वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
There are currently 109 names in this directory beginning with the letter V.
vacilans
विलोल मुक्तपणे हालणारे उदा. गवतांच्या व नागदवणाच्या फुलातील परागकोश

vacuolar
रिक्तिकासम कोशिकेतील पोकळीसारखे.

vacuolate
रिक्तिकायुक्त रिक्तिका (पोकळ जागा) असलेला (प्राकल, कोशिका, जीवद्रव्य).

vacuole
रिक्तिका प्राकलातील पोकळी, यामध्ये अनेकदा घन स्फटिक किंवा काही द्रव (अन्न किंवा टाकाऊ) पदार्थांचा साठा असतो.

vacuolization
रिक्तिकानिर्मिती रिक्तीका बनणे.

vagin
पिंगल द्रव्य काही नेचांमधील असा पदार्थ

vagina
आवरक पानाच्या तळाशी पात्याचे अगर देठाचे अथवा पर्णतलाचे खोडाभोवती असलेले आवरण, उदा. केळ गवत.

vaginate
आवरकी

vaginule
१ लघु आवरक, तिरोधान २ नलिका पुष्पक १ शेवाळीच्या दंडाच्या तळाशी असलेले आवरण, तिरोधान, अंदुककलशाचा खालचा अर्ध २ सूर्यफूल कुलातील नलिका पुष्पक.

valid name
प्रमाण नाम, सार्थ नाम, यथार्थ नाम आंतरराष्ट्रीय नामकरण पद्धतीप्रमाणे बनविलेले वनस्पतीचे अधिकृत नाव.

valid publication
प्रमाण प्रकाशन, सार्थ प्रकाशन वनस्पतींच्या वर्गीकरणातील एखाद्या एककाचे अनुवृत्त प्रकाशनाच्या पद्धतीप्रमाणे बनविलेले व त्याबरोबरच त्याचे वर्णन दिलेले अथवा तत्पूर्वीच्या अनवृत्त प्रकाशनाचा व वर्णनाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संदर्भ दिलेले प्रसिद्धीकरण.

vallecula
सीता बारीक पन्हळ, खोबण, कंगोऱ्यांमधील खोबणी उदा. धने, जिरे.

vallecular canal
सीतानाली पृष्ठावरील खोबणीसमोरील मध्यस्त्वचेतील अंतराकोशिकी पोकळ मार्ग उदा. एक्किसीटमचे खोड.

valvate
धारास्पर्शी फुलाच्या कळीतील परस्परांना स्पर्श करणारी (परिदले), उदा. रूईच्या पाकळ्या, जास्वंदीची संदले.

valve
१ शकल २ झडप १ फळ तडकून होणारे त्याचे स्वतंत्र भाग उदा. भडी, शिंबा, करंडक वनस्पतीच्या कोशिकावरणाच्या दोन्हीपैकी एक भाग (शकल). २ परागकोशाच्या आवरणाचा लहान भाग (झडप) उदा. दालचिनी. v.view शकल दृश्य करंडक वनस्पतीच्या दोन कोशिकावरणांपैकी एकाच्या पूर्ण पृष्ठाचे

valvular dehiscence
१ शकनस्फुटन २ सीवनस्फुटन १ परागगोशा झडपांनी तडकणे २ शिवणीवर फळ तडकून त्याची शकले होणे.

vaporisation
बाष्पीभवन, बाष्पन वाफेत रुपांतर होण्याची प्रक्रिया

variability
परिवर्तनशीलता फरक पडण्याची क्षमता (प्रवृत्ती).

variable
परिवर्तनशील, परिवर्ती फरक (भेद) पडण्याची (प्रवृत्ती) असलेले, उदा. सर्व सजीव.

variant
भेदजन्य, विभिन्न मूळ जातीत थोडा फरक पडून निर्माण झालेला प्रकार.

variation
भेद, विभिन्नता मूळच्या जातीपासून अल्पसा फरक अथवा बदल किंवा तो दर्शविणारा प्रकार. उदा. दुहेरी पाकळ्यांचा प्रकार, भिन्न रंगाची फुले असणारे वाण. v. acquired अर्जित किंवा संपादित भेद व्यक्तीच्या विकासावस्थेत परिस्थितीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष

varicose
अपिस्फित काही ठिकाणी विस्तारलेले, उदा. तंतुयुक्त अवयव.

