वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा
There are currently 121 names in this directory beginning with the letter N.
naked
अनावृत, नग्न, प्रकट आवरण नसलेली (कोशिका, कलिका, बीजुके, गंतुके, पुष्पकलिका, बीज इ.) उदा. प्रकटबीज वनस्पती n.flower नग्नपुष्प परिदलहीन फूल उदा. वाळुंज कुल, गवते, अळू n. seeded प्रकटबीज, नग्नबीज, अनावृतबीजी बीजे किंजपुटात नसून उघडी असण्याचा प्रकार, उदा.
nannophanerophyte
लघु बीजी पादप दोन मीटरपेक्षा जास्त उंची नसलेले व भूपृष्ठावरील भागावर सुप्त कलिका असणारे बीजधारी झुडूप
nastic movement
अनुकुंचनी वलन चेतनेमुळे घडून येणारी पण तिच्या दिशेशी संबंध नसलेली हालचाल, दोन पृष्ठभाग असलेल्या अवयवांमध्ये सतत लांबीत वाढ होत असल्याने आपोआप वाकडेपणा आणणारी हालचाल (वळणे), यामुळे कळ्या प्रथम मिटलेल्या असून पुढे उघडतात, दरवेळी भिन्न पृष्ठभाग अधिक वाढतो
natural classificaiton
नैसर्गिक वर्गीकरण n.family नैसर्गिक कुल अनेक (क्वचित एकच) निकट संबंधित वनस्पतींच्या वंशांचा गट n. order नैसर्गिक गण अनेक (क्वचित एकच) निकटवर्ती कुलांचा गट classification
natural selection
नैसर्गिक निवड विशिष्ट परिस्थितीत, जगण्यास योग्य अशी निसर्गतः घडून येणारी प्रक्रिया, डार्विनच्या (इ.स.१८५९) तत्त्वाप्रमाणे सजीवातील जीवनार्थ स्पर्धेत यशस्वी होणाऱ्यांना जणु निसर्गानेच जगण्यास लायक ठरवले व ते जगले आणि इतर नाश पावले, अशा प्रकारची घटना.
naturalisation
स्वाभाविकीकरण परठिकाणाहून येऊन स्थानिक परिस्थितीशी (निसर्गाशी) समरस होऊन देशी किंवा स्थानिक सजीवाप्रमाणे स्थायी होण्याची प्रक्रिया, उदा. कित्येक तण (पिवळा धोत्रा, ओसाडी इ.)
naturalist
निसर्गवैज्ञानिक, निसर्गातील वनस्पती, प्राणी, खडक इत्यादींची विशेष माहिती संकलन करणारा तज्ञ
neck
ग्रीवा, मान १ खोड व मूळ यामधील सांधा २ पाते व आवरक यांमधील सांधा ३ पुष्पमुकुट व संवर्त यांच्या नलिकांचा आकुंचित भाग ४ गर्भकोस किंवा अंदुककलश यांचा लांबट भाग ५ काही कवकांच्या पलिघ धानीफलांची लांबवण n.canal cell ग्रीवा मार्ग कोशिका ग्रीवेतील पोकळी भरुन
necrosis
ऊतकक्षय, ऊतकनाश व्रणासारख्या रोगकारक घटनेमुळे जिवंत वनस्पतीच्या विशिष्ट स्थानातील कोशिकेचा किंवा ऊतकाचा नाश.
nectar
मधुरस, मकरंद बहुधा फुलात असलेला व कीटकाकरिता अथवा अथवा पक्ष्याकरिता आकर्षक अन्न असा गोड रस, हाच रस नंतर मध म्हणून उपलब्ध होतो. काही कवकसुद्धा असा रस बनवितात तो कीटकांकडून बीजुकांच्या प्रसाराकरिता असतो.
needle shaped
सूच्याकार सुईप्रमाणे लांबट निमुळते गोलाकार (चितीय) उदा. चीड (पाइन) चे पान, शतावरीच्या काही जातींच्या फांद्या cladode
negative
ऋऋण १ विरुद्ध, अभावदर्शक किंवा नकारात्मक उपसर्ग २ विद्युत आयनांपैकी एक प्रकार, उदा. ऋऋणभार n. geotropism ऋऋण गुरुत्वानुवर्तन गुरुत्वाकर्षणाच्या चेतनेविरुद्ध (वाढणे), उदा. खोड n. heliotropism ऋऋण प्रकाशानुवर्तन प्रकाशाच्या चेतनेविरुद्ध असलेल्या दिशेकडे
negative reaction
ऋण प्रतिक्रिया चेतना देणारा घटक (तपमान, ओलावा, प्रकाश इ.) अधिक प्रभावी (तीव्र) असेल तिकडून उलट बाजूकडे परतणे किंवा वाढणे अशी प्रक्रिया. taxism, tropism.
