वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा
There are currently 198 names in this directory beginning with the letter R.
race
प्रजाति बीजापासून प्रजोत्पत्ती करण्याइतके स्थिर प्रकार किंवा त्या व्यक्तींचा लहान गट r.adaptive (biological) अनुकूलित (जैव) प्रजाति फक्त क्रियावैज्ञानिक फरक दर्शविणारा प्रकार, आकार वैज्ञानिक फरकांचा येथे अभाव असतो. r. physiological क्रियात्मक प्रजाति
raceme
मंजरी, मंजिरी फुलोऱ्याचा एक प्रकार, यामध्ये मुख्य अक्ष टोकाकडे सतत वाढत राहून बाजूस फुले येतात, सर्वात कोवळे फूल टोकाकडे व जून खाली तळाकडे याप्रमाणे क्रम (अग्रवर्धी) असतो. फुलांना देठ असतात. उदा. संकेश्वर, बाहवा इ. यामध्ये फुलांचे देठ सारख्या लांबीचे असता
rachill
उपाक्षिका, प्राक्षिका लहान पर्णाक्ष किंवा लहान उपाक्ष, पुष्पके धारण करणारा अक्ष, उदा. गवते, लव्हाळे इ.
radial
अरीय केंद्रापासून निघालेले, त्रिज्येच्या दिशेने असलेले r.bundle अरीय वृंद प्रकाष्ठ व परिकाष्ठ भिन्न त्रिज्येवर असलेला वाहक वृंद, उदा. बहुतेक मुळे r.dot अरीय बिंदू पहा casparian dot r. plane अरीय प्रतल केंद्रातून त्रिज्येच्या दिशेत व पृष्ठाशी काटकोनात
radical
मूलज मुळापासून जमिनीवर निघालेली अथवा मुळाच्या माथ्यावरील संक्षिप्त खोडापासून निघालेली किंवा जमिनीतील खोडापासून झुबक्यात वर येणारी (पाने), उदा.मुळा, बीट, गाजर, नागदवणा, निशिगंध यांची पाने
radicicolous
मूलस्थित मुळाच्या माथ्यावर उगवलेले (उदा. फूल), अथवा मुळातच वस्ती करून असणारे (उदा. सूक्ष्मजंतू, Rhizobium radicicola)
radicle
आदिमूल, मुलांकुर बीज रुजुन त्यातून आलेला मोड, काही अबीजी वनस्पतीतील मुळाचे कार्य करणारा प्रारंभिक अवयव
radicose
१ बहुमूली २ गुरुमूली १ अनेक मुळे किंवा २ मोठी मुळे असलेली (वनस्पती), उदा. शतावरी, डेलिया, टॅपिओका, कणगर, गुलबुश इ.
radius (ray)
त्रिज्या, अर, किरण उदा. १ सूर्यफूल कुलातील स्तबक फुलोऱ्यातील परिघाजवळचे भिन्न पुष्पक २ चामर कुलातील संयुक्त चामर फुलोऱ्यातील एक. ३ निकाष्ठ किरण
rain forest
वर्षावन, वर्षारण्य भरपूर पावसामुळे वाढलेले दाट जंगल, उदा. सह्याद्री वरील दाट सदापर्णी जंगल, यात काही पानझडी झाडेही असतात. कमीजास्त मोसमी पावसामुळे सदापर्णी किंवा पानझडी अशी दोन्ही प्रकारची जंगले बनतात. r.f.hot सदापर्णी वर्षावन विषुववृत्ताभोवतीच्या
rain leaf
पर्जन्यपर्ण पावसाचे पाणी खाली ठिबकून जाण्यास सोयीचे लांबट टोक (प्रकुंचित) असलेले पान. उदा.पिंपळ.
ramunculus (twig)
अंत्यशाखा, अंतिम शाखा अनेक शाखायुक्त असलेल्या अक्षाची लहानात लहान (शेवटची) शाखा (टहाळ)
Ranales
मोरवेल गण, रॅनेलीझ बेंथॅम व हूकर यांच्या वर्गीकरण पद्धतीप्रमाणे हे द्विदलिकित वनस्पतींचे गोत्र असून त्यात मोरवेल कुल चंपक कुल, सीताफळ कुल, गुडूची कुल व कमल कुल यांचा समावेश गण या संज्ञेने होतो. बेसींच्या पद्धतीत मोरवेल गणात ह्या कुलांशिवाय तमाल कुल, जातिफल कुल व मिरी कुल यांचाही अंतर्भाव आहे. हचिन्सनांनी फक्त मोरवेल कुल व कमल कुल यांचा समावेश केला आहे. या गणातील काष्ठयुक्त वनस्पती प्रारंभिक व औषधीय वनस्पती विशेषत्व पावलेल्या आहेत. पुष्पदलांची सर्पिल मांडणी, मुक्त व अवकिंज किंजपुट, सुटी परिदले इत्यादी लक्षणे येथे आढळतात.
random mating
यदृच्छ संयोग, स्वैर संगम दोन किंवा अधिक भिन्न जनुकयुक्त नर गंतुकांचा दोन किंवा अधिक प्रकारच्या स्त्री गंतुकांशी होणारा संभाव्य संयोग (युति, मीलन), यातून भिन्न जनुकयुक्त अनेक रंदुकांची व त्यातून विकास पावणाऱ्या संततीची निर्मिती होत.
range
कक्षा, पल्ला कमीतकमी व जास्तीत जास्त मूल्यांमधील अंतर, उदा. उष्णतामान, पाण्याची खोली, एखाद्या वनस्पतीची निसर्गतः वस्ती करण्याचे क्षेत्र, एखाद्या क्षेत्रातील किमान व कमाल पर्जन्यमानातील किंवा तापमानातील फरक.
rank
१ सरल पंक्ति, रांग २ पद १ उभी रांग किंवा ओळ उदा. खोडावरील पानांची ओळ २ वर्गीकरणातील स्थान, उदा वर्ग, गण, वंश इ.
rank
१ सरल पंक्ति, रांग २ पद १ उभी रांग किंवा ओळ उदा. खोडावरील पानांची ओळ २ वर्गीकरणातील स्थान, उदा वर्ग, गण, वंश इ.
