वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
There are currently 259 names in this directory beginning with the letter T.
tabasheer
तबाशीर बांबूच्या पेऱ्यांमधील वालुकामय खडे (औषधी पदार्थ). tabashir

tabular
सपाट पृष्ठभागाशी समांतर दबलेले

tactic
अनुचलनी आंतरिक बदल होऊन चेतकाला (उदा. प्रकाश, रसायन, उष्णता) प्रतिसाद दर्शविणारी स्थलांतराची हालचाल, उदा. काही स्वतंत्र एककोशिक शैवले, हरितकणू, सूक्ष्मजंतू इ.

tactile
स्पर्शग्राही स्पर्शाला (स्पर्शाच्या चेतकाला) प्रतिसाद देणारे. t. hair or bristle स्पर्शग्राही केस, स्पर्शरोम उउदा. कीटकभक्षक वनस्पती, डायॉनिया. t. organ स्पर्शेंद्रिय t. papilla स्पर्शग्राही पिटिका अवयवावरील एखाद्या कोशिकेचा बाहेरील उंचवट्यासारखा फुगीर

tail
पुच्छ बारीक, लांब व शेपटीसारखे उपांग

tailed another
पुच्छयुक्त परागकोश परागकोशाच्या पोकळीखालून वाढलेले शेपटीसारखे (परंतु त्यात परागकण नसलेले) उपांग, उदा. वासक कुलातील काही वनस्पती.

tamaricaceae
झाऊ कुल, टॅमॅरिकेसी शेरणी, झाऊ इत्यादी द्विदलिकित मरुवनस्पतांचे लहान कुल, याचा अंतर्भाव बेंथॅम व हूकर यांच्या पद्धतीत कार्बाएफायलिनी व एंग्लर व प्रँटल यांच्या पद्धतीत पराएटेलीझ गणात केलेला आढळतो, बेसींनी अहिफेन गणात (पॅपॅव्हरेलीझमध्ये) आणि हचिन्सननी झाऊ गणात (टॅमॅरिकेलीझमध्ये) समाविष्ट केले आहे. प्रमुख लक्षणे- फार लहान व एकाआड एक पानांची झुडपे व वृक्ष, द्विलिंगी, नियमित, ४-५ भागांची फुले, सुट्या पाकळ्या, तितकीच किंवा दुप्पट केसरदले, क्वचित अनेक, सुटी किंवा गटांमध्ये, किंजदले २-५ व जुळलेली, ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा व तलस्थ बीजकाधानीवर अनेक बीजके बोंडात केसाळ बिया.

tangential plane
स्पर्शरेखीय प्रतल खोड किंवा मूळ यांच्या आडव्या छेदात त्रिज्येशी अथवा निकाष्ठ किरणाशी काटकोनात असलेली पातळी. t. section स्पर्शरेषी छेद, स्पर्शरेखी छेद वर वर्णन केलेल्या पातळीतून मिळणारा काप.

tap root
प्रधानमूळ, सोटमूळ, अधिमूळ आदिमुळाची सतत खाली वाढ होऊन जाडजूड बनलेले व जमिनीत अनेक उपमुळे निर्माण करून मूलव्यूहाचा (तंत्राचा) प्रमुख भाग बनलेले प्रमुख मूळ, हे सर्व द्विदलिकित व कित्येक प्रकटबीज वनस्पतींत आढळते. उदा. मुळा, गाजर, गुलबुश यांमध्ये ते मांसल असत

tapering
शुंडाकृति, शूलाकृति लांबकाट्याप्रमाणे किंवा सोंडेप्रमाणे निरुंद होत गेलेले. tapered

tapetum
पोषक स्तर सर्व उच्च दर्जाच्या वनस्पतींत, बीजुकजनक कोशिकांभोवती असणारा व अन्नकणांनी भरलेल्या कोशिकांचा थर, हळूहळू हा विसर्जित होऊन बीजुक निर्मितीत वापरला जातो.

tapioca
तापिका, टॅपिओका एरंड कुलातील एका वनस्पतीच्या लठ्ठ (ग्रंथिल) मुळातील पिष्ठयुक्त पदार्थ, तापिका (Manihot utilissima Pohl.)

tawny
फिकट तपकिरी काहीसा पिंगट पिवळ्या रंगाचा.

Taxetum
बिर्मी संघात बिर्मि वृक्षांचा नैसर्गिक समूह (समावास), बर्मी बिर्मी यू (Taxus baccata L.)

taxis
अनुचलन स्वतंत्र सजीवांची बाह्य चेतकाला अनुलक्षून केलेली प्रतिसादरुप हालचाल phototaxis, chemotaxis.

taxon
वर्गक वर्गीकरणात भिन्न थरात मानलेले एखादे एकक, उदा गण, गोत्र, वर्ग, कुल, वंश, जाती इ. pl. taxa

taxonomist
वर्गीकरणविज्ञ वनस्पती अथवा प्राणी यांच्य वर्गीकरणासंबंधी विशेष ज्ञान असणारी व्यक्ती.

taxonomy
वर्गीकरण विज्ञान १ वनस्पती अथवा प्राणी यांच्या महत्त्वाच्या लक्षणांचा विकासवादाच्या संदर्भात विचार करून वर्गीकरणाची तत्त्वे व मांडणी ठरविणारे शास्त्र २ परिस्थिति व वनस्पती यांच्या अभ्यासात भिन्न समुदायासंबंधी सर्व तपशील लक्षात घेऊन केलेली वनश्रीतील भिन्न घटकांची (समुदायांची) वर्गवारी.

technical term
पारिभाषिक संज्ञा, तांत्रिक संज्ञा विशिष्ट विषयाच्या क्षेत्रात विशिष्ट अर्थाने वापरलेला शब्द

technique
तंत्र विशिष्ट कार्य घडवून आणण्याकरिता वापरलेली आवश्यक पद्धती, त्यावरुन technical तांत्रिक (तंत्राचा अंतर्भाव असलेले, तंत्राचा आधार असलेले).

tegmen
अंतश्चोल बीजाच्या दोन आच्छादनांपैकी आतील आवरण

tegumentum
पुंजत्राण indusium

teleology
उद्देश्यवाद एखाद्या संरचनेचे उपयुक्ततेच्या दृष्टीने किंवा तिच्या हेतुपूर्वक अस्तित्वाचे समर्थन करण्याकरिता मांडलेली उपपत्ति.

teleutospore
शिशिर बीजुक एक अथवा बहुधा दोन (क्वचित अनेक) कोशिकांचे बनलेले व बहुधा हिवाळी विश्रांतीनंतर रुजणारे बीजुक (कवकांपैकी तांबेऱ्यात आढळणारे). uredospore. winter spore

telium
शिशिर बीजुकपुंज शिशिर ऋतूतील बीजुके एकत्र वाढल्याने बनलेला समूह, पिंगट, काळसर, पिवळट अशा रंगाचे हे ठिपके पानांवर वा खोडावर आढळतात.

