वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा
There are currently 109 names in this directory beginning with the letter O.
oasis
मरुद्यान, मरुबन रुक्ष प्रदेशातील, पाण्याच्या क्वचित उपलब्धतेमुळे बनलेला, नैसर्गिक वनासारखा कमीजास्त तुरळक वनश्रीने व्यापलेला भाग
ob-
-व्यस्त, प्रति- उलट या अर्थाचा लॅटिन भाषेतील उपसर्ग, मराठीतही तसाच उपयोग होतो. obcompressed पार्श्वदम्न, प्रतिसंपीडित बाजूने दबलेले (सपाट झालेले), चपटे obconical व्यस्त शंक्काकृति खाली तळाकडे टोकदार व शेंड्याकडे रुंदट, भोवऱ्यासारखे obcordate व्यस्त
oblitertion
अभिलोपन वनस्पतींच्या शरीरात नवीन घटक बनल्यामुळे जुन्या नलिकाकृती घटकांवर दाब येऊन त्यांच्या पोकळ्या बंद होण्याची व ते घटक चिरडून जाण्याची प्रक्रिया.
obscure venation
अस्पष्ट सिराविन्यास प्रमुख शिरेशिवाय इतरांचा विकास न झाल्याने एकूण शिरांची पुसट मांडणी, उदा. मांसल पाने (घोळ, पानफुटी इ.)
occidentalis
पाश्चिमात्य पश्चिम गोलार्धातील ह्या अर्थाची लॅटिन संज्ञा, गुणनाम दर्शविण्याकरिता उपयुक्त उदा. Thuja occidentalis.
oceanophyta
सागरवनस्पति महासागरात विशेषेकरून आढळणाऱ्या वनस्पती उदा. काही शैवले- सरगॅजम, पॉस्टेल्शिया, नेरिओसिस्टिस, मॅक्रोसिस्टिस
odoratus
सुगंधी चांगला वास येणारे (फूल अथवा जवळचा भाग) उदा. केवडा (Pandanus odoratissimus Roxb.). हिरवा चाफा (Artabotrys odoratissimus R. Br.)
oecology
परिस्थिती विज्ञान, पारिस्थितिकी, स्थलविज्ञान निसर्गतः वनस्पती (किंवा प्राणी) अथवा त्यांचे लहान मोठे समुदाय ज्या परिस्थितीत विकास पावतात, तेथील सर्व बाबीचा (जमीन, हवामान, इतर वनस्पती व प्राणी इत्यादी घटकांचा) संपूर्ण अभ्यास, ecology
oedema
शोफ शंकुमंत वनस्पतींच्या काष्ठयुक्त ऊतकावर वाढलेले अर्बुदासारखे प्रपिंड, वनस्पतींच्या शरीरावर कोठेही कोशिकांची अतिवृद्धी (सूज) edema
offensive
बोचक, क्षोभक स्पर्श, गंध, घर्षण इत्यादींमुळे दाह (कंडु किंवा आग) उत्पन्न करणारी (वनस्पती, तिचे अवयव अथवा यंत्रणा) उदा. आग्या, खाजोटी इत्यादींच्या स्पर्शाने खाज सुटते व आग होते अथवा काटेरी झाडांचा बोचकपणा जाणवतो.