variegated
शवल, विविधवर्णी अनियमितपणे रंगाचे किंवा इतर ठिपके पडलेले, उदा. क्रोटॉनची पाने, गुलबुशच्या काही प्रकारातील फुले.

variety
प्रकार जातीपेक्षा किंवा उपजातींपेक्षा खालच्या दर्जाचा वाण, एकाच जातीची सामान्य लक्षणे असूनही काही किरकोळ भेदांनी निराळेपण दर्शविणाऱ्या व्यक्तींचा गट. उदा. टोमॅटो, वांगी (हिरवट पांढरी, काळी, तांबूस पण पांढऱ्या रेषांची इ.) मिरच्या (लांबट, बुटक्या, लवंगी इ.)

vascular
वाहक, वाहिनीवंत १ वाहून नेण्याचे कार्य करणारी (कोशिका, नलिका इ.) २ वर सांगितलेल्या प्रकारचे विशेषत्व पावलेले घटक असलेली वनस्पती किंवा संरचना. v. bundle वाहक वृंद विशेषत्व असलेले वाहक घटक (संरचना) असलेला संच (गट). फक्त वाहिका अथवा वाहिका आणि वाहिन्या

vascular cylinder
वाहक चिति वाहक ऊतकांचा खोड, शाखा, मूळ इत्यादी अक्षरुप अवयवांतील केंद्रवर्ती समूह v. plant वाहिनीवंत वनस्पति वाहक ऊतके असलेली वनस्पती v. ray (pith ray) मज्जाकिरण प्रकाष्ठ व परिकाष्ठ यातून जाणारे भेंडाच्या ऊतकाचे पदर v. structure वाहक संरचना पाणी व अन्नरस

vasculum
वनस्पति (संग्राहक) पेटिका, व्हॅस्क्युलम वनस्पतींची पाहणी करण्यास वनसंचार करताना, काही वनस्पती जमवून त्यांचे नमुने आणण्याकरिता बरोबर ठेवलेली लहान व पत्र्याची बंदिस्त पेटी.

vase shaped
पुष्पपात्रसम, कलशाकृति, कुंभाकार कलशाप्रमाणे (कुंभ, तांब्या इ.) अथवा फुलदाणी प्रमाणे. vascularis

vasiform
दीर्घनालिकाभ लांबट नाळक्यासारखे

vector
रोगप्रवेशक रोगकारक सजीव नेणारा आणि दुसऱ्या सजीवात घालणारा सजीव (बहुधा कीटक).

vegetable
वानस्पतिक, शाक, वनस्पति वनस्पतींचे किंवा वनस्पतियुक्त, भाजी. v. acid शाकाम्ल वनस्पतीमध्ये सामान्यतः आढळणारे आम्ल v. anatomy वनस्पति शारीर वनस्पतींच्या शरीराची संरचना (अंतर्रचना) v. diet शाकाहार, वनस्पत्याहार फक्त वनस्पतियुक्त खाण्याचे पदार्थ.

vegetarian
शाकाहारी वानस्पतिक (वनस्पती अथवा तज्जन्य) पदार्थ खाणारे (प्राणी).

vegetate
वर्धन वनस्पतीप्रमाणे रुजणे अथवा वाढणे.

vegetation
वनश्री पृथ्वीवरील कोणत्याही लहान वा मोठ्या प्रदेशावरील नैसर्गिक वानस्पतिक आवरण अथवा सर्व वनस्पतींचा समूह. v. form १ वनस्पत्याकृति २ वनश्रीरुप वनस्पतींचा विशिष्ट आकार उदा. वृक्ष, क्षुप, उपक्षुप, औषधी, इत्यादी, बहुवर्षायु व वर्षायु असा यांमध्ये भेद करतात. २

vegetative
१ वर्धी २ शाकीय १ वाढणारी किंवा वर्धन घडविणारी २ पोषणाच्या अवयवांशी संबंधित v. bud कोरक वाढीस मदत करणारी कळी v. cell वर्धी कोशिका १ पराग कणातील दोन कोशिकांपैकी मोठी व पुढे परागनलिका निर्मिणारी २ सिलाजिनेलाच्या लघुबीजुकातील टोकास असलेली स्वतंत्र कोशिका. v.