Neo Darwinism
नव डार्विनवाद क्रमविकासाने घडून येणाऱ्या जातींच्या निर्मितीसंबंधीच्या चार्लस् डार्विन यांच्या उपपत्तीवर घेतले गेलेले आक्षेप दूर करून, उत्परिवर्तनाचा आधार घेऊन. तसेच मेंडेल यांनी पुरस्कार केलेल्या उपपत्तीप्रमाणे अनुहरणांच्या नियमांचा विचार करून, डार्विनच्य
Neo Lamarckism
नव लामार्क वाद लामार्क या शास्त्रज्ञाच्या अनुयायांनी त्याच्या मूळच्या सिद्धांताल आधारभूत म्हणून मांडलेले नवीन स्पष्टीकरण, संपादित लक्षणांच्या अनुहरणास प्रायोगिक पुरावा नाही ह्या वाइझमान यांच्या हरकतीमुळे लामार्क यांची नवजाति निर्मितीला आधार देणारी मूळची उ
neo-
नव- नवीन या अर्थाचा ग्रीक उपसर्ग n. plasm १ नवोतक २ अर्बुद १ नवीन बनलेला कोशिका समूह (ऊतक) २ पहा tumor. n. type नवप्ररुप, नीओटाइप वनस्पतीच्या नमुन्याचा कोणताही भाग उपलब्ध नसल्यास नामकरणाकरिता निवडलेला प्रातिनिधिक नमुना.
neobiogenesis
नवजीवजनन पृथ्वीवर आरंभी एकदाच (अपघाताने) जीवोत्पत्ति होऊन जीवपरंपरा सुरू झाली या उपपत्तींशिवाय त्यानंतर ती पुन्हा झाली असावी किंवा अनेकदा होत गेली असावी असा एक विचार
Nepenthaceae
घटपर्णी कुल, नेपॅथेसी चंबू, कलश, घट, कुंभ यांसारख्या रुपांतरित पानांच्या कीटकभक्षक व द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा अंतर्भाव सॅरासेनिएलिझ ह्या कीटकभक्षक वनस्पतींच्या गणात करतात. carnivorous plants, Sarraceniales. Pitcher plants
nerve
१ सिरा, शीर २ चेतनी, ज्ञानतंतू १ साधी किंवा शाखायुक्त (पानातील) शीर २ सजीवांच्या परिस्थितीचे ज्ञान त्यांना देणारा व प्रतिसाद करु देणारा तंतू
nerve cell
चेतापेशी, चेतनक, चैतन कोशिका, चेताघटक ज्ञानग्रहण व संदेशदान यामध्ये विशेषत्व प्राप्त झालेली शरीरातील संवेदनाशील कोशिका (पेशी, सूक्ष्म घटक) neurone
nerve fibre
तंत्रिका तंतु, ज्ञानतंतु, चैतनतंतु, चेतातंतु परिस्थितीची जाणीव करून देण्यास व आवश्यक हालचाली करण्यास चेतना (प्रेरणा) देणारा धाग्यासारखा चेतापेशीचा (प्रेरक शरीर घटकाचा) भाग nerve.
nervous system
तंत्रिका व्यूह (तंत्र), चैतन्यव्यूह सजीवास बाह्य परिस्थितीचे ज्ञान करून देणारी संरचना (कोशिका, तंतू, जीवद्रव्य इ.)
neuter flower
क्लीब लिंगहीन पुष्प नपुंसक फूल, कार्यक्षम केसरदले किंवा किंजदले नसलेले फूल, उदा. अळूच्या फुलोऱ्यातील काही फुले, सूर्यफुलाच्या स्तबकातील किरण पुष्पके neutral
neutralisation
उदासिनीकरण अल्कधर्मी पदार्थाने (रसायनाने) अम्लधर्मी पदार्थांचे गुण नाहीसे करण्याची विक्रिया
neutriflorus
लिंगहीन (निर्लिंग) पुष्पी नपुंसक फुले असलेले, उदा. सूर्यफुलाच्या कुलातील किरण पुष्पके नपुंसक असलेल्या काही जाती.
niche
निवासस्थान, कोनाडा, देवळी नैसर्गिक समुदायातील एखाद्या सजीवाचा दर्जा किंवा त्याचा जैव व पोषणविषयक आप्तभाव दर्शविणारी संज्ञा, ज्या विशिष्ट परिस्थितीत एखादी जाती पूर्णपणे समरस होऊन यशस्वीपणे जगते ते सूक्ष्मस्थान किंवा त्या निवासातील भूमिका.