telophase
अंत्यावस्था प्रकलाच्या विभाजनातील शेवटची अवस्था mitosis, meiosis.

tendril
प्रतान, ताणा, तणावा दुर्बल वनस्पतीच्या प्रमुख अवयवाच्या रुपांतराने बनलेला तंतूसारखा, स्पर्शग्राही (संवेदनाक्षम) व आधार घेण्यास उपयुक्त असा अवयव उदा. काकडी, वाटाणा, कळलावी, मोरवेल इ. t.climber प्रतानारोही, प्रतानिनी प्रतानाच्या कार्यक्षम (उदा. कळलावीच्या

tentacle
स्पर्शक स्पर्शग्राही केस, उदा. ड्रॉसेरा नावाची कीटकभक्षक वनस्पती.

tenuifolious
तनुपर्णी पातळ पान असलेले.

tepal
परिदल perianth.

terate
शूलाकृति लांबट, गोलसर व टोकदार दांड्याप्रमाणे (उदा. पान).

teratology
विकृतिविज्ञान, विद्रुपविज्ञान कुरचना, विकृति, राक्षसी आकाराचे अवयव इत्यादीसारख्या निर्मितीसंबंधीची विज्ञानशाखा

terminal
अग्रस्थ, अंतिम टोकावर असलेले, शेवटी असलेले, उदा. संयुक्त पानाच्या टोकावरचे दल, अक्षाच्या टोकावरची कळी.

terminology
परिभाषा एखाद्या विषयात विशिष्ट अर्थी वापरलेल्या (संज्ञांची) अनेक शब्दांची यादी (शब्दसंग्रह)

ternary
त्र्यंगी तिन्हीच्या गटात असलेले, त्रिभागी.

ternate
त्रिदली तीन दले असलेले (उदा. बेलाचे संयुक्त पान).

terrestrial
भूवासी जमिनीत अंशतः किंवा पूर्णतः वाढणारी (वनस्पती).

terrestrial
भूवासी जमिनीत अंशतः किंवा पूर्णतः वाढणारी (वनस्पती).

tertiary
तृतीय, तृतीयक, तिय्यम तिसऱ्या क्रमांकाचे, दुय्यम अक्षावर आलेला तिसरा (अक्ष) t. period तृतीयकल्प भूस्तर विकासातील एक कालखंड (सु. साहेसहा कोटी ते १-२ कोटी वर्षापूर्वीचा काल).

testa
बीजचोल, बर्हिगोल, बीजावरण बीजाचे बाहेरचे आच्छादन, कधी कधी बाहेरचे व आतील पूर्ण जुळलेले असते.

tetra-
चतुः, चतुर्- चारीचा संबंध दर्शविणारा उपसर्ग

tetracarpellary
चतुः किंजदली चार किंजदले असलेले (किंजमंडल किंवा फूल).

tetrachotomy
चतुःखंडन, चतुःशाखाक्रम चार सारखे भाग पडलेले (अक्ष) असण्याचा प्रकार dichotomy

tetracyclic
चतुर्मंडलित, चतुश्वाक्रिक भिन्न अवयवांची चार मंडले (चक्रे, वर्तुळे) असलेले (फूल).

tetrad
चतुष्टय चौकडा, चारीचा संच, उदा. परागचतुष्टय (उदा. संतानक) किंवा बीजुकचतुष्ट्य (काही शैवले)

tetradynamous
चतुरोन्नत सहापैकी चार केसरदले अधिक उंच असलेले, उदा. मोहरीच्या फुलातील केसरमंडल.

tetrafoliate
चतुर्दली चार दलाचे संयुक्त पान, उदा. मार्सिलिया.

tetramerous
चतुर्भागी प्रत्येक मंडलात चार अवयव असलेले (फूल). उदा. मोहरीचे फूल

tetrandrous
चतुष्केसरदली चार केसरदले असलेले उदा. कारवीचे फूल

tetranucleate
चतुःप्रकली चार प्रकले असलेली कोशिका.

tetraphyllous
चतुष्पर्णी, चतुष्परिदली चार पानांचे, चार दले असलेले परिदलमंडल perianth.

tetraploid
चतुर्गुणित चार एकगुणित प्रकलांच्या संयोगाने बनलेला (प्रकल), तसा प्रकल असलेली (वनस्पती).

tetraploidy
चतुर्गुणितत्त्व चतुर्गुणित प्रकल असण्याचा प्रकार

tetraquetrus
चतुष्कोनी चार धारा असलेले, आडव्या छेदात चार कोन दिसणारे (चौकोनी), उदा. खोड (कांडवेल).

tetrarch
चतुःसूत्र रंभाच्या आडव्या छेदात चार प्रकाष्ठाचे वृंद असण्याचा प्रकार stele.

tetrasporangium
चतुर्बीजुककोश चार बीजुके असलेला बीजुककोश उदा. लाल शैवले

tetraspore
चतुर्थबीजुक चार बीजुकांपैकी एक

tetrasporophyte
चतुर्थबीजुकधारी चतुर्थबीजुके निर्मिणारी पिढी, उदा. लाल शैवले (उदा. पॉलिसायफोनिया).

tetravalent
चतुःसंयुजी प्रकलाच्या अर्धसूत्रण विभाजनात वरवर एका रंगसूत्राप्रमाणे दिसणाऱ्या रंगसूत्रातील चारीपैकी एक, येथे समजात रंगसूत्राच्या जोडीतील प्रत्येकाची उभी विभागणी झाली असावी असे मानल्यास एकूण चार रंगसूत्रार्धे एकत्र काही काळ असतात.

texture
पोत पानांची किंवा तत्सम अवयवांची जाडी, मजबुती इ. उदा. पातळ जाड, चिवट, मांसल, ठिसूळ इ. संज्ञा यासंबंधात वापरतात. हीच संज्ञा जमिनीबाबतही वापरतात.

Thalamiflorae
अवकिंजपुष्पी श्रेणी बेंथॅम व हूकर यांच्या वर्गीकरणामध्ये द्विदलिकित (वर्ग) वनस्पतींतील मुक्तप्रदली (सुट्या पाकळ्यांच्या फुलझाडांची) उपवर्गातील अवकिंज फुलांची एक श्रेणी, दुसरी बिंबयुक्त फुलांची (बिंबपुष्पी) व तिसरी श्रेणी चषकाप्रमाणे संवर्त असलेल्या परिकिंज किंवा अपिकिंज फुलांची (संवर्तपुष्पी).

thalamifloral
अवकिंजपुष्प किंजमंडलाखेरीज फुलातील इतर भाग वरच्या पातळीत (पुष्पस्थलीवर) असलेले. thalamiflorous

thalamus
पुष्पस्थली पुष्पदले ज्यावर आधारलेली असतात तो देठाचा पसरट भाग याला receptacle असेही म्हटलेले आढळते. torus

thalasad
समुद्रपादप समुद्रात वाढणारी वनस्पती.