vegetative multiplication
शाकीय गुणन शाकीय भागांच्या साहाय्याने संख्यावाढ करण्याची प्रक्रिया)  v. nucleus शाकीय प्रकल प्राकलातील प्रजोत्पादनाशी संबंध नसलेला प्रकल v. organ शाकीय अवयव प्रजोत्पादनाशी संबंध नसलेले पण वाढीशी बहुतांशी (पोषणाशी) संबंधित अवयव, उदा. पान, मूळ, खोड इ. v.

veil
गुंठन calyptra, velum.

vein
सिरा, शीर पान अथवा तत्सम सपाट अवयवांत पाणी व अन्नरस यांची ने आण करणाऱ्या ऊतकांची जुडी (वाहक वृंद)  v.costal (primary) प्राथमिक सिरा मध्य (मोठ्या) शिरेपासून निघणारी v. external (intramarginal) बाह्यसिरा पानाच्या किनारीजवळून त्याशी समांतर जाणारी शीर.

veined
सिराल, सिरायुक्त शिरा असलेले.

veining
सिराविन्यास शिरांची मांडणी

veinless
सिराहीन शिरा नसलेले

veinlet
सूक्ष्म (अंतिम) सिरा फार लहान शीर, सिराविभाजनातील सर्वात लहान शीर.

velamen
जलशोषी त्वचा पाण्याचे प्रत्यक्ष शोषण करणारी हवाई (वायवी) मुळावरची मृत, सच्छिद्र त्वचा, या त्वचेमुळे ती मुळे पांढरट दिसतात. उदा. आमरे व इतर काही अपि वनस्पती.

veld
मिश्र तृणक्षेत्र, व्हेल्ट नैसर्गिक तृणसंघाताचा एक प्रकार, दक्षिण आफिकेतील पठारावर या प्रकारचे गवताळ प्रदेश आढळतात, गवते खुरटी, कोरडी व झुबकेदार असतात, तसेच लहान वृक्ष तुरळकपणेच आढळतात. steppe. veldt.

velum
छदन १ भूछत्र्याच्या विकासामध्ये प्रारंभीचे आच्छादन, यामध्ये दांडा व छत्र दोन्ही झाकलेली असतात, पुढे याचे अवशेष छत्र व दांड्यावर आढळतात. २ आयसॉएटिसमध्ये पापुद्र्यासारखे आच्छादन (पुंजत्राण) बीजुककोशावर आढळते. veil

velutinous
मखमली सूक्ष्म व नरम केसामुळे किंवा पिंडिकेय (बारीक उंचवटे असलेल्या) अपित्वचेमुळे मखमलीसारखा पृष्ठभाग असलेले (उदा. अळूचे पान. अनेक फुलांच्या पाकळ्या), यामुळे अवयवांवर पडलेले पाणी पृष्ठभागास न चिकटता ओघळून जाते. velvety

venation
सिराविन्यास शिरांची मांडणी पद्धत, उदा. द्विशाख, जालरुप व समांतर   netted, reticulate

veneniferous
विषारी

venenose
अतिविषारी

venose
सिराल, शिरामय शिरा असलेले

venter
अंदुस्थली अंदुक कलशाचा तळचा विस्तृत भाग

ventilating tissue
विरलोतक, संवातन ऊति पानातील विवरयुक्त कोशिकांचा समूह (थर) spongy parenchyma

ventral
अधर, औदर, मुखीन उभ्या अक्षाशी काटकोनात असलेल्या व प्रकाशाकडे वळलेल्या पानाचा किंवा तत्सम सपाट अवयवाचा खालचा पृष्ठभाग, किंजदलाचा आतील पृष्ठभाग. v. canal cell उदरमार्ग कोशिका अंदुककलशाच्या अंदुस्थली (तळचा भाग) व मान (ग्रीवा) यामधील नळीसारख्या भागातील कोशिका

ventricose
एकतःशून एका बाजूने फुगलेले.