Nidulariaceae
नॅडिकवक कुल, निड्युलॅरिएसी सत्यकवकापैकी गदाकवक वर्गातील (भूकंदुक गणातील) एक लहान कुल, ह्यातील सर्व वनस्पती शवोपजीवी असून शरीर पक्ष्याच्या (पेल्यासारखे) घरट्यासारखे असते. Basidiomycetes, Eubasidii, Lycoperdales.
niger
काळे, कृष्णवर्णी, कारळा उदा. कांगणीचे फळ (Solanum nigrum L.), कारळा (कार्तिल) Guizotia abyssinica Cass)
night position
निशास्थिती रात्री अंधारात काही वनस्पतींच्या (शिंबीकुलातील) पानांची सैल लोंबणारी (निमिलीत) स्थिती, तसेच काही फुले (कमळ) रात्री बंद राहण्याची रीत nyctinasty
nigricant
कृष्णवर्णी काही कालानंतर काळे होणारे उदा. फड्या निवडुंग (Opuntia nigricans Haw.), Ixora nigricans, राई (Brassica nigra koch.) nigricans
nitrification
नायट्रीकरण जमिनीतील सूक्ष्मजंतू, कवक इत्यादींच्या साहाय्याने वनस्पती व प्राणी यांच्या मृत अवशेषांचे रुपांतर प्रथम अमोनियात व नंतर नायट्रेटयुक्त लवणात होण्याची प्रक्रिया, ही लवणे वनस्पती पुन्हा शोषून घेतात किंवा त्यातील काही भाग अन्य सूक्ष्मजंतूमुळे नायट्रोजनहीन बनून (विनायट्रीकरण denitrifying) तो वायू हवेत मिसळून जातो.
nitrogen fixation
नत्र (नायट्रोजन) स्थिरीकरण, नत्र स्थिरण अननिल (हवेशिवाय जगणारे) सूक्ष्मजंतुद्वारे किंवा काही नील हरित शैवलांकडून स्वतंत्रपणे अथवा मुळातील सहजीवी सूक्ष्मजंतूद्वारे केले जाणारे हवेतील नायट्रोजन वायूचे संस्थापन (कार्बनी नायट्रोजन संयुग निर्मिती) याचा इतर वनस्पतींसही अन्नघटक म्हणून उपयोग होतो कारण जमीन नायट्रोजनसंपन्न होते.
noctural
१ नैश २ रात्रिंचर १ रात्रीसंबंधी, रात्री घडून येणारे २ रात्री संचार करणारे (निशाचर) n.movement नैश चलन वलन रात्रीमुळे घडून येणारी हालचाल, पाना फुलांची उघडझाप
node
पेरे, पर्व खोडावर जेथून एक किंवा अनेक पाने, बगलेतील कळ्या व कधी मुळ्या निघतात तो दोन कांड्यांमधील भाग
nodule
गंड, ग्रंथि, ग्रंथिका, गाठ लहान गाठ, काही शिंबी वनस्पतींच्या मुळावर सूक्ष्मजंतुयुक्त गाठी असतात.
nomen
नाम नाव या अर्थाची लॅटिन संज्ञा. n. ambiguum बहवार्थी नाम अनेक अर्थ असलेले नाव. n. conservandum अधिकृत (निर्णायक) नाम आंतरराष्ट्रीय वनस्पतिशास्त्रीय काँग्रेसने मान्यता दिलेले नाव. n. dubium संदेह नाम अनिश्चित अर्थाचे नाव. n. nudum नग्न नाम अधिकृत
nomenclature
१ नामपद्धति २ नामकरण १ प्राणी किंवा वनस्पतींच्या वर्गीकरणात शास्त्रीय नाव देण्याची पद्धत किंवा २ प्रत्यक्ष नाव देणे, Binomial nomenclature
non essential organ
साहाय्यक (अनावश्यक) अवयव प्रत्यक्ष बीजोत्पत्तीकरिता केसरदले व किंजदले आवश्यक असल्याने इतर पुष्पदलांना (संदले व प्रदले) ही संज्ञा वापरतात. incomplete flower.