thalasophilus
समुद्रप्रिय (वनस्पति)

thalassoplankton
सागर प्लवक plankton

thalloid
कायकाभ कायकासारखे अत्यंत साधे शरीर thallus

thallophyta
कायकवनस्पति विभाग जुन्या (ऐक्लर) वर्गीकरण पद्धतीप्रमाणे अति साध्या, अप्रभेदित, कायक प्रकारच्या शरीर धारण करणाऱ्या वनस्पतींचा विभाग, यामध्ये शैवले, कवक व शैवाक यांचा समावेश करीत. cryptogamae.

thallus
कायक खोड व पाने यांचा पूर्ण अभाव असलेले व कधी कधी मुळासारखी (पण मुळे नव्हेत) आधारभूत साधी उपांगे असलेले, एककोशिक किंवा अनेक कोशिक अप्रभेदित शरीर उदा. शैवल, कवक, धोंडफूल इ.

theaceae
चहा कुल, थीएसी चहा (थीया), कॅमेलिया (गॉर्डाएनिया), नागेट्टा इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा अंतर्भाव एंग्लर व प्रँटल यांनी पराएटेलीझमध्ये (तटलग्न बीजकाधानी असलेल्या गणात), बेंथॅम व हूकर यांनी कोकम (वृंदार) गणात व हचिन्सननी चहा गणात (थीएलीझमध्ये) क

theca
प्रावरक १ नेचाचा बीजुककोश २ शेवाळीतील बीजुकाशय ३ परागकोश ४ पराग पुटक

theine
थीन चहाच्या पानातील क्षाराभ (अल्कलॉइड).

Thelephoraceae
चर्मकवक कुल, थेलेफोरेसी गदाकवकांपैकी एक कुल, यातील कवकांचे शवोपजीवी शरीर झाडांच्या सालीवर सपाट, चिवट खपलीसारखे असून गदानिर्मितीचा थर वरच्या बाजूस असतो अथवा सपाट शरीराचा भाग आधारावर उचलला जाऊन एकावर एक कंसाकृति रचना बनते व त्या प्रत्येकाखाली गदांचे थर येता

Theory of descent
वंशानुक्रमवाद (सिद्धांत) पृथ्वीवरील सजीव सृष्टी एकाएकी आहे तशी निर्माण झाली नसून आरंभी अपघातानेच निर्माण झालेल्या अतिसूक्ष्म साध्या जीवद्रव्यापासून क्रमाने, हळुहळु निसर्गतः फरक पडत जाऊन विविधरुपधारी अवस्थेप्रत पोचली आहे असा चार्लस् डार्विन यांचा सिद्धांत.

theory of pangenesis
सर्वाएत्पत्तिवाद pangenesis.

thermonastic
तापानुकुंचनी उष्णतेमुळे (अधिक तापमानाच्या उत्तेजनामुळे) घडून आलेली (अवयवांची वक्रता), यामध्ये अवयवांची वाढ होऊन परिणामी वाकडेपणा येतो. उदा. यकृतकांचे कायक प्रथम वरच्या बाजूस अधिक वाढून उलट्या बशीप्रमाणे आकार येतो व याला अपिवर्धन म्हणतात. याउलट वाकडेपणाला

thermonasty
तापानुकुंचन वर वर्णन केलेली घटना, येथे उत्तेजकाच्या दिशेचा वक्रतेशी संबंध नसतो. nastic movement.

thermophillous
तापप्रिय वाढीस उच्च तापमान (उष्णता) आवश्यक असणारी किंवा उच्च तापमान सहन करणारी (वनस्पती) thermophile

thermotactic
तापानुचलनी पुढे वर्णन केलेल्या प्रकारची हालचाल (त्या दिशेकडे किंवा त्या विरुद्ध)

thermotaxis
तापानुचलन उष्णतेमुळे उत्तेजन पावलेल्या सजीव स्वतंत्र वनस्पतीचे स्थानांतर अथवा स्थिर वनस्पतींच्या स्वतंत्र भागाचे (गंतुक, बीजुक, हरितकणु इ.) स्थलांतर taxis

thermotropic
तापानुवर्तनी उष्णतेमुळे तिच्या उगमाकडे किंवा विरुद्ध दिशेला झालेली (वनस्पतीच्या अवयवांची वाढ), यामध्ये अवयवास वक्रता येणे शक्य असते. tropism

therophyte
वर्षायु पादप कडक हिवाळा अथवा रुक्ष ऋतू यांमध्ये फक्त बीज रुपानेच अस्तित्व राखणारी वनस्पती.

thickening
घनीभवन प्राथमिक तूलीरमय आवरणावर नवीन लेप बसून जाडी वाढण्याची प्रक्रिया. हा लेप तूलीराचा किंवा काष्ठीराचा (लिग्निनचा) असतो. तसेच तो सर्वत्र सारखा अगर विशिष्ट जागी बसल्याने भिन्न प्रकारचे अंकन आढळते.

thicket
झाडी अनेक लहान झुडपांची दाट जाळी.

thigmotropism
कंपनानुवर्तन, स्पर्शानुवर्तन १ कंपनाच्या चेतनेनुसार अधिक स्थानिक वाढ होऊन अवयवात वक्रता येणे २ स्पर्शाच्या चेतनेमुळे उलट बाजूस वाढ अधिक होऊन वक्रता येण्याची प्रक्रिया, उदा. वेलीचे टोक, प्रतानाचा टोकाकडील भाग, कीटकभक्षक वनस्पती.

thinophyta
राशिपादप माती किंवा वाळूच्या ढिगावर वाढणाऱ्या वनस्पती.

thorn
शूल, काटा लांबट, टोकदार, कठीण, कधी शाखित, अशी रुपांतर पावलेली शाखा, उदा. मेंदी, डाळिंब, करवंद इ.

thorn forest
काटेरी वन रुक्ष ठिकाणी वाढणारी काटेरी झुडपे व लहान वृक्ष यांचे जंगल. उदा. बाझीलमधील कटिंगा वन (कंटकी वन)

thread shaped
सूत्राकार फार बारीक सुतासारखे filiform

three angled
त्रिकोणी, त्रिधारी तीन धारा असलेले (खोड, फळ, बी इ.) trigonous

throat
कंठ जुळलेल्या पाकळ्यांचा फुलाच्या नळीचे द्वार, उदा. सदाफुली, पारिजातक

thrum eyed
बद्धकंठी जुळलेल्या पाकळ्यांच्या पुष्पमुकुटाच्या प्रवेशस्थानात (गळ्यात) परागकोश असल्यामुळे बंद झालेले (फूल), उदा. प्रिमरोझ.

Thymelaeaceae
रामेठा कुल, थायमेलिएसी रामेठा या वनस्पतीचा अंतर्भाव असलेले हे द्विदलिकित फुलझाडांचे कुल जंबुल गणात (मिर्टेलीझमध्ये) समाविष्ट केले आहे (एंग्लर). हचिन्सन यांनी रामेठा गणात (थालमेलेलिझमध्ये) अंतर्भूत केले आहे. प्रमुख लक्षणे- काष्ठयुक्त व साध्या, एकाआड एक किं

thyrse
मिश्रवर्ध्यक्ष, मिश्र परिमंजरी बाजूचे अक्ष कुंठित व मुख्य अक्ष अकुंठित असलेली परिमंजरी (शाखायुक्त फुलोरा). panicle. thyrsus

tier
स्तर, थर

tigline
टिग्लीन जमालगोटा या वनस्पतीच्या बियांतील कडू व तिखट द्रव्य.