Ranunculaceae
मोरवेल कुल, रॅनन्क्युलेसी काळे जिरे, बाळकडू, मोरवेल, अतिविष, बचनाग इत्यादी वनस्पतींचे (द्विदलिकित) कुल, याचा अंतर्भाव मोरवेल गणात (रॅनेलीझमध्ये) करतात. प्रमुख लक्षणे- औषधीय वनस्पती, बहुधा विभागलेली पान, द्विलिंगी, नियमित, क्वचित एकसमात्र फुले, सर्पिल ते चक्रीय परिदले, क्वचित संदले व प्रदले भिन्न, केसरदले अनेक, किंजदले ऊर्ध्वस्थ, एक ते अनेक, सुटी, बीजके एक, बोंड किंवा पेटिका फळ, क्वचित मृदुफळ, बिया तेलकट व पुष्कयुक्त
raphe
संधिरेषा १ अधोमुख बीजकाशी चिकटून असलेला लांबट कंगोऱ्यासारखा बीजबंध (बीजकाचा देठ) उदा. सूर्यफूल २ करंडक वनस्पतीच्या कोशिकावरणावर असलेली भेग, यातून होणाऱ्या जीवद्रव्याच्या हालचालीने कोशिका सरपटत जाते व मागेपुढे सरकते.
raphide
सूचिस्फटिक सुईसारखे स्फटिक (कॅल्शियम ऑक्झेलेट) उदा. गोंडाळ, कोरफड, कांडवेल इत्यादींच्या पानांतील कोशिकात अनेक स्फटिकांची जुडी असते. sphaeraphide.
ray
किरण, रश्मी, अर दंडाकृति अक्षातील त्रिज्येशी समांतर असा मृदूतकाचा भाग, रंभातील अवाहक ऊतक. r.floret किरण पुष्पक स्तबक (गुच्छासारख्या) फुलोऱ्यावरचे परिघातील फूल उदा. सूर्यफूल, शेवंती, सहदेवी इ. r. medullary निकाष्ठी किरण, निकाष्ठ किरण निकाष्ठाचा (भेंडाचा)
reaction
१ प्रतिक्रिया २ विक्रिया १ चेतकामुळे घडून येणारा बदल अथवा प्रतिसादरुप क्रिया, वसतिस्थानावर घडलेला वनस्पतींच्या समावासाचा परिणाम २ रसायनशास्त्रात ही संज्ञा रासायनिक बदलाकरिता वापरतात. r.time प्रतिक्रिया काल चेतकाला प्रतिसाद देण्याला लागलेला अवधी.
recapitulation
पुनरावर्तन त्याच अवस्थांतून पुन्हा जाणे r. hypothesis पुनरवर्तन गृहीतक r. theory पुनरावर्तन सिद्धांत प्रत्येक सजीव व्यक्ती आपल्या जातीच्या क्रमविकासात ज्या अवस्थांतून गेली असावी त्याच अवस्थांतून स्थूलमानाने ती आपल्या व्यक्तिगत विकासामध्ये जात असते अशी
receptacle
१ पुष्पासन २ आशय ३ आधानी १ अनेक लहान फुले धारण करणारा अक्षाचा लांबट, सपाट, खोलगट किंवा फुगीर भाग, उदा. सूर्यफूल कुल २ कित्येक कवकांत आढळणारा बीजुकधारी भआग उदा. पीठिका, धानीफल, पलिघा, शैवाकातील प्रजनी जनक, बीजकाधानी, पुष्पस्थली ३ काही शेवाळीतील जननेंद्रिये
receptacular
पुष्पासनीय, पुष्पस्थलीय फुलातील पुष्पासनावर आधारलेले, पुष्पासनासंबंधी, पुष्पस्थलीसंबंधी r.theory पुष्पस्थली सिद्धांत ऊर्ध्वस्थ किंजपुटापासून अधःस्थ किंजपुटाचा क्रमविकास झाला असून त्यामध्ये पुष्पस्थली (पुष्पासन) ऊर्ध्वस्थ किंजपुटाला वेढून वाढण्याची
receptive
ग्राही, आदायी, ग्रहणशील ग्रहण करण्याची (स्वीकारण्याची) क्षमता असलेला (अवयव, भाग, किंजल्क इ.) r. body ग्राही काय ग्रहणशील कणासारखा भाग
recessive
अप्रकट, अप्रभावी एका पिढीतून दुसऱ्या पिढीत गुणदोषांचे अनुहरण होताना काही गुणदोष (लक्षणे) संततीत ताबडतोब न दिसता सुप्त (अप्रकट) राहून, त्यापुढच्या पिढीत अनुकूल परिस्थितीत दिसू लागतात म्हणून ती अप्रकट मानतात. त्यांना जी पर्यायी लक्षणे (जी लागलीच दिसतात) ती
reciprocal
अन्योन्य, पारस्परिक, व्युत्क्रमी दोन सजीव एकत्र जीवन काढीत असताना त्यांचा एकमेकांशी देवघेवीचा संबंध अथवा व्यवहार उदा. शैवाक, कवकमूल संबंध r.hybrids अन्योन्य संकरण दोन जाती अथवा प्रकार यांमध्ये दोन प्रकाराने घडवून आणलेली संकरप्रजा, एकदा एक जातीतील नर व
reciprocity
अन्योन्यता, परस्परता एकमेकात देवघेवीच्या तत्त्वावर संबंध असण्याची स्थिती, उदा. फूल व कीटक यांचे संबंध, वनस्पती व प्राणी यांचे संबंध symbiosis
recolonisation
पुनर्वसन, पुनर्वसाहतीकरण एखाद्या क्षेत्रातील वनस्पतीसमुदाय नाश पावल्यावर पुनरपि तेथे वसाहत (समुदाय) स्थापन होण्याची प्रक्रिया (घटना).
