वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
There are currently 606 names in this directory beginning with the letter P.
P
प, पी, P पुष्पसूत्रात परिदलमंडल संक्षिप्तरुपाने दर्शविण्यास हे अक्षर वापरतात. floral formula. p

pachy-
स्थूल, घन- जाड अथवा दाट या अर्थाचा ग्रीक उपसर्ग p. carpous स्थूलफलावरणी, स्थूलफलभित्तिक फळाला जाड आच्छादन असलेली (वनस्पती), उदा. कवठ, बेल इ. p. cladous स्थूल शाखी जाड फांद्या असलेली (वनस्पती). p. phyllous स्थूलपर्णी, घनपर्णी जाड पाने असलेली वनस्पती उदा.

pachynema
स्थूलसूत्रावस्था प्रकलाच्या न्यूनीकरण विभागणीच्या प्रक्रियेत सर्व रंगसूत्रांचा मिळून प्रथम बनलेला समीपस्थितीतील जाड सर्पिल धागा उभा चिरला जाण्यापूर्वीची अवस्थआ (काल),   synapsis, spireme, meiosis.

pachytene
घनसूत्रतावस्था न्यूनीकरणातील (दुसऱ्या अवस्थेत) समरचित रंगसूत्रांच्या जोड्यातील प्रत्येक सूत्र अधिक जाड बनण्याची अवस्था diplotene, leptotene

packing cell
भरण कोशिका (पेशिका) पातळ आवरणाची साधई जिवंत कोशिका (सूक्ष्म शरीर-घटक) ह्या घटकांपासून मृदूतक बनते. parechyma.

pagophyta
गिरितलस्थ वनस्पति, गिरितलपादप डोंगराच्या पायथ्याशी वाढणाऱ्या वनस्पती

paired
युगल, युग्म जोडीने असणारे, उदा. रंगसूत्रे, शेवाळींच्या परितुंडाजवळचे दाते, संयोगापूर्वीची दोन प्रजोत्पादक कोशिकांची जोडी. conjugated

palaeclimatology
पुराहवामानशास्त्र प्राचीनकाळातील हवामानासंबंधी शास्त्रीय माहिती.

Palaeobotany
पुरापादप शास्त्र, पुरावनस्पतिशास्त्र प्राचीन काळी पृथ्वीवर असलेल्या व आता अश्मीभूत (दगडासारख्या) बनलेल्या अवशेषांवरुन ओळखू येणाऱ्या वनस्पतींच्या माहितीची शाखा, त्यावरुनच आजच्या वनस्पतींची परंपरा, परस्परसंबंध व कालखंड इत्यादींची कल्पना येते. fossil.

palaeocene
पॅलिओसीन तृतीयक कल्पातील एक उपविभाग, सुमारे ६ ते ७ वर्षांपूर्वीचा (भूशास्त्रीय कालखंड).

Palaeontology
पुराजीवशास्त्र, जीवाश्मशास्त्र सर्व प्राचीन जीवांच्या (प्राणी व वनस्पती) संबंधीची अश्मीभूत अवशेषांच्या (जीवरंभाच्या) शोधावरुन व अभ्यासावरून काढलेली माहिती (विज्ञानशाखा), क्रमविकासाच्या सिद्धांताला हा बळकट पुरावा मानतात.

palaeooic era
पुराजीव महाकल्प, पॅलिओझोइक ईरा सुमारे ६० कोटी ते २४.५ कोटी वर्षापूर्वीचा भूशास्त्रीय कालखंड.

palate
तालु १ उघडलेल्या तोंडाच्या दोन ओठाप्रमाणे (द्वयोष्ठक) असलेल्या पुष्पमुकुटाच्या फुलातील खालचा ठळक ओठ उदा. अडूळसा २ तसाच परंतु मिटलेल्या तोंडाच्या पुष्पमुकुटातील खालच्या ओठातील उंचवटा उदा. हरणखुरी (Linaria ramosissima Wall) bilabiate personate and ringent

pale
अंतस्तुष १ गवतांच्या कणिशकातील सर्वात आतील छदासारखा भाग (तूस) २ सूर्यफूल कुलातील काहींच्या पुष्पासनावर असलेले शुष्क छद ३ काही नेचांच्या पानांच्या देठावरील पातळ, शुष्क व सपाट केस ramenta  palea, palet

paleaceous
तुषसम, तुषाभ, तुसासारखे palea.

palisade cell
स्कंभकोशिका, लंब कोशिका लांबट, पातळ आवरणाची, हरित्कणयुक्त कोशिका

palisade stereide
स्कंभ कठक कोशिका काही बियांच्या जाड सालीत आढळणारी घन आवरणाची, लांबट कोशिका, ही पृष्ठभागाशी काटकोनात असते. sclereid.

palisade tissue
स्कंभोतक पृष्ठभागांशी काटकोनात असलेल्या लांबट हरित द्रव्ययुक्त कोशिकांचा थर, प्रकाशात वाढणाऱ्या बहुधा सर्व पानांत किंवा तत्सम अवयवांत हे ऊतक आढळते. parenchyma

pallens
पांडुरवर्णी फिकट रंगाची, उदा. दवणा Artemisia pallens pamp.

pallid
फिकट रंगाचे, पांडुरवर्णी pallens.

palm house
तालगृह भिन्न प्रकारच्या ताल वनस्पतींचे संवर्धन करण्यास किंवा कायम सुव्यवस्थित राखण्यास उपयुक्त असे कृत्रिम घर

Palmaceae
ताल कुल, पामेसी ताड, माड, पोफळी, शिंदी, खजूर, वेत इत्यादी उपयुक्त व परिचित एकदलिकित वनस्पतींचे मोठे कुल, याचा अंतर्भाव (पामेलीझमध्ये) ताल गणात करतात. प्रमुख लक्षणे- बहुधा झुडपे व वृक्ष, क्वचित औषधी, खोडाला फांद्या क्वचित असतात. संयुक्त पाने हाताच्या पंजाप

palmales
ताल (ताड), पामेलीझ बेंथॅम व हूकर यांच्या पद्धतीत पामी हा गण कॅलिसीनी या एकदलकित श्रेणीत घातला असून एंग्लर व प्रँटल यांच्या पद्धतीत याच गणाला प्रिन्सिपेस म्हटले आहे, बेसींनी हा गण स्ट्रॉबिलॉइडी या उपवर्गात तर हचिन्सन यांनी आपल्या कोरॅलोफ्लोरी या विभागात ठेवला आहे. पलांडु गणातील (लिलिएलीझ) पूर्वजांपासून हा गण अवतरला असावा याबद्दल यांचे एकमत आहे.

palmate
हस्ताकृति हाताच्या पंजासारखे विभागलेले (संयुक्त पाने) उदा. शाल्मली, अंबुशी, मार्सिलिया इ.

palmately veined
हस्ताकृति सिराल हाताच्या पंजाप्रमाणे शिरांची मांडणी असलेले (पाते), उदा. एरंड, कापूस, कवंडळ (Trichosanthes palmata Roxb.) गारवेल (Ipomoea palmata Forsk)

palmatifid
अल्पहस्ताकृति अर्ध्यापेक्षा कमी पण हस्ताकृति विभागलेले (पाते) उदा. पपई, एरंड

palmatipartite
अर्धहस्ताकृति अर्ध्यापर्यंत विभागलेले हस्ताकृती (पाते), उदा. चिनी एरंड, भेंडी, कापूस, ताड

palmatisect
अपूर्णहस्ताकृति अर्ध्यापेक्षा अधिक विभागलेले हस्ताकृती (पाते), उदा. गारवेल

paludosa
पंकवासी दलदलित वाढणारे (झाड), उदा.Phoenix paludosa Roxb.

paluster
रुतणवासी विशेष प्रकारच्या पाणथळीत वाढणारे (झाड) उदा. Caltha palustris L.

Palynology
परागविज्ञान परागांचे भिन्न प्रकार, त्यांचे गुणधर्म, कार्य, संरचना, जीवाश्म (व त्यावरुन प्राचीन वनस्पतीसंबंधी काढलेले निष्कर्ष) इत्यादीसंबंधी तपशीलवार माहितीची शाखा, हिला परागविश्लेषण असेही म्हणतात.

pampa
सदातृणक्षेत्र, पंपा याला रुक्षतृणक्षेत्र असेही म्हणतात. अर्जेंटिनात या प्रकारचे गवताळ प्रदेश आढळतात, ह्या गवतांचे मरु वनस्पतींशी साम्य असते, ती उंच असून त्यांचे झुबके विखुरलेले असतात. steppes.

Pandanaceae
केतकी कुल, पडनसा केवडा (वंश- पँडॅनस), सारारंगा व फेसिनेशिया या तीन वंशांतील सुमारे २२५ जातींचा समावेश करणारे एकदलिकित कुल, यांचा समावेस पँडॅनेलीझ गणात करतात. प्रमुख लक्षणे- बहुधा पाणथळीत वाढणाऱ्या व वायवी मुळांनी आधारलेल्या काष्ठमय वनस्पती, कधी वेलीप्रमाणे चढणाऱ्या, कधी शाखायुक्त, एकाआड एक, लांब, अरुंद, काटेरी कडा असलेली व तळाशी खोडास वेढणारी पाने तीन रांगांत असतात. फुलोरा टोकास व तळाशी छदे, स्थूलकणिश, नग्न फुले फार लहान व एकलिंगी, नर फुलात अक्षावर फक्त अनेक केसरदले, स्त्री पुष्पात अनेक किंजदलांच्या वर्तुळाने बनलेल्या एक किंवा अनेक कप्प्याच्या किंजपुटात एक ते अनेक बीजके, किंजले नसतात, मृदुफळ किंवा आठळीफळ किंवा यांचे बनलेले संयुक्त फळ, पुष्क तेलकट.

panduriform
वीणाभ काहीसे वीणेसारखे, मध्यभागी थोडे आकुंचित व तीन खंड पडलेले (साधे पान), उदा. पानचेटी, चुक्याची जाती पहा lyrate, fiddle shaped  pandurate

pangenesis
सर्वजनन शरीराच्या सर्व भागांतून सदैव असंख्य सूक्ष्म कण निघून प्रजोत्पादक कोशिकात जमतात व पुढील पिढीचा विकास घडवून आणण्यास व पितरांची लक्षणे पिढीत उतरण्यास जबाबदार असतात असा डार्विनचा सिद्धांत, हा मान्य झाला नाही, कारण त्यामुळे संपादित गुण उतरणे शक्य होते

panicle
परिमंजरी विरळ व अनेक शाखायुक्त मंजरी किंवा तत्सम फुलोरा, उदा. आंबा, कंगुणी (Celastrus paniculatus Willd).

paniculate
परिमंजरीय परिमंजरीयुक्त

panmixis
यादृच्छिक संयोग random mating.

panniform
ऊर्णाजिनाभ बुरुणूस किंवा लोकरीच्या कापडासारखे pamosus

pantogenous
सर्वाश्रयी, भिन्नोपजीवी अनेक आश्रयावर वाढणारी (वनस्पती), उउदा. काही कवक.

papain
पपेन पपईच्या पानातील विशिष्ट प्रकारचे प्रथिनपाचक वितंचक (वितंचकांचा गट) enzyme.

Papaveraceae
अहिफेन कुल, पॅपॅव्हरेसी अफू, पिवळा धोतरा (काटे धोतरा), पॉपी इत्यादी (द्विदलिकित) वनस्पतींचे कुल याचा अंतर्भाव (पॅपॅव्हरेलीझमध्ये ) अहिफेन गणात करतात. हचिन्सन यांनी ऱ्हीडेलीझमध्ये आणि बेथँम व हूकर यांनी पराएटेलीझमध्ये हे कुल घातले आहे. प्रमुख लक्षणे- एकाआड एक पाने व चीक असलेल्या औषधी, पाकळ्या ४-६ क्वचित नसतात, संदले२, केसरदले २,४ किंवा अनेक, किंजदले २ ते अनेक, जुळलेली, ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा व तटलग्न बीजकाधानी, बीजके अनेक, बोंड किंवा कपाली प्रकारचे फळ, बीजे सपुष्क

Papayaceae
पपई कुल, पपयेसी caricaceae.

Papilionaceae
पलाश कुल, पॅपिलिओनेसी अगस्ता, घेवडा, गोकर्ण, पळस (पलाश), हरबरा, वाटाणा, शिसू, करंज, पांगारा इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, हचिन्सन यांना याचा समावेश शिंबी गणात (लेग्युमिनोजीमध्ये) केलेला असून तत्पूर्वी शिंबी कुलातील हे एक उपकुल मानले जात असे. प्रमुख ल

papilionaceous
पतंगरुप फुलपाखरासारखा दिसणारा पुष्पमुकुट, यामध्ये एक सर्वात मोठी पाकळी (ध्वज) बाहेर व तिच्या आत दोन बाजूच्या लहान पाकळ्या (पक्ष पंख) व मध्ये दोन जुळलेल्या पाकळ्यांचा नावेसारखा (नौकादल) भाग अशा पाच पाकळ्या असतात. उदा. अगस्ता, वाटाणा

papilla
पिंडिका मृदु उंचवटा

papillate
पिंडिकेय अनेक पिंडिका असलेला (पृष्ठभाग). papillose

pappus
पिच्छसंदले पिसासारखा अथवा केसांच्या झुबक्यासारखा संवर्त उदा. दुधळ, सहदेवी इ.

parachute mechanism
छत्र यंत्रणा हवेतून तरंगून राहण्याकरिता फळावर किंवा बियावर असलेले छत्रीप्रमाणे साधन, उदा. सहदेवी, दुधळ यांची फळे, रुईचे बी, येथे केसांचा झुबका तरंगण्यास व वाऱ्याने प्रसारास मदत होते. flying hair.

parallel evolution
समांतरित क्रमविकास दोन भिन्न गटात, समान परिस्थितीत विकास होत गेल्यामुळे काही लक्षणांत सारखेपणा येण्याची प्रक्रिया, उदा. रूई कुल, एरंड कुल, एरंड कुल व निवडुंग कुल यांतील काही वनस्पतींत काटेरी, मांसल व पानासारखे हिरवे खोड आढळते, ते रुक्षतेशी समरस होण्याकरिता असते.

parallel venation
समांतर सिराविन्यास पात्याच्या तळापासून अनेक शिरा उगम पावून टोकाकडे त्या समांतर जाऊन तेथे परस्परांशी जुळल्यास अभिसारी व न जुळता पात्याच्या कडेने गेल्यास अपसारी म्हणतात व हा बहुसिराल समांतर सिराविन्यास, पात्यात फक्त एक प्रमुख शीर व अनेक उपशिरा त्याशी काटकोन

parallelotropic
समांतरानुवर्तनी चेतकाच्या दिशेशी समांतर वाढणारा (अवयव) उदा. वृक्ष किंवा झुडपाचे सरळ वाढणारे खोड, बाळवेखंड किंवा कांद्याची पाने, हे अवयव प्रकाशाच्या दिशेशी समांतर वाढतात.

paraphysis
वंध्यतंतु इतर फलनक्षम अवयवांमधून असणारा व कार्यक्षम नसलेला (वांझ) तंतूसारखा अवयव, उदा. काही अबीजी वनस्पती (शेवाळी, शैवले, कवक इ.) pl. paraphyces

parasite
जीवोपजीवी दुसऱ्या सजीवावर आपला निर्वाह अंशतः किंवा पूर्णतः करणारा सजीव, उदा. तांबेरा रोग, हिवतापाचे जंतू, बांडगूळ, अमरवेल

parasitism
जीवोपजीवन जीवोपजीवी असण्याचा प्रकार

parastichy
सर्पिल पंक्ति, परिपंक्ति खोडावरील पानांच्या एकाआड एक मांडणीत (सर्पिल प्रकार) त्यांच्या तळातून खोडाभोवती काढलेल्या काल्पनिक रेषेला जननिक सर्पिल म्हणतात. जेव्हा खोडावरील पानांची गर्दी असते व त्यांचा निकट संपर्क असतो तेव्हा अन्य सर्पिल रेषांची श्रेणी ठळकपणे आढळते व त्यांना सर्पिल पंक्ती म्हणतात. उदा. पाइनचे शंकू, वई निवडुंग.

parasyndesis
समांतर युग्मन प्रकल विभाजनातील समीप स्थितीत समजात रंगसूत्रांची समांतर मांडणी (उपस्थिती) synapsis

paratonic
प्रवर्तित वनस्पतिसृष्टीत आढळणाऱ्या व बाह्यचेतनेमुळे घडवून आणलेल्या (हालचाली), याच्या उलट स्वायत्त (स्वयंप्रेरित) autonomic.

paratype
मूलान्यप्ररुप, पॅराटाइप एखाद्या वनस्पतीच्या मूळच्या नमुन्याखेरीज (मूलप्रकलाखेरीज) मूळच्या वर्णनाबरोबर उल्लेख केलेला नमुना   holotype.

parenchyma
मृदूतक बहुधा पातळ आवरणाच्या, जिवंत, समव्यासीय व विविध कार्ये करणारा उपयुक्त कोशिकांचा समूह (ऊतक), उदा. मध्योतक, वायूतक, हरिमोतक, स्कंभोतक इ. mesophyll, palisade

parenchymatous
मृदुतकीय मृदुतकाचे बनलेले

parents
जनक पिढी आनुवंशिकतेच्या चर्चेत (संकर प्रयोगात) वापरली जाणारी माता व पिता (आई व बाप) यासंबंधीची संज्ञा, त्यापुढच्या जन्मलेल्या) संततीय संतानीय पिढी म्हणतात. filial generation

parichnos
द्विपार्श्वमुद्रा पान पडून गेल्यावर खोडावर मागे राहणाऱ्या वणावरचे (किणावरचे) बाजूचे दोन ठसे, उदा. लेपिडोंडेंड्रेलीझमध्ये ह्या गणातील प्राचीन वनस्पतींचे खोडाचे जीवाश्म Lycopodineae.