verbenaceae
साग कुल, व्हर्बिनेसी तिवर, साग (संगव), घाणेरी (टणटणी), निर्गुडी, व्हर्बिना, शिवण, डुरांटा, भारंगी, कडवी (कुईनेल) इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. या कुलाचा अंतर्भाव हल्ली तुलसी गणात (लॅमिएलीझ) करतात व क्रमविकासात हा गण फार प्रगत समजतात. प्रमुख लक्षणे -

vermicular
कृमिरुप काही ठिकाणी जाड व वाकलेले, उदा. काही झाडांची मुळे. vermiform

vernal
वासंतिक वसंत ऋतूत येणारे (असणारे) vernalis

vernal aspect
वासंतिक प्रभाव, वासंतिक दृश्य वसंत ऋतूतील देखावा, वनश्रीमध्ये अथवा पादप समुदायातील वनस्पतींची पाने गळणे, पालवी येणे अथवा त्यांना फुलांचा बहर येणे यामुळे विशिष्ट स्वरुप प्राप्त झालेला देखावा.

vernalisation
वासंतीकरण फुले येण्याकरिता वनस्पतींना, तापमानात बदल करून उद्युक्त करणे, हे दिवसाच्या कमी अधिक मोठेपणाशी संबंधित असते. photoperiodism.

vernation
पर्णसंबंध, कलिकारचना कलिकावस्थेतील पानांची मांडणी (परस्परसंबंध)

verrucose
चर्मकीलकी चामखिळ्या असलेले (आच्छादन, पृष्ठभाग इ.) verrucous

versatile
विलोल सहज हलणारे, चंचल (उदा. गवताच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलातील परागकोश)

versicolour
चंचल (तरल) वर्णी रंग बदलणारे, एक रंग बदलून दुसरा घेणारे, उदा. पारसा पिंपळाचे किंवा बदलरंग भेंडीचे फूल.

vertical
ऊर्ध्व, उदग्र, उभा क्षितीजाशी काटकोनात असलेले उभे (खोड, पान, इ.) भेंडीचे फळ, कांद्याची पात अथवा फुलोऱ्याचा दांडा, आयरिसचे पान.

verticil
मंडल, झुबका, वर्तुळ

verticillaster
पुंजवल्लरी अक्षाच्या एकाच किंवा प्रत्येक पेऱ्यावर समोरासमोर आलेल्या द्विपाद वल्लरीचे मंडल, फुले व प्राथमिक अक्ष फार लहान असल्याने सर्वांचा प्रमुख अक्षाभोवती दाट पुंजका बनतो. उदा. तुळस, सब्जा, दीपमाळ इत्यादींच्या मंजिऱ्या.

verticillate
मंडलित, चक्रीय, चक्री पुष्पदले, शाखा, पाने अथवा तत्सम अवयवांची चक्रासारखी मांडणी असण्याचा प्रकार, उदा. सातवीण, एक्किसीटम, कारा शैवल, सामान्यतः बहुतेक फुलातील दले. whorled

vesicle
पुटिका, आशयक लहान पोकळी अथवा पिशवीसारखा अवयव, उदा. गेळ्याची कीटकभक्षक वनस्पती, दृतिपर्ण (utricularia)

vessel
वाहिनी trachea.

vestige
अवशेष उरलेला भाग, एखाद्या अवयवाचा ऱ्हास होऊन शिल्लक राहिलेला भाग. उदा. पपईच्या स्त्री पुष्पातील केसरदले, काही फुलातील परागकोशहीन तंतू किंवा वंध्य किंजपुट (सूर्यफुलातील किरण पुष्पके)

vestigial
अवशिष्ट, अवशेषी अवशेषरुप अकार्यक्षम (अवयव)

vexillary
ध्वजकीय, ध्वजकरुप पतंगरुप फुलातील इतर पाकळ्यावर लपेटलेली ध्वजक पाकळी असलेले कळीतील पुष्पदलसंबंध (कलिकारचना) उदा. वाटाणा aestivation

vexillum
ध्वजक पतंगरुप फुलातील सर्वात मोठी पश्चस्थानी असलेली (निशाणासारखी) पाकळी papilionaceous  standard or banner

viability
अंकुरणक्षमता रुजण्याचे सामर्थ्य

viable
अंकुरणक्षम, जननक्षम रुजण्याची समर्थता असलेले (बीज, बीजुक इ.)