normal
नियमित, सामान्य, नित्य संरचनेच्या संदर्भात, नित्याप्रमाणे असलेली, परिस्थितीच्या दृष्टीने, सामान्य असलेली
nucellus
प्रदेह, बीजांडकाय बीजकातील गाभा, यातच गर्भकोशिका (गुरुबीजुक) असते. बीजकाभोवती एक किंवा दोन आवरणे असतात. ovule
nuciferous
कपाली धारक कठीण कवचाचे फळ असणारे (झाड), उदा. ओक, नारळाचे (Cocos nucifera L.) आतील कवचधारी भागाला उद्देशून जातीवाचक नाव दिले आहे. पण नारळाचे फळ अश्मगर्भी आहे. nut
nuclear
प्रकलीय प्रकलासंबंधी, प्रकलातील n.disc प्रकलबिम्ब, केंद्रकी बिम्ब कोशिका विभाजनात प्रकलातील सर्व रंगसूत्रांच्या जोड्या बनून त्यांची कोशिकेच्या मध्यास बनलेली तबकडीसारखी आकृती (मध्यावस्था) n. division प्रकल विभाजन प्रकलाची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विभागणी
nucleic
प्रकली, न्यूक्लीइक प्रकलातील, प्रकलासंबंधी n.acid प्रकली अम्ल, केंद्रकाम्ल अनेक न्यूक्लिओटाइडांच्या संयोजनाने बनलेली लांब साखळीची संयुगे (डीएनए, आरएनए), पहा nucleotide
nucleolus
प्रकलक, केंद्रिका प्रकलातील घनबिंदू, यामध्ये रिबोज प्रकल प्रथिने असतात. प्रकल विभाजनात प्रकलक लुप्त होतो व पुढे रंगसूत्रातील काही भागापासून पुन्हा आकार घेतो.
nucleotide
न्यूक्लिओटाइड पाच कार्बन अणूंची एक शर्करा (रिबोज), फास्फॉरिक अम्ल व नायट्रोजनयुक्त क्षारक (प्सूरिन किंवा पिरॅमिडीन) यांच्या प्रत्येकी एक रेणूंचा बनलेला रासायनिक संयुग, यापासून डी ऑक्सीरिबोज न्यूक्लीइक अम्ल (डीएनए) व रिबोजन्यूक्लीइक अम्ल (आरएनए) बनतात, डीए
nucleus
प्रकल, केंद्रक सजीव प्राकलातील अत्यंत जटिल प्रथिनयुक्त व संघटित सूक्ष्म काय, हा कोशिकेतील सर्व जीव प्रक्रियांना जबाबदार असून कोशिका विभाजनात विशेष क्रियाशील असतो. अनुवंशिक लक्षणांच्या अनुहरणास जबाबदार असलेले घटक (रंगसूत्रे व जनुके) त्यातच सामावलेले असतात.
nuculanium
द्राक्षाभ लिंडले याच्या मताप्रमाणे ऊर्ध्वस्थ व द्राक्षासारखे पण कठीण बियांच फळ (मृदुफळ), उदा. निंब, करवंद, खजूर, द्राक्ष इ. nuculane
nudicaulous
नग्नस्तंभी, नग्नक्षोड खवले, पाने नसलेल्या खोडाची (वनस्पती), उदा. नेपती, सोमलता, नांग्या, शेर इ.
nulliplex
अघटक आईबापापासून विशिष्ट लक्षणांबद्दल जबाबदार असलेल्या प्रभावी जनुकाचा संततीत अभाव, त्यामुळे संततीत फक्त अप्रभावी (अप्रकट) जनुक असते व त्यामुळे पूर्वी सुप्त (अप्रकट) असलेला गुण दिसतो. duplex, simplex
nursery garden
पन्हेरी बाग वाफ्यात किंवा बागेत नियोजित ठिकाणी लावण्यापूर्वी रोपे तयार करण्याची नियंत्रित जागा.