recombination
पुनस्संयोजन संकर प्रक्रियेत संकरजात एकत्र आलेल्या अनेक गुणघटकांचे संकरजंआच्या अंतःप्रजननामुळे पुढील पिढीत भिन्नप्रकारे (प्रभावी व अप्रभावी लक्षणांच्या रुपाने) मिश्रण होण्याचा प्रकार, याचा पहिला अनुभव ग्रेगर मेंडेल या शास्त्रज्ञांना आला. Mendelism.
reconnaissance of vegetation
वनश्रीचे पूर्वान्वेषण वनश्रीची स्थूलमानाने केलेली प्रारंभिक पाहणी, त्यानंतर पादप समाजशास्त्राच्या दृष्टीने तिचे तपशीलवार विश्लेषण.
reconstruction
पुनर्रचना, पुनर्घटना जीवाश्मस्वरुपात इतस्ततः आढळणाऱ्या प्राचीन वनस्पतींना (किंवा प्राण्यांच्या) भिन्न अवयवांचा अभ्यास करून संपूर्ण वनस्पतीची (किंवा प्राण्याची) पूर्ण कल्पना देणारी आकृती (चित्र किंवा प्रत्यक्ष प्रतिकृती) बनविणे.
red snow
लाल हिम, लाल बर्फ एका हरित शैवलामुळे (Haematococcus nivalis Agardh) लाल ठिपके पडल्याप्रमाणे दिसणारा बर्फाळ भाग
reduced
१ न्यूनीकृत, अर्धसूत्रित २ ऱ्हसित, न्यूनित १ द्विगुणितापासून एकगुणित झालेली (रंगसूत्रांची संख्या) २ विकसनात अपूर्ण राहिलेला (अवयव), क्रमविकासात संख्येत (उदा. केसरदले, किंजदले, परिदले इ.) किंवा आकारमानात (उदा. भिन्न अवयव, उंची, पानांचा आकार इ.) कमीपणा आलेला, उदा. बटाट्याचे प्ररोह ऱ्हसनाने ग्रंथिक्षोड झालेले असावे असे मानतात.
reduced apogamy
न्यूनित अनिषेकजनन, न्यूनित अयुग्मता r.fertilisation ऱ्हसित फलन (निषेचन), न्यूनीकृत फलन नर व स्त्री गंतुकांच्या किंवा प्रकलांच्या संयोगापासून होणाऱ्या नित्य फलनाऐवजी अन्य प्रकले (उदा. दोन स्त्री प्रकले) एकत्र होण्याची प्रक्रिया apogamy
reduction
ऱ्हसन, न्यूनीकरण, क्षपण वर reduced येथे वर्णिलेली प्रक्रिया, रसायनशास्त्रात क्षपण ही संज्ञा हायड्रोजन अणू मिळविणे किंवा ऑक्सिजन अणू घालविणे असा सामान्यपणे होणारा प्रकार
reduplicate
बहिर्वक्र धारास्पर्शी, वक्रधारास्पर्शी फुलांच्या कळीतील पुष्पदलांच्या मांडणीचा एक प्रकार, यांमध्ये संदले किंवा पाकळ्या परस्परास फक्त किनारीनी (कडांनी) स्पर्श करतात परंतु तत्पूर्वी प्रत्येक दल बाहेर वळलेले असते. उदा. गुलखेराची संदले, बटाट्याच्या कुलातील फुलांच्या पाकळ्या
reduplication
पुनर्द्विगुणन १ मूळच्या अवयवांच्या संख्येत नवीन अवयव त्याच धर्तीवर बनल्याने संख्यावाढ होणे उदा. पाकळ्या, किंजदले, केसरदले इत्यादींची मंडले. २ रंगसूत्राच्या एकगुणित संचात एखाद्या रंगसूत्राचा भाग (खंड) दोनदा येण्याचा प्रकार. ३ संलग्नता व विलग्नता या पूर्वीच
reflexed
बहिर्नत, बहिर्वलित, बहिर्वक्र ईकदम बाहेर वळलेला (अवयव) खाली किंवा मागे वाकलेला, उदा. काही केसरदले, गुलाबाची संदले, सूर्यफूल (छदमंडल).
regeneration
पुनर्जनन, पुनरुद्भवन जखम झाल्यावर किंवा अवयव कापून टाकल्यावर तेथील शेष पृष्ठभागापासून नवीन शाकीय अवयवांचे उत्पादन उदा. जंगलातील झाड तोडून राखलेल्या बुंध्यावर नवीन प्ररोह (फांद्या) येऊन झाड पुन्हा वाढण्याची घटना, कलमावर मुळे फुटणे, वनस्पतीत किंवा प्राण्यात
region
प्रदेश काही विशिष्ट प्रकारांनी (जातींनी) व्यापलेला प्रदेश r.botanical वानस्पतिक प्रदेश विशिष्ट परिस्थितीशी संबंधित असे वनस्पतिप्रधान प्रदेश उदा. उष्णकटिबंधीय वर्षारण्य, समशीतोष्ण तृणक्षेत्र, विषुववृत्तीय वर्षावन.