viabratile
कंपनक्षम, कंपशील थरथर कापण्याची क्षमता असणारे, पुढे व मागे गति प्राप्त करून देणारे (गति असणारे).

viatical
पथतटीय रस्त्याच्या कडेने वाढलेल्या (वनस्पती), उदा. अनेक तण.

vibrio
वक्रजंतु स्वल्पविरामासारखा सूक्ष्मजंतू, उदा. पटकीचा सूक्ष्मजंतू.

villous
लंबकेशी, तनुरोमी पृष्ठभागी लांब नरम केस असलेला (अवयव) villose

villus
लंबकेश, तनुरोम मृदु, बारीक, लांबकेस

vine
वेल वर चढणारी किंवा जमिनीवर पसरणारी दुर्बल वनस्पती, द्राक्षवेल (Vitis vinifera L.)

vinegar plant
सिर्का (व्हिनेगर) वनस्पति व्हिनेगर (सिर्का) तयार होण्यास जबाबदार असलेली कवक वनस्पती (Mycoderma aceti desmaz.)

vinicolor
सुरावर्ण मद्याचा (वाइनचा) रंग (गर्द किंवा जांभळट लाल). vinosus

violaceous
जांभळा, नीललोहित व्हायलेटच्या फुलासारखा रंग

virens
हरितवर्णी, हिरवे.

virescence
हरितभवन नित्याच्या रंगाऐवजी हरितद्रव्याच्या निर्मितीमुळे हिरवा रंग येणे.

virgate
१ वर्णरेषांकित २ लघुदंडाकृति, शलाकाकृति १ रंगाच्या रेघा असलेले २ लहान दांड्यासारखे

virgin soil
कोरी जमीन पूर्वी कोणत्याही वनस्पतींनी (वनश्रीने) न वापरलेली जमीन. v. forest अस्पृष्ट वन मानवाने प्रवेश (स्पर्श) न केलेले जंगल.

viridis
हिरवे, हरितवर्णी हिरव्या रंगाचे, उदा. एका आमराची जाती. (Habenaria viridiflora L.)

virolus
हिरवट काहीसे हिरवे, त्यावरुन सदाहरित (virent)

virosus
दुर्गंधी १ वाईट वास येणारी (वनस्पती अथवा फूल) २ विषारी. virose

virus
विषाणु, व्हायरस सजीव वनस्पती व प्राणी यांच्या शरीरांत प्रवेश करून तेथे रोग निर्माण करणारे, आपली प्रजोत्पत्ती करणारे पण सामान्यपणे सूक्ष्मदर्शकातून पुरेशी कल्पना येण्याइतपत सहज न दिसणारे सजीव द्रव्य. याला विशिष्ट आकार नसून सजीवांच्या शरीराबाहेर त्याची वाढ व पुनरुत्पत्ती होत नाही. इतर सजीवांप्रमाणे यातील जीवद्रव्य प्रभेदित नसते व कोशिका या संज्ञेत त्याचा समावेश होत नाही. सजीव व निर्जीव यांच्या सीमेवर अशी द्रव्ये असलेल्यांच्या गटात अशा विविध द्रव्यांचा समावेश होतो. देवी, सर्दी पडसे, कांजिण्या, इन्फ्लुएंझा, पीतज्वर, इत्यादी रोग विषाणूमुळे होतात, ज्या पडद्यातून सूक्ष्मजंतू जात नाहीत त्यातून विषाणू जातात.

viscid
चिकट, पिच्छिल श्लेष्मल (बुळबुळीत) पदार्थामुळे आलेला चिकटपणा viscidosus

viscous
विष्यंदी, श्यान चिकटपणा असलेले (पान, देठ, संवर्त, फळे इ.) उदा. पिवळ्या तिळवणीची पाने (cleome viscosa L.) प्राकलाची घटना.