Tiliaceae
परुषक कुल, टिलिएसी ज्योत (ज्यूट), निचर्डी, खटखटी, धामण, रुद्राक्ष इ. वनस्पतींचे कुल याचा अंतर्भाव भेंडी गणात (माल्व्हेलीझमध्ये) केला जातो. हचिन्सन यांनी परुषक गणात (टिलीएलीझमध्ये)केला आहे. भेंडी कुलाशी याचे साम्य असून अनेक व स्वतंत्र केसरदले, दोन कप्प्यांचे व कुंठित फुलोरे या लक्षणांनी त्या कुलापासून परुषक कुलाचे निराळेपण ओळखता येते.

tiller
फूट, फुटवा sucker उदा. नेचा, गवते.

tilophyte
पल्लवपादप डबक्यातील वनस्पती, उदा. गोंडाळ, ऍझोला, कारंड (लेग्ना) इ. pond plant

timber line
वृक्षसीमा उंच पर्वतावरच्या वनश्रीतील वृक्षांची वाढ संपून खुरटी झाडी सुरवात होते ती सीमारेषा (उंची)

tinctorious
रंजकता, रंजनक्षमता रंगविण्याची क्षमता असलेले उदा. अल (Morinda tinctoria Roxb.), काळा कुडा (Wrightia tinctoria R. BR.) नीळ (Indigofera tinctoria L.) tinctorial

tissue
ऊतक, ऊति समान उगम व कार्य असलेल्या आणि बहुधा परस्परावलंबी कोशिकांचा समूह. t. aqueous जलोतक पातळ आवरणाच्या, हरितद्रव्यहीन, जलपूरित कोशिकांची अधस्त्वचा, उदा. मांसल पाने. t. culture ऊतक संवर्धन कृत्रिमरित्या सजीवांच्या ऊतकाची विशेष पद्धतीने शरीराबाहेर वाढ

toadstool
छत्रक भूछत्राखेरीज इतर तत्सम गदाकवक

tolerance
सहिष्णुता, सहनशीलता, सह्यता परिस्थितीतील तपमान, छाया, प्रकाशतीव्रता इत्यादींपैकी कोणत्याही घटकासंबंधीचे फरक सहन करण्याची एखाद्या जातीची क्षमता. t range सह्यता क्षेत्र, सहिष्णुता कक्ष परिस्थितीतील एखाद्या घटकासंबंधीच्या किमान ते कमाल सह्य मूल्यांची मर्यादा

tomentose
लवदार, लवाच्छादित आखूड व बारीक लव असलेले. उदा. ऐन (Terminalia tomentosa W. A.)

tomentum
लव

Tomillares
चर्मपर्णी (चर्मिलपर्णी) वनश्री फार थोडा पाऊस व कोरडी हवा यांच्या प्रभावाने वाढलेला मरुवासी (चिवट पानांच्या) वनस्पतींचा समावास.

tongue grafting
जिभली कलम मूळच्या खुंटात इच्छित वनस्पतींचे पाचरीसारखे कापलेले कलम बसविण्याची प्रक्रिया

tongue shaped
जिव्हाकृती जिभेसारखे सपाट, क्वचित जाड व मांसल व लांबट आकाराचे, फार पातळ व लहान असल्यास जिव्हिकाकृति ही संज्ञा वापरतात. उदा. सूर्यफुलाच्या किरणपुष्पकांचा पुष्पमुकुट ligulate

tonoplast
अंतःप्राकल पटल, रिक्तिकापटल कोशिकेतील रिक्तिके (पोकळी)भोवती असलेले जीवद्रव्याचे (प्राकलाचे) आवरण, रिक्तिकेतील पदार्थाचे नियंत्रण या पटलाद्वारे होते.

toothed
दातेरी दाताप्रमाणे विभागलेली किंवा दाते असलेली. करवती (पानाची कडा).

top shaped
कुंभीरुप, भोवऱ्यासारखे उलट्या शंकूप्रमाणे, उदा. मुळा, गाजर napi form.

topotype
एकस्थानक प्ररुप, टोपोटाइप मूळच्या वनस्पतीच्या ठिकाणी घेतलेल्या तशाच वनस्पतीचा नमुना.

tortuose
शृंखलिक लांब व दंडाकृती (चितीय) आणि सारख्या अंतरावर गाठी (फुगीरपणा) आल्याने माळेसारखा (साखळीसारखा) पोकळ किंवा भरीव (तंतू, धागा इ.) tortuous

torula condition
किण्वावस्था तंतूसारख्या शरीराची पुनः पुनः विभागणी होऊन अनेक कोशिकांची माळ किंवा त्या कोशिका सुट्या होऊन राहणे व त्यांची साखरेच्या विद्रवात किण्वाप्रमाणे मद्य बनविण्याची प्रक्रिया होणे. उदा. म्यूकर व काही तत्सम कवक yeast.

torulose
गाठाळ अनियमितपणे गाठाळ असलेला.

torus
पुष्पस्थली thalamus

toxic
विषारी, विषमय विष असलेले, विषयुक्त

toxin
विष, जंतुविष काही जीवोपजीवी कवकातून स्त्रवलेला व आश्रय वनस्पतीच्या कोशिकांचा नाश करणारा पदार्थ, काही सूक्ष्मजंतूंनी टाकलेला तसाच विकृतिजनक (अथवा नाशक) द्रव.

trabecula
प्रपट्टिका बारीक आडवा दांडा, उदा. शेवाळीच्या परितुंडांच्या दात्यांवर असलेला, आयसॉएटिसच्या लघुबीजुक कोशातील पडदे, सिलाजिनेलाच्या खोडातील मध्यवृंदाभोवती असलेल्या ऊतकातील आडवा पडदा.

trabeculate
प्रपट्टिकित प्रपट्टिका असलेले

trace
लेश t.elements लेशघटक वनस्पतींना आवश्यक असे पण लेशमात्र अन्नघटक t.leaf पर्णलेश पानाच्या देठातून खोडातील रंभाशी (वाहक व्यूहाशी) जोडणारा वाहक घटकांचा संच

trachea
वाहिनी, वाहक नलिका बीजी वनस्पतींपैकी फुलझाडांमध्ये विशेषेकरून आढळणारा काष्ठातील पाण्याची ने-आण करणारा सूक्ष्म नळीसारखा मृत घटक, यांची आवरणे जाड व लिग्निनयुक्त असल्याने यामध्ये प्राकल नसतो. वनस्पतीस मजबुती आणण्यास या घटकांचा विशेष उपयोगही होतो.

tracheal cell
वाहिका वरच्याप्रमाणे काष्ठांतील हा घटक लांबट कोशिकारुप आणि मृत असून प्रकटबीज वनस्पती, नेचे व नेचाभ पादप यांत आढळतो. फुलझाडांपैकी काहीत वाहिका आढळतात (द्विदलिकित वनस्पतीतील द्वितीयक काष्ठ). tracheid

tracheid fibre
वाहिका सूत्र जाड आवरण असलेला व फक्त मजबुती देणारा लांब तंतूसारखा घटक.