regional
प्रादेशिक विशिष्ट प्रदेशातील, प्रदेशासंबंधी r.distribution प्रादेशिक प्रसार परिस्थितिसापेक्ष विशिष्ट प्रदेशातच (काही वनस्पती अथवा प्राणी यांचा) प्रसार, उदा. सागाची किंवा सालाची वने, हिमालयातील शंकुमंत वने.
regma
पालिस्फोटी फळ तडकून तीन किंवा अधिक एकबीजी व स्फोटक फलांश (कुडी फळ) बनविणारे शुष्क फळ उदा. एरंड, मोगली एरंड, जंगली एरंड, भद्रदंती इ. हे फळ ऊर्ध्वस्थ, त्रिपुटक किंजपुटापासून बनलेले असते.
regression
परागति, घट प्रगतीऐवजी उलट प्रक्रिया, उदा. प्रगत अवयवाऐवजी तत्पूर्वीचा कमी दर्जाचा अवयव बनणे, पाकळ्याऐवजी संदले, केसरदलाऐवजी पाकळ्या
regressive evolution
प्रतिगामी क्रमविकास वनस्पती अथवा प्राणी यांच्या सद्यःस्थितित पूर्वजांशी तुलना केल्यास, आढळणारा अप्रगत (ऱ्हास दर्शविणारा) बदल. हा बदल काही लक्षणांत (उदा. उंची, आकारमान, संरचना, संख्या, प्रसार इ.) विशेषेकरून आढळतो. उदा. काही वनस्पती कुलांत परिदलांचा आकार व
regulation
नियमन प्रतिकूल परिस्थितीतही नित्य स्थिती व शरीरकार्ये चालू ठेवण्याची क्षमता. r.auto (self) स्वनियमन स्वतःच्या जबाबदारीवर नियमन (नियंत्रण) चालू ठेवण्याचा प्रकार
rejuvenation
पुनरुज्जीवन, पुनर्युवीकरण, पुनर्युवन विद्यमान कोशिकेतील जीवद्रव्यापासून नवीन एक नग्न कोशिका बनविण्याची प्रक्रिया, उदा. काही शैवल वनस्पतींची गंतुके व बीजुके
reniform
मूत्रपिंडाकृति, वृक्काकार मूत्रपिंडाप्रमाणे (काजूच्या फळाप्रमाणे) एका बाजूस (तळाशी) खाच असलेले व दुसऱ्या बाजूस (टोकाकडे) गोलसर असलेले (पान, फळ, बी इ.) उदा. बाम्हीचे पान, उंदीरकानी (Ipomea reniformis chois)
reorientation
पुनर्विन्यास, पुनःस्थापन अवयवांच्या सापेक्ष स्थितीत बदल, उदा. आमरांची फुले, काही फुलातील केसरदले व किंजदले यांची परागणानंतर पूर्व स्थिती बदलते. उदा. भारंगी, सॅल्व्हिया.
reparation
पुनर्वर्धन, हानिपूर्ति नाश पावलेला अवयव, तेथेच पुन्हा नवीन बनणे, उदा.मुळाचे टोक फार थोडे तुटले असल्यास नवीन येणे, चिरले गेले असल्यास दोन नवीन टोके येणे.
repent
प्रसर्पी रांगते व मुळांनी चिकटून राहणारे खोड असलेली (वनस्पती), उदा. केसर (Jussiaea repens L.) repens
replum
छद्मपट, आभासी पट (पडदा) काही वनस्पतींच्या किंजपुटात नंतर बनणारा पडदा, बीजकाधानी याला चिकटून राहिल्याने फळाची झडपे अलग होतात उदा. मोहरीचे (सार्षप) फळ siliqua
reproduction
प्रजोत्पादन, पुनरुत्पादन, जनन विद्यमान (हयात असलेल्या) व्यक्तीपासून शाकीय, अलिंग किंवा सलिंग पद्धतीचा अवलंब करून नवीन त्यासारखी व्यक्ती (संतती) निर्माण होण्याची प्रक्रिया (घटना).
reproductive
जनक, पुनरुत्पादक, प्रजोत्पादक नवीन संतती निर्माण होण्यात भाग घेणारा (अवयव किंवा कोशिका), उदा. बीज, बीजुक, गंतुक, रंदुक इ.) r.bud कलिका, मुकुलिका प्रजोत्पादक अवयव निर्मिणारी कळी (फुलाची कळी, पुष्पकलिका), प्रजा (संतती) निर्माण करणारी सूक्ष्म संरचना (उपांग,
repulsion
प्रतिकर्षण, विलग्नता सजीवांचे किंवा त्यांच्या वैकल्पिक लक्षणांचे परस्परांना टाळणे. जनकाकडून (आईबापाकडून) आलेल्या भिन्न वैकल्पिक लक्षणांच्या घटकांचे संततीत उतरताना स्वतंत्र व्यवस्थापन होण्याऐवजी, भिन्न जनकांतून, काही घटक अनेकदा एकत्रपणे संततीत उतरतात त्यास
reserve cellulose
संचित तूलीर, राखीव सेल्युलोज साठवून ठेवलेले अर्धतूलीररुप अन्न उदा. खारकेच्या बीजात विशिष्ट प्रकारे कोशिकावरणात साठवून ते अन्न बीजाच्या अंकुरणात विद्राव्य स्वरुपात आणून वापरले जाते.