vitaceae
द्राक्षा कुल, व्हायटेसी, ऍम्पेलिडेसी द्राक्षवेल, कांडवेल, दिंडा, आंबटवेल, बेंडरवेल, कर्कणी इत्यादी द्विदलिकित वेली वनस्पतींचे कुल. बेंथॅम आणि हूकर यांच्या पद्धतीनुसार बोर कुल व हे कुल यांचा समावेश ज्योतिष्मती गणात (सेलॅस्ट्रेसलीझमध्ये) केला गेला आहे. दोन्

vital
जैव जीवविषयक, जीवासंबंधी, प्राणी व वनस्पती यांतील जीवतत्त्वासंबंधी.

vitalism
जीवनवाद, प्राणतत्त्ववाद सर्व सजीवांचे वैशिष्ट्य मानली गेलेली (जैव) व जीवनाला निर्देशन करणारी आंतरिक प्रवृत्ति सर्व सजीवाद्वारेच व्यक्त होते असे मानणारी विचारप्रणाली. या उलट जडवाद विचारसरणीप्रमाणे सर्व जीवनव्यापार भौतिक, रासायनिक व यांत्रिक पद्धतीचे असून ते निर्जिव सृष्टीतही आढळतात.

vitalistic theory
जैवशक्तिवाद (सिद्धांत) वितंचनक्रिया (फसफसणे, आंबणे इ.) हा एक परिणाम असून तो घडून येण्याचे कारण काही वनस्पतीची वाढ व क्रियाशीलता (सूक्ष्मजंतू, बुरशी, किण्व) होय असे लुई पाश्चर यांचे मत.

vitality
जैवशक्ति, जीवनशक्ती जीवनातील विक्रिया व प्रक्रिया दर्शविण्याची क्षमता, उदा. बियांच्या बाबतीतील अंकुरणशीलता. परिस्थिति विज्ञानात पादपसमुदायातील भिन्न जातींनी दर्शविलेला जोम आणि उत्कर्ष.

vitamin
जीवनसत्त्व जैव प्रक्रियांना प्रेरणा देणारा वनस्पतींतील अतिरिक्त अन्नघटक अ,ब,क,ड,इ इत्यादी प्रकार.

viticolous
द्राक्षोपजीवी द्राक्षवेलीवर किंवा वेलीत उपजीविका करणारे उदा. द्राक्षावरील तंतुभरी (Plasmopara viticola) mildew. viticola

vitricole
काचस्थ, काचवासी काचेच्या बाटलीवर वाढणारे (दगडफूल, शैवाक)

vitta
१ तैलनलिका २ लंबसिरा १ सुगंदी (बाष्पनशील) तेल असलेली सूक्ष्म नळी, उदा. धने, जिरे, ओवा इ. (यांच्या फळावरच्या सूक्ष्म नळ्या). २ करंडक वनस्पतींच्या भिंतीवरील लांबट (उभ्या रेषा) pl. vittae

viviparous
अपत्यजनक १ फुलांऐवजी व त्यांच्या जागी कंदिका किंवा लहान वनस्पतींची निर्मिती करणारी. २ बियाऐवजी लहान वनस्पतींची उत्पत्ती करणारे (अंकुरण), झाड).

vivipary
अपत्यजनन अपत्ये जन्माला येणारी घटना, खाऱ्या दलदलीच्या जमिनीत वाढणाऱ्या कित्येक वनस्पतींची बीजे फळातच रुजून (हवेत) लांब आदिमूळ प्रथम बाहेर येते व त्यानंतर (दलिकाधर व दलिकायुक्त) कोवळी प्ररोह (कोंब) त्यातून निघून खाली चिखलात पडतो व वाढून नवीन वनस्पती बनते. उदा. कांदळ, चिप्पी. प्राण्यांच्या बाबतीत काही प्राणी अंडी घालतात तर काही प्रत्यक्ष अपत्यांना जन्म देतात.

volatile
बाष्पनशील वाफेच्या रुपात उडून जाणारे (तेल, कापूर इ.)

voluble
वलयिनी आधाराभोवती वेढत जाणारी वेल उदा. नीलहार वेल (Petrea volubilis L.) volubile

volva
अधच्छादनी, अधोवेष्टन, परिस्यून संपूर्ण भूछत्रावरील प्राथमिक आच्छादनाचा तळभाग

vulgaris
सामान्य, साधारण उउदा. बीट, चुकंदर (Beta vulgaris L.) कलिंगड (Citrullus vulgaris Schrad. var. fistulosus).