Tracheophyta
वाहिनीवंत वनस्पती. वाहिन्या किंवा वाहिन्यायुक्त संरचना असलेल्या वनस्पती (नेचाभ व बीजी वनस्पती) Pteridophyto, Phanerogamae. vascular plants

trachycarpous
खर्बरफली खरबडीत फळ असलेली (वनस्पती) उदा. कवठ, सिताफळ इ.

traction fibre
कर्षण सूत्र कोशिकाविभाजनातील (प्रकल विभाजनात) तर्कूच्या सूत्रापैकी रंगसूत्रांना चिकटलेला व त्यांना धुवाकडे खेचून नेणारा सूत्रल भाग, हे अनेक असून जीवद्रव्यापासून बनतात.

tragacanth
ट्रँगॅकँथ (गोंद) एका विशिष्ट वनस्पतीपासून (Astragalus tragacantha L.) स्त्रवणारा गोंद.

trailing
अनुसरणी, प्रणत मुळाशिवाय जमिनीवर सरपटत वाढणारी वेल किंवा औषधी उदा. विष्णुकांता, काटेरिंगणी prostrate

transect
वनश्री छेद विशिष्ट स्थानातील वनश्रीच्या अभ्यासाकरिता घेतलेला आडवा छेद.

transfer
स्थानांतर कोशिका अथवा नलिकेद्वारे पाण्याचे स्थलांतर.

transformation
रुपांतर, रुपांतरण एखाद्या अवयवाच्या कार्यात बदल होऊन त्यानुसार आकारात व स्वरुपात बदल होण्याची प्रक्रिया, उदा. फांदीचे रुपांतर तणाव्यात किंवा काट्यात झालेले आढळते. पानाचे रुपांतर काटा किंवा ताणा यात होते. (उदा. निवडुंग, कृष्णकमळ, वाटाणा, कांडवेल इ.)

transfusion tissue
संचरणोतक बाजूच्या शिराऐवजी मृदुतक व वाहिकासारख्या मृत कोशिकांचे जाळ, कित्येक शंकुमंत वनस्पतींच्या पानामध्ये हे ऊतक वाहकवृंदाशी संलग्न असते व त्याचे कार्य वाहकवृंदाला पूरक असते. मृदूतकाचा संपर्क परिकाष्ठाशी व वाहिकांचा प्रकाष्ठाशी असतो.

transition
संक्रमण एका अवयवातून दुसऱ्यात बदल होण्याची प्रक्रिया, उदा. मुळाची व खोडाची परस्परमर्यादा संपून ते अवयव स्वतंत्र कार्य करु लागतात असा संधिप्रदेश, दोन्ही अवयवांच्या सांध्यात असून, लहान रोपाच्या तेथील अंतर्रचनेत हा बदल भिन्न प्रकारे झालेला आढळतो. या बदलानंतर वाहकवृंदांच्या संख्येत बदल बहुधा होतो. पाकळ्यांचे केसरदलात रुपांतर

translator
वृंतक, स्थानांतरकारी दोन परागपुंजाच्या तळास जोडणारा देठासारखा भाग, उदा. रुई. corpusculum

translocation
१ स्थलांतर २ अदलाबदल १ एखाद्या ठिकाणाहून अन्यत्र संचित (राखीव) पदार्थ नेण्याची प्रक्रिया, उदा. ग्रंथिल (लठ्ठ) मुळातून खोडात व तेथून फुलाच्या कळीत अन्नांश नेणे व फळ बनविण्यास मदत करणे, कलमातील राखीव अन्न त्यावर नव्याने फुटणाऱ्या कळ्यात येणे. २ जनुकांचे एका रंगसूत्रावरुन दुसऱ्यावर जाणे व त्या उलट क्रिया.

transmission
प्रेषण संपर्कस्थानापासून प्रत्यक्ष चलनवलन घडविणाऱ्या अवयवापर्यंत चेतनेला (किंवा ती पोचविणाऱ्या पदार्थाला) पोचविण्याची प्रक्रिया, उदा. लाजाळुच्या पानास केलेला स्पर्श (चेतक) पानाच्या तळापर्यंत (पुलवृंत) पोचल्याशिवाय पानाची व दलांची प्रतिक्रिया (वळून खाली लोंबणे) होत नाही.

transpiration
बाष्पोच्छवास, बाष्पोत्सर्जन वनस्पतीने नियंत्रित केलेला व त्वग्रंधांतून बाहेर टाकलेला वाफेच्या स्वरुपातील उच्छवास t. cuticular उपत्वचीय बाष्पोच्छवास उपत्वचेतून होणारे मामुली (अत्यल्प) बाष्पीभवन. t. stomatal त्वग्रंथीय बाष्पोच्छवास त्वग्रंधांतून (पानावरच्या

transpirometer
बाष्पोच्छवासमापक बाष्पोच्छवासाचे प्रमाण मोजण्याचे साधन (उपकरण).

transport
अभिगमन, परिवहन एखाद्या अवयवात इतरत्र तयार झालेले अन्न खोडात किंवा फुलोऱ्यात नेणे.

transverse
अनुप्रस्थ, आडवा. लांबट अक्षाला काटकोनात असलेला (उदा. छेद) t. plane अनुप्रस्थ प्रतल वर सांगितल्याप्रमाणे असलेली पातळी. t. section अनुप्रस्थ छेद, काटच्छेद, आडवा छेद लांब (उभ्या) अक्षाचा घेतलेला आडवा पातळ काप, उदा. खोड, शाखा, मूळ व पान यांचा आडवा काप ते उभे

trap door
कूटद्वार आतल्या बाजूस उघडून, बंद राहून व आतच कोंडून ठेवणारे झडप, उदा. कीटकभक्षक वनस्पतींपैकी गेळ्याची वनस्पती (Bladderwort.)

trap mechanism
कारायंत्रणा prison mechanism. prison

trapezoid
समलंबाभ समलंब चौकोनाप्रमाणे आकाराचे (उदा. पान) उदा. अडिँटम नेच्याच्या काही जातींची दले किंवा दलके.

traumatropism
व्रणानुवर्तनी जखमेच्या चेतकामुळे विशिष्टप्रकारे वाढ घडून येण्याची प्रक्रिया उदा. मुळांचे टोक, ओकच्या वृक्षावर येणारी गाठ (मायफळ).