resin
राळ, रेझीन चिकट, अविद्राव्य, घनीभूत किंवा कठीण टर्पेंटाइन यासारख्या वनस्पतीत (पाइन, फर इ.) बनलेला व सालीतून निसर्गतः किंवा जखम झाल्यावर पाझरणारा टाकाऊ पदार्थ, उदा. बोळ, गुग्गुळ, धूप, बाल्सम इ. r.duct (canal) राळ नलिका काही वनस्पतीतील राळ किंवा तत्सम
resinosis
राळस्त्राव काही झाडातून कवकांच्या उपद्रवामुळे (उदा. Armillaria mellea) सुटलेला अनियंत्रित, अनैसर्गिक व विपुल राळेचा पाझर, उदा. शंकुमंत वनस्पती. resin flux
respiration
श्वसन, श्वासोच्छवास प्राणवायू आत घेऊन कार्बन डाय ऑक्साइड व पाणा बाहेर सोडणे व ऊर्जाप्राप्ती करणे इत्यादी प्रक्रियेस सानिल (normal, aerobic) श्वसन म्हणतात. ऑक्सिजन बाहेरुन न घेता ऊर्जेचे उत्पादन करणे यास अननिल किंवा निर्वात (anaerobic) श्वसन म्हणतात (उदा. यीस्ट, काही सूक्ष्मजंतू), याला अंतःश्वसन (internal respirtion) असेही म्हणतात. श्वसनक्रिया मूलतः ऑक्सिडीकरण होय. ती एक ज्वलनक्रिया आहे व ती कमी तपमानात घडून येते.
respiratory coefficient
श्वसन गुणक आत घेतलेला ऑक्सिजन व बाहेर सोडलेला कार्बन डाय ऑक्साइड यांचे गुणोत्तर (co२o२), सर्वसाधारणतः (co२o२ १) असे आढळते तथापि तेलबियांच्या श्वसनक्रियेत ऑक्सिजन अधिक घेतला जाऊन कार्बन डाय ऑक्साइड कमी सोडला जातो व निर्देशांक (भागाकार) १ पेक्षा कमी होतो
respirometer
श्वसनमापक वायुविनिमयाचे मोजमाप करण्याकरिता वापरलेले उपकरण, यामध्ये अंकुरणाऱ्या बिया किंवा उमलणाऱ्या कळ्या यांचा उपयोग करतात.
response
प्रतिक्रिया, प्रतिसाद चेतकाला सजीवाने भिन्न भिन्न प्रकारे दिलेला प्रतिसाद, सजीवांच्या संवेदनक्षमतेचा आविष्कार, उदा. अनुवर्तन, अनुचलन, अनुकुंचन इत्यादी हालचाली व आदिजीव सदृश प्रतिसाद.
rest
विश्राम कडक हिवाळ्यात शीत तपमानामुळे आणि कडक उन्हाळ्यात ओलाव्याच्या अभावी काही वनस्पतींची चयापचय निष्क्रियता.
resting cell
विश्रामी (निश्चल) कोशिका, विश्रामी पेशी निष्क्रियावस्थेत असलेली स्वतंत्र जिवंत कोशिका r.nucleus विश्रामी केंद्रक, विश्रामी प्रकल प्रकलाची विभाजनपूर्व अवस्था r.period विश्रामकाल बीजुके, बीजे, कंद, ग्रंथिक्षोडे इत्यादींची प्रसुप्तावस्था (निष्क्रिय अवस्था),
restitution
नवोद्गम, प्रत्यास्थापन, यथापूर्वस्थापन नाश पावलेल्या अवयवांची किंवा अवयवांच्या भागंआची पुन्हा वाढ (पुनर्जनन), वनस्पतीत ही घटना विकासावस्थेतील भागातच घडून येते. (उदा. फार लहान रोपे, वर्धिष्णु भाग इ.), इतरत्र जून ऊतकांचे विकासी ऊतकात रुपांतर होऊन नवीन वर्धि
restricted
निर्बंधित, सीमित परिस्थितीच्या दबावामुळे मर्यादित झालेला (उदा. वनस्पतीचा प्रसार किंवा वाढ)
resupinate
विपर्यस्त खालची बाजू वर आल्याप्रमाणे स्थान बदलणे उदा. काही कवकांचा बीजुकोत्पादक थर सर्वात वर असतो.
resupination
विपर्यास वर वर्णिलेली प्रक्रिया. मूळच्या स्थितीच्या उलट स्थिती होणे. उदा. आर्किडच्या फुलाची अंतिम स्थिती आरंभीच्या अवस्थेच्या (स्थितीच्या) उलट असते कारण विकास होत असताना ते अर्धे स्वतःभोवती फिरते.
resurrection plant
पुनर्जीवी वनस्पती एकदा सुकल्यावर पुन्हा पाण्यात ठेविली असता पूर्ववत आकार धारण करणारी वनस्पती, उदा. सिलाजिनेला लेपिडोफायला, ऍनॅस्टॅटिका, काही नेचे (प्लिओपेल्टिस) इ.
retardation
प्रगतिरोध मुक्तपणे वाढ किंवा विकास होण्यास प्रतिबंध किंवा मर्यादा. उदा. प्रकाशाचा प्रत्यक्ष परिणाम वाढ मर्यादित करतो. अंधारातील वाढ सापेक्षतः अधिक असते. खोड व फांद्या अधिक लांब परंतु पाने फार लहान व फुलांचा अभाव आढळतो.
retentivity
धारणशीलता धरुन ठेवण्याची क्षमता. उदा. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती तिच्या कणांच्या आकारावर व ह्यूमस (कुजकट पदार्थ) वर अवलंबून असते.
reticulate
जालरुप, जाळीदार जाळे असलेले, जाळीप्रमाणे संरचना असलेले, उदा. जाळ्याप्रमाणे फळाच्या सालीचा पृष्ठभाग असलेले रामफळ (Anona reticutata L.)
