वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा
There are currently 42 names in this directory beginning with the letter W.
wall formtion
तट (भित्ति, भित्तिका) निर्मिती नग्न कोशिका (प्राकल खंड) भोवती अथवा बहुप्रकल प्राकलामध्ये तट (भिंती) निर्माण होणे, कोशिका विभाजनात तटनिर्मिती होऊन दोन कोशिका बनतात.
water bloom
जलबहार तळी व डबकी यांतील कायम पाण्याच्या पृष्ठावर गरम हवेत एकाएकी येणारा (निळ्या हिरव्या शैवलांचा) तवंग.
water cell
जलकोशिका मांसल वनस्पतींच्या पानातील (किंवा पर्णहीन खोडातील) पाणी साठवून ठेवणारी व बहुधा त्वक्षीय पदार्थाने वेढलेली कोशिका.
water culture
जलसंवर्धन आवश्यक ते क्षार पाण्यात मिसळून (विरघळून) केलेल्या विलयनात किंवा विलयनाच्या साहाय्याने वनस्पती वाढविण्याची प्रक्रिया w.dispersal जल विकिरण पाण्याचे साहाय्याने प्रसाराची पद्धत, उदा. नारळ w. leaf जलपर्ण सदैव पाण्यात राहणारे व अतिशय विभागलेले पान
waxy
मेणचट मेणाचा पातळ थर किंवा मेणाच्या बारीक केसांचा थर असलेले. यामुळे पानावरचे पाणी न चिकटता गळून पडते. तसेच बाष्पीभवनापासून वनस्पतींचे संरक्षण होते. उदा. मरुवनस्पती, उसाच्या खोडाचे कांडे, घायपाताचे पान glaucous.
weeping
१ दोलित, लोंबते २ स्त्रवण १ लोंबणाऱ्या पानांचे अथवा शाखांचे (झाड), उदा. (विलो) वाळुंज, हिरव्या अशोकाचा एक प्रकार. २ जखमेतून अति रक्तस्त्राव होण्याचा प्रकार, उदा. द्राक्षवेल, भूर्ज
whip shaped
प्रतोदरुप चाबकासारखा उदा. उसाच्या अक्षाची लांब चाबकासारखी वाढ होऊन त्यावर काणी रोगाची (smut) काळी बीजुके तयार होतात. flagelliform
wilt (disease)
मर, ग्लानि (रोग) अवयव कोमेजून लोंबण्याचे लक्षण असलेले रोग, बटाटा, जवस इत्यादीवर आढळतो.
wilting coefficient
म्लानिगुणक वनस्पतीची पाने पाण्याअभावी लोंबू लागतात त्यावेळचे जमिनींतील पाण्याचे प्रमाण.
wing
पक्ष, पंख १ कोणत्याही अवयवांवर (देठ, फळ, बीज, खोड) असलेला पातळ पापुद्र्यासारखा विस्तार (पसरट भाग). २ पतंगरुप पुष्पमुकुटाची बाजूची पाकळी papilionaceous. ala
winged (alate fruit)
सपक्ष फल ंपंखधारी फळ. फलावरणावरील पातळ विस्तृत उपांग असलेले फळ. उदा.बिबला, अर्जुनसादडा, जखमी, अंजन, शिसवे, माधवलता इ. अनेक पंखांचा उगम छदे, संवर्त (संदले), परिदले यापासून होतो (उदा. साल, चालन, लिंडेन इ.) samara
winged seed
पक्षधारी बीज, सपक्ष बीज बीजावरणावर असलेला पंखासारखा विस्तार उदा. शेवगा, तूण, टेटू, वावळा इ.
witches broom
केरसुणी रोग, गोसावी रोग कवक किंवा काही कीटक यांमुळे झाडांना फक्त बारीक शाखांचे झुबके धारण करावयास लावणारा रोग.
wood
काष्ठ, लाकूड, प्रकाष्ठ वनस्पतींतील लिग्नीयुक्त घटकांचा वाहक किंवा मजबुती देणारा भाग. w.fibre काष्ठसूत्र, प्रकाष्ठसूत्र प्रकाष्ठ भागात असलेला मृत, लांब, काष्ठयुक्त कोशिकावरणाचा घटक, पहा fibre, xylem. ऐw. land वनभूमी विशेषतः वृक्षांनी व्यापलेले स्थल
wood ray
प्रकाष्ठ किरण, काष्ठ किरण प्रकाष्ठातून त्रिज्येप्रमाणे जाणारे मृदूतकाचे पदर (पट्ट) w. autumn शरदकाष्ठ प्रकाष्ठाच्या प्रत्येक वार्षिक वलयातील सर्वात बाहेरचा लहान घटकाचा भाग, आतील भाग तत्पूर्वीचा (वसंत काष्ठ) w. cryptogamic अभिमध्य प्रकाष्ठ काही खोडातील
woody
काष्ठमय काष्ठ (लाकूड) असलेले (झाड, ऊतक, फळाची साल, तंतू इ.) w. tissue काष्ठोतक कठीण आवरणाच्या कोशिकांचा (बहुधा वाहिकांचा व वाहिन्यांचा) समूह
wool
ऊर्णा, लोकर मेंढी, बकरा, ऍल्पाक इ. प्राण्यांच्या कातडीवरील विशिष्ट प्रकारचे कुरळे केस, त्यावरुन वनस्पतींवरील मऊ, कुरळे, बारीक, लांब, दाट केस.
wound hormone
व्रण संप्रेरक जखम झालेल्या ऊतकात तयार होणारा व तेथे वनस्पतीच्या भागाचा विकास घडवून आणणारा पदार्थ w. parasite व्रणजीवोपजीवी जखमेतूनच शरीरात प्रवेश मिळविणारा व तेथेच नंतर उपजीविका करणारा अन्य सजीव. w. tissue व्रणोतक जखमेनंतर तेथे ऊतककरापासून बनलेला मृदु
wounding
व्रणन जखम होण्याची प्रक्रिया, पान, फूल, फळ किंवा फांदी बाहेरील घटकांमुळे तुटून जाऊन अक्षावरचा काही पृष्ठभाग किंवा आतील काही ऊतके उघडी पडणे.