tree
वृक्ष बहुवर्षायू, काष्ठमय व एक जाडजुड, प्रमुख व उंच खोड (प्रकांड) असलेले झाड उदा. आंबा, निंब इ. t.canopy वृक्षछत्र अनेक वृक्षांच्या माथ्यावरील पर्णसंभारामुळे बनलेला छत. t. stratum वृक्षस्तर जंगतालीत सर्वात उंच झाडाचा थर t. culture वृक्षसंवर्धन विशेष

Tremellales
जेलीकवक गण, अवलेहकवक jelly fungi  Jelly fungi

tremelloid
थुलथुलीत ट्रेमेला या वंशातील जेलीकवकाप्रमाणे (थलथलीत) शरीर असलेले.

tri
त्रि- तीन या संख्येसंबंधीचा किंवा तिप्पट संख्या दर्शविण्याचा उपसर्ग.

triad
त्रिक, त्रिकूट, त्रय तिन्हींचा गट

triadelphia
त्रिसंघ गण केसरदलांचे तीन संघ असणाऱ्या फुलझाडांचा कार्ल लिनियस यांनी केलेला गट (गण).

triadelphous
त्रिसंघ केसरदले तीन गटात असणारे (फूल किंवा केसरमंडल) monadelphous

triandrous
त्रिकेसरदली तीनच केसरदले असलेले (फूल किंवा केसरमंडल) उदा. गवते (मका), केशर, बाळवेखंड

triangular
त्रिकोणी तीन कोन किंवा तीन धारा असलेले (पान, खोड), उदा. लव्हाळा, मोथा, सायलोटम, लायकोपोडियमचे पान.

trianthous
त्रिपुष्पी एका देठावर तीन फुले असलेले.

triarch
त्रिसूत्र तीन प्रकाष्ठ गट असलेला (रंभ), उदा. लायकोपोडियमच्या काही जातींचे मूळ, stele.

triassic period
ट्रायासिक पीरीयड (कल्प) सुमारे २३ कोटी ते २० वर्षापूर्वीचा भूशास्त्रीय कालखंड

tribe
जमात वनस्पतींच्या वर्गीकरणातील एक गौण एकक, काही वंशाचा गट त्यावरुन sub tribe उपजमात.

tricarpellary
त्रिकिंजक तीन किंजदले असलेले (फूल किंवा किंजमंडल) उदा. एरंड, नारळ. इ. tricarpellate

tricephalous
त्रिस्तबक, त्रिशीर्षक तीन स्तबक (फुलोरे) असलेला (अक्ष), capitulum.

trichasium
त्रिपद वल्लरी तीन अक्षात विभागलेला कुंठित फुलोरा cyme.

trichodes
केशाभ केसासारखा

trichogyne
योनिकासूत्र काही लाल शैवलांच्या स्त्री जननेंद्रियाच्या टोकास असलेला तंतूसारखा आदायी (ग्राहक) भाग. काही धानीकवक व शैवाक वनस्पतींतही हा आढळतो.

trichoma
तंतुकायक सूक्ष्म तंतूसारखे कायक (शरीर), उदा. काही शैवले (नॉस्टॉक, कॉन्फर्वा) याला trichome असे विशेषेकरून म्हणतात. pl. trichomata

trichome
अधिरोम अपित्वचेपासून वाढलेला केस bristle

trichophyllus
केशपर्णी अतिशय विभागलेली केसासारखी पाने असलेली (वनस्पती), उदा. कामलता.

trichothallic
अग्रकेशी टोकास एक अथवा अनेक तंतूसारखे केस असलेला (उदा. शैवल-कायक-तंतू) एक्टोकोर्पस, लेथेसिया इ.

trichotomy
त्रिभाजन, त्रिशाखाक्रम अक्षाचे तीन विभाग (शाखा) होण्याचा प्रकार.

tricoccus
त्रिफलांश फुटून ज्याचे तीन तडकणारे भाग (कुडी) अलग होतात असे शुष्क फळ. उदा. एरंड coccus.

tricolor
तिरंगी तीन रंग असलेले

tricostate
त्रिसिराल तीन मुख्य शिरा असलेले पान, उदा. बोर trinervate

tricussate
त्रिपर्णी खोडाच्या प्रत्येक पेऱ्यावर तीन पानांचे मंडळ असलेली स्थिती उदा. कण्हेर decussate.

tricyclic
त्रिचक्रीय, त्रिमंडलित अवयवांची तीन मंडले असलेले, उदा. फुलातील संवर्त, पुष्पमुकुट इत्यादी पुष्पदलांची मंडले एकूण तीन असल्यास ते फूल त्रिचक्रीय ठरते. गुलबुश, कुमूर, आघाडा, आवळा, कुंकुम इ.

tridentate
त्रिदंती तीना दाते असलेले.

triennis
त्रिवर्षायु तीन वर्षे टिकणारे trimus

trifid
त्रिशाखी तीन शाखांत विभागलेले, उदा. एरंडाच्या फुलातील किंजल्क.

triflorous
त्रिपुष्पी तीन फुले असलेली (वल्लरी) उदा. मोगरा.

trifoliate
त्रिपर्णी तीन पानी

trifoliolate
त्रिदली तीन दले असलेले संयुक्त पान उदा. पांगारा, पळस, बेल इ.

trigonous
त्रिधारी तीन धारा असलेले triangular.

trihybrid cross
गुणत्रय संकर तीन वैकल्पिक गुणांच्या जोड्यांनी भिन्न असलेल्या वनस्पतींच्या प्रकारांचा संकर, यातील संततीस त्रिसंकरण म्हणतात. dihybrid cross.

trilateral
त्रिपार्श्व तीन पृष्ठे असलेले किंवा लोलकासारखे (पान, खोड, फळ, बी)

trilobed
त्रिखंडी तीन भाग स्पष्ट असलेले, उदा. एरंडाचा किंजपुट, तीन अपूर्ण खंड असलेले (पान), उदा. अळू, हरणखुरी. trilobate

trilocular
त्रिपुटक तीन कप्पे असलेला (उदा. किंजपुट, जंगली एरंड, कर्दळ इ.) three celled.

trimerous
त्रिभागी प्रत्येक मंडलात तीन भाग असलेले (उदा. नारळ, कुमूर, गुलछडी, इत्यादींची फुले).

trimonphism
त्रिरुपत्व वर वर्णन केलेली स्थिती.

trimorphic
त्रिरुपी तीन भिन्न प्रकारची संरचना असलेला एकच अवयव (उदा. फूल), आखूड, लांब व मध्यम किंजदले किंवा केसरदले असलेली फुले. trimorphous

trioecious
त्रिभक्तलिंगी पुं-पुष्पे, स्त्री पुष्पे व द्विलिंगी फुले तीन स्वतंत्र झाडावर असलेली वनस्पती, उदा. ऍश

triovulate
त्रिबीजक तीनच बीजके असलेला किंजपुट उदा. एरंड

tripartite
त्रिभागी, त्रिभक्त तीन भागात विभागलेले, उदा. सीताफळाचा संवर्त

tripetalous
त्रिप्रदली तीन पाकळ्यांचे (उदा. सीताफळाचे फूल).

