या, रंगसूत्रांची मूलभूत संख्या.

X chromosome
क्ष रंगसूत्र लिंगनिश्चिती करणाऱ्या दोन रंगसूत्रांपैकी एक.

x generation
एकगुणित पिढी, क्ष पिढी रंगसूत्रांचा एक संच असलेली कोशिका किंवा अनेक कोशिका असलेली संतती (प्राणी किंवा वनस्पती) त्यावरुन २ x generation (द्विगुणीत पिढी) म्हणजे दुप्पट रंगसूत्रे असलेली एक कोशिका किंवा अनेक कोशिक पिढी. n generation

xanth-
पीत- पिवळे या अर्थाचा ग्रीक उपसर्ग, मराठीत तसाच उपयुक्त. xantho-

xanthophyll
पर्णपीतक, पीतद्रव्य, झँथोफिल पाण्यात न विरघळणारे प्राकणूतील एक पिवळे रंगद्रव्य उदा. काटेरिंगणातील फळ (Solanum xanthocarpum schrad).

xanthorhamnin
झॅन्थोऱ्हॅम्निन रक्तरोहिडाच्या वंशातील (ऱ्हॅम्नस) जातींच्या पिकलेल्या फळातील पिवळे रंगद्रव्य

xenia
परप्रभाव, झेनिया जनक वनस्पतीच्या काही अवयवांवर परकीय परागाच्या संपर्काने (फलनामुळे) झालेला प्रत्यक्ष परिणाम, उदा. मक्याच्या कणसातील दाण्यांचे(पुष्काचे) भिन्न रंग.

xenocarpy
परफलोत्पत्ति परकीय गंतुकाच्या फलनामुळे फळ बनण्याची घटना.

xenogamy
परफलन, दूरस्थयुति. एकाच जातीतील दोन भिन्न व्यक्तीतील लैंगिक प्रक्रियेमुळे घडून आलेला गंतुकसंयोग. cross fertilisation. gaitonogamy

xerad
मरुवनस्पति रुक्ष ठिकाणी वाढणारी वनस्पती. xerophyte

xerarch succession
मरुद्भवी अनुक्रमण शुष्क (रुक्ष) स्थानात उगम पावणाऱ्या वनश्रीचा विकास व चरमावस्था.

xeric environment
मरु परिसर रुक्ष आसमंत (परिस्थिती).

xerochasy
शुष्कक्षेपण फळ सुकून तडकल्यामुळे होणारा बीजप्रसार उदा. संकेश्वर, एरंड, काटेधोत्रा इ. hydrochasy.

xerohylad
रुक्षपादप रुक्ष (सुक्या) जंगलातील झाड.

xerohylium
रुक्ष वन रूक्ष (सुक्या) जंगलातील वनस्पतींचा समुदाय.

xeromorphic
रुक्षतानुकूली शुष्क हवा, जमीन इत्यादीपासून अथवा सुकण्यास जबाबदार असणाऱ्या इतर बाबीपासून रक्षण करण्यास जलनाश कमी करण्याची योजना अथवा लक्षणे असणारी (वनस्पती)

xeromorphy
रुक्षतामुकूलन वर सांगितल्याप्रमाणे लक्षणे असण्याचा प्रकार.

xerophilous
रुक्षताप्रिय शुष्क ठिकाणी वाढणारी वनस्पती उदा. निवडुंग, घायपात, कोरफड इ. xerophile

xerophobous
रुक्षताद्वेषी शुष्क ठिकाणी न आढळणारी (वनस्पती), उदा. बहुतेक नेचे, शेवाळी इ.

xerophyte
मरुवनस्पती, मरुपादप मरुस्थलात (फार थोडा ओलावा असलेल्या ठिकाणी) वाढणारी वनस्पती, उदा. नागफणा, नेपती, शेंड, खजूरी, घायपात, रुई, घाणेरी इ.

xerophytic
मरुवानस्पतिक, मरुपादपीय मरुवनस्पतींप्रमाणे, मरुपादपांना योग्य स्थान, मरु वनस्पती असलेले (वन, समावास). xeric

xerophytism
मरुवानस्पतिकता, मरुपादपता. मरुवनस्पतीची लक्षणे (पाने फार लहान असणे किंवा नसणे, मांसल शरीर, मेणचट लेप, केसाळपणा, काटेरी आवरण इ.)असण्याचा प्रकार.

xerosere
मरुस्थलीय क्रमक, शुष्कवासीय क्रमक पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या ठिकाणी क्रमाने बदलत जाणाऱ्या पादप समुदायाची अवस्था अथवा तो समुदाय. xerarch succession

xerotherous
उन्हाळी, ग्रीष्मानुकूल उन्हाळ्यातील हवामानाशी अनुयोजना असणारी (वनस्पती, पिके).

xerotropism
शुष्कनानुवर्तन सुकून जाण्याविरुद्ध संरक्षण मिळण्याकरिता वनस्पतींनी किंवा त्यांच्या अवयवांनी केलेला स्थितीतील बदल (बदल करण्याची प्रवृत्ति).

xiphioid
खड्गाकृति, अस्याकार ensiform.

xiphiophyllous
असिपर्णी तरवारीसारखी पाने असलेले, उदा. बाळवेखंड, आयरिस, बेलमकँदा.

xylem
प्रकाष्ठ उउच्च वनस्पतींत पाण्याची (व त्यात विरघळलेल्या) क्षारांची ने आण करणाऱ्या कठीण आवरणाच्या व मृत कोशिका व नलिका यांचा संच x. island इतरांपासून तुटक असलेला प्रकाष्ठाचा भाग, उदा. थंबर्जिया x. parenchyma प्रकाष्ठ मृदुतक प्रकाष्ठाच्या सान्निध्यात

xylochrome
काष्ठवर्ण मध्यकाष्ठाच्या गडद रंगाबद्दल जबाबदार असलेल्या टॅनीन, गोंद आणि राळ यासारख्या पदार्थांचे मिश्रण.

xylogenous
काष्ठवासी. लाकडात किंवा लाकडावर राहणारे.

xylophilous
काष्ठप्रिय मृत लाकडावर वाढणारे (कवक).