reticulum
जाल, जाळे आडव्या व उभ्या धाग्यांनी बनलेला पापुद्रा (पल्ल) उदा. नारळाच्या पानाच्या देठाशी बनलेला. r.nuclear प्रकलजालक प्रकलाच्या नित्य स्थितीतील प्रकलावरणाच्या आतील रंगसूत्र द्रव्याचे सूक्ष्म जाळे.
retinaculum
१ परिवाहक २ अंकुशाभ १ एक किंवा अधिक परागपुंज एकत्र चिकटवणारा प्रपिंड (उदा. आमरे) २ बिया पक्क होईपर्यंत त्यांना आधार देणारा आकड्यासारखा बीजबंध (उदा. वासक कुल)
retrogression
परागति, प्रतिगमन अधिक साधेपणा (अप्रभेदन) दर्शविणारा उलटा विकास. पादप समुदायात किंवा व्यक्तिगत विकासात हा प्रकार आढळतो. अनुक्रमणाच्या विरुद्ध ही प्रक्रिया घडून येते व पादपसमुदाय अस्थिर व साधा बनतो. regression, filial regression
retrogressive
परागामी, प्रतिगामी परागति दर्शविणारे, उदा. पूर्वकालीन हवामानाशी सुसंबद्ध असा स्थायी समावास (बदललेल्या परिस्थितीनुरुप विकास न पावलेला) r. metamorphosis परागामी रुपांतरण नित्य अवयवाऐवजी कमी दर्जाचे अवयव बनणे ही विकृती (विकृतीविज्ञानातील एक प्रकार), उदा.
retroserrate
पश्चदंती अंशतः खंड पडलेल्या पात्याचे भाग मागे वळलेले असून टोकास एक काहीसा त्रिकोणी भाग असलेले (साधे पान), उदा. पाथरी. runcinate
retuse
निम्नाय टोकास खोलगट असलेले (पान, उदा. तागाची एक जाती), उदा. नांदुरुक (Ficus retusa L.), असाणा (Bridelia retusa Spreng).
reversion
प्रत्यावर्तन पूर्वस्थितीवर (पूर्वावस्थेप्रत) येणे, पूर्वजांची काही लक्षणे विद्यमान पिढीत दिसून येण्याची घटना.
revolute
बहिर्वलित दोन्ही कडा खालच्या पृष्ठाकडे स्वतंत्रपणे वळून दोन सुरळ्या झालेले (साधे पान, उदा. कण्हेर)
Rhamnaceae
बदरी (बोर) कुल, ऱ्हॅम्नेसी बोर, तोरण इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा समावेश बेसी आणि बेंथॅम व हुकर यांनी ज्योतिष्मती गणात (सीलॅस्ट्रेलीझमध्ये) व एँग्लर व प्रँटल यांनी बदरी गणात (ऱ्हॅम्नेलीझमध्ये) केला आहे. प्रमुख लक्षणे- काष्ठयुक्त (झुडपे व वृक्ष)
rheotropic
धारानुवर्तनी, स्त्रोतानुवर्तनी पाण्याच्या झोताच्या चेतनेमुळे त्या दिशेने किंवा त्याविरुद्ध दिशेकडे वाढणारे.
rhipidium
व्यजनवल्लरी बाजूच्या शाखा एकाआड एक पद्धतीने पण समोरासमोरच्या दिशेने परस्परावर वाढलेल्या असल्याने पंख्यासारखा दिसणारा कुंठित फुलोरा, यामध्ये पहिल्या अक्षावर टोकांस फूल व खाली बाजूस (पहिल्या अक्षाजवळ) तिसरा अक्ष याप्रमाणे अनेक अक्ष निर्माण होतात व सर्व फुले एका पातळीत येतात, उदा. आयरिस व जुंकस (प्रनड) वंश.
rhizine
मूलबुव साधा एक तंतू किंवा शाखित तंतू अथवा अनेक समांतर तंतूंचा एकरुप झुबका, उदा. शैवाकांतील (दगडफुलातील) अनेक जातींत असे शोषणाचे कार्य करणारे व वनस्पतीएस आधार देणारे अवयव आढळतात.
rhizoid
मूलकल्प, मूलाभ मुळासारखे काय करणारे पण साधे केसासारखे एककोशिक किंवा अनेककोशिक पण तंतूसारखे उपांग, उदा. शेवाळी, प्रारंभिक नेचाभ पादप (टेरिडोफायटा), सायलोफायटीनी, कित्येक गंतुकधारी.
rhizome
मूलक्षोड, मूलस्तंभ जमिनीखाली आडवे वाढणारे, मुळासारखे दिसणारे, खवल्यासारखी पाने असलेले, द्विपार्श्व, बहुधा बहुवर्षायु, जमिनीवर पाने, फांद्या, फुलोरे व जमिनीतील मुळे निर्मिणारे खोड (रुपांतरित), उदा. कर्दळ, हळद, आले, दूर्वा (हऱ्याळी) इ. root stock
Rhizophoraceae
कांदल कुल, ऱ्हायझोफोरेसी पांशी, कांदल, कांकरा, चौरी इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा समावेश जंबुल गणात (मिटेंलीझ) केला जातो. प्रमुख लक्षणे- समोरासमोर व उपपर्णे असलेल्या पानांची झाडेझुडपे, द्विलिंगी, अवकिंज ते अपिकिंज, नियमित फुले, संदले ४-८, पाकळ्य
Rhizophoretum
कांदल संघात कांदलाची एखादी जात किंवा अनेक जाती निसर्गतः एकत्र वाढत असलेला समावास, यामध्ये ही वनस्पती प्रभावी असते. किनाऱ्यावरील खाऱ्या दलदलीत यांचा एक समुदाय आढळतो. consociation, formation.