tripinnate
त्रिगुण पिच्छाकृति तीनदा पिसासारखे विभागलेले (पान) उदा. शेवगा.

triple fusion
त्रिसंयोग फुलझाडांच्या बीजकाच्या गर्भकोशातील दोन स्त्रीप्रकल व परागनलिकेतून आलेल्या दोन नरप्रकलांपैकी एक या तिन्हींचा संयोग, त्यानंतर पुष्क प्रकल बनण्याची प्रक्रिया होते. endosperm.

triplex
त्रिघटक एका विशिष्ट प्रभावी जनुकाची (घटकाची) तिप्पट संख्या असलेले चतुगुर्णित रंदुक duplex, tetraploid.

triplicate
त्रिगुण्य तिप्पट संख्या असलेले, उदा. एखाद्या आनुवंंशिक लक्षणाचे अनुहरण संततीत भिन्न प्रमाणात होतांना त्याबद्दल तीन प्रभावी घटक जबाबदार असण्याचा प्रकार आढळतो. उदा. गव्हाचा रंग duplicate.

triploid
त्रिगुणित रंगसूत्रांच्या नित्य (एकगुणित) संख्येऐवजी प्रकलातील त्यांची संख्या तिप्पट असणे. polyploid, diploid

triquetrous
त्रिधारी, त्रिकोनी तीनधारा असलेले (खोड, फळ इ.) psilotum triquetrum.

triridged
त्रिकटक तीन जाड कंगोरे असलेले उदा. काही बीजुके.

triseriate
त्रिस्तरी तीन थरात (श्रेढीत) असणारे.

trisomic
त्रिसमसूत्री द्विगुणित रंगसूत्रे असलेल्या प्रकलात कधी कधी एखादे रंगसूत्र विद्यमान रंगसूत्रांपैकी एखाद्याशी सारखेपणा दर्शविणारे (समरचित) आढळते. त्यामुळे तीन रंगसूत्रे सारखी असण्याचा प्रकार. नित्याच्या प्रकारात समरचित रंगसूत्रांच्या जोड्या असतात.

trispermous
त्रिबीजी तीनच बीजे असलेले, उदा. एरंडाचे फळ.

tristichyous
त्रिपांक्तिक तीन उभ्या रांगांत असलेले (उदा. मोथा कुलातील पाने) phyllotaxis

tristigmatic
त्रिकिंजल्की तीन किंजल्क असलेले किंजमंडल उदा. आवळा, एरंड

tristis
१ निशापुष्पी २ मंदवर्णी १ रात्री फुले येणारी (विकसणारी) उदा. पारिजातक (Nyctanthes arbor tristis L.) २ फिकट व अनाकर्षक रंगाचे

tristylous
त्रिकिंजली तीन किंजले असलेले (किंजमंडल, फूल) उदा. जंगली एरंड

triternate
त्रिदली संयुक्त पानाचे प्रत्येक दल पुन्हा त्रिदली असण्याचा प्रकार.

trivalent
त्रियुजी प्रकल विभाजनात समरचित रंगसूत्रांच्या जोडीत येणारे तिसरे (अधिक) bivalent.

trivalvular
त्रिशकली फुटल्यावर तीन शकले असलेले (फळ) उदा. भेंडी.

trophic
१ उपजीवी २ पोषक १ पोषणासंबंधीचा प्रत्यय २ पोषण करणारे autotrophic heterotrophic

trophoplast
प्राकणु, लवक plastid.

tropic
अनुवर्तनी चेतना निर्माण करणाऱ्या घटकाकडे किंवा घटकाविरुद्ध दिशेने वाढत जाणारे (अवयव) अथवा होणारी वाढ

tropism
अनुवर्तन वर सांगितल्याप्रकारच्या वाढीची प्रक्रिया phototropism, geotropism.

tropophyte
परिवर्तनी वनस्पति ऋतुमानाप्रमाणे आर्द्र वनस्पती किंवा मरुवनस्पती या प्रमाणे अनुयोजक वनस्पती.

truffle
कंदकवक धानीकवक वर्गातील भूमिस्थित कवक कुलातील खाद्य व सुवासिक शवोपजीवी वनस्पती, ती १०-१० सेंमी. व्यासाची, गोलसर, पिंगट, काळसर व बाहेरुन खरबडीत असून आत बनलेली धानीबीजुके, त्यावर पडणाऱ्या भोकातून बाहेर येतात व पसरतात. डुकरे व कुत्री या वनस्पती वासाने काढतात

truncate
छिन्नाग्र, छेदिताग्र टोकास सपाट (आडवे कापल्याप्रमाणे) असलेले (पान)

truncus
प्रकांड वृक्षाचे प्रमुख खोड, शैवाकातील कायक. trunk

tubaeformis
तुतारीसारखे खाली नळीप्रमाणे व टोकास पसरट होत गेलेले, काहीसे धोतऱ्याच्या पुष्पमुकुटाप्रमाणे पण त्यापेक्षा अरुंद उदा. परळ, तुतारी वृक्ष. trumpet shaped

tube cell
नलिका कोशिका, नलिकापेशी नळीसारख्या आकाराची कोशिका (पेशी), उदा. परागनलिका.

tube nucleus
नलिकाप्रकल फुलझाडांच्या परागनलिकेतील जनककोशिकेखेरीज राहिलेल्या प्राकलातील प्रकल, याचे कार्य परागनलिकेला फलन घडवून आणण्यास मदत देण्याचे असते. जनक कोशिकेपासून बनलेल्या दोन पुं-प्रकलांचा विनियोग द्विफलनाकरिता होतो. double fertilisation.

tuber
ग्रंथिक्षोड खोडाचे अथवा शाखेचे (बहुधा जमिनीत राहणाऱ्या व) गाठीसारख्या अन्नयुक्त अवयवात रुपांतर, उदा. बटाटा, काही नेचे.

Tuberales
कंदकवक गण truffle.

tubercle
गुलिका, पिटिका लहान गाठ, उदा. भुईमुगाच्या मुळावरच्या गाठी

tuberculous
ग्रंथियुक्त लहान गाठींचे आवरण असलेले किंवा गाठीचे बनलेले. tuberculose

tuberiferous
ग्रंथिधारक गाठी (ग्रंथि) धारण करणारी (वनस्पती), गाठीसारखे अवयव असलेले, कधी पानाच्या बगलेत गाठी असलेले, उदा. कारंदा.

tuberous
ग्रंथिल, गाठदार गाठीसारखा मांसल, स्थूल व अन्नयुक्त (अवयव) उदा. खोड, बटाटा (Solanum tuberosum L.) मूळ (गाजर, मुळा, गुलबुश इ.)