nut
कपाली, कवची फळ एकापेक्षा अधिक किंजदलापासून बनलेल्या संयुक्त किंजपुटापासून पक्क झालेले, शुष्क, कठीण कवचाचे (फलावरणाचे) पण न तडकणारे एकबीजी फळ, उदा. काजू, हॅझेट नट, ओक (वंजूफल), हीच इंग्रजी संज्ञा अश्मगर्मी फळातील कठीण आवरणाच्या (अंतःकवच) बियांस वापरतात. उद
nutation
प्रच्यवन १ खोड, फांदी इ. अवयवांच्या टोकांची वेढे देत जाणारी सर्पिल अथवा एका बाजूकडून दुसरीकडे होणारी वाढ, विभाजी भागांतील (टोकातील) वाढीच्या दिशेत व प्रमाणात होणाऱ्या सतत बदलामुळे होणारी घटना २ वाढ होत असलेल्या अवयवाच्या टोकाचे बाजूकडे झुकणे, यामुळे ते टो
nutlet
कपालिका पक्वावसथेत फुटणाऱ्या शुष्क एकबीजी भाग (फुलांश) उदा. तुलसी कुलातील व मोथा कुलातील वनस्पतीतील एकबीजी फळ किंवा फळाचा भाग
nutrition
पोषण योग्य अन्न व पाणी घेऊन व शरीरातील चयापचयाच्या क्रिया चालू ठेवून ऊर्जेची निर्मिती करणे, झीज भरून काढणे व वाढ होण्यास साहाय्य करणे ही प्रक्रिया nutriment
nutritive symbiosis
पोषक सहजीवन दोन सजीवांचे परस्परपोषणाच्या तत्त्वावर एकत्र असण्याचा प्रकार, या दोन्हीपैकी कधी एक वाढतो व दुसरा नाश पावतो (जीवोपजीव), तर कधी परस्परास पूरक अशी अन्न घटकांची देवघेव होते (दगडफूल) parasitism, Lichen, carnivorous plants.
Nyctaginaceae
पुनर्नवा कुल, निक्टॉजिनेसी गुलबुश, पुनर्नवा, वसू, बुगनवेली इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे लहान कुल. याचा अंतर्भाव एंग्लर व प्रँटल यांनी सेंट्रोस्पर्मी या गणात तर बेसींनी पाटलपुष्प गणात (कार्याएफायलेलीझमध्ये) व हचिन्सन यांनी रामेठा गणात (थायमेलेलीझमध्ये) केला आहे. प्रमुख लक्षणे- बहुधा औषधीय, कधी काष्ठयुक्त झाडे, झुडपे, वेली, पाने साधी, समोरासमोर, नियमित, द्विलिंगी, एकलिंगी, सच्छद फुले, परिदले पाच व जुळलेली आणि पाकळ्यासारखी असून खालचा भाग फळाभोवती कायम चिकटून राहतो. केसरदले बहुधा पाच तथापि कधी (१-३०) आणि एका ऊर्ध्वस्थ किंजदलाच्या किंजपुटात एक कप्पा व त्यात एक बीजक, शुष्क फळ, एकबीजी, न तडकणारे आणि बीजात परिपुष्क
nyctanthous
१ नक्तपुष्पी २ निशाविकासी १ रात्री उमलणाऱ्या फुलांची (वनस्पती), उदा. पारिजातक (Nyctanthas arbor- tristis L.) रातराणी (Cestrum nocturnum L.) २ रात्री उमलणारी फुले
nyctinasty
निशानुकुंचन काही वनस्पतींत (उदा. शिंबी कुल), प्रकाशाच्या अभावामुळे त्यांच्या काही अवयवांच्या कोशिकांतील पाण्याच्या प्रमाणात बदल होऊन ते अवयव खाली, बाजूस किंवा वर वळण्याचा प्रकार उदा. पानांची दले, दलके किंवा फुलांच्या पाकळ्या मिटणे. दिवसा प्रकाश तीव्र झाल्यास अशा क्रिया घडून येतात त्याला आन्हिक निद्रा (दिवा निद्रा- diurnal sleep) वलन म्हणतात. प्रकाशाचा प्रभाव नाहीसा झाल्यावर पुन्हा पूर्ववत स्थिती प्राप्त होते.
Nymphoeaceae
कमल कुल, निम्फिएसी कमळे, महापद्म इत्यादींचे द्विदलिकित फुलझाडांचे कुल. याचा अंतर्भाव मोरवेल गणात (रॅनेलीझमध्ये) केला जातो. प्रमुख लक्षणे- पाण्यात किंवा दलदलीत वाढणाऱ्या औषधीय वनस्पती, तरंगणारी किंवा बुडून राहणारी पाने, मोठी आकर्षक, नियमित, द्विलिंगी, एकाकी, फुले, देठ पोकळ, परिदले सहा ते अनेक, सुटी, केसरदले सुटी सहा ते अनेक, किंजदले सुटी किंवा जुळलेली, तीन ते अनेक, ऊर्ध्वस्थ किंवा अधःस्थ, मृदुफळातील बियांना बीजोपांग बहुधा असते., पुष्क व परिपुष्क कधी कधी असते. नीलंबियम, निंफिया, केंबोम्बा, नूफर, यूरेल, व्हिक्टोरिया इत्यादी वंशनामे आहेत. हल्ली कॅबोम्बेसी