officinal
औषधी औषधाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरलेली, क्वचित इतर दृष्टीने व्यापारी महत्त्वाची (वनस्पती), उदा. अफू, कबाबचिनी, कापूर, गजपिप्पली (Pothos officinalis L.), दुधळ (Taraxacum officinale Webber), लुतपतिया (Nasturtium officinale R.Br.), ऊस (Saccharum officinaru
offset
अपप्रराह, प्रशाखा, उपशाखा एका वनस्पतीच्या खोडाच्या तळापासून निघालेली व टोकांशी मुळे फुटून नवीन वनस्पती निर्माण करणारी जाड व आखूड शाखा उदा. गोंडाळ offshoot
oil
तैल, तेल वनस्पतीतील कोणतेही पातळ स्निग्ध (वसायुक्त) द्रव्य, विशेषतः स्टेरिक, पामिटिक, ओलीक आम्ले oil immersion lens तैल निमज्जन भिंग तैलाचे निरीक्षण करण्याकरिता वापरलेले भिंग oil plastid तलकणु पहा elaioplast oil tube (vitta) तैल नलिका तेलाची ने आण अथवा
oil body
तैलकाय इतस्ततः विखुरलेल्या कोशिकांतील प्रत्येकी एकच मोठा तेलाचा बिंदु (थेंब) उदा. मार्चांशिया व तत्सम शेवाळी.
Oleaceae
पारिजातक कुल, ओलिएसी ऑलिव्ह, करंबा (इंडियन ऑलिव्ह), पारिजातक, जाई, जुई, चमेली इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा अंतर्भाव किराइत गणात (जेन्शिएनेलिझमध्ये) केला जातो. प्रमुख लक्षणे - काष्ठयुक्त, काही वेली, क्वचित औषधीय, पाने साधी, समोरासमोर, क्वचित संयुक्त, पिसासारखी, द्विलिंगी किंवा एकलिंगी, नियमित व २-६ भागी फुले, पुष्पमुकुट सुट्या किंवा जुळलेल्या पाकळ्यांचा, क्वचित अभाव, पाकळ्यास चिकटलेली दोन केसरदले, दोन जुळलेल्या ऊर्ध्वस्थ किंजदलांच्या किंजपुटात एक किंवा अनेक बीजके, फळे मृदु, आठळीयुक्त किंवा बोंड, अपुष्क बीजे.
olens
गंधयुक्त विशेषतः मधुर वासाचे, graveolens उग्र वासाचे, उदा. सताप (Ruta graveolens L.) अजमोदा (Apium graveolens L.)
oleraceous
खाद्य स्वयंपाकात उपयुक्त वनस्पतीसारखे, खाण्यास योग्य, लागवडीच्या जागी वाढणारे, उदा. घोळ (Portulaca oleracea L.), कोबी (Brassica oleracea L. var. capitata)
olibanum
धूप चंद्रसेनी ऊद, कडू व सुवासिक राळ, सालई व त्याच वंशातील (Boswellia) इतर झाडांपासून मिळालेला चिकट गोंदासारखा पदार्थ
oligomerous
अल्पभागी प्रत्येक मंडलात फार थोडे भाग असलेले (फूल), उदा. गवते, मोथा कुल, शेर, शेंड, थोर इत्यादी युफोर्बिया वंशातील वनस्पती.
ombrophilous
पर्जन्यप्रिय भरपूर पावसात वाढत असलेली (वनस्पती), उदा. भात, नाचणी, ऊस, रोहिश, मोथा, कुंदा, शेवाळी, केळ, कर्दळ इ.
ombrophobe
पर्जन्यद्वेष्टी सतत पावसात न वाढू शकणारी (वनस्पती) उदा. बाभूळ, नेपती, काटेधोत्रा, निवडुंग इ.
Ombrophyte
छायाप्रिय वनस्पती सावलीत वाढणारी वनस्पती, पर्जन्यप्रिय वनस्पती असाही अर्थ आहे. उदा. नेचे, शेवाळी, कॅलॅडियम इ. sciophyte
omnivorous
१ सर्वाएपजीवी २ सर्वभक्षक १ अनेक वनस्पतीवर उपजीविका करणारे जीवोपजीवी (कवक) २ कोणत्याही पदार्थावर उपजीविका करणारा (सजीव).