Rhodophyceae
लाल शैवलवर्ग, ऱ्होडोफायसी शैवल वनस्पतीपैकी लाल रंगाचे द्रव्य (फायकोएरिथीन) शिवाय कधी निळे रंगद्रव्य (फायकोसायनीन) प्रामुख्याने आढळणाऱ्या साध्या कायक वनस्पती, इतर शैवलाप्रमाणे यांमध्येही हरितद्रव्य असतेच. बहुतेक सर्व खाऱ्या पाण्यात, परंतु काही गोड्या पाण्य
ribosome
रिबोसोम, रायबोसोम प्रथिनांचे संश्लेषण करणारा, आर एन ए (रिबोन्यूक्लीइक अम्ल) चा भरपूर साठा असलेला, परिकलात आढळणारा व कधी परिकलातील सूक्ष्म जालकतंतूस (अंतःप्राकल जालकास) चिकटून असणारा अतिसूक्ष्म कण, असे असंख्य कण परिकलात असतात. nucleotide, chromosome,
ridged
कटकित, कंगोरेदार अनेक कटक (कंगोरे) असलेले, उदा. दोडका, भेंडी यांची फळे, खडशेरणीचे व एक्किसीटमचे खोड, फांद्या इ.
rigid
ताठर, दृढ फारसे न वाकणारे (उदा. खोड, पान, काटे इ.) उदा. लहान सूर्यफूल (Helianthus rigidus Desf.) stiff
ring
वलय, कडे गोलाकार कंगोरा (कटक) अथवा कडी, उदा. काही वाहिका किंवा वाहिन्यातील जाड कंगोरे, खोडाच्या आडव्या छेदात दिसणारी काष्ठातील वार्षिक वर्तुळे annual ring, annulus.
ring bark
वलयवल्क, वलयीवल्क गोलसर पट्ट्यांनी सोलून जाणारा खोडाच्या बाहेरील भाग उदा. भूर्ज scale bark.
riparian
नदीतटीय, स्त्रोतसमीपस्थ, नदीतीरस्थ नदीच्या किंवा पाण्याच्या ओहोळाच्या कडेने वाढणारी (वनस्पती, वनश्री) उदा. Homonoia riparia Lour. reparial
RNA
आरएनए रिबोन्यूक्लीइक (रायबोन्यूक्लीइक) ऍसिड यांचे संक्षिप्त रुप, प्रथिन संश्लेषणात याचा महत्त्वाचा वाटा असतो, सर्व सजीवांत हे आढळते. chromosome, ribosome.
rock garden
शैलोद्यान खडकाळ जागी वाढणाऱ्या मरुवनस्पतींची बाग (बागेचा भाग), कलांचो, पानफुटी, निवडुंगाच्या भिन्न जाती, कॉटिलेडॉन इ. वनस्पती तेथे वाढतात.
rolling mechanism
लोळण यंत्रणा गडबडा लोळत, वाऱ्याने दूरवर जमिनीवरुन (फिरत) जाण्याची योजना, उदा. समुद्रकिनाऱ्यावर वाढणाऱ्या काही वनस्पतींची फळे (Spinifex suqarrosus), रानमेथी, लसूणघास इ. जेरिकोचा गुलाब व सिलाजिनेलाची एक जाती संपूर्णपणे जमिनीतून निघून वाऱ्याने दूरवर गडगडत जातात.
root
मूळ, मूल उउच्च वनस्पतीत आढळणारे, खोडापासून जमिनीत व प्रकाशाविरुद्ध दिशेकडे वाढत जाणारे, वनस्पतीस आधार देणारे व लवणयुक्त पाणी शोषून घेणारे इंद्रिय r.cap मूलत्राण मुळाच्या टोकाशी संरक्षणाकरिता असलेले टोपीसारखे आवरण r. climber मूलारोहिणी मुळांच्या साहाय्याने
Rosaceae
गुलाब कुल, रोझेसी गुलाब, जरदाळू, बिही, रॉसबेरी, स्ट्रॉबेरी, नासपाती, सफरचंद इत्यादि द्विदलिकित फुलझाडांचे कुल. याचा अंतर्भाव गुलाब गणात करतात. प्रमुख लक्षणे- औषधी, वेली, झुडुप व वृक्ष, पाने साधी किंवा संयुक्त व बहुधा उपपर्णासह असतात, बहुधा द्विलिंगी व एकसमात्र फुले, संदले पाच व जुळलेली, पाकळ्या बहुधा पाच व सुट्या, केसरदले अनेक, किंजदले जुललेली किंवा सुटी व बहुधा अनेक, फुले परिकिंज किंवा अवकिंज, फळे विविध, साधी किंवा घोसफळे, बीजे थोडी व अपुष्क.
rosaceous
गुलाबाकृति, गुलाबवणा गुलाबपुष्पाप्रमाणे पाकळ्यांची मांडणी असलेला पुष्पमुकुट, गुलाबी रंगाचा.
Rosales
गुलाब गण, रोझेलीझ बेंथॅम व हूकर यांच्या पद्धतीप्रमाणे हे गोत्र समजले जाते व एंग्लर व प्रँडल यांच्या व बेसीच्या पद्धतीत हा गण असून त्यात शिंबी कुल, गुलाब कुल इत्यादींचा समावेश होतो. हचिन्सनांच्या पद्धतीत शिंबी कुलाचा समावेश नाही. ह्या गणाचा उगम मोरवेल गणाशी संबंधित असून त्यातील फुले चक्रीय, पूर्ण, एकसमात्रापासून अरसमात्र या मर्यादेत मुक्तप्रदल, पंचभागी असतात, केसरदले अनेक, किंजदले थोडी किंवा अनेक, सुटी किंवा जुळलेली.
rosette
गुच्छ, गुच्छाकृति गुलाब पुष्पातील पाकळ्यांच्या मांडणीप्रमाणे असलेला पानांचा झुबका, उदा. कोरफड, घायपात, कॉटिलेडॉन इ. r. shoot गुच्छ प्ररोह फांदीवर एकाच बिंदूपासून निघालेला पानांचा झुबका. rosella
roseus
गुलाबी, फिकट लाल उदा. गुलखेरा (Althea rosea (L). cav.), सदाफुलीचा एक प्रकार (Vinca rosea L.) rosy
rostellum
चंचुक केसरमंडल व किंजमंडल याच्या स्तंभाच्या टोकाचा अरुंद चोचीसारखा भाग उदा. आमरे (ऑर्किड) Orchidaceae.
rotate
चक्राकृति गोलाकार, चाकासारखा, सपाट व खाली आखुड नलिकेवर आधारलेला (जुळलेल्या पाकळ्यांचा पुष्पमुकुट). उदा. वांगे, मिरची, रुई इ.
rotation
परिगमन कोसिकेतील (सूक्ष्म शरीर घटकातील) सजीव द्रव्याची कोशिकेच्या आवरणाच्या आतील बाजूस चालणारी प्रदक्षिणा उदा. नायटेला, सवाला अशा कित्येक जलवनस्पती.
rotund
वर्तुळाकृति एकंदरीने गोल आकाराचे पण काहीसे आयत (पान), उदा. कमळ, भुईचाफा (Kaempferia rotunda L.) orbicular oblong
rough
१ खरबरीत २ रोमश १ पृष्ठभाग खडबडीत असलेले २ पृष्ठभागावर ताठर केस असलेले (उदा. पान, खोड, फळ इ. खरवताचे व प्राजक्ताचे पान, भोपळ्याचे खोड, पान, देठ इ. scabrous
Rubiaceae
कदंब कुल, रुबिएसी मंजिष्ठ, कदंब, कॉफी, पापटी, अनंत, राईकुडा इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. बेंथम व हूकर यांच्या वर्गीकरणाप्रमाणे याचा अंतर्भाव रुबिएलीझ गोत्रात असून एंग्लर व प्रँटल यांच्या व बेसींच्या पद्धतीत त्याच नावाच्या गणात आहे. हचिन्सन यांनी रुबिएलीझ गणात फक्त रुबिएसी हे एकच कुल समाविष्ट केले आहे. विविध उपपर्णे असलेली समोरासमोर पाने, पुष्प संरचनेत ४-५ भागांची मंडले, संदले फार लहान, पाकळ्या जुळलेल्या, अधःस्थ किंजपुट व सपुष्क बियांची विविध फळे, इत्यादी लक्षणे या कुलात आढळतात. कॉफी उपकुल (कॉफीऑइडी) व सिंकोना (कोयनेल) उपकुल (सिंकोनॉइडी) अशी कदंबकुलाची विभागणी करतात.
ruderal
अपशिष्टवासी, अपशिष्ट पादप, क्षेप्यवासी वर्ज्य (कचरा वगैरे टाकाऊ माल) वस्तूंवर अथवा ओसाड जागी वाढणारी वनस्पती उदा. ओसाडी काटेरिंगणी, काटेमाठ, काटेधोत्रा, पांढरा धोत्रा इ.
rudiment
अवशेष, रुद्ध खुरटलेला, पूर्ण वाढ होण्याअगोदर ती थांबून अर्धवट विकास पावलेला (अवयव), उदा. स्त्री पुष्पातील कार्यक्षम नसलेली केसरदले, केलातील बिया. rudimentary
rugose
सुरकुतलेले सुरकुत्या पडलेले, उदा. खोड, फळ, तोरण (Zizyphus rugosa Lamk.) भिरी व गुलबुश यांची फळे. rugous
ruminate
रेषाभेदित अनेक रेषांनी भरलेले (बियातील मगज, पुष्क), उदा. जायफळ, हिरवा अशोक, सुपारी, सिताफळ इत्यादींचे बी. येथे बीजावरणाचा आतील थर मगजात इतस्ततः वाढलेला असतो.
runcinate
पश्चदंती पात्याच्या कडावरचे (करवती) दात खाली तळाकडे वळलेले असणे, उदा. दुधाळचे पान, पाथरी (Lactuca runinata DC).
runner
धावते खोड, धुमारा मुख्य खोडापासून निघालेली व जमिनीवर सरपटत मुळांनी चिकटून वाढणारी बाजूची शाखा, उदा. बाम्ही.
rust
तांबेरा, गेरवा तांबूस, पिवळट, तपकिरी, गर्द पिंगट रंगाच्या ठिपक्यांनी सहज ओळखू येणारा कवकजन्य रोग, लोखंडावरील गंजाप्रमाणे दिसल्याने तसे नांव पडले आहे. Uredinae.
Rutaceae
सताप कुल, रुटेसी बेल, कवठ, सताप, लिंबू, कढिलिंब इत्यादींचे द्विदलिकित कुल. हे हचिन्सन यांनी सताप गणात (रुटेलीझमध्ये) अंतर्भूत केले आहे. बेसींच्या व बेंथॅम व हूकरच्या पद्धतीत भांड गणात (जिरॅनिएलीझमध्ये) घातले आहे. सुगंधी प्रपिंडचित्रित बहुधा संयुक्त पाने, नियमित द्विलिंगी फुले, संदले व प्रदले ४-५, केसरदले ५,८,१० अथवा अधिक, सुटी किंवा अनेक जुड्यांची असून किंजपुट बिंबावर व ऊर्ध्वस्थ. किंजपुटातील अनेक कप्प्यात दोन ते अनेक बीजके, फळे विविध.