tubiflorae
नलिकापुष्पी गण एंग्लर व प्रँटल यांच्या वर्गीकरण पद्धतीप्रमाणे द्विदलिकित फुलझाडांच्या युक्तप्रदली (मेटॅक्लमिडी) उपवर्गातील एक गण, यामध्ये धोत्रा कुल, नीरबाम्ही कुल, साग कुल, हरिणपदी (गंधवेल) कुल व वासक कुल इत्यादी अंतर्भूत आहेत. यापैकी काही कुले हचिन्सन य

tubiflorous
नलिकापुष्पी नळीसारखी फुल असलेले (झाड), उदा. सूर्यफुलातील बिम्ब पुष्पकाप्रमाणे tubuliflorous

tubiform
नलिकाकृति नळीसारखे

tuborculoid
ग्रंथिसदृश बारीक गाठीसारखे tubercular

tubular
नळीसारखे, नलिकाकृति चितीय (दंडगोलासारखे) व पोकळ

tuft
झुबका

tufted
झुबकेदार अनेक लहान खोडे एकत्र उगवून बनलेली (वनस्पती), उदा. काही गवते, क्षुप. कधी काही केस असे झुबक्यांनी बियांवर येतात (उदा. कुडा). caespitose

tumble weed
कोलांटी तण सुकल्यावर कोलांट्या घेत वाऱ्यामुळे फिरत अथवा गडगडत व बिया फेकत जाणारी वनस्पती (अथवा तिचे भाग), उदा. समुद्रकिनाऱ्यावरचे एक गवत (Spinifex squarrosus L.), आळीव, लसूण गवत, जेरिकोचा गुलाब, सिलाजिनलाची एक जाती, इसबगोल.

tumid
फुगीर, स्फीत फुगलेले, सुजलेले उदा. शिंगाड्याच्या पानाचे देठ, गुलबुशाच्या खोडाची पेरी, हवेने अथवा पाणी शोषण करून फुगलेले, उदा. कपाळफोडीचे फळ.

tumor
अर्बुद १ शरीराच्या कोणत्याही भागावर आलेली अनित्य सूज (फुगवटा) २ शरीरातील कोणत्याही भागात निर्माण झालेला, इतर जवळच्या भागाशी (वाढीत) संबंध नसलेला निरुपयोगी ऊतकाचा समूह.

tundra
टंड्रा विस्तृत, सपाट किंवा लहान मोठ्या उंचवट्यांनी व्यापलेला वृक्षहीन तथापि जीर्णक भूसारखा प्रदेश t.lichen शैवाक टंड्रा दगडफुलांनीच विशेषतः भरलेला टंड्रा प्रदेश, हा सैबेरियाच्या उत्तरेस आढळतो. t. moss शेवाळी टंड्रा शेवाळींनी विशेषतः भरलेला टंड्रा प्रदेश,

tunic
कंचुक १ बीजाचे आवरण २ पातळ, शिथिल पापुद्रा ३ कंदाचे आवरण ४ काही कवकांचे बाह्यावरण. tubica

tunicate
चोलधारी, आवृत भूमिस्थित कंद प्रकारच्या खोडाचे (उदा. कांदा) बाहेरील पातळ आवरण असलेले bulb. tunicated

turbinate
कुंभीरुप भोवऱ्यासारखा किंवा उलट्या शंकूच्या आकाराचे.

turfophylae
रुतणवनस्पति bog.

turgescence
स्फीतता अर्धपार्य पडद्यातून आत पाणी शोषल्यानंतर त्यामुळे उत्पन्न झालेल्या तर्षण दाबामुळे आलेला फुगीरपणा, उदा. मनुका पाण्यात टाकल्यावर त्या फुगतात. osmosis. turgidity

turgid
स्फीत तुडुंब भरल्यामुळे फुगलेले.

turgor pressure
स्फीतता दमन वर वर्णन केलेल्या तर्षणामुळे उत्पन्न झालेला दाब

turnip shaped
कुंभीरुप napiform.

tussock
जुमडा, झुबका गवत अथवा तत्सम वनस्पतींचा झुबका, काही गवताळ प्रदेशात गवत झुबक्यांनी वाढते. उदा. तृणसंघात, steppe

twig
डहाळी, लघुत्तम शाखा वृक्षाची फार लहान फांदी

twin
जोडी, जुळे, युगुल t.bundle द्विपर्णलेश पर्णाशी खोडातील रंभाचा संबंध जोडणारी दोन लहान वाहक वृंदाची जोडी उदा. लायजिनोडेन्ड्रॉन

twiner
वलयिनी, वेल, वल्ली आपल्या दुर्बल खोडाने जवळच्या आधारास पकडून वेढे देत वर चढून जाणारी वनस्पती, जाई, जुई, चमेली, कुसर, गारवेल, रंगूनचा वेल, इत्यादी, चढण्याकरिता यांना विशेषत्व पावलेले स्वतंत्र अथवा रुपांतरित अवयव नसतात. climber.

twisted
परिवलित, परिहित, व्यावृत contorted उदा. Andropogon contortus L. कुसळी गवत.

two celled
द्विकोष्ठी दोन कप्पे असलेला (उदा. किंजपुट, परागकोश).

two edged
दुधारी, द्विधारी सपाट व दोन्ही किनारीस तीव्र धार असल्याप्रमाणे (उदा. फळ, बी इ.)

two lipped
द्व्योष्ठी दोन ओठ असल्याप्रमाणे (संवर्त, पुष्पमुकुट)

tylosis
गुहारुध जवळच्या वाहक नलिकेत खाचेचा पडदा आत ढकलून व वाढून तेथे अनेक कोशिका बनवून तिची पोकळी भरुन टाकणारी संरचना, जखम झालेल्या वाहिकांत किंवा वाहिन्यांतही अशाच प्रकारे वाढ होऊन त्या बंद होतात. tylose

type
प्ररुप holotype

type
प्ररुप holotype

Typhaceae
पाणकणीस कुल, टायफेसी. पाणकणीस या सामान्य व दलदलीत वाढणाऱ्या वनस्पतींच्या टायफा ह्या एकमेव वंशाचा अंतर्भाव करणारे एकदलिकित फुलझाडांचे कुल. याचा समावेश न्यूडिफ्लोरी अथवा नग्नपुष्पी श्रेणीत (बेंथॅम व हूकर) व केतकी गणात (पँडॅनेलीझ, एंग्लर व प्रँटल) केला जातो. प्रमुख लक्षणे- पाणथळ जमिनीत वाढणाऱ्या औषधीय वनस्पती, एकलिंगी फुले, परिदले नसतात. कणिश फुलोऱ्यात वर केसांनी वेढलेली पिवळट पुंपुष्पे व त्याखाली तशीच पण पिंगट स्त्री पुष्पे, केसरदले २-५, परागकणांचे चौकडे, किंजदल एकच व बीजकही एकच, वायुपरागण, फळ शुष्क, एकबीजी व केसाळ व बीज सपुष्क असते.

typhetum
पाणकणीस संघात फक्त पाणकणिसाचाच प्रभाव असलेला दलदलीतील समावास.

typical
प्रारुपिक एखाद्या गटाचे किंवा गटातील साच्याचे प्रतिनिधित्व करणारी (वनस्पती) अथवा करणारा प्राणी.