Onagraceae
शृंगाटक (शिंगाडा) कुल, ऑनेग्रेसी फुक्सिया, शिंगाडा, पाणलवंग, ईनोथेरा, केसर इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा समावेश बेसींनी जंबुल गणात (मिर्टेलीझमध्ये) व हचिन्सन यांनी मेंदी गणात (लिथेलीझमध्ये) केलेला आढळतो. प्रमुख लक्षणे- एकाआड एक, समोरासमोर किंवा झुबक्यात, बहुधा साध्या पानांच्या औषधी, कधी कधी झुडपे व वृक्ष, द्विलिंगी व बहुधा नियमित फुले, संदले व पाकळ्या २-४ व सुट्या, पाकळ्या क्वचित नसतात, केसरदले ४-८ सुटी व किंजदले बहुधा चार व अधःस्थ किंजपुटात १ ते अनेक बीजके, फळ (बोंड, कपाली, मृदु), अपुष्क बीजे किंवा थोडा पुष्क असतो.
one-called
एककोशिक एकाच कोशिकेचा (जीव, बीजुक, प्राणी किंवा वनस्पती), एकच कप्पा असलेला (परागकोश, किंजपुट इ.)
ontogeny
व्यक्तिविकास, व्यक्तिवृत्त प्राणी किंवा वनस्पती यांच्यापैकी कोणाच्याही (एकाच्या) संपूर्ण वाढ व विकासाचा वृत्तांत embryology
oomycetes
रंदुककवक उपवर्ग, ऊमायसेटीज शैवलकवक या वर्गातील दोन्हीपैकी एक उपवर्ग, दुसरा उपवर्ग गंतुबीजुक कवकांचा. पहिल्यात अंदुक व रेतुक यांची निर्मिती असून लैंगिक प्रजोत्पादन त्यांचे साहाय्याने होते. उदा. पिथियम. दुसऱ्यात समगंतुके असून गंतुबीजुक बनतात. उदा. म्यूकर, न
open bundle
वर्धी वृंद वाढ चालू असलेला (वर्धिष्णु, कार्यक्षम ऊतककर असलेला) वाहक ऊतकांचा संच closed bundle
open formation
विरल समावास वनस्पतींचा प्रसार ज्यामध्ये विखुरलेला (विरळ) असतो, असा विशिष्ट परिस्थितीतील समुदाय, उदा. पानझडी जंगल, खुरटी झाडी.
opercule
अपिधान १ शेवाळीतील बीजुकाशयाचे किंवा काही बीजी वनस्पतीतील करंडकरुप फळाचे टोपण उदा. घोळू, कुरडू. २ काही परागकणांवरील टोपण ३ निलगिरीच्या फुलावरील टोपण hue pyxis. operculum
Ophioglossales
अहिजिव्ह गण, ऑफिओग्लॉसेलीझ नेचे वर्गातील स्थूलबीजुककोशी उपवर्गातील (युस्पोरँजतिएटी) दोन्हीपैकी एक गण, दुसरा गण मॅरेटिएलीझ. या दोन्ही गणातील नेचे सापेक्षतः प्रारंभिक आहेत. अहिजिव्ह गणातील नेचांना पाते व देठ यांतून जननक्षम कणिशासारख्या शाखेवर जाड आवरणाचे बी
opium
अफू अफूच्या झाडावरील बोंडाला चऱ्या पाडून काढलेला व सुकविलेला चीक, मॉर्फिया हा त्यातील प्रमुख क्षाराभ (अल्कलॉइड) Papaveraceae
opposite
संमुख, समोरासमोर परस्परांच्या विरुद्ध बाजूस असलेले (अवयव, पाने) उदा. दसरी (colebrookia oppositifolia Sm.) deccussate, antipetalous
optimal
पर्यास एखाद्या कार्याच्या दृष्टीने किंवा अवयवाच्या दृष्टीने सर्वाधिक हिताचे (उदा. तपमान, प्रकाश इ.)