parietal
तटलग्न, भित्तीय एखाद्या अवयवाच्या आवरणास चिकटलेले अथवा त्यावरच वाढलेले उदा. बीजक, बीजुक p.layer भित्तिस्तर बाहेरचा थर

Parietales
भित्तीयबीजक गण, पराएटेलीझ एंग्लर व प्रँटल यांच्या पद्धतीत आद्यपरिदली श्रेणीतील आणि बेंथँम व हूकर यांच्या पद्धतीत मुक्त प्रदली उपवर्गातील एक गण. प्रमुख लक्षणे- फुलात अनेक केसरदले, बीजके अनेक असून ती तटलग्न बीजकाधानीवर असतात. फुले सर्पिल किंवा चक्रीय, परिदल

paripinnate
समदली पिच्छाकृति मध्यशिरेच्या (पर्णाक्षाच्या) फक्त दोन्ही बाजूस असलेली दले संख्येने सारखी असलेले (पिसासारखे) व टोकास दल नसलेले संयुक्त पान, उदा. चिंच, बाहवा इ.

park land
वृक्षवास भूमि रुक्षवनापेक्षा अधिक ओलसर हवामानातील तृणक्षेत्र savannah.

parted
विभक्त, खंडित बव्हंशी तळापर्यंत विभागलेला (अवयव, उदा. संवर्त, पुष्पमुकुट इ.)

parthenocarpic fruit
अनिषेक फल

parthenocarpy
निर्बीज फलोत्पत्ति बीज नसलेल्या फळाचे उत्पादन (निर्मिती), १ परागण न झाल्यामुळे २ फलन न झाल्यामुळे किंवा ३ गर्भविकास न झाल्यामुळे, इत्यादी कारणे याला जबाबदार असू शकतात.

parthenocarpy
निर्बीज फलोत्पत्ति बीज नसलेल्या फळाचे उत्पादन (निर्मिती), १ परागण न झाल्यामुळे २ फलन न झाल्यामुळे किंवा ३ गर्भविकास न झाल्यामुळे, इत्यादी कारणे याला जबाबदार असू शकतात.

parthenogenesis
अनिषेक जनन फलनाशिवाय (लैंगिक प्रक्रियेशिवाय) अंड्यापासून (अंदुकापासून) नवीन व्यक्तीची उत्पत्ति होण्याची घटना उदा. दुधळ, धोतरा इत्यादी वनस्पती, प्राण्यांपैकी काही माव्यांचे व मुंग्या, मधमाश्या, गांधीलमाश्या इत्यादींचे प्रकार.

parthenospore
अनिषेकबीजुक लैंगिक प्रक्रियेशिवाय एकाच गंतुकांपासून बनलेले गंतुबीजुकासारखे बीजुक   zygospore

partial
अंश, आंशिक, अल्प- काहीसे किंवा पूर्ण नसलेले p. habitat अल्पाधिवास, आंशिक आश्रय एखाद्या वनस्पतीच्या जीवनचक्रात अल्पकाळ उपयोगात आणलेले ठिकाण, जीवनचक्रातील एखादी अवस्था काढण्यास वापरलेले स्थान (आश्रय देणारा सजीव). p. parasite अंश परोपजीवी अन्नाकरिता

particulate inheritance
विविक्त अनुहरण आईबापापासून संततीत उतरलेल्या लक्षणांचे साधे अपूर्ण मिश्रण झाल्यास संततीमध्ये व्यक्तीच्या शरीराचा काही भाग आईकडून आलेल्या व काही भाग बापाकडून आलेल्या लक्षणांचा छाप दर्शवितो उदा. कर्दळीच्या काही जातींत निम्मे पान हिरवे व निम्मे लालसर पिंगट अस

parviflorous
लघुपुष्पी एकाच वंशातील इतर जातीत आढळणाऱ्या फुलांपेक्षा लहान फुले असलेली (वनस्पती), उदा. राईकुडा (Ixora parviflora Vahl.)

parvifolius
लघुपर्णी एकाच वंशातील इतर जातीतल्यापेक्षा लहान पाने असलेली (वनस्पती)

passage cell
मार्ग कोशिका, प्रवेश कोशिका मुळांतील अंतस्त्वचा अथवा बहिस्त्वचा ह्यातील कोशिकावरण न बदललेल्या कोशिका, यातून पाण्याचा आत बाहेर प्रवेश चालू राहतो, इतर कोशिकांचा अशा प्रवेशाला विरोध असतो, बहुधा या कोशिका आदिप्रकाष्ठासमोर असतात.

Passifloraceae
कृष्णकमळ कुल, पॅसिफ्लोरेसी कृष्णकमळ, पॅशनफुट, ऍडेनिया पामॅटा इत्यादी द्विदलिकित फुलझाडांचे एक लहान कुल, हल्ली याचा अंतर्भाव कृष्णकमळ गणात (पॅसिफ्लोरेलीझमध्ये) करतात. तत्पूर्वी पराएटेलीझमध्ये (एंग्लर व प्रँटल यांनी) केला होता. कृष्णकमळाच्या वंशात (पॅसिफ्लोरामध्ये) सुमारे पाचशे जाती असून त्या कुलात एकूण बारा वंश व सहाशे जाती आहेत. प्रसार उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात आहे. प्रमुख लक्षणे- बहुतेक जाती औषधी, झुडपे किंवा पानांच्या बगलेतील तणावे असलेल्या वेली, पाने साधी, खंडयुक्त, एकाआड एक व उपपर्णयुक्त, फुले एकेकटी किंवा वल्लरीवर येतात, फुले नियमित, द्विलिंगी किंवा एकलिंगी, फुलात केसरधर किंवा किंजधर आढळते, कधी पाकळ्या नसतात. संदले, प्रदले, केसरदले ३-५, केसरदले कधी १०, तीन ऊर्ध्वस्थ किंजदलांच्या किंजपुटात एक कप्पा व तटलग्न अनेक बीजके, मृदुफळ किंवा बोंड, बियांवर अध्यावरण

pasteurisation
पाश्चरीकरण ज्यात वितंचन होऊन पदार्थ बिघडण्याची शक्यता असते तो द्रव सुमारे १४० अंश फॅ. पर्यंत तापवून वितंचन घडवून आणणाऱ्या कवकांचा व बीजुकांचा नाश करण्याची प्रक्रिया, यामुळे द्रवाचे परिरक्षण होते.

pasture
कुरण, गुरचरण नरम व उंच गवत सलगपणे वाढून बनलेला गवताळ प्रदेश (समावास), गुरांना चरण्यास हा फार उपयुक्त असतो.

patella
बशी, थाळी आधाराकरिता दांडा नसलेला व किनार स्पष्ट असणारा उथळ बशीसारखा अवयव उदा. मुक्त धानीफल apothecium.

patens
प्रसृत पसरट आकार किंवा प्रकार असलेला (अवयव किंवा वनस्पती) उदा. Hamelia patens Jacq. (Scarlet bush). patent

paternal
पैतृक पित्याकडून आलेली (लक्षणे, जनुके किंवा रंगसूत्रे).

pathogen
रोगकारक, रोगजनक, रोगजंतु रोगाची लागण करणारे (बीजुक, जंतू इ.)

pathogenic
विकृतिजनक विकृति (रोग) उत्पन्न करणारे जीव किंवा परिस्थिती

pathology
विकृतिविज्ञान रोगासंबंधीची सर्व माहिती संकलन करणारी विज्ञानशाखा p. vegetable (plant) वनस्पति रोग चिकित्सा, वनस्पति रोग विज्ञान, वनस्पतींना होणाऱ्या रोगासंबंधीची ज्ञानशाखा

patromorphic
पितृरुपी वडिलांच्आय (पित्या) सारखे, दोन जनक (पिता आणि माता) व्यक्तीपैकी नर (पुं-) व्यक्तीसारखे (अपत्य)

pattern vegetational
वानस्पतिक आकृतिबंध वनस्पतींचे संच किंवा समूह यांचा विशिष्ट प्रकारे निसर्गतः घडून आलेला साचा.

patulous
विस्तारित विस्तारुन किंवा पसरुन वाढलेले (झाड)

pauciflorous
अल्पपुष्पी थोडी फुले निर्मिणारी (वनस्पती)

pear shaped
कुंभाकृति तळाकडे निरुंद होत गेलेले, काही घागरी व तांबे अशा आकाराच्या असतात. उदा. नासपती (pear) obovoid, obconic

peat
जीर्णक, पीट विशिष्ट हवामानात, उंचीवरच्या खोल दलदलीत व ऑक्सिजनच्या अभावी, वनस्पतींचे मृत अवशेष पूर्णपणे न कुजता राहून बनलेला जळाऊ पदार्थ

pectin
पेक्टिन फळातील थलथली (जेली) सारखा पदार्थ

pectinate
कंकतिक फणीच्या दात्याप्रमाणे बारीक बाग पडलेले, उदा. पान (कामलता), पाकळी (पिंक) fimbriate, pinnatifid, pinnatisect

Pedaliaceae
तिल कुल, पेडॅलिएसी तीळ (तिल). रानतीळ, मोठे गोखरु इत्यादि द्विदलिकित फुलझाडांचे लहान कुल, बेंथॅम व हूकर यांनी मार्टीनिएसीचा (वृश्चन कुलाचा) अंतर्भाव या कुलात केला असून तिलकुल पर्साएनेलीझ गणामध्ये समाविष्ट केले आहे.प्रमुख लक्षणेः प्रपिंडीय केस असलेल्या औषधी, फुले द्विलिंगी, असमात्र, संदले व प्रदले प्रत्येकी पाच, केसरदले २ किंवा ४ः किंजदले २ किंवा ३-४, बीजके अनेक, किंजपुटात २-४ कप्पे, अक्षलग्न बीजकविन्यास, बोंड किंवा कपाली प्रकारचे फळ, बिया सपुष्प, तीळ (sesamum indicum L.)

pedate
पक्षिपदाकृति पक्ष्यांच्या पावलाप्रमाणे विभागलेले (पान किंवा पानातील शीर), हस्ताकृति खंडित पानाच्या बाजूचे खंड पुन्हा विभागलेले असण्याचा प्रकार

pedicel
वृंत, देठ, पुष्पवृंत फुलाचा देठ, जलनेचातील बीजुककोशधारी तंतू

pedicellate
सवृंत देठ असलेले (फूल), उदा. संकेश्वर, गुलाब

Pedology
मृदाविज्ञान भिन्न प्रकारच्या जमिनींचा अभ्यास.

peduncle
पुष्पबंधाक्ष फुलोऱ्याचा देठ (अक्ष), एकच फूल असल्यास सुद्धा (उदा. कमळ, झेफिर, लिली) ही संज्ञा वापरतात.

peel
साल फळाची साल (उदा. आंबा, केळ, संत्र, डाळिंब इ.) यामध्ये केव्हा फलावरणाचे तीन भाग तर केव्हा दोन किंवा एकच भाग येतो.

peg
कीलक काही वनस्पतींच्या बीजांच्या रुजण्याच्या प्रक्रियेत, आतील कोवळ्या कोंबाला (आदि कोरकाला) बीजावरणाबाहेर पडण्यास मदत करणारा अधराक्षावरचा उंचवटा. उदा. भोपळा.

pelagic
सागरी खुल्या समुद्रात (किनाऱ्यापासून दूर) वास करणारे (सजीव), ही संज्ञा खाऱ्या किंवा गोड्या पाण्यात (पण तळाशी नव्हे राहाणाऱ्यांनाही वापरली जाते, plankton and nekton हे त्यांचे दोन प्रकार

pelagophyta
सागरपृष्ठी वनस्पति समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या वनस्पती, उदा. सरगॅजम शैवल

pellicle
तनुच्छद नाजुक व सर्वात बाहेरचा पापुद्रा, अपित्वचा

pellucid
पारदर्शी अंशतः किंवा पूर्णतः पारदर्शक (पलीकडचे दर्शविणारे), स्वच्छ

pelochthophyta
कर्दमतीर वनस्पति चिखल साचलेल्या तीरावरील वनस्पती अनूप समावास, पंक समावास marsh formation. pelophytes

peltate
छत्राकृति छत्राप्रमाणे एक दांडी (देठ) व त्यावर पसरट गोलसर ढालीसारखे आच्छादन (पाते) असणारे (पान), उदा. अळू, कमळ, ट्रोपिओलम इ.

pendant
लोंबते, निलंबित आधाराच्या साहाय्याने लोंबणारे, उदा. काही पाने, फुले, फुलोरे, परागकोश, फळे इ. बाहव्याचा फुलोरा

pendulous
लोंबते, निलंबी pendant

penicillate
शलाकाकृति पेन्सिलीसारखे, अनेक केसांच्या झुबक्यासारखे

penicillium
केश शलाका, कूर्चक कवक केसांचा झुबका, Penicilium notatum या बुरशीला तिच्या झुबकेदार तंतूमुळे ते (कूर्चक कवक) नाव पडले.

pennate
पिच्छाकृति, पक्षाकृति pinnate

pentacarpellary
पंचकिंजी पाच किंजदले असलेले (फूल) अथवा पाच किंजदलांचा बनलेला (किंजपुट), उदा. भेंडी कुलातील काही वनस्पती, जास्वंद

pentacyclic
पंचचक्रीय संवर्त, पुष्पमुकुट, केसरमंडल व किंजमंडल यापैकी एका किंवा दोन मंडलात वाढ होऊन एकूण पाच मंडले असलेले (फूल), उदा. कळलावी, नागदवणा या दोन्हीत परिदले व केसरदले यांची प्रत्येकी दोन मंडले व किंजदलांचे एकच मंडल असते.

pentafoliate
पंचदली पाच दलांचे संयुक्त पान

pentagonal
पंचकोनी पाच कोनाचे, उदा. निर्गुडी, गुलाब, पाचधारा असलेले (खोड, फळ, बी इ.) उदा. काही निवडुंगाच्या जाती pentangular

pentamerous
पंचभागी प्रत्येक मंडलात पाच भाग असलेले (फूल) उदा. गारवेल, धोतरा bimerous

pentander
पंचकेसरी पाच केसरदले असलेले (फूल), उदा. धोतरा, वांगे, केळ, रुई इ. यावरुन Pentandria हा वर्ग लिनियसने मानला होता व त्यात सर्व पंचकेसरी वनस्पतींचा समावेश केला होता. pentandrous

pentarch
पंचसूत्री पाच आदिप्रकाष्ठांचे गट असलेला (प्रकाष्ठ, रंभ)

pentose
पेंटोज (शर्करा) पाच कार्बन अणू असलेले ग्लूकोजसारखे संयुग (रेणू) उदा. रिबोज, प्रकली अम्लांचे घटक

pepo
कर्कटीफल अधःस्थ किंजपुटापासून बनलेले अनेकबीजी, एक कप्प्याचे, तटलग्न बीजकविन्यास असलेले मृदुफळ, उदा. काकडी, भोपळा, काशीफळ (cucurbita pepo.L.)

pepsin
पेप्सिन एक पाचक द्रव्य (वितंचक) enzyme

peptic ferment
प्रथिन पाचक प्रथिनांचे पाचन करणारे (व त्यांचे रुपांतर पेप्टोनमध्ये करणारे) वितंचक उदा. पेप्सिन

perceptibility
अवगम्यता जाणीव होण्याची क्षमता

perceptible
इंद्रियग्राह्य, अवगम्य इंद्रियामुळे ग्रहण करता येणारे (समजून येणारे)

perception
अवगम इंद्रियाच्या मध्यस्थीने बाह्य कारण जाणण्याची (समजण्याची) प्रक्रिया, उदा. गुरुत्वाचे अस्तित्व कोशिकेतील काही कणांमुळे समजून येण्याची प्रक्रिया statolith, statocyst

percolation
निचरण, परिगलन पाणी किंवा तत्सम द्रव जमिनीच्या कणांमधून (जमिनीतील पोकळ्यांमधून) किंवा छिद्रयुक्त पडद्यातून खाली किंवा बाजूस गळणे (पाझरणे).

perennating organ
बहुवर्षजीवी अंग (अवयव) अनेक वर्षे जिवंत स्थितीत राहणारा वनस्पतीचा भाग उदा. जमिनीतील खोड

perennation
बहुऋऋतुजीविता, बहुवर्षजीविता अनेक वर्षे जिवंत राहण्याची प्रक्रिया

perennial
बहुवर्षायु अनेक वर्षे जिवंत राहणारी (वनस्पती), यांपैकी काही एकदाच फुलतात, उदा. घायपात, बांबू, काही दरवर्षी तर काही कधीमधी फुलतात annual, biennial

perfect
पूर्ण १ द्विलिंगी फूल (सर्व अत्यावश्यक अवयव असलेले) २ सर्व घटक भागांनी युक्त असा अवयव ३ लैंगिक प्रक्रियेचा परिणाम म्हणून बीजकोत्पत्ति होणारी जीवनातील अवस्था, उदा. काही कवकात (अपूर्ण कवक) या अवस्थेचा (धानी, गदा, रंदुक इ.) अभाव आढळतो.

perfoliate
परिवेष्टी पात्याच्या तळामधून खोड वर आल्यासारखे दिसणारे (पाते), तळाशी खोडाभोवती वेढून राहणारे (उदा. शंखपुष्पी Canscora perfoliata) Bupleurum perfoliatum L. जेव्हा दोन समोरची अशी पाती जुळून राहतात तेव्हा त्यास सहजात (उदा. Lonicera glauca Hk. शिया) म्हणता

perforate
छिद्रिल सूक्ष्म छिद्रे असलेले अथवा काहीसे पारदर्शी ठिपके असलेले (पाते)

peri-
परि- भोवती या अर्थाचा उपसर्ग

perianth
परिदलमंडल संवर्त आणि पुष्पमुकुट असा भेद नसलेली पुष्पदले, दोन्ही मिळून वर्णन करण्या पण ही संज्ञा वापरतात. p. lobe परिदल परिदलमंडलाचा भाग perichaetium

periaxial wood
परिप्रकाष्ठ खोडातील प्रकाष्ठाचा बाहेरचा भाग (उदा. टेटू कुल)

periblem
मध्यजनक खोडाच्या व मुळाच्या टोकाकडील सतत वाढणाऱ्या भागाचा (विभज्येचा) त्वचाजनकाच्या खालचा कोशिकांचा थर, त्याखाली वाहकवृंदाची निर्मिती करणारा रंभजनक भाग असतो plerome, meristem, dermatogen.

pericarp
फलावरण किंजपुटापासून बनलेले फळाचे संपूर्ण आवरण, बाह्यकवच, मध्यकवच व अंतःकवच असे याचे तीन भाग असून ते विविध प्रकारचे असतात.(उदा. आंबा, नारळ) कधी कधी (उदा. सूर्यफूल) तीन्ही भाग एकवटलेले आढळतात.

perichaetium
परिवेष्टन शेवाळींपैकी हरितकांच्या बीजुकघराच्या तळाशी असलेल्या सूक्ष्म छदकासारख्या उपांगांचे मंडल, काही यकृतकामध्येही असे वलय आढळते. त्याला छदक मंडल म्हणतात व त्याच्या आतील बाजूस असलेल्या तशाच वलयास परिदलमंडल म्हणतात. involucre, perianth, Liverworts, Musci

periclinal
परिवाष्टत, पृष्ठसमांतर वक्र पृष्ठभागाशी समांतरित भित्तिका p. chimaera परिवेष्टित विचित्रोतकी पहा graft-hybrid, chimaera

pericycle
परिरंभ खोडातील किंवा मुळातील अंतस्त्वचेच्या आतील अस्तरासारखा व रंभाबाहेरचा कोशिकांचा थर, याचा अंतर्भाव रंभातच होतो,   stele

pericyclic fibre
परिरंभ सूत्र परिरंभ वलयातील काही घनकोशिका

periderm
परित्वचा त्वक्षाकार व त्यापासून निर्मिल्या जाणाऱ्या बाहेरच्या त्वक्षा कोशिकांचा थर आणि आतील हरिमोतक अथवा द्वितीयक मध्यत्वचा phellogen, phelloderm, cork cambium, phellem

peridiole
बीजुककोटर भूकंदुकांतील बीजुकधराच्या आच्छादनात असलेल्या गाभ्यातील बीजुके बनविणारा कप्पा

peridium
परिधाय कवकांपैकी भूकंदुक उपवर्गातील बीजुकधराभोवती तंतूंचे बनलेले पापुद्र्यासारखे आवरण. याचे आतील व बाहेरील असे दोन पदर असतात.(अंतःपरिधाय व बहिःपरिधाय)  Mushroom, Gasteromycetes

perigone
परिवेष्टन बाहेरचे आच्छादन perianth, perichaetium

perigynous
परिकिंज फुलातील इतर अवयव किंजमंडलाच्या पातळीवर किंवा पातळीच्या वर असल्यास संवर्त किंजपुटापासून अलग असण्याचा प्रकार, उदा रॉसबेरी, स्ट्रॉबेरी, गुलाब इ.

perimedullary zone
परिनिकाष्ठ क्षेत्र आदिप्रकाष्ठांच्या आतील बाजूस असलेल्या भेंडाभोवतीचे ऊतक क्षेत्र, आदिप्रकाष्ठ व भेंड यामधील विभाग (ऊतक)

perinium
अपिबीजुक epispore

period
कल्प भूशास्त्रीय कालखंडाचे एकक (युग), अनेक कल्प मिळून महाकल्प (सर्वात मोठा कालखंड).

periodic movements
आवर्ती हालचाल ठराविक कालाने पुनः पुनः घडून येणारी ठराविक हालचाल, उदा. काही फुलांचे उघडणे व मिटणे, पानांचे निशानुकुंचन nyctinasty

periodicity
आवर्तितता वर वर्णिलेला प्रकार

peripetalous
परिप्रदलीय पाकळ्याभोवती असलेले

peripheral
परिघीय, परिघी परिसरात किंवा सभोवार असलेले, उदा. सारोनियसमधील चार, लांबट, वाकडे रंभ, मुळातील सर्वात बाहेरचे ऊतक (परिधी ऊतक), कोशिकेतील सर्वात बाहेरील परिकलाचा थर (परिघीय परिकल)

periplasm
परिप्राकल अंदुकाशय किंवा रेतुकाशय यातील उपयोगात न येता शिल्लक राहिलेले जीवद्रव्य

perisperm
परिपुष्क पुष्काभोवती प्रदेहापासून बनलेले अन्नयुक्त ऊतक (कोशिकांचा समूह) nucellus, endosperm

perispore
परिबीजुक बीजुकाभोवतीचे आवरण, सिलिकायुक्त पुट (उदा. आयसॉएटिसच्या बीजुकाभोवती असलेले)

peristomate
पतितुंडी, परिमुखी परितुंड असलेले, उदा. शेवाळीपैकी हरितकातील बीजुकाशय

peristomatic
संवर्तमुखी संवर्ताच्या (नलिकेच्या) मुखाशी चिकटलेली (परिकिंज केसरदले)

peristome
परितुंड, परिमुख हरितकात (शेवाळी) आढळणारे बीजुकाशयाचे द्वार व त्यावरची उपांगे किंवा तत्सम संरचना Musci

perithecium
पलिघ धानीफल धानीकवकांत आढळणारा धानी अथवा धानीबीजुके यांची निर्मिती करणारा सूक्ष्मद्वारयुक्त अवयव (धानीफल) ascus, ascocarp, Ascomycetes

peritrichous
परिकेसलीय सर्व पृष्ठभागावर केसले असलेले उदा. व्हॉल्व्हॉक्स शैवल, काही सूक्ष्मजंतू cilium

permanent hybrid
स्थायी (चिर, स्थिर) संकरज स्वफलनाने स्वतःसारखीच प्रजा निर्माण करणारी मिश्र संतती. त्या प्रजेत संकरजाच्या पितरासारखी प्रजा अलग होत नाही, कारण त्यास जबाबदार असलेले एखादे जनुक मारक असू शकते. p. wilting स्थायी म्लानता, कायम मर ओल्या हवामानात ठेवले असूनही

permanent tissue
स्थायी ऊतक, स्थायी ऊति पूर्णपणे वाढलेल्या व कार्यक्षम झालेल्या कोशिकांचा समूह, क्वचित हा पुन्हा विभाजी व जननक्षम बनतो व नवकोशिकांची निर्मिती करतो. p. quadrat स्थायी चौकोन, स्थायी चतुष्कोणक प्रत्येक बाजू एक मीटर असलेली कायम चौकोनी जागा, ही राखून ठेवून

permeability
पार्यता गरजेनुसार कोशिकाबाहेरील काही पदार्थ (पाणी, लवणे, क्षार, विद्राव्य पदार्थ इ. आत जाऊ देणे व आतील काही बाहेर जाऊ देणे, अशी (जीवद्रव्याची) क्षमता, यावर जीवद्रव्याचे जीवन व कार्यक्षमता अवलंबून असते, कोशिकावरण बव्हंशी पार्य असते.

permeable
पार्य पदार्थांचे सूक्ष्म कण आंत (किंवा बाहेर) जाऊ देणारा निर्जीव पापुद्रा किंवा तशी जीवद्रव्याची अवस्था.

permian period
पर्मियन पीरीयड (कल्प) सुमारे २७.५ कोटी ते २४.५ कोटी वर्षापूर्वीचा भूवैज्ञानिक (पृथ्वीच्या इतिहासातील) कालखंड

persistent
दीर्घस्थायी धारण करणारा अवयव पूर्ण पक्क होईपर्यंत (दीर्घकाल) त्यावर राहणारा अन्य अवयव अथवा उपांग, उदा. काही झाडांवरची पाने, काही फळावरील संवर्त (उदा. पेरु). वांगे अथवा डाळिंबाच्या फळावरील संवर्त सतत राहतो व अधिक वाढतो. accrescent

Personales
बद्धौष्ठी गण बेंथॅम व हूकर यांच्या पद्धतीतील युक्तप्रदली उपवर्गातील एक गण, पुष्पमुकुट अनियमित द्वयोष्ठक, केसरदले २ किंवा ४, किंजपुट ऊर्ध्वस्थ व १-२ किंवा ४ कप्प्याचा.

personate
बद्धौष्ठी दोन ओठाप्रमाणे असलेल्या (द्वयोष्ठक) पुष्पमुकुटाचे तोंड मोकळे नसून त्यात तालू, उंचवटा, उपांग इत्यादींचा अडथळा असणे, यामुळे फार बारीक प्राणीच आत तळाकडे जाऊ शकतात. उदा. हरणखुरी, स्नॅपड्रॅगॉन इ.

perulate
शल्कित खवलेदार उदा. काही कळ्या

pesticide
कीटनाशक, पीडकनाशक पिकांवरील रोगकारक कीटक, सूक्ष्मजंतू किंवा कवक यांचा नाश करणारे उदा. द्रव, दुसरे कीटक, चूर्णे इ.

petal
प्रदल, पाकळी फुलातील बहुधा आकर्षक, विविधरंगी पण पानासारखा सपाट व संदलापासून भिन्न भाग (पुष्पदल), पुष्पमुकुटाचा भाग, क्वचित तो हिरवा असतो (उदा. हिरवा चाफा, सिताफळ, हिरवा अशोक), पिवळ्या चाफ्याच्या फुलात सर्वच परिदले पिवळी असतात. sepal, calyx, corolla

petalody
प्रदलीभवन फुलातील अन्य पुष्पदलांचे, विशेषतः केसरदलांचे पाकळ्यात रुपांतर झालेली घटना.

petaloid
प्रदलसम पाकळीसारखे सपाट, रंगीत (किंवा पांढरे) अन्य पुष्पदल, उदा. संदल, छद, केसरदल किंजल ही सर्व कर्दळीच्या फुलात पाकळीसारखी असतात, संकेश्वराच्या फुलातील संदल प्रदलसम असते.

petalous
प्रदलयुक्त पाकळ्या असलेले

petaly
प्रदलावस्था पाकळ्या असण्याची अवस्था, gamopetaly युक्त प्रदलावस्था, polypetaly मुक्त प्रदलावस्था

petiolar
वृंतीय देठासंबंधी, देठावर असलेले (उपांग, कंटक, उपपर्ण, प्रतान इ.)

petiolate
सवृंत देठ असलेले (पान) sessile (अवृंत)

petiole
वृंत, देठ पानाचा तळ व पाते यामधील पात्यास आधार देणारा ताठर भाग

petiolule
वृंतक लहान देठ, संयुक्त पानावर असलेल्या दलाचा किंवा दलकाचा देठ

petrad
शैलपादप खडकावर येणारी वनस्पती, उदा. काही शैवाक, शेवाळी

petrifaction
अश्मीभवन सिलिसिक (सिकता) अम्ल अथवा चुनखडीचे कण मूळ जीव पदार्थात किंवा जीवावशेषात घुसून त्याचे घन परिरक्षित रुपांतर अथवा जीवाश्म बनण्याची प्रक्रिया fossil

petrochthophyta
शैलतीरपादप खडकाळ गोट्यांच्या जमिनीत वाढणाऱ्या वनस्पती

petrophilous
शैलवासी खडकावर राहणारी (वनस्पती किंवा प्राणी).

petrophyte
शैलपादप खडकावर वाढणाऱ्या वनस्पती उदा. शेवाळी, शैवाक, काही नील हरित शैवले. खडकाच्या पृष्ठभागावर किंवा बाजूच्या आडव्या कंगोऱ्यावर वाढणाऱ्या असे दोन प्रकार असतात. lithophyta

pezizoid
चषकाकृति पेल्यासारख्या आकाराचे, उदा. पेझिझा नावाचे कवक

PH
पीएच एका लिटर पाण्यातील हायड्रोजन आयनांची ग्रॅममध्ये संहति दर्शविणारी संक्षिप्त संज्ञा, उदा. जमिनीतील द्रवाचा पीएच७ हा विद्राव उदासीन, पीएच७ पेक्षा कमी असल्यास अम्लीय व अधिक असल्यास क्षारीय (अल्कधर्मी) समजतात.

phaeo-
गर्द गडद रंगाचे, अशा अर्थाचा उपसर्ग.

Phaeophyceae
पिंगल शैवले वर्ग, फीओफायसी सामान्यपणे पिंगट, तपकिरी किंवा फिकट रंग असलेल्या साध्या व कायक वनस्पती विभागातील गट, काहींच्या मते हा विभाग (Phaeophyta) समजावा, यामध्ये फ्यूकोझँथीन रंगद्रव्य असते. ही शैवले मोठी असून बहुधा समुद्रात किंवा किनाऱ्यावर आढळतात, उदा.

Phallaceae
पूतिकवक कुल, फॅलेसी भूकंदुक कवकाच्या गणात (लायकोपर्डेलीझ) समाविष्ट केलेल्या काही गदाकवकांचे एक कुल, यातील मुख्य वंश फॅलस (इथिफॅलस) याच्या परिपक्क शरीरापासून अत्यंत घाण वास सुटतो व हे शरीर शेवटी अर्धवट द्रवरुपात चिघळत जाते म्हणून पूतिकवक हे त्याचे नाव व त्

Phanerogamae
बीजी वनस्पति विभाग बीजकात होणाऱ्या लैंगिक प्रक्रियेनंतर बियासारखे जटिल प्रजोत्पादक इंद्रिय बनविणाऱ्या वनस्पती Angiospermae, Gymnospermae  Phanerogams

phanerophyte
प्रकटपादप विश्रांतीच्या काळात कळ्या व वाढीस जबाबदार असलेली नाजूक टोके सरळ वाढणाऱ्या खोडावर जमिनीपासून २५-३० सेंमी. किंवा अधिक उंचीवर व फांद्यांवर राखणारा वृक्ष किंवा झुडूप cryptophyte, geophyte.

phanerophyte
प्रकटपादप विश्रांतीच्या काळात कळ्या व वाढीस जबाबदार असलेली नाजूक टोके सरळ वाढणाऱ्या खोडावर जमिनीपासून २५-३० सेंमी. किंवा अधिक उंचीवर व फांद्यांवर राखणारा वृक्ष किंवा झुडूप cryptophyte, geophyte.

pharmacognosy
औषधीस्वरुप विज्ञान वनस्पतींतील औषधी द्रव्यांच्या निश्चित लक्षणांची माहिती देणारी विज्ञानशाखा

pharmacology
औषधी क्रियाविज्ञान, औषधि विज्ञान वनस्पतीपासून उपलब्ध झालेल्या औषधीद्रव्यांचा शरीरावर होणाऱ्या परिणामांची (प्रभावाची) माहिती देणारी विज्ञानशाखा.

pharmacopia
औषधीकोश भिन्न प्रकारच्या शासनमान्य औषधांच्या माहितीचा अधिकृत ग्रंथ pharmacopoeia

pharmacy
१ औषधनिर्माणशास्त्र २ रसशाळा ३ औषधनिर्मिती १ औषधे तयार करण्यासंबंधी माहिती २ औषधे निर्मितीचा कारखाना ३ औषधे बनविण्याची प्रक्रिया

phellem
त्वक्षा बुचासारख्या पदार्थाने भरलेल्या संरक्षक कोशिकांचे थर (ऊतक) cork cambium, periderm, suberin  cork

phelloderm
उपत्वक्षा, द्वितीयक मध्यत्वचा त्वक्षा निर्मिती करणाऱ्या कोशिकाथरापासून आतील बाजूस तयार होणाऱ्या नवीन (द्वितीयक) मध्य(मृदु) त्वचेचे थर

phellogen
त्वक्षाकर त्वक्षा व उपत्वक्षा निर्मिणारा द्वितीयक ऊतककर (विभज्या) cambium  cork cambium

phenology
ऋतुजैविकी वनस्पतींच्या जीवनातील ऋऋतुमानसापेक्ष आवर्ती (ठराविक काली होणाऱ्या) घटनांची नोंद, उदा.पाने येणे, फुले येणे, फळे व बीजे यांचा प्रसार इ. ची माहिती. phenomenology

phenotype
सरुपविधा, दृश्यरुप वनस्पती अथवा प्राणी यांचे आनुवंशिक दृष्ट्या बाह्यस्वरुप (मग त्यांची जननिक दृष्टीने संघटना कोणतीही असो) genotype

phloem
परिकाष्ठ, अधोवाही वाहिनीवंत वनस्पतींत सामान्यपणे अन्नरसाची ने आण करणाऱ्या प्रभेदित (विशिष्ट संरचनेच्या) कोशिका व संलग्न ऊतके, सामान्यपणे उच्च दर्जाच्या वनस्पतीत यामध्ये चालनी नलिका, सहचरी कोशिका, मृदूतक व काही दृढोतक (घनावरणाच्या लांबट कोशिका ऋ सूत्रे) इ.

phosphorescence
स्फुरदीप्ती bioluminescence

phosphorylation
भास्वरलन फॉस्फॉरिक अम्लाशी संयोग (उदा. शर्करेचा)

photochemical
प्रकाशरासायनिक प्रकाशाने घडवून आणलेली रासायनिक (प्रक्रिया)

photogenic
प्रकाशजनक स्वतःच्या क्रियाशीलतेने चमकणारे (प्रकाशनिर्मिती करणारे), उदा. काही सूक्ष्मजंतू, काजवा, काही मासे, याला जीवदीप्ती असे म्हणतात.

photokinesis
प्रकाशजन्य हालचाल प्रकाशाकडे किंवा प्रकाशाच्या दिशेविरुद्ध केली जाणारी हालचाल उदा. काही शैवले, हरित्कणु, सूक्ष्मजंतू, इत्यादी. प्रकाशाच्या अभावी किंवा प्रकाश सान्निध्यामुळे घडून येणारी हालचाल, उदा. पाने व फुले यांची उघडझाप nyctinastic, photonastic

photomicrography
सूक्ष्म छायाचित्रण प्रकाशाच्या साहाय्याने सूक्ष्म वस्तूची छायाचित्रे घेण्याची प्रक्रिया (कृती)

photonastic
प्रकाशानुकुंचनी प्रकाशाच्या तीव्रतेच्या बदलाने घडून येणारी (हालचाल), प्रकाशाच्या दिशेशी या हालचालींचा संबंध नसतो. उदा. पानां-फुलांची उघडझाप, nastic movements.

photoperceptive
प्रकाशसंवेदी प्रकाशाची जाणीव करून देणारी (कोशिका, इंद्रिये, संरचना, कोशिकांगके इ.)

photoperiod
प्रकाशावधि

photoperiodic
प्रकाशावधिक

photoperiodism
प्रकाशावधिप्रभाव, प्रकाशावधि प्रतिक्रिया दिवसाच्या (प्रकाशाच्या) कमीजास्त कालामुळे वनस्पतीच्या फुलण्यावर होणारा परिणाम, कारण प्रत्येक वनस्पतीला याबाबत काही कमाल प्रकाशपरिमाण आवश्यक असते, त्यामुळे लघुदिन वनस्पती (उदा. कॉस्मॉस) व दीर्घदिन वनस्पती (उदा. मुळा, लेट्यूस इ.) असे भेद पडतात. काही वनस्पती मात्र भेदातीत (उदा. टोमॅटो) असतात. वनस्पतीचे वय आणि तपमान यावर प्रकाशावधि संबंधीची प्रतिक्रिया अवलंबून असते.

photophilous
प्रकाशप्रिय सूर्यप्रकाशात वाढणारी वनस्पती

photophobism
प्रकाशद्वेष प्रकाश टाळण्याची प्रवृत्ति

photosynthesis
प्रकाशसंश्लेषण जिवंत कोशिकांत हरितद्रव्याच्या व प्रकाशाच्या सान्निध्यात त्यातील ऊर्जेचा उपयोग करून कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे रासायनिक संश्लेषण घडवून त्यापासून कार्बाएहायड्रेटांची (उदा. शर्करा, तूलीर, स्टार्च) निर्मिती. सृष्टीतील जीवनास अत्यावश्यक अशी हिरव्या वनस्पतींतील मौलिक प्रक्रिया, यामध्ये प्राणवायूचीही निर्मिती होऊन तो सर्व जीवांस आवश्यक म्हणून उपयुक्त ठरतो.

photosynthetic
प्रकाशसंश्लेषी प्रकाशसंश्लेषणाशी संबंधित

phototactic
प्रकाशानुचलनी प्रकाशाच्या प्रेरणेने होणारी गतियुक्त हालचाल, उदा. काही स्वतंत्रपणे हालचाल करणारी शैवले (क्लॅमिडोमोनॅस, युग्लिना इ.) कोशिकेतील हरितकणु, काही गंतुके, बीजुके, ह्यांच्या हालचाली प्रकाशाच्या दिशेकडे किंवा विरुद्ध असतात.

phototaxis
प्रकाशानुचलन प्रकाशाच्या दिशेप्रमाणे आपली हालचाल नियंत्रित करण्याची प्रक्रिया

phototonic
प्रकाशपोषित प्रकाशाच्या पोषक प्रभावाने वाढणारी (संवेदनक्षमता).

phototropic
प्रकाशानुवर्ती प्रकाशाच्या दिशेप्रमाणे नियंत्रित व एकाच बाजूस अधिक वाढ होऊन घडून येणारी (अवयवांची वक्रता), उदा. मुळे प्रकाशाविरुद्ध व खोड प्रकाशाच्या दिशेकडे वाढतात.

phototropism
प्रकाशानुवर्तन प्रकाशनियंत्रणामुळे एकाच बाजूस अधिक वाढ होणे (होण्याची क्षमता), यामुळे अवयवास वक्रता येण्याची प्रक्रिया heliotropism

phyad
पादपाकृति वनस्पतीचे जीवरुप, उदा. वृक्ष, वेल इ.

phycocyanine
नील रंगद्रव्य, फायकोसायनिन नील हरित शैवलातील निळ्या रंगाचे द्रव्य, याशिवाय हरितद्रव्य असतेच. काही लाल शैवलांतही हे द्रव्य आढळते.

phycoerythrine
लाल रंगद्रव्य, फायकोएरिथीन लाल शैवलांतील हरितद्रव्याशिवाय तांबड्या रंगाचे एक द्रव्य

phycologist
शैवलविझ शैवलांच्यासंबंधी विपुल ज्ञान मिळविलेला विशेषतज्ञ.

phycology
शैवलविज्ञान शैवल वनस्पतीसंबंधीच्या माहितीची शाखा (algology)

phycomycetes
शैवलकवक वर्ग, फायकोमायसेटीज (फायकोमायसेटी) सत्यकवक विभागातील (युमायकोफायटा) व शैवलांशी काही लक्षणांत साम्य असणाऱ्या व सापेक्षतः साध्या कवकांचा गट उदा. ग्यूकर (बुरशी), पिथियम, तंतुभरी इ. phycomycetae

phylloclade
पर्णकांड, पर्णझोड पानासारखे स्वरुप किंवा कार्य अथवा दोन्ही प्राप्त झालेले खोड, उदा. फड्या निवडुंग, नांग्या शेर, रस्कस, त्रिधारी निवडुंग इ.

phyllode
वृंतपर्ण पात्यासारखे देठ, उदा. काही कीटकभक्षक वनस्पती (नेपेंथस), बाभळीची एक जाती. phyllodium

phyllody
पर्णायन, पर्णाभता पुष्पदलांचे पानांसारख्या अवयवांत रुपांतर, ही एक विकृती आहे.

phyllody
पर्णायन, पर्णाभता पुष्पदलांचे पानांसारख्या अवयवांत रुपांतर, ही एक विकृती आहे.

phylloid
पर्णाभ पानासारखे स्वरुप असणे, उदा. वाटाण्याची उपपर्णे.

phyllotaxis
पर्णविन्यास अक्षावर (खोडावर) पानांची मांडणी, उदा. एकांतरित, संमुख, मंडलित इ. alternate, opposite, whorled. phyllotaxy

phylogeny
जातिविकास, जातिवृत्त जातीच्या, वंशाच्या किंवा कुलाच्या क्रमविकासाचा इतिहास, व्यक्तीच्या विकासावरून ती व्यक्ती ज्या जातीत समाविष्ट असते तिच्या पूर्वजांच्या इतिवृत्ताचे अनुमान, व्यक्तीचा विकास थोड्या कालातील असल्याने तो संक्षिप्त स्वरुपात मिळतो त्यामुळे काह

phylum
संघ वर्गीकरण पद्धतीत पूर्वी संबंधित जीवांच्या फार मोठ्या गटास ही संज्ञा उपयोगात असे, हल्ली प्राणिशास्त्रात ती वापरतात परंतु वनस्पतिशास्त्रात तिच्याऐवजी काही शास्त्रज्ञ विभाग (division) ही संज्ञा वापरतात, सर्वसाधारणपणे संघाचे अथवा विभागाचे अनेक वर्ग, वर्गा

phymatodeus
पिटाकित अनेक पुटकुळ्या (चामखिळीसारख्या) असलेले पान (उदा. Pleopeltis phymatodes) warted

physical barrier
भौतिक (प्राकृतिक) रोघ नैसर्गिक अडथळा (उदा. पर्वत, समुद्र इ.)

physical drought
भौतिक (प्राकृतिक) रुक्षता वनस्पतींना उपलब्ध न होण्याइतकी जमिनीतील पाण्याची टंचाई

physiognomy
रुपाकृति स्वरुपाची माहिती देणारी लक्षणे व त्यावरुन झालेला आकृति बोध

physiognomy botanical
पादपरुपाकृति वनस्पतींचे अथवा वनस्पति समुदायाचे स्वरुप (रीती), त्यावरून ती दुरून ओळखता येते.

physiological drought
क्रियात्मक रुक्षता जमिनीत पाणी असूनही तांत्रिक कारणामुळे (क्षार, लवणे, अम्ल इ., मुळे) ते वनस्पतींना उपलब्ध न होण्याची परिस्थिती.

physiology
क्रियाविज्ञान, शरीरक्रियाविज्ञान शरीरांतर्गत चयापचयातील (पचन, शोषण, अभिसरण इ.) अनेक क्रियाविक्रियासंबंधीची माहिती, अनेक इंद्रियांच्या साहाय्याने हे घडून येत असल्याने पूर्वी याला इंद्रियविज्ञान म्हणत असत. या विषयातील तज्ञास क्रियावैज्ञानिक (physiologist) म्हणतात.

phyto-
वनस्पति-, पादप- वनस्पति या अर्थाचा एक ग्रीक उपसर्ग, मराठीत उपसर्ग किंवा प्रत्ययाप्रमाणे वापरता येतो. p. chrome प्रकाशग्राही रंजक (वर्णक) प्रकाशाचे ग्रहण करणारे रंगद्रव्य p. edaphon सूक्ष्मपादप जमिनीतील सूक्ष्म वनस्पती. p. graphy (descriptive botany)

phytodynamics
पादपगतिकी वनस्पतींतील हालचालीसंबंधीचे ज्ञान

phytogenesis
पापदजनन, पादपोद्भव वनस्पतीचा उगम व विकास यासंबंधीचे ज्ञान phytoeny

phytogenetics
पादपानुवंशिकी वनस्पतींतील आनुवंशिक लक्षणांच्या अनुहरणासंबंधीची माहिती.

phytogeographer
पादपभूगोलविज्ञ वनस्पती भूगोलासंबंधी माहितगार

phytogeographical region
भौगोलिक वनस्पती प्रदेश

Phytogeography
पादपभूगोल, वनस्पती भूगोल पृथ्वीवर भिन्न हवामानानुसार निसर्गतः झालेल्या वनस्पतींच्या प्रसाराची माहिती (माहितीची शाखा). plant geography

Phytognosis
वनस्पतिविज्ञान, वनस्पतीशास्त्र वनस्पतीसंबंधी समग्र ज्ञानाची शाखा, एक जुनी संज्ञा Botanym, Phytology

phytohormone
पादप संप्रेरक वनस्पतीतील विशिष्ट प्रेरक पदार्थ hormone

phytolith
पादपजीवाश्म जीवाश्मरुपातील प्राचीन वनस्पती.

phytolithology
पुरावनस्पतीशास्त्र palaeobotany  Palaeobotany

phytopathology
वनस्पती विकृतिशास्त्र, वनस्पतिरोगशास्त्र, पादपरोगशास्त्र वनस्पतींना होणाऱ्या सर्व रोगांसंबंधीची ज्ञानशाखा vegetable plant pathology

phytoplankton
वनस्पति (पादप) प्लवक किनाऱ्यापासून दूरवर तळ्यात किंवा समुद्रात तरंगणारा वनस्पतींचा समूह plankton

phytosociology
वनस्पतिसमाजशास्त्र, पादप समाजशास्त्र वनस्पतींच्या समुदायंचा व सामुहिक जीवनाचा अभ्यास. plant sociology

phytoteratology
पादपविद्रुपशास्त्र, पादपात्यरुपशास्त्र वनस्पतिसृष्टीत आढळणाऱ्या विकृत (अनित्य किंवा राक्षसी) स्वरुपाच्या संरचनेबद्दलची माहिती, उदा. एका केळीच्या सालीत दोन केळ्यांचा गाभा, नित्यापेक्षा फार मोठ्या आकाराचे फळ, फळाऐवजी गाठीसारखा अवयव, फुलातील केलरदलाऐवजी पाकळ्यासारखे अवयव.

Phytotomy
वनस्पति पादप शारीर वनस्पतींच्या शरीराच्या अंतर्रचनेचा अभ्यास अथवा तत्संबंधी माहितीची शाखा plant anatomy

pierin
पायपरिन काळ्या व पांढऱ्या मिरीत आढळणारे तिखट द्रव्य, त्यावरून piperatus (piperitus) तिक्त (तिखट) ही संज्ञा.

pigment
पिंजक, रंजक, वर्णक प्राणी किंवा वनस्पती यांच्या शरीरास किंवा अवयवास रंग प्राप्त करून देणारा पदार्थ उदा. हरितद्रव्य

pileate
छत्रयुक्त, छत्रकी छत्राप्रमाणे आकार असलेला व बीजुके निर्माण करणारा भाग

pileus
छत्र पसरट टोपीप्रमाणे (बशीसारखा) आकाराचा खालून दांड्यावर आधारलेला व बीजुकधारक पडदे असलेला अवयव, कधी दांडा फार लहान व छत्र फारच पसरट असते. उदा. कवकांपैकी भूछत्रे mushroom

piliferous layer
मूलकेशस्तर मुळावरचे केसाळ आवरण, यातूनच पाणी व खनिजे यांचे शोषण होते.

pilose
केशयुक्त, केसाळ नरम केस असलेले (उपांग, अवयव इ.) उदा. कुंदा (Ischaemum pilosum Hack.) pilous

pinna
दल, पिच्छक संयुक्त पानाचा सुटा भाग, उदा. गुलाबाच्या संयुक्त पानास पाच सुटी दले असतात. p.trace दलकेश पहा leaf trace

pinnate
पिच्छकल्प, पिच्छाकृति पिसासारखे, एका मध्यशिरेवर (मध्याक्षावर) दोन्ही बाजूस लहान सुटी (स्वतंत्र) दले असलेले (संयुक्त पान) उदा. चिंच, गुलाब, निंब इ.  paripinnate,  imparipinnate

pinnatifid
अल्पपिच्छाकृति अर्ध्यापेक्षा कमी व पिसासारखे विभागलेले (साधे पान) उदा. अफू, शेवंती, भुईपात्रा (Launea pinnatifida cass).

pinnatipartite
अर्धपिच्छाकृति अर्ध्यापर्यंत पिसासारखे विभागलेले (पाते, पान) उदा. काटे धोत्रा, मुळा

pinnatiseet
अपूर्ण पिच्छाकृति अर्ध्यापेक्षा बरेच अधिक आणि पिसासारखे (पाते) विभागलेले (साधे पान), उदा. झेंडू (Tagetes erecta L.) कॉसमॉस, कामलता (Ipomoea quamoclit L.)

pinnule
दलक संयुक्त पानाच्या पुनः विभागलेल्या दलाचा सुटा भाग, उदा. शेवगा.

pioneer
आद्य, आद्य प्रवर्तक आरंभी असणारा, पायाभूत

Piperaceae
मरीच (मिरी) कुल, पायपरेसी पिंपळी, कंकोळ, मिरी, नागवेल इत्यादी वनस्पतींचे (द्विदलिकित) कुल, बेसींच्या वर्गीकरणात या कुलाचा अंतर्भाव मोरवेल गणात (रॅनेलीझमध्ये)केला असून हचिन्सन यांनी मिरी गणात (पायपरेलीझमध्ये) केला आहे. उभयतांच्या मते हे प्रारंभिक कुल आहे. कारण त्यांची फुले एकलिंगी किंवा द्विलिंगी व अपरिदली असतात. प्रमुख लक्षणे- तिखट व साध्या एकाआड एक पानांच्या औषधी व क्षुपे, कणिश फुलोरा, ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा व त्यात एक बीजक, सपुष्क व सपरिपुष्क बी.

pisaceus
वृत्तांगवर्णी ओल्या वाटाण्या (वृत्तांग)प्रमाणे हिरवे

pisiform
वृत्तांगकृति वाटाण्यासारख्या आकाराचे

pistil
किंजमंडल, स्त्री केसरमंडल एक किंवा अनेक किंजदलांचे बनलेले फुलातील स्त्रीलिंगी प्रजोत्पादक दलांचे मंडल gynaecium

pistillate
किंजयुक्त फक्त किंजमंडल असलेले (फूल) p. flower किंजपुष्प, मादीफूल फक्त किंजमंडल असलेले फूल, उदा. पपई, भोपळा इ.

pistillode
वंध्यकिंज ऱ्हास पावलेल्या किंवा अकार्यक्षम किंजदलांचे मंडल, उदा. सूर्यफुलाच्या फुलोऱ्यातील किरण पुष्पक, उंबरातील गुल्म पुष्पे

pit
खात, खाच, गर्त कोशिकावरणातील लहान खोलगट जागा

pit field
खातक्षेत्र, गर्तक्षेत्र अनेक खाचा असलेली जागा

pit membrane
खातपटल, गर्तपटल खाचेतील पातळ पापुद्रा (कोशिकावरण)

pitcher
कलश, घट, कुंभ नेपेंथेस (घटपर्णी, कलशपर्णी) वनस्पतींच्या रुपांतरित पानाचा टोकाकडील चंबूसारखा भाग, त्यात बहुधा पाचक रस असून त्यामुळे कीटकांचे रुपांतर शोषणीय पदार्थात होते.  sarraceniales.

pith
निकाष्ठ, भेंड, मज्जा खोडात सामान्यपणे मध्यभागी आढळणारे मृदूतक, द्विदलिकित वनस्पतीच्या फार जून व काष्ठयुक्त खोडात त्याजागी पोकळी असते. p.ray (vascular ray) निकाष्ठ किरण, मज्जा किरण पहा medullary ray  medulla

pitted
खातांकित कोशिकावरणात खाचा असलेली (वाहिका किंवा वाहिनी). काही फळांच्या किंवा बियांच्या सालीवरही खाचा आढळतात. p.vessel खातांकित वाहिनी

placenta
बीजकाधानी किंजपुटातील बीजकाचे उगमस्थान, प्रकटबीज वनस्पतीतील किंजदलांच्या किनारी (कडा) किंवा खवल्यांचा पृष्ठभाग. अबीजी वनस्पतीतील बीजुककोशांच्या उगमस्थानाचे ऊतक, उदा. नेफोलेपिस नेचा.

placentation
बीजकविन्यास किंजपुटात आढळणारी भिन्न प्रकारची बीजकांची मांडणी (बीजकाधानींची व्यवस्था), वनस्पतींच्या काही वंशात, कुलात किंवा गणात एकाच प्रकारचा बीजकविन्यास आढळतो, त्याला वर्गीकरणात महत्त्व असते.

plaited
चुणित, चुणिदार कळीमध्ये चुण्या (घड्या) पडलेला पुष्पमुकुट किंवा उभ्या घड्या पडलेले पान उदा. नारळ, शिंदी, इत्यादी. पर्णवलनाचा एक प्रकार, गारवेलींच्या किंवा धोतऱ्याच्या फुलातील पुष्पमुकुट plicate

plane of section
छेद प्रतल छेद घेण्याची पातळी (आडवी किंवा उभी)

plane of symmetry
समात्र प्रतल, समात्रतेची पातळी वस्तूचे (विशेषतः फुलाचे) दोन अथवा अधिक सारखे भाग करणारी पातळी

plank root
फलक मूल खोडाच्या तळाशी असलेले फळीसारखे मूळ.

plankton
प्लवक, प्लवकजीव बहुदा जलपृष्ठावर किंवा पृष्ठाखाली मुक्तपणे तरंगणारा बहुधा सूक्ष्म जीवांचा समूह, इतर मोठ्या प्राण्यांचे प्रमुख खाद्य p. neritic तटसमीप प्लवक किनाऱ्याजवळचा तरता जीवसमूह उदा. शैवले, सूक्ष्मजंतू, सूक्ष्म प्राणी, करंडक वनस्पती इ. p. formation

plano convex
समतल बर्हिगोल एका बाजूस सपाट व दुसऱ्या बाजूस फुगीर

planogamete
चरगंतुक केसलयुक्त व हालचाल करणारी प्रजोत्पादक कोशिका उदा. हरितशैवल, काही कवक

plant
वनस्पति, पादप, उद्भिज्ज निसर्गातील वायू, पाणी, खनिजे यांचे शोषण करून व सूर्यापासून अन्न बनविण्यास लागणाऱ्या उर्जेचा वापर करणारा हरितद्रव्ययुक्त, स्वावलंबी, सजीव घटक, कवक, अनेक सूक्ष्मजंतू वगैरे सजीव याला अपवाद परंतु त्यांवर अवलंबित असतात, तसेच अनेक प्राणी

plant breeder
वनस्पति प्रजनक वनस्पतींच्या भिन्न जाती व प्रकार यांमध्ये कृत्रिम पद्धतीने प्रजोत्पादन घडवून आणणारा (विज्ञ), उदा. लूथर बरबँक, मेंडेल इ.

plant breeding
वनस्पती प्रजनन वर सांगितलेली प्रक्रिया

plant cane
सुरु ऊस बियांपासून आरंभ केलेल्या लागवडीचे पहिल्या वर्षाचे पीक (वाढ)

Plant geography
वनस्पति भूगोल Phytogeography

Plant pathology
वनस्पतिरोगविज्ञान Phytopathology

plantation
लागवड, मळा विशिष्ट वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर विशेष प्रकारे केलेली पिकवण, उदा. ऊस, कॉफी, द्राक्षे इ.

plantlet
पादपक लहान रोपटे

plasma membrane
प्राकल कला, प्राकल पटल अतिशय पातळ, विशेषतः वसा व प्रथिन यांनी बनलेला (कोशिकेतील) जीवद्रव्याचा सर्वात बाहेरचा पापुद्रा, वनस्पतींच्या कोशिकांत असा पापुद्रा कोशिकेतील रिक्तिकेभोवतीही असतो. कोशिकेतील प्राकलाची पार्यता या पापुद्र्यावरच अवलंबुन असते. ectoplasm.

plasmodesma
प्राकलतंतु एका जिवंत कोशिकेतील प्राकलापासून निघालेला व दुसऱ्या कोशिकेतील प्राकलाला जोडणारा अतिसूक्ष्म धागा, अशा अनेक धाग्यांनी सर्व कोशिकांचा परस्परसंबंध मध्ये कोशिकावरण असतांनाही अबाधित राहून बहुकोशिक वनस्पती एकच सजीव व्यक्तीप्रमाणे जगते. protoplast,

plasmodial stage
प्राकलावस्था जीवनांतील फक्त प्राकलयुक्त असण्याची अवस्था

plasmodium
प्राकलपुंज अनावृत (नग्न), अनेक प्रकले असलेला व आदिजीवाप्रमाणे सरपटण्याची हालचाल करणारा प्राकलाचा (जीवद्रव्याचा) अनियमित गोळा Mycetozoa.

plasmogamy
परिकलसंयोग प्रकलाखेरीज इतर जीवद्रव्याचा (परिकलाचा) संयोग, यांमध्ये दोन किंवा अधिक जीवद्रव्ययुक्त घटकांचे मीलन (मिश्रण) होऊ शकते.

plasmolysis
प्राकलकुंचन कोशिकेतील पाण्याचा अंस बहिस्तर्षणामुळे (कोशिकेच्या बाहेर विसरणामुळे गेल्याने), कमी झाल्याने प्राकलाचे आकुंचन व कोशिकावरणापासून अलग होणे, रिक्तिकेचा भोवतालच्या प्राकलावरचा दाब कमी झाल्याने ही क्रिया घडून येते.

plastic
आकार्य आकार देता येण्यासारखे किंवा रुपांतर करण्यासारखे p.material अकार्य पदार्थ

plasticity
आकार्यता आकार्य असण्याची क्षमता, पाने, उपपर्ण, खोड व मुळे यांमध्ये हा गुण असल्यामुळे त्यांचे परिस्थितिनुसार रुपांतर झालेले आढळते.

plastid
प्राकणु, प्राकलकणु, लवक वनस्पतींच्या सजीव कोशिकेतील जिवंत द्रव्यात (प्राकलात) आढळणारे व विविध कार्ये करणारे कोशिकांगक, उदा. हरितकणु, तैलकणु, वर्णकणु, श्वेतकणु इ. cell organelle.

platycarpic
विस्त-तफली, पृथुफली रुंद (पसरट) फळे असलेले (पादप) platycarpous

platyform
चपटा, पसरट

platylobate
विस्तृतखंडी रुंद विभाग असलेले (पान)

platyphyllous
विस्तृतपर्णी, पृथुपर्णी रुंद पाने असलेली (वनस्पती, जाती)

plectenchyma
छद्मी (आभासी) मृदूतक, कवकोति, स्थूलोति अनेक सुट्या कोशिकांचे किंवा तंतूंचे नंतर एकत्र येऊन बनलेले ऊतक. उदा. कवकांतील कित्येक अवयव (जालाश्म, पीठिका), काही शैवले. merenchyma, pseudoparenchyma

pleiochasium
बहुशाखी पुष्पबंध प्रत्येक शाखा पुन्हा दोन्हीपेक्षा अधिक व लहान अक्ष बाजूस बनविणारा कुठित फुलोरा polychasium

plerome
रंभजनक खोडाच्या किंवा तत्सम अवयवाच्या विभज्येतील मध्यवर्ती वाहक वृंदादि भागाची निर्मिती करणारा मध्यजनकाच्या आतील भाग p.sheath (bundle sheath) रंभजनकावरण, रंभजनकयेष्ट रंभजनकाभोवती असलेले उतक stele, periblem, vascular bundle, meristem

pleuston
तरंड पादप हलकेपणामुळे पाण्यात तरंगणाऱ्या वनस्पती, मुळे नसलेल्या, मुक्तपणे तरंगणाऱ्या व पाण्याखालील बीजी वनस्पतींचाही येथे समावेश करतात.

plexus
जालक परस्परांना जोडणाऱ्या शिरांचे जाळे

plicate
चूणित चुण्या पडलेले (अवयव).

plrecatorius
माळेकरिता उपयुक्त उउदा. गुंज (Abrus precatorius L.)

Plumbaginaceae
चित्रक कुल, प्लंबॅजिनेसी काळा व लाल चित्रक इत्यादींचे द्विदलिकित लहान कुल, चित्रकाच्या मुळ्यात प्लंबॅजिन हे स्फटिकी द्रव्य असते. याचा अंतर्भाव चित्रक गणात (प्लंबॅजिनेलीझमध्ये) एंग्लर व प्रँटल यांनी केला असून हचिन्सन व बेंथॅम आणि हूकर यांनी प्रिम्युलेलीझ गणात केला आहे. प्रमुख लक्षणे - औषधी, क्षुपे व उपक्षुपे (लहान झुडपे), पाने साधी, पाणी व चुना मिश्रित पाणा बाहेर टाकणारी प्रपिंडे त्यावर असतात, फुले द्विलिंगी, संदले पाच व युक्त, पाकळ्या जुळलेल्या किंवा सुट्या, पाच केसरदलांचे एकच मंडल, पाच जुळलेल्या किंजदलांच्या किंजपुटात एक कप्पा व त्यात एकच बीजक, फळ एकबीजी शुष्क व न तडकणारे किंवा करंड्यासारखे झाकणाने उघडणारे, बी सपुष्क, संवर्त अनेकदा फळास वेढून राहतो.

plume
तुरा, पिच्छक केसांचा झुबका, उदा. दुधळ, एकदांडी व सहदेवी यांची फळे, कुड्याचे व रुईचे बी.

plumose
शिखायुक्त, पिच्छकी शेंडी अथवा तुऱ्याप्रमाणे केसाचा झुबका असलेले फळ अथवा बीज. सातविणीच्या बियास दोन झुबके असतात.

plumule
आदिकोरक, कोंब बीज रुजल्यावर त्यातून बाहेर येणाऱ्या पहिल्या कळीचे (कोंबाचे) उजेडाकडे वाढणारे टोक (कळी) radicle

plumule axis
प्रथमाक्ष, आद्यक्ष प्रारंभिक अक्ष, रुजलेल्या बियातून बाहेर आलेल्या अंकुराच्या आदिकोरक व आदिमूल यांना जोडणारा भाग

pluri-
बहु किंवा अनेक या अर्थाचा उपसर्ग

pluricellular
बहुकोशिक, बहुपशीय, अनेक कोशिक अनेक शरीरघटक असलेले.

pluriflorus
बहुपुष्पी, अनेकपुष्पी अनेक फुले असलेले

plurigametic
बहुगंतुकी अनेक गंतुके निर्माण करणारे उदा. शैवल

plurilocular
बहुपुटकी, अनेकपुटकी अनेक कप्पे असलेले (किंजपुट), अनेक कोशिकांचे बनलेले उदा. एक्टोकार्पस या शैवलातील बीजुककोश किंवा गंतुकाशय

plurisporous
बहुबीजकी, बहुबीजाणुक अनेक बीजुके असलेला (कोश).

plus
धन पुं-प्रकल असलेल्या बीजुकांचे (वाणाचे, तंतूचे) विशेषण, उदा. बुरशीच्या दोन प्रकारच्या तंतूपैकी एक (नर), दुसरा तंतू (minus or - ) ऋण (स्त्री) (or +)

plus strain
धन वाण strain

pneumathode
वातछिद्र, वातरंध पानावरील त्वग्रंध, सालीवरील वल्करंध इत्यादीसारख्या छिद्रांचा अंतर्भाव या संज्ञेत करतात.

pneumatophore
श्वसनमूल, वातमूल वायूशी विनिमय करण्याकरिता जमिनीतून वर प्रकाशाकडे वाढणारे व अनेक हवायुक्त पोकळ्या असलेले मूळ. उदा. कांदळ, कांकरा चिप्पी, तिवार इ. समुद्रकिनाऱ्यावर चिखलात वाढणारी झाडे.

pocket leaf
कोटर पर्ण कुजट पदार्थ साठविण्याकरिता कप्प्याप्रमाणे विशेषत्व पावलेले पान उदा. काही अपिवनस्पती.

pod
शिंबा सामान्य भाषेत शेंग, पण शास्त्रीयदृष्ट्या विशिष्ट प्रकारचे शुष्क फळ legume, siliqua

podetium
उन्नत कायक तलस्थ व सपाट कायकाचा वर सरळ वाढलेला भाग, उदा. शैवाक, शेवाळी (मार्चांशिया), हा दांड्यासारखा अथवा पेल्यासारखा किंवा शाखायुक्त असतो.

podium
स्तंभाधार तळाशी असलेला सरळ आधार

podo-
दंड, वृंत ग्रीक भाषेतील देठ किंवा तत्सम भाग या अर्थाचा उपसर्ग.

podocarp
किंजवृंत किंजदलाचा देठासारखा तळभाग

point mutation
जनुकोत्परिवर्तन gene mutation

polar
धुवी, धुवीय अवयवाच्या किंवा अक्षाच्या टोकासंबंधी किंवा टोकावर असलेले. p. body त्यक्त कोशिका जनक कोशिकेच्या अर्धसूत्रण विभागणीने बनलेल्या कार्यक्षम कोशिकेखेरीज इतर (वंध्य) किंवा तत्सम प्राकलाचा अंश. p.cap धुवी आवरण कोशिकाविभाजनातील मध्यावस्थेत परिकलाच्या

polar nucleus
धुवी प्रकल, धुवीय केंद्रक फुलझाडांच्या बीजकातील गर्भकोशात फलनापूर्वी बनलेल्या चार प्रकलांच्या जोडीतील प्रत्येकी एक, यांच्या संयोगाने पुढे बनणाऱ्या दुय्यम प्रकलाचे पर्यवसान पुष्कात (गर्भाभोवतीच्या अन्नात होते) endosperm.

polarity
धुवत्व दोन धुव (टोके) असण्याची स्थिती, उदा. आदिमूळ व आदिकोरक ही दोन गर्भाक्षाची (प्राथमिक अक्षाची) टोके त्याचे धुवत्व दर्शवितात व त्यांची निश्चिती तत्पूर्वीपासून झालेली असते. अनेक वनस्पतींत रंदुकावस्थेत दोन धुवांची स्पष्टता दिसून येते.

pole
धुव, अग्र, टोक

polemoniales
भोकर गण, पोलेमोनिएलीझ बेसी यांच्या वर्गीकरणाप्रमाणे द्विदलिकित वनस्पतींच्या या गणात वृत्तांक कुल, भोकर कुल, हरिणपदी कुल इत्यादींचा समावेश होता. हचिन्सन यांनी भोकर गण (बोरॅजिनेलीझ), वृंत्ताक गण व पोलेमोनिएलीझ स्वतंत्र ठेवले आहेत. Boraginaceae.

polioplasm
कणप्राकल कोशिकेतील जीवद्रव्याचा कणीदार (कणमय) भाग.

polish
झिलई करणे घासून पुसून चकाकी आणणे.

pollard
ऱ्हस्वित जमिनीजवळच्या शाखा छेदून खुजा राखलेला व कापलेल्या ठिकाणी जाडजूड प्ररोहांनी भरलेला वृक्षतळ (खुंट).

pollen
पराग फुलझाडांच्या फुलातील केसरदलावर निर्माण झालेले व लैंगिक प्रक्रियेत आवश्यक असे लहान धुळीच्या कणासारखे भाग. यांचे कार्य प्रकटबीज वनस्पतींतील व नेचाभ (वाहिनीवंत अबीजी) वनस्पतींतील लघुबीजुकाप्रमाणे असते. साधारणपणे गोलसर, तथापि बाह्यावरणात ते फार विविधता द

pollinate
परागण करणे पराग किंजल्कावर पडणे अथवा पाडण्यास मदत करणे (सिंचन).

pollination
परागण, परागसिंचन केसरदलांमधून निघणारे पराग त्याच फुलातील किंवा त्याच जातीच्या अन्य फुलातील किंजल्कावर पडण्याची प्रक्रिया अथवा पडण्यास मदत करण्याची प्रक्रिया, प्रकटबीज वनस्पतींतील पराग (लघुबीजुके) प्रत्यक्ष बीजकावर पडण्याची प्रक्रिया

pollinium
परागपुंज एका परागकोटरातील सर्व परागांचा एक पुंजका, पुंजक्यातील कण सुटे नसून पातळ पापुद्र्यांनी वेढलेले असतात. तळाशी एक चिवट तंतू असतो व दोन तंतूंचा सांधा एका सूक्ष्म ग्रंथीस चिकटून असतो. उदा. रुई, ऑर्किड

pollinodium
पुं-धानी antheridium  antheridium

poly
बहु- अनेक याअर्थी उपसर्ग p.adelphia बहुसंघीय, पॉलिअडेल्फिया कार्ल लिनियस यांच्या कृत्रिम वर्गीकरण पद्धतीतील एक वर्ग. यामध्ये त्यांनी फुलातील केसरदलांचे अनेक गट (झुबके) असणाऱ्या सर्व वनस्पतींचा समावेश केला होता. p. adelphous बहुसंघ केसरदलांचे अनेक संघ

polygamous
बहुयुतिक एकलिंगी व उभयलिंगी (द्विलिंगी) फुले एकाच झाडावर अथवा एका जातीच्या दोन भिन्न झाडावर असणारी (जाती) उदा. ऍश, मँगोस्टीन, काजू, काकडशिंगी, अमोणी इ.

polygamy
बहुयुतिकत्व वर सांगितलेले लक्षण असण्याचा प्रकार

polygonaceae
चुक्र (चुका) कुल, पॉलिगोनेसी मुहलनबेकिया, चुका, रेवंदचिनी, पोवळी (ँटिगोनॉन), इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा अंतर्भाव बेसींनी पाटलपुष्प गमात (कॅरिओफायलेलीझ), एँग्लर व प्रँटल यांनी व हचिन्सनांनी चुक्रगणात (पॉलिगोनेलिझ) केला आहे. प्रमुख लक्षणे- नलिकेसारखे उपपर्ण असलेल्या एकाआड एक पानांच्या औषधी, द्विलिंगी, नियमित, चक्रीय किंवा अचक्रीय फुले, परिदले३+३ , केसरदले ३+३, किंजदले ३ जुळलेली व ऊर्ध्वस्थ किंजपुट, ह्या साधारणतः आढळणाऱ्या व्यवस्थेत फरक आढळतात, किंजपुटात एक कप्पा व एक बीजक, त्रिकोनी कपाली (फळ), सपुष्क बी, फळावर सतत राहणाऱ्या परिदलाचा पंख असतो.

polymerous
बहुभागी फुलातील प्रत्येक मंडलात अनेक पुष्पदले असलेले (फूल), उदा. गुलाब (संवर्ताशिवाय इतर मंडले), कमळ, हिरवा चाफा pleiomerous

polymorphic
बहुरुपी स्वरुपाचे अनेक प्रकार दर्शविणारे, एका जातीत पाने, पुष्पदले, बीजुके, फळे यांच्या प्रकारातील विविधता असणारी (वनस्पती).

polymorphism
बहुरुपता बहुरुपी असण्याची स्थिती, उदा. एकाच झाडावर दोन प्रकारची फुले असणे. जीवनात त्याच वनस्पतींचे भिन्न आकार प्रकार आढळतात. उदा. अर्गट नावाचे कवक

polynucleate
बहुप्रकल (प्रकली), बहुकेंद्रक अनेक प्रकल असलेली (कोशिका) उदा. म्युकर, बुरशी, क्लॅडोफोरा शैवल. multinucleate

polypetalae
मुक्तप्रदली उपवर्ग बेंथॅम आणि हूकर यांच्या वर्गीकरणातील सुट्या पाकळ्या असलेल्या फुलांच्या (द्विदलिकित वर्गातील) वनस्पतींचा गट

polypetalous
मुक्तप्रदली अनेक सुट्या पाकळ्यांचे फूल उदा. गुलाब, संकेश्वर, गुलमोहर इ.

polyphagous
बहवाश्रयी अनेक आश्रयांवर आढळणारे (कवक) उदा. पिथियम, अर्गट, तांबेरा इ.

polyphyletic
अनेकोद्भव, अनेकस्त्रोतोद्भव अनेक पूर्वजांपासून (कुले, जाती अथवा वंश) उत्क्रांत झालेला (अवतरलेला) एखादा मोठा गट, उदा. सर्व शैवल वनस्पती अनेक प्रारंभिक सूक्ष्म पूर्वजांपासून स्वतंत्रपणे विकसित होत आल्या असाव्या, या आधारावर त्यांचे स्वतंत्र विभाग पाडले आहेत,

polyphyllous
मुक्तपरिदली सुटी परिदले असलेले (फूल) उदा. चुका, नारळ, कमळ, पिवळा चाफा

polyploid
बहुगुणित प्रकलातील रंगसूत्रांची संख्या दुपटीपेक्षा अधिक असलेले (प्रकल अथवा वनस्पतीच्या जाती, प्रकार इ.) यातील जातीचा द्विगुणिताशी संकर होत नाही. diploid

polyploidy
बहुगुणितत्त्व, बहुगुणन बहुगुणित (रंगसूत्रांचे अनेक गट) असण्याचा प्रकार haploid, diploid, allopolyploidy

polyporaceae
बहुछिद्रकवक कुल गदाकवक वर्गातील अनेक छिद्रे असलेल्या बीजुकोत्पादक अवयवांच्या कवकांचे कुल Basidiomycetes.

polyscpalous
मुक्तसंदली सर्व संदले सुटी असलेले (फूल), उदा. मोहरी, लिंबू

polyspermous
बहुजीवी अनेक बिया असलेले

polysporangiate
बहुबीजुककोशिक अनेक बीजुककोश असलेले

polysporous
बहुबीजुकी, बहुबीजाणुक अनेक (४-८ पेक्षा अधिक) बीजुके असलेली (धानी) ascus.

polyspory
बहुबीजुकत्व, बहुबीजाणुकता अनेक बीजुके असण्याचा प्रकार

polystelic
बहुरंभी अनेक रंभ असलेले खोड, उदा. सिलाजिनेला, काही नेचे इ. stele.

polystemonous
बहुकेसरी, बहु पुं-केसरी अनेक केसरदलांचे, उदा. पेरु, सावर यांचे फूल polyandrous

polystylous
बहुकिंजली अनेक किंजले असलेले (किंजमंडळ) उदा. एरंड, चित्रक, गुलाब इ.

polytheleus
बहुकिंजपुटी अनेक स्वतंत्र किंजपुट असलेले (फूल) उदा. पिवळा चाफा, गुलाब, स्ट्रॉबेरी, रासबेरी इ.

polytrichous
बहुकेशी अनेक केस असलेले (फळ, बी, केसरदल इ.) उदा. सावर व कापसाचे बी, एकदांडीचे फळ, मोरवेलीचे किंजल, काही गवतांची तुसे.

polytypic
बहु (अनेक) प्रतिरुपी अनेक जाती अंतर्भूत असलेला वंश monotypic

pome
आक्रांत फल अनेक कप्पे असलेले, मांसल पुष्पासनाने आणि संवर्ताने वेढलेले फळ उदा. सफरचंद, नासपती, बिही

pomiferous
आक्रांत फलधारी आक्रंआत फळ असलेली (वनस्पती).

pomology
फलविद्या, फलशास्त्र खाद्य फळझाडांच्या लागवडीसंबंधी माहिती.

pond scum
पल्वल तरंग डबक्यातील व साठलेल्या पाण्यातील हिरवा तवंग, यात मुख्यतः सूक्ष्म शैवले असून विशिष्ट ऋतूत ती भरपूर असतात.

poophyte
शाद्वलपादप शाद्वल प्रकाराच्या गवताळ प्रदेशातील वनस्पति,   meadow

popcorn
लाही मका मक्याची लाही करण्यास उत्तम असा प्रकार

porandrous
रन्धस्फोटक छिद्रे पडून त्यातून पराग विखुरणारी (वनस्पती), उदा. मका, वांगे poricidal

pore
छिद्र, रंध कोणत्याही अवयवाला (खोड, पान, परागकोश इ.) असलेले भोक, उदा. त्वग्रंध, वल्करंध, जलरंध, छिद्रकवक, वाहिका, जमिनीतील पोकळी, स्फॅग्नम शेवाळीतील पाने, अफूची बोंडे p. fungus छिद्रकवक पहा polyporaceae p. passage रंधमार्ग पानांच्या त्वग्रंधाचा मार्ग,

poricidal
रंधस्फोटी भोके पडून फुटणारे (फळ) उदा. अफू

porogamy
रंधयुति बहुतेक सर्व बीजी वनस्पतींत परागनलिका बीजकरंधातून प्रदेहात प्रवेश करून नंतर गर्भकोशातील अंदुकाचे व परागनलिकेतील पुं-प्रकलाचे मीलन घडवून आणते तो प्रकार. chalazogamy

poroids
छिद्राभ छिद्रासारखे दिसणारे अनेक बिंदू (ठिपके) उदा. करंडक वनस्पतीचे आवरण.

porometer
त्वग्रंधमापक त्वग्रंधंआची परिमाणे मोजण्याचे उपकरण

porous
छिद्रल, छिद्री, रंधी छिद्रे असलेले (अवयव) p. dehiscence छिद्रल स्फुटन, रंधीस्फुटन छिद्रे पडून तडकणारा, उदा. अफूचे बोंड, रिंगणीचे परागकोश. porose

porphyreus
जांभळे उदा. Claviceps purpurea या कवकाचे जालाश्म (अनेक तंतू एकत्र होऊन बनलेली निष्क्रीय संरचना) purpureus

Portulacaceae
लोणी (लोनिका) कुल घोळ (लोणी, लोणा) व तत्सम द्विदलिकित वनस्पतीचे लहान कुल, एंग्लर व प्रँटल यांनी सटोस्पर्मीमध्ये, बेंथॅम व हूकर यांनी कार्याएफायलीनीत व हचिन्सननीं कार्याएफायलेलीझमध्ये समाविष्ट केले आहे. प्रमुख लक्षणे- औषधी व लहान झुडपे, मांसल पाने व केसाळ उपपर्णे, फुलोरा- नियमित, द्विलिंगी फुलांची वल्लरी, संदले सुटी, २ प्रदले ४-५ सुटी, केसरदले सुटी व ५ किंवा त्यापेक्षा कमीजास्त, किंजदले जुळलेली ३-५, किंजपुट ऊर्ध्वस्थ किंवा अर्धाधःस्थ, त्यात एक कप्पा व २-अनेक बीजके, बोंडफळात सपुष्क बीजे.

positive
धन केवळ (निरपेक्ष) किंवा परिणामकारक स्थिती दर्शविण्याकरिता उपसर्गाप्रमाणे उपयोग करतात. उदा. धन प्रकाशानुवर्तनी (प्रकाशाच्या परिणामामुळे तिकडे वाढणारे), त्याउलट ऋण प्रकाशानुवर्तनी (प्रकाशाविरुद्ध वाढणारे) p. reaction धन प्रतिक्रिया चेतकाकडे क्रियात्मक

post-climax
पश्चचरमावस्था, पश्चपरमावस्था चरमावस्थेनंतरची स्थिती p.fertilisation फलनोत्तर गंतुकमीलनानंतर (फलनानंतर) होणारे (बदल किंवा विकास) पहा fertilisation p. genital जन्मोत्तर, जननोत्तर जन्मास आल्यानंतर उद्भवणारी किंवा दिसून येणारी (लक्षणे किंवा संरचना),याउलट

posterior
पश्च प्रमुख अक्षाजवळची (उदा.पानाची किंवा फुलाची बाजू)

potamophyta
नदीपादप नद्यांत वाढणाऱ्या वनस्पती

potential
स्थितिज, अव्यक्त विशिश्ट स्थान (स्थिती) असल्यामुळे प्राप्त होणारे व परिस्थितिसापेक्ष उपयुक्त ठरणारे (संचित) p. energy स्थितिज ऊर्जा संचित ऊर्जा उदा. अन्नकणांतील ऊर्जा अनुकूल परिस्थितीत मुक्त होऊन कार्यास उपयुक्त होते. लाकडातील ऊर्जा जळतांना उष्णतारुपाने

potometer
बाष्पोच्छ्वासमापक वनस्पतीतून वाफेच्या रुपाने बाहेर टाकल्या जाणाऱ्या पाण्याचे मोजमाप करणारे उपकरण (साधन)

pouch
कोष्ठ पिशवीसारखा अवयव, उदा. काही फुलातील शुंडिका, काही बाजूच्या उपमुळाच्या विभाजी टोकावरची पाचक व पिशवीसारखी टोपी spur

powder
चूर्ण, पीठ, पूड, भुकटी

powdery mildew
चूर्णभुरी कवकांमुळे पानावर पडलेले पिठासारखे लहानमोठे ठिपके, उदा. द्राक्ष, गुलाब mildew

prairie
प्रशाद्वल दमट हवामानातील उंच, नरम व सलगपणे वाढणाऱ्या गवतांचा (उ. अमेरिकेतील) प्रदेश, यांत ऋतुमानाप्रमाणे काही औषधीही (कंदयुक्त, वर्षायू) आढळतात.

pratensis
शाद्वलवासी शाद्वलप्रकारच्या गवताळ प्रदेशात वाढणारी (वनस्पती), उदा. Eulophia pratensis (शतावरी)

pratum
शाद्वल meadow

pre
आदि-, पूर्व, प्राक् स्थान किंवा काल यांच्या संदर्भात अग्रत्व दर्शविणारा उपसर्ग, मराठीत प्रत्ययासारखाही उपयुक्त prae

pre-cambrian period
हैमन्तपूर्व कल्प, कँबियनपूर्व कल्प सुमारे साठ कोटी वर्षांपूर्वीचा कालखंड

preangiosperms
आध्यावृतबीज वनस्पति, आवृतबीजपूर्व वनस्पती फुलझाडे (आवृतबीज वनस्पती) अस्तित्वात येण्यापूर्वीच्या पूर्वज वनस्पती, आधीची फुलझाडे.

preclimax
पूर्वचरमावस्था, पूर्वपरमावस्था वनस्पतींच्या समुदायाच्या अंतिम अवस्थेपूर्वी असलेली स्थिती.

prefertilisation
फलनपूर्व अंदुकाचे रेतुकाकडून फलन होण्यापूर्वीची (स्थिती, संरचना इ.)

prefloration
कलिकारचना फुलाची कळी उमलण्यापूर्वीची अंतर्गत संरचना अथवा आतील अवयवांची (पुष्पदलांची) मांडणी, ptyxis, aestivation

prefoliation
कोरकरचना कळी उमलण्यापूर्वीची तिच्यातील पानांची मांडणी ptyxis, vernation

prehensile type
परिग्राही प्रकार केसरदले व किंजल यांना कवटाळून धरुन परपरागण घडवून आणणारी कीटकपरागित (फुले)

premorse
छिन्न टोकाशी कापल्याप्रमाणे, चावून तोडल्याप्रमाणे, कुरतडलेला. praemorse

presence
उपस्थिती १ व्यक्तीतील एखाद्या लक्षणाबद्दल जबाबदार असलेल्या जनुकाचे अस्तित्व पहा gene २ परिस्थितिविज्ञानात, एखाद्या पादप समुदायातील अनेक नमुनाक्षेत्रात त्यातील विशिष्ट जातीचे अस्तित्व व तिचे मापन किंवा वर्गवारी

presentation time
अवगमकाल, एखाद्या अवयवास चेतकाची जाणीव होण्यास लागलेला वेळ

preservation
परिरक्षण जैव, भौतिक व रासायनिक बदल न होऊ देता जतन करण्याची (टिकविण्याची) प्रक्रिया, उदा. खाद्य पदार्थ, वनस्पती अथवा प्राणी किंवा त्यांचे भाग

pressure
दाब, दमन p.root मूलदमन खोडात द्रव वर चढविण्यास आवश्यक असा मुळांच्या उतकांतील दाब

presynapsis
पूर्व समीपस्थिति समीपस्थितीच्या आधीची प्रकलाची अवस्था synapsis, post synapsis

prevention
प्रतिबंध रोग होऊ न देणे, फुले किंवा फळे येऊ न देणे इत्यादी संबंधी वापर असलेली संज्ञा.

prevernal aspect
वसंतपूर्व प्रभाव अथवा दृश्य वसंतऋतूपुर्वी पादपसमुदायास असलेले स्वरुप vernal aspect

prickle
काटा, शल्य सालीवर इतस्ततः वाढलेले तीक्ष्ण व कठीण उपांग, उदा. गुलाब, काटेमाठ

prickly
काटेरी, शल्यवंत काटे असलेले

primary
आद्य, प्राथमिक प्रथम विकास पावलेला (अवयव) p.axis प्रथमाक्ष, आद्याक्ष पानांचा किंवा फुलोऱ्याचा मुख्य अक्ष (दांडा), वनस्पतींचे खोड p.body मूलकाय, आद्यकाय फक्त प्राथमिक ऊतके असलेले शरीर, अग्रस्थ विभज्येपासून बनलेल्या ऊतकांचे शरीर, पहा meristem p.cortex

primary cell wall
प्राथमिक कोशिका भित्ति कोशिकेतील जीवद्रव्याची पूर्ण वाढ होईपर्यंत असलेले, पातळ, कमी सेल्युलोजाचे, अधिक पेक्टिनचे व अस्तरित (थर नसलेले) आवरण, हे पुढे आवरणाची जाडी वाढल्यावर मध्यपटल म्हणून राहते. p. mycelium प्राथमिक कवकजाल गदाकवकांचे गदाबीजुक रुजून निर्माण

primeval forest
अस्पष्ट वन, मूळचे जंगल मूळच्या स्वरुपात असलेले, मानवाने स्पर्श न केलेले जंगल, अशी जंगले आता फारच थोडी आहेत (अमेरिका, आफिका, इ.) पहा vergin forest

primine
बीजकावरण बीजकाचे बाह्याच्छादन

primitive
प्रारंभिक, आदिम, आद्य, आदि प्राचीन पहिल्याने विकास पावलेले (अवयव, वनश्री, वनस्पती, जाती, जीवन इ.)

primofilices
आदिम नेचे, आदि नेचे, प्रायमोफिलिसेस नवनेचांपूर्वी विकास पावलेले प्राचीन नेचे. पुराजीव महाकल्पातील जीवाश्म स्वरुपातच सध्या आढळणारे व नेचे (फिलिसीनी) वर्गातील तीन उपवर्गांपैकी एक पहा Filicinae

primordial
अविकसित, आदिम, आद्य पहिल्याने दृश्य स्वरुपात आलेले, सर्वप्रथम अवस्थेतील (अवयव). p.cell अनावृत (नग्न) कोशिका कोशिकावरण नसलेला जीवद्रव्याचा घटक (एकक) p. leaf आद्यपर्ण दलिकेनंतरचे (पहिले) पान, आदिकोरकापासून बनलेले. p. meristem (promeristem) पूर्व विभज्या,

primospore
आदिबीजुक जनक जीवांच्या शरीरकोशिकेपासून फारसे भिन्न (अप्रमेदित) नसणारे बीजुक.

prismatic
लोलकाभ, प्रचिनाकार लोलकासारखे, कोनानी अलग केलेल्या सपाट बाजू असलेले उदा. काही मृदूतकातील कोशिका, ऊतककर कोशिका p. layer लोलकस्तर, त्रिपार्श्विकस्तर वर सांगितल्याप्रमाणे कोशिका असलेला थर

prison flower
कारा पुष्प तुरुंगातील कैद्याप्रमाणे काही वेळ बंदिस्त ठेवून त्याचे (प्राण्यां) कडून परागणाचे कार्य करवून घेणारे फूल, उदा. पोपटवेल, अळू, कॅलॅडियम

pro-embryo
पूर्वगर्भ, आदिगर्भ गर्भाचे भिन्न भाग स्पष्ट होण्यापूर्वीची अवस्था

proanthesis
प्रारपुष्पन फुले येण्याच्या नित्यकालापूर्वी ती येण्याचा प्रकार

procambial strand
पूर्वाएतककर पट्ट विभज्येच्या रंभजनक भागातील वाहकवृंद बनविणाऱ्या लांबट कोशिकांची उभी पट्टी meristem

procambium
पूर्वाएतककर ज्या विभाजी कोशिकापासून नवीन वाहक घटक (वाहिका, वाहिन्या इ.) निर्मिले जातात त्या मूळ व खोड यांच्या टोकाशी असलेल्या विकासपूर्वावस्थेतील कोशिकांचा थर

procarp
पूर्वफल धानीकवकातील (उदा. युरोशियम) स्त्री जननेंद्रिय, त्यालाच टोकाशी योनिकासूत्र असा आदायी (ग्रहणशील) तंतू असतो. trichogyne

procerus
उंच लहान वृक्षाप्रमाणे उंच असलेले झाड, उदा. मांदार (Calotropis procera R.Br.)

process
१ प्रवर्ध २ प्रक्रिया, विधी १ पृष्ठभागापासून वर किंवा पुढे वाढून आलेले उपांग, उदा. काटे, केसल इ. २ अनेक टप्यांनी घडून येणारी जटिल क्रिया, उदा. वितंजन, प्रकाशसंश्लेषण, पचन, प्रजोत्पादन इत्यादी जैव प्रक्रिया.

processing
प्रक्रियण वर (२) मध्ये वर्णन केलेली घटना

procumbent
भूसर्पी जमिनीसरपट वाढणारे (खोड, वेल) उदा. पुनर्नवा, व्हर्बिना व्हेनोजा, एकदांडी (Tridax procumbens L.) इ.

producer
उत्पादक, निर्माता ecosystem.

proenzyme
पूर्ववितंचक वितंचनाची प्रक्रिया होण्यापूर्वी तिला चेतना देणारे दुसरे द्रव्य (प्रभावक).

profile lie
पार्श्वदृश्य स्थिती, पार्श्वरुप तीव्र प्रकाशाला अनुलक्षुन पाने प्रकाशाच्या किरणाकडे आपल्या किनारी (कडा) वळवुन ठेवतात ती स्थिती, उदा. टाकळा, लाजाळू, नागफणाचे खोड, नागीनची अथवा कोरफडीची पाने.

progamous
फलनपूर्व फलनापूर्वी घडणारी, उदा. लिंगनिश्चिती p.cell फलनपूर्व काशिका परागकणात बनलेली व नर गंतुक (प्रकल) असलेली कोशिका.

progression of communities
समुदायी प्रगमन पादपसमुदायात विशिष्ट दिशेने अधिक गुंतागुंत आणणारे बदल घडून येण्याची प्रक्रिया.

progressive metamorphosis
प्रगामी रुपांतरण उच्चतेकडे (प्रगतीकडे) नेणारा अवयवांतील बदल, उदा. पाकळ्या ऐवजी केसरदलांची निर्मिती. p.succession प्रगामी अनुक्रमण चरमावस्थेप्रत नेणारा पादपसमुदायातील बदल

Progymnosperms
आदिप्रकटबीज वनस्पति प्रकटबीज वनस्पतींचे पूर्वज, उदा. बेनेटायटेलीझ, बीजी नेचे

prohydrotropism
धन जलानुवर्तन ओलाव्याकडे वाढत जाण्याची प्रवृत्ती.

projection
प्रवर्धक, प्रक्षेप पृष्ठभागावर वाढलेला लहान पण भिन्न आकार प्रकाराचा उंचवटा

proliferation
प्रचुरजनन, प्रचुरण उपशाखांनी विस्तार होण्याची घटना

proliferous
उपशाखी, बहुजनक, प्रचुरजनक उपशाखारुप संतती असलेले (निर्मिणारे), अधिक सारखे अवयव किंवा भाग स्वतःवर निर्मिणारे.

prolific
जननक्षम, प्रसवशील, फलदायी प्रजानिर्मितीचे विपुल सामर्थ्य असलेले, विपुल फळे देणारे.

prolification
प्ररोहनिर्मिती फुलामध्ये टोकास किंवा बाजूस पानांचा झुबका येणे, उदा. गुलाब कुलातील काही वनस्पती, स्ट्रॉबेरी इ.

proligerous
बहुप्रसवी शैवाक (दगडफूल) वनस्पतीतील मुक्त धानीफलाचा बीजुकधारी भाग proliferous

promeristem
पूर्वविभज्या उच्च दर्जाच्या वनस्पतींतील कोवळ्या रोपाच्या खोडाच्या टोकातील अप्रभेदित कोशिकासमूह (मृदूतक), यातील सर्व कोशिका सर्व दिशांना विभाजनाने वाढत असतात, जसजसे टोकाकडून खालच्या बाजूस पहावे तसतसे अधिकाधिक प्रभेदित ऊतके आढळतात (आद्यत्वचा, पूर्वाएतककर आण

promycelium
पूर्वतंतु, पूर्वतंतु, पूर्वजालक, प्राक् कवकजाल बीजुक रुजून त्यातून वाढणारा अल्पायुषी व पुनरपि भिन्नरुप बीजुके निर्मिणारा कवकतंतु, उदा. कवक, म्यूकर बुरशीचे गंतुबीजुक रुजून बनणारा तंतू.

pronucleus
पूर्वप्रकल संयोगी गंतुकातील प्रकल, हा दुसऱ्याशी संयोग पावून कार्यक्षम बनतो व संयुक्त कोशिकेपासून नवीन वनस्पती निर्माण होते.

prop-root
आधारमूळ वनस्पतीला आधार देणारे व खोडापासून निघून हवेतून जमिनीत गेलेले टेकूसारखे मूळ, उदा. केवडा, मका इ. stilt root

prop-root
आधारमूळ वनस्पतीला आधार देणारे व खोडापासून निघून हवेतून जमिनीत गेलेले टेकूसारखे मूळ, उदा. केवडा, मका इ. stilt root

propagation
अभिवृद्धी, प्रवर्धन सजीवांचा प्रसार किंवा लागवड

propagule
कलिका, मुकुलिका, कंदिका, प्रवर्ध्य वनस्पतींच्या लक्षणांचे सातत्य टिकवून धरणारी प्रजोत्पादक कोशिका, कळी इत्यादी उपांग अथवा अवयव.

prophase
पूवावस्था कोशिकाविभाजनातील (प्रकल विभाजनातील) पहिली आरंभीची अवस्थआ, यामध्ये रंगसूत्रे स्पष्ट व तर्कुतंतूशी जोडली जातात. प्रकलावरण नाहीसे होते व प्रकलक लुप्त होतो. मात्र तर्कुचे स्पष्ट रुप पुढील अवस्थेत दिसते. metaphase

prophloem
आदिपरिकाष्ठ  protophloem

prophototatic
धन प्रकाशानुचलनी प्रकाशानुचलनी, phototactic

prophototropic
धन प्रकाशानुवर्तनी प्रकासानुवर्तनी phototropic

prophylactic
रोगप्रतिकारक, रोगप्रतिबंधक रोगाला प्रतिबंध करणारे (साधन, उपाय इ.)

prophylaxis
रोगप्रतिकार,रोगप्रतिबंध रोग होऊ न देण्याचा प्रकार

prophyll
छदक bracteole

proplastid
पूर्वप्राणू, आदिलवक,पूर्वलवक परिकलातील प्राकणूची निर्मिती करणारा सूक्ष्मकण chloroplast, chromoplast

prosenchyma
दीर्घाएतक पातळ किंवा जाड आवरण असलेल्या, सजीव व लांबट कोशिकांचे समूह, अनेकदा याचे वलय अपित्वचेखाली (खोड व देठ यामध्ये) आढळते. ह्या ऊतकांत हरितकणु बहुधा असतात. अन्ननिर्मिती, संचय, विसृति इत्यादी कार्ये येथे चालू असतात, जाड भिंती असलेले ऊतक मजबुती देते.

prosgeotropic
धन गुरुत्वानुवर्तनी geotropism  positively geotropic

prosheliotropic
धन प्रकासानुवर्तनी phototropism, positive  positively heliotropic

prosporangium
पूर्वबीजुककोश काही कवकातील बीजुककोशाची निर्मिती करणारी पहिली फुगीर कोशिका, यातील जीवद्रव्य बीजुककोशात गेल्यावर त्यापासून अनेक चरबीजुके निर्माण होतात. Chytridieae

prostelic
एकरंभी अक्षामध्ये एकच, मध्यवर्ती, एकमध्य वाहकवृंद असलेले (खोड), उदा. ऱ्हिनिया (नेचाभ पादप)

prosthermotaxis
धन तापानुचलन सूक्ष्मजंतू किंवा चरबीजुके यांचे ऊष्ण भागाकडे (गमन) जाणे thermotaxis. positive thermotaxis

prostrate
प्रणत जमिनीवर सपाट राहून वाढणारी (वनस्पती), उदा. काही शैवले, यकृतका, शैवक, मर्यादवेल, पुनर्वना, काटेरिंगणी, विष्णुकांता यांची खोडे व फांद्या.

protandrous
पूर्वपरागपक्क केसरदलातील परागकण प्रथम पूर्णपक्क होणारे (फूल), उदा. सूर्यफूल, कपूस

protandry
पूर्वपरागपक्कन वर सांगितलेले लक्षण असलेली स्थिती (प्रकार)

protease
प्रथिन वितंचक, प्रोटिएज प्रथिनांचे वितंचन (रासायनिक प्रक्रियेने साध्या पदार्थात रुपांतर) करणारे द्रव्य

protective layer
संरक्षक स्तर (थर), संरक्षी स्तर पाने गळून पडतेवेळी खोडावर तेथील अनेक कोशिकांच्या थरात बदल होऊन (जखम न होऊ देता) बनणारा संरक्षक थर, पान प्रत्यक्ष गळल्यावर तेथे त्याचा व्रण राहतो, उदा. पपई   abscission

protective sheath
संरक्षक आवरण endodermis

protein
प्रथिन जीवद्रव्याचा मूलभूत घटक, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन व नायट्रोजन क्वचित गंधक व स्फुर इत्यादी मूलद्रव्ये (आणि काही खनिजे) असलेले जटिल संयुग, प्राण्यांच्या अन्नातील आवश्यक घटक, अनेक ऍमिनो अम्लांच्या संश्लेषणाने प्रथिने बनतात. protoplasm

protenchyma
तल्पोतक ground tissue  ground tissue

proterandrous
पूर्वपरागपक्क protandrous

proterogynous
पूर्वकिंजपक प्रथम किंजल्क पक्क होणारे (फूल), उदा. सापसंद, मोहरी, बटाटा इ.

proterogyny
पूर्वकिंजपक्कन वर सांगितलेली स्थिती (प्रकार)

prothallus
पूर्वकायक, प्रकायिका बीजुक रुजल्यावर त्यापासून निर्मिलेली कायकरुप (अत्यंत साधे शरीर असलेली) व गंतुके निर्मिणारी एकलिंगी किंवा द्विलिंगी, स्वतंत्र किंवा अवलंबित (वनस्पतीची) पिढी, गंतुकधारी gametophyte

proto-
आद्य-, प्राक्- प्रारंभिक, सर्व प्रथम, प्राचीन इत्यादी अर्थाचा उपसर्ग

protocorm
आद्यघनकंद काही वनस्पतींत आढळणारा (फायलोग्लॉसम, लायकोपोडियम सर्नम व इतर काहींत) दृढकंदासारखा अवयव, याला ग्रंथिक्षोड असेही म्हणतात, गर्भाचे प्रभेदन होण्यापूर्वी तो याच स्वरुपात कमी अधिक काळ असतो. वाहिनीवंत वनस्पतींच्या खोडाच्या क्रमविकासात हा अवयव एक टप्पा

protoderm
आद्यत्वचा प्राथमिक अग्रस्थ विभज्येपासून बनलेले पहिले बाह्याच्छादक ऊतक (अल्पविकसित अपित्वचा) meristem, epidermis

protodochae
प्रागनुक्रमण, पूर्वानुक्रमण विशिष्ट ठिकाणी पहिल्याने होणारा वनश्रीतील क्रमिक बदल succession

protogenesis
पूर्वमुकुलन कळ्यांनी प्रजोत्पादन घडून येण्याची प्रक्रिया.

protogynous
पूर्वकिंजपक proterogynous

protohadrome
आदिप्रकाष्ठ protoxylem

protoleptome
आदिपरिकाष्ठ protophloem

protomeristem
आदिविभज्या अवयवाचा पाया घालणारी अग्रस्थ विभज्या

protonema
शंवालक शेवाळी वनस्पतींत रंदुक रुजल्यावर निर्माण होणारी पहिली शैवलासारखी (तंतूसारखी किंवा सपाट चकतीसारखी) अवस्था, पुढे हिच्यापासून मुख्य वनस्पती वाढते.

protophloem
आदिपरिकाष्ठ वाहक वृंदातील अन्नरसाची ने आण करणाऱ्या (परिकाष्ठ) भागातील पहिल्याने बनलेला भाग phloem.

protophyll
पूर्वपर्ण आद्यदृढकंदावरील पान (वाहिनीवंत) अबीजी वनस्पतीतील (नेचाभ पादपातील) दलिका अथवा आद्यपर्ण, लायकोपोडियम् सर्नम ह्या वनस्पतीत आद्यदृढकंदावर अनेक पूर्वपर्णे असतात. protocorm.

protophyta
आदिपादप, आदिवनस्पती अत्यंत साध्या प्रारंभिक एककोशिक व क्षुद्र वनस्पती, उदा. काही शैवले, सूक्ष्मजंतू, काही कवक

protophytology
पुरावनस्पतिविज्ञान Palaeobotany

protoplasm
जीवद्रव्य सर्व सजीवांच्या (प्राणी व वनस्पती) शरीरातील जीवनव्यवहाराचे भौतिक (वास्तव) आधारभूत स्थान. त्याच्या अभावी सजीवत्व (वृद्धी, चयापचय, प्रजोत्पादन, संवेदनक्षमता इ.) आढळत नाही. एककोशिक सजीवात हा अर्धघन पदार्थ कोशिकावरणाने संरक्षित किंवा नग्नावस्थेत असत

protoplast
प्राकल आच्छादलेल्या किंवा नग्नावस्थेत असलेल्या व्यक्तिस्वरुपातील (व्यष्टी) जीवद्रव्याचे एकक, एका कोशिकेतील सर्व जीवद्रव्य cytoplasm, nucleus, plastid

Protopteridophyta
प्राग्नेचाभ (प्राग्वाहिनीवंत) पादप, प्रोटोटेरिडोफायटा वाहिनीवंत अबीजी वनस्पतींचा गृहीत पूर्वज गट, हरित शैवलांपासून ह्या वनस्पती क्रमविकासाने अवतरलेल्या आहेत असे मानल्यास त्यांच्याहून प्रभेदित व सायलोफायटीनी (ज्यांचे पासून इतर टेरिडोफायटा विकसित झाल्या आहेत असा गट) या गटांशी साम्य असलेला (कल्पिलेला) प्रारंभिक गट.

protostele
आद्यरंभ मध्य केंद्रवर्ती प्रकाष्ठ व त्याभोवती परिकाष्ठ असलेला प्रारंभिक रंभ, उदा. ऱ्हिनिया, Psilophytales.

prototype
आदिरुप ज्यापासून रुपांतरित प्रजा निर्मिली गेली असावी असा गृहीत पूर्वज (पूर्वजाकृति).

protoxylem
आदिप्रकाष्ठ, पूर्वकाष्ठ विभज्येपासून प्रथम बनलेला प्राथमिक प्रकाष्ठाचा (जलवाहक ऊतक समूह) भाग, हा भडाजवळ असतो. xylem.

protozoophilous
सूक्ष्मजीवप्रिय, सूक्ष्मजीवपरागित लहान अगर सूक्ष्म प्राण्यांकडून (आदिजीव) फलन (लैंगिक प्रक्रिया) घडवून आणणाऱ्या काही जलवनस्पती.

protozygote
आदिरंदुक अनुहरणाच्या प्रक्रियेत पितरांकडून दोन्ही प्रभावी घटक (जनुके) एकत्र आलेले समरंदुक

protropic
धन अनुवर्तन (धनानुवर्तन) चेतकाकडे नेणारी वाढण्याची प्रक्रिया उदा. प्रकाशानुवर्तन heliotropic, phototropic

protrudig
पुरःसृत पुढे डोकावणारे (झुकणारे) उदा. संकेश्वराची केसरदले.

proximal
समीपस्थ जवळचे, अक्षाला अनुलक्षून, त्याच्या जवळ येणारे भाग उदा. पानाच्या पात्याचा तळभाग टोकापेक्षा जवळचा असतो, टोक दूरस्थ असते. distal

pruinate
भुरे भुरकट दिसणारे, पृष्ठभागावर मेणचट व चूर्णीय (पिठासारखा) थर असलेले, उदा. घायपातीचे पान pruinose, pruinous

prurient
दाहक, खाजरे, कंडूत्पादक खाज (कंडू) आणणारे, उदा. खाजकुइली (Mucuna pruriens Baker)

psamnophilous
वालुकाप्रिय, वालुकावासी, वालुकारागी उदा. विपुल वाळूमिश्रित जमिनीत वाढणारी (वनस्पती), Psamna arenaria आणि spinifex squarrosa ह्या वनस्पती वालुकाराशीवर समुद्रकिनारी आढळतात. strand plants  psamnophile

psamnosere
वालुकी क्रमक रेताड जमिनीवर विकास होत असलेला वनस्पतींचा समुदाय.

pscudoepiphyte
अपिवनस्पतिबूव प्रथमपासूनच दुसऱ्या (आश्रय) वनस्पतीवर न वाढता, पुढे आधार घेऊन जगणारी वनस्पती, उदा सुरण कुलातील काही वनस्पती प्रथम जमिनीत वाढून नंतर जवळच्या झाडाचा आधार घेतात व त्यावर वाढतात, त्यांच्या खोडाची खालची बाजू नाश पावून त्यापासून सुटलेल्या वायवी मु

pseudannual
छद्मवर्षायु कंदयुक्त किंवा ग्रंथिक्षोडयुक्त, जमिनीतील खोडाच्या साहाय्याने वर्षानुवर्षे जगणारी परंतु वर्षायुप्रमाणे प्रतिवर्षी कोरड्या ऋतूत जमिनीवर न दिसणारी औषधी, उदा. आले, काही आमरे, हळकुंड, कांदा, सुरण इ.

pseudannulus
छद्मवलय शेवाळींच्या बीजुकाशयाच्या परितुंडाबाहेरचे विशेषत्व पावलेल्या कोशिकांचे वर्तुळ.

pseudaxis
छद्माक्ष sympodium

pseudembryo
छद्मगर्भ पुष्कातील अलग राखलेला कोशिकांचा समूह, उदा. बॅलॅनोफोरा (पूर्ण जीवोपजीवी फुलझाड).

pseudo perianth
छद्मपरिदलमंडल, आभासी परिदल अंदुलकलशाच्या तळाशी फलनानंतर बनणारे पेल्यासारखे आवरण, काही यकृतकातील वनस्पती.

pseudo vivipary
छद्मापत्यजनन फुलांबरोबरच जवळपास पर्णयुक्त जननक्षम कळ्यांची निर्मिती, उदा. प्रनड (Juncus bufonius L.)

pseudo-
छद्मी, छद्म-, मिथ्या, आभासी खोटे अथवा भास उत्पन्न करणारे या अर्थी उपसर्ग pscud-

pseudo-hermaphrodite
छद्मी द्विलिंगी कार्यक्षमतेच्या दृष्टीने एकलिंगी, तथापि संरचनेत द्विलिंगी आणि दोन्हीपैकी एका लिंगाचे अवयव वंध्य असलेले (फूल)

pseudo-monocotyledon
छद्मी एकदलिकित द्विदलिकित, तथापि विकासावस्थेत दोन्हीपैकी एक दलिका स्थगित झालेली (वनस्पती), उदा. कॅप्सेला.

pseudoapogany
आभासी अफलितजनन, आभासी अयुग्मकता नित्य लैंगिक प्रकारातील पुं- व स्त्री प्रकलांच्या संयोगाऐवजी, दोन स्त्री प्रकल, एक स्त्री प्रकल व एक शाकीर्य प्रकल किंवा दोन शाकीय प्रकल यांच्या संयोगाने संयुक्त प्रकल (रंदुक प्रकल, द्विगुणित प्रकल) बनण्याची प्रक्रिया.

pseudoapospory
आभासी अबीजुकजनन प्रकलाचे न्यूनीकरण विभाजन न होता बीजुकाची निर्मिती.

pseudobulb
आभासी कंद, छद्मकंद कंदाप्रमाणे अन्नसंचयी कांडे (खोडाच्या दोन पेऱ्यांमधील भाग) उदा. आमरांपैकी काही जाती.

pseudocarp
छद्मफल, आभासी फल पक्क किंजपुटाऐवजी फळाचे कार्य करणारी पुष्पस्थली किंवा तत्सम संलग्न अवयव, याला अतिरिक्त (साहाय्यक) फळ म्हणतात, उदा. सफरचंद, नासपती, स्ट्रॉबेरी, कमळ (नीलंबो), काजूचे बोंडू

pseudogamy
छद्मयुति, आभासी फलन, आभासी युग्मन अनिषेक जननाने फलोत्पत्ती, परागण होऊन बीजुकात गंतुक प्रवेश होत नाही, असा प्रकार

pseudoparenchyma
छद्मी मृदूतक मूलतः संबंध नसलेल्या स्वतंत्र कोशिकांचे साधे ऊतक, उदा. कवकातील तंतू एकत्र येऊन बनलेले ऊतक.

pseudopodium
छद्मपाद, पादाभ, आभासी पाद नग्नावस्थेतील जीवद्रव्याच्या पृष्ठभागापासून निघालेले व हालचालीत पायाप्रमाणे उपयुक्त असलेले तात्पुरते प्रवर्धन उदा. श्लेष्मकवकांची बीजुके व जीवद्रव्याचे खंड, ऍमीबा प्राणी.

pseudozygospore
आभासी (छद्मी) गंतुबीजुक, आभासी युग्माणु azygospore

psilo-
अनावृत, नग्न आच्छादन नसलेले, उपसर्गाप्रमाणे उपयुक्त संज्ञा

psilophytaceae
नग्नपादप कुल, सायलोफायटेसी नग्नपादप गणातील दोन कुलांपैकी एक, दुसरे सायलोटेसी, काहींच्या मते सायलोफायटेलीझ गणातील एकमेव कुल, त्यांनी सायलोटेसीचा अंतर्भाव सायलोटेलीझ या नावाच्या अन्य गणात केला आहे.  psilophytinae,  psilotales, psilophytales.

psilophytales
नग्नपादप गण, सायलोफायटेलीझ वर सांगितलेल्या वर्गातील एक गण, ह्या सर्वच वनस्पती प्राचीन व जीवाश्म रुपातच आढळतात. उदा. ऱ्हिनिया, सायलोफायटॉन, ऍस्टरोझायलॉन हे व इतर काही वंश यात अंतर्भूत आहेत.

Psilophytinae
नग्नपादप वर्ग, सायलोफायटीनी वाहिनीवंत अबीजी वनस्पती विभागातील (नेचाभ पादप, टेरिडोफायटा) प्रारंभिक वनस्पतींचा वर्ग, यातील वनस्पती अत्यंत साध्या व मूलहीन असून बीजुककोश शाखांच्या वा उपशाखांच्या टोकास एकेकटे असतात, पाने फार लहान किंवा नसतात. यांच्यापैकी काहींचे जीवाश्म पूर्व व मध्य डेव्होनियन ह्या अतिप्राचीन काळातील खडकांत सापडतात, कदाचित त्यापूर्वी त्यांचा क्रमविकास होत आला असावा.

Psilotales
सायलोटेलीझ सायलोफायटीनी वर्गातील विद्यमान व फक्त दोन वंश असलेला (सायलोटम व मेसिप्टेरिस) गण, फक्त सायलोटमला खवल्यासारखी पाने असतात, बीजुक कोशआत २-३ कप्पे, द्विखंडी बीजुककोशपर्णे.

psychrometer
आर्द्रतामापक हवेतील ओलाव्याते (आर्द्रतेचे) मापन करण्याचे साधन (उपकरण).

psychrophytes
अतिशीतवनस्पति, शीतवासी पादप जमिनीतील अतिथंड तपमानामुळे मुळांच्या शोषणक्रियेत येणाऱ्या अडचणींशी समरस होणाऱ्या वनस्पती (आल्पीय वनस्पती).

ptenophyllium
पानझडी वन ठराविक काळात पाने गळणाऱ्या वृक्षांचा समावास.

pterampelid
आरोही नेचा वर चढत जाणारा कोणताही नेचा, उदा. लायगोडियम

pteratus
सपक्ष पंखयुक्त

pteridophyta
नेचाभ पादप (वाहिनीवंत अबीजी वनस्पती) विभाग, टेरिडोफायटा शेवाळी व बीजी वनस्पती या दोन्हीच्या मध्ये (विकासाच्या दृष्टीने) असणारा गट. वाहिका आणि कधीकधी वाहिन्या असलेल्या (प्रकाष्ठ व परिकाष्ठ या घटकांनी बनलेले वाहक वृंद (गट) असलेल्या), परंतु बीजाचा अभाव असलेल

pteridospermae
बीजी नेचे गण, टेरिडोस्पर्मी (सायकॅडोफिलिकेलीझ) बीजे धारण करणारा तथापि नेचाभ वनस्पतीशी साम्य असणारा प्राचीन (अश्मीभूत) वनस्पतींचा गट, याचा अंतर्भाव प्रकटबीज वनस्पतींत करतात. पुराजीव महाकल्पातील खडकात यांचे शिलारुप अवशेष आढळतात, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्

pterigraphia
नेचे विज्ञान pteriodographia

pterigynous
सपक्ष पंख असलेले.

ptero-
पक्ष पक या अर्थाचा ग्रीक उपसर्ग, मराठीत प्रत्ययाप्रमाणेही उपयुक्त, उदा. pterospore सपक्ष बीजुक.

pterocarpus
सपक्षफली पंखयुक्त फळे असलेली (वनस्पती) उदा. बिबळा (Pterocarpus marsupium Roxb.), रक्तचंदन (pterocarpus santalinus L.)

Pteropsida
टेरोप्सिडा विभाग पाणी व अन्नरस यांची ने आण करणारे घटक (वाहिका व वाहिन्या) असणाऱ्या वनस्पतींच्या दोन विभागांपैकी एक, दुसरा विभाग लायकोप्सिडा, पहिल्या विभागात नेचे (फिलिसीनी), प्रकटबीज व आवृतबीज (बीजी) वनस्पतींचा समावेश होतो, मोठी पाने व त्यामुळे रंभात असले

pterospore
सपक्षबीजी पादप पंखयुक्त बीजे असलेली वनस्पती, उदा. शेवगा.

pterygium
पंख, पक्ष

pterygospermous
सपक्षबीजी pterospore उदा. शेवगा (Moringa pterygosperma Gaertn.)

ptomaine
शविक विष, टोमेन रोगकारक सूक्ष्मजंतूंच्यापासून बनणारा विषारी क्षाराभ (अल्कलॉइड)

ptyalin
टायलिन, लालाद्रव्य स्टार्चसारख्या पिठूळ पदार्थांचे साखरेत रुपांतर करणारे लाळेतील वितंचक (एन्झाइम) द्रव्य

ptyxis
दलवलन, पर्णवलन कळीतील संरचना दर्शविणारी संज्ञा, पान किंवा पुष्पदल कळीमध्ये स्वतःभावती गुंडाळलेले किंवा घडी पडलेले (वळलेले) असण्याचे भिन्न प्रकार prefoliation, prefloration, sestivation, vernation

puberulous
अल्पलोमश, सूक्ष्मरोमिल फार थोडी लव असलेले (पान, खोड, फुलातील भाग, फळ, बी इ.) उदा. आघाड्याचे पान, तुळशीचे प्रमुख अवयव

pubescence
लवदारपणा, लोमशत्व, रोमिलता लवदार असण्याचे लक्षण, उदा. कुंद (Jasminum pubescence Willd.)

pubescent
लोमश, लवदार, मृदुरोमी नरम व आखूड केस (लव) असलेले (अवयव), उदा. ऐसर (ईश्वर) ची फुले, फुलोरा इ. लाल कमळ (Nymphoea pubescence Willd.).

pull root
कर्षण मूळ स्वतः आकुंचन पावून खोडास जमिनीत खोलवर ओढून धरणारे मूळ, यावर आडवे कंगोरे दिसतात. उदा. अळू, केशर, नागदौना (भुईशिरड) इ.

pullulation
मुकुलायन कळ्या येणे, अंकुरणे उदा. यीस्ट नावाचे कवक.

pulp
गाभा, मगज, कल्क फळातील गीर (रसाळ अथवा मांसल), प्राण्यांतील नरम व मांसल भाग -p.paper लगदा कागद बनविण्यास लागणारा लाकडाचा किंवा चिंध्यांचा मऊ चोथा

pulsation
स्पंदन कोशिकेतील (नग्न चरबीजुके आणि प्राकलपुंज) रिक्तिकांचे आकुंचन व प्रसरण, प्राण्यांतील हृदयाची तीच प्रक्रिया vacuole.

pulverulent
भुरकट, चूर्णाभ, चूर्णिल, चूर्णी भुकटी पसरल्याप्रमाणे दिसणारे उदा. काही कवकातील बीजुके अथवा बीजुकसमूह

pulvinate
सपुलवृंत, स्थूलाधारी पुलवृंत असलेले

pulvinule
पुलवंऋतक संयुक्त पानाच्या दलाचा (किंवा दलकाचा) फुगीर तळभाग.

pulvinus
पुलवृंत, स्थूलाधारिका पानाच्या देठाच्या तळाशी असलेला फुगीर उशीसारखा भाग

pulvis
भुकटी, चूर्ण

pumilus
खुजे, लघु उदा. कवठी चाफा (Magnolia pumila Andr.)

punctate
बिंदवांकित, ठिपकेदार अनेक ठिपके, सूक्ष्म खाचा अथवा अर्धपारदर्शक प्रपिंड असलेले

punctiform
बिंदुरुप ठिपक्यासारखे

pungent
१ तिक्त २ तीक्ष्णाग्र १ तिखट चव असलेले २ अणकुचीदार टोकाचे (पान), उदा. घायपात, युका, निवगूर

Punicaceae
दाडिमकुल, प्युनिकेसी प्युनिका या शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या एकाच वंशाचा अंतर्भाव असलेले कुल. याचा समावेश जंबुल गणात (मिर्टिफ्लोरीत) केला जात असे. हचिन्सन यांनी मेंदी (मेंदिका) गणात (लिथेलीझमध्ये) हे कुल घातले आहे. ग्रॅनेटेसी या नावानेही हे कुल ओळखले जाते. डाळिंब (दाडिम) ही परिचित जाती या कुलातील फक्त दोन जातींपैकी एक आहे. प्रमुख लक्षणे- काष्ठयुक्त वनस्पती, पाने साधी, बहुधा समोरासमोर किंवा मंडलित, फुले द्विलिंगी, आकर्षक, नियमित, संदले व प्रदले सुटी, ५-७, केसरदले अनेक, किंजदले अनेक व जुळलेली, किंजपुट अधःस्थ, बीजके अनेक, बीजावरण रसाळ, मृदुफळात अपुष्क बीजे, डाळिंब (Punica granatum L.)

puniceous
किरमिजी किरमीजी अगर गर्द लाल रंगाचे, डाळिंबी रंगाचे, डाळिंबाच्या फुलाच्या पाकळ्यांच्या रंगाचे

pure
शुद्ध, स्वच्छ, विशुद्ध मिश्रण नसलेले. -p.culture विशुद्ध संवर्धक कोणत्याही अन्य सजीवाचा संपर्क न झालेला व विशिष्ट जीवाचे शुद्ध स्वरुपात संवर्धन केलेला द्रव अगर घन पदार्थ, उदा. यीस्ट (किण्व), सूक्ष्मजंतू, बुरशी, आदिजीव, इत्यादींच्या कृत्रिम वाढीकरिता असे

purity of gametes
गंतुकशुद्धी व्यक्ती मिश्रगुणयुक्त असली तरी गंतुकात एकच गुणघटक असण्याचा प्रकार, एखाद्या व्यक्तीच्या शरीरकोशिकात त्याच्या आईबापाकडून आलेल्या वैकल्पिक गुणांपैकी (उदा. खुजेपणा व उंची अथवा गुळगुळीतपणा व सुरकुतलेपणा इ.) दोन्हींचे जनक घटक (जनुके) असले तरी तिच्या प्रजोत्पादक कोशिकात त्यांपैकी एकच असतो, म्हणजे प्रजोत्पादक कोशिका (गंतुक) शुद्ध असते.

purpureus
जांभळे, नीलारुण निळे व लाल यांच्या कमीअधिक मिश्रणाने बनलेला रंग, उदा. Digitalis purpurea L. तिलपुष्पी

pustular
पिटकित बारीक फोडाप्रमाणे पुटकुळ्या आलेले.

pustule
पिटक, पुळी सूक्ष्म उंचवट्यासारखा फोड

putamen
दृढपुष्क, घनपुष्क आठळीफळाच्या बीजामधील गर्भपोषकाचे कठीण ऊतक, उदा. आलुबुखार.

putamen
दृढपुष्क, घनपुष्क आठळीफळाच्या बीजामधील गर्भपोषकाचे कठीण ऊतक, उदा. आलुबुखार.

pycnidium
गर्तिका, पलिघा काही कवकातील व शैवकातील विशिष्ट प्रकारची बीजुके निर्माण करणारी पेल्यासारखी किंवा सुरईसारखी व अलिंग पद्धतीने कायकातच बनलेली पोकळी

pycnium
परिघ उथळ किंवा सुरईसारखी पोकळ असलेली व स्थिर पुं-कोशिका बनविणारी कवकातील एक संरचना. spermogonium

pycnoconidium
गर्तिका बीजुक गर्तिकेत बनलेले बीजुक pycnogonidium, pycnospore

pycnospore
पलिघबीजुक pycnoconidium.

pyrene
गुठळी आठळीफळीतील आठळीप्रमाणे एकबीजी व कठीण भाग, एका फळात एक किंवा अनेक गुठळ्या असणे शक्य असते, उदा. सप्ताळू (पीच)

pyrene
गुठळी आठळीफळीतील आठळीप्रमाणे एकबीजी व कठीण भाग, एका फळात एक किंवा अनेक गुठळ्या असणे शक्य असते, उदा. सप्ताळू (पीच)

pyrenoid
प्रकणु कोशिकेतील वर्णकणूतील (प्राकणूतील) सूक्ष्म वर्णहीन, गोल कण. अनेकदा याभोवती पिष्टकण बनतो. उदा. शैवले.

pyrenomycetes
पलिघ कवक, पायरिनोमायसेटीज पलिघ प्रकारचे घानीफल निर्मिणाऱ्या कवकांचा गट (उपवर्ग), उदा. अर्गट रोग perithecium, ascus

pyriform
कुंभाकृति पीअर फळासारखा आकार असलेले

pyrophilous
दग्धभूवासी नुकत्याच जळून गेलेल्या जमिनीवर वाढणारी (वनस्पती).

pyroxylophilous
दग्धकाष्ठवासी जळलेल्या लाकडावर वाढणारी (वनस्पती).

pyxidate
सापिधान झाकणी असलेले, उदा. घोळ, कुरडू व निलगिरी यांची फळे. operculate

pyxidium
करंड फल लहान करंड्याप्रमाणे तळ व झाकणी असणारे व तसेच तडकणारे फळ उदा. कुरडू, शेवाळीतील बीजुकाशय pyxis