orbicular
गोलाकार चकतीसारखे सपाट व गोल (उदा. पान, फळ, बी इ.), कमळाचे पान, पारिजातक, वावळा व बिबला यांची शुष्क सपक्ष फळे orbiculate
Orchidaceae
आमर कुल, ऑर्किडेसी आकर्षकपणामुळे व कधी सुगंधामुळे परिचित (सुप्रसिद्ध) असलेल्या एकदलिकित वनस्पतींचे मोठे कुल, याचा अंतर्भाव आमर गणात (ऑर्किडेलीझ) हल्ली करतात. (पूर्वी मायक्रोस्पर्मी श्रेणीत). प्रमुख लक्षणे- बहुवर्षायु औषधी कधी अपिवनस्पती, द्विलिंगी, एकसमात्र, सम (किंवा विषम) परिदली, मंडलित, त्रिभागी व जटिल संरचनेची फुले, केसरदले एक किंवा दोन असून किंजलाशी जुळलेले (किंजकेसराक्ष), पराग पुंजामध्ये, तीन अधःस्थ किंजदलांच्या व एका कप्प्याच्या किंजपुटात अनेक सूक्ष्म बीजके, बोंडात अपुष्क बीजे. तीन किंजल्कापैकी एक रुद्ध. सालममिश्री हे एका आमराच्या फळापासून काढतात व काही खाद्य पदार्थात स्वादाकरिता घालतात. रुद्ध किंजल्काला चंचुक म्हणतात.
order
गण वर्गीकरण पद्धतीत अनेक कुलांच्या संचाला ही संज्ञा हल्ली वापरतात, उपवर्ग व वर्ग हे त्यापेक्षा मोठे गट असून जेव्हा एखाद्या गणात एकच गुल असते तेव्हा त्यांची लक्षणे समान असतात व त्यात एक किंवा अनेक वंश समाविष्ट करतात, उदा. आमरगण, तृणगण, गिंकोएलीझ, नीटेलीझ इ.
ordovician period
ओर्डाएव्हिसियन पीरीयड (कल्प) सुमारे ४९ कोटी ते ४४ कोटी वर्षापूर्वीचा भूशास्त्रीय कालखंड
organ
अवयव, अंग, इंद्रिय प्राणी किंवा वनस्पती यंआच्या शरीरातील निश्चित कार्यक्षम भाग उदा. पान, खोड, मूळ, फूल, फळ व बी इ. प्राण्यांत यकृत, प्लीहा, नेत्र, कर्ण, हृदय इ.
organic
कार्बनी, जैव, ऐंद्रिय सजीव इंद्रियासंबंधी, सजीवासंबंधी, सजीवांनी निर्मिलेल्या पदार्थासारखी संघटना असलेले o.evolution क्रमविकास, उत्क्रांति सर्व सजीव प्राचीन व साध्या सजीव द्रव्यापासून क्रमाने फरक पावून निर्माण होत आले आहेत अशी संकल्पना (सिद्धांत, उपपत्ति)
organism
जीव, सजीव ऐंद्रिय संरचना असलेले, भरण, पोषण, वर्धन, प्रजोत्पादन इत्यादी जैव प्रक्रिया दर्शविणारे, जीव असलेले
organogenesis
अवयव विकास, इंद्रियजनन इंद्रियंचा उगम, वाढ, प्रभेदन इत्यादी सर्व घटनांचा वृत्तांत organography
Orientale
पौर्वात्य पूर्व गोलार्धातील ह्या अर्थाची लॅटिन संज्ञा, गुणनामाकरिता उपयुक्त, उदा. एक नेचा (Blechnum orientale L.)
origin
उत्पत्ति, उगम एखाद्या सजीवाची जाती, वंश किंवा कुल इत्यादींची निर्मिती कोठून झाली, तसेच एखाद्या अवयवाची सुरवात कशी झाली यासंबंधीची माहिती, उदा. पानांचा उगम, फुलांचा उगम, फुलझाडांची उत्पत्ति इ.
ornithophilous
पक्षिपरागित पक्ष्यांकडून पराग ने आण करविणारे (फूल अगर वनस्पती), उदा. शाल्मली, पळस, कदंब, पांगारा इ.
orthogenesis
नियत (निर्धारित) विकास प्राणी वा वनस्पती यांच्या अनेक पिढ्यान् पिढ्या निश्चित दिशेने चालू असलेला (अंगभूत प्रवृत्तीमुळे क्रमाने घडून येणारा) बदल. त्यामध्ये प्रगति वा परागति अभिप्रेत असते. परिणामी व्यक्तीचे अवयव ऱ्हास पावतात किंवा विकासाप्रत जातात, कधी कधी अतिविस्तार तर कधी अतिसंक्षेप होतो व त्यामुळे ती व्यक्ती अगर जाती जीवनार्थ कलहात अयशस्वी होते. त्यामुळे नवीन जातींच्या निर्मितीस मदत होते, अशी विचारसरणी, पण ती सर्वमान्य नाही.
orthostichy
सरलपंक्ति खोडावरील पानांच्या सरळ उभ्या रांगा. उदा. पेरु व रुई यांच्या खोडावर चार तर आल्याच्या खोडावर दोन ओळी असतात. phyllotaxy.
orthotropous
ऊर्ध्वमुख किंजदलावर किंवा किंजपुटात सरळ स्थितीत वाढलेले (बीजक), यात बीजकरंध वरच्या टोकास व बीजकतल तळाशी (विरुद्ध टोकास) नाभीजवळ असते, बीजकाचा अक्ष सरळ असतो, उदा. सायकस, चुका इ.
oscillatory
आंदोलनी साधारणपणे घड्याळाच्या लंबकाप्रमाणे घडून येणारी (हालचाल) उदा. काही निळी हिरवी शैवले व काही तंतूसारखे सूक्ष्मजंतू
osmosis
तर्षण, परासरण पार्य पापुद्र्यातून होणारा दोन विद्रवांमधील पदार्थांच्या कणांचा (किंवा पाण्याचा) मंद प्रवेश (अभिसरण, विसरण) diffusion, permeable
ossified
अस्थिभूत, घनीभूत हाडाप्रमाणे कठीणपणा आणलेले, उदा. काही सप्ताळूसारख्या आठळीयुक्त फळाचे अंतःकवच
oval
लंबवर्तुळाकृति लांबट वर्तुळासारखे, उदा. शेवग्याचे दलक, सदाफुलीचे पान, तळाशी व टोकाकडे गोलसर व समांतर बाजू असलेले उदा. निळा गुलमोहर (Jacaranda ovalifolia R.Br.)
ovary
किंजपुट फुलातील किंजदलाच्या (स्त्री केसराच्या) तळाशी असेलला व बीजकांना (बीजांडांना) समाविष्ट करणारा फुगीर भाग (भावी फळ), उदा. सर्व फुलझआडे, बीजांडकोश व बीजकोश हे शब्दही वापरलेले आढळतात.
ovate
अंडाकृति, अंडाभ तळाशी रुंद गोलसर व टोकाकडे निमुळत, अंड्याच्या आकाराचे, उदा. गुलबुशचे पान, इसबगोल (Plantago ovata Forsk.) ovoid, oviform, egg-shaped
overlapping
परस्परव्यापी कलिकावस्थेत पुष्पदले अनेकदा विविधप्रकारे परस्परावर अंशतः झाकून असण्याचा प्रकार, imbricate, contorted.
ovule
बीजक, बीजांड बीजी वनस्पतीत आढळणारा बीजपूर्व अवयव, अबीजी वनस्पतीत (नेचाभ पादप) आढळणारा गुरुबीजुककोश व बीजक हे दोन्ही सारखेच (समजात) आहेत megasporangium
oxycanthous
कंटकयुक्त, काटेरी अनेक काटे असलेले (पान, खोड, फळ इ.) उदा. हॉथॉर्न (Crataegus oxycantha L.) याच्या फांद्यांचे रुपांतर काट्यांत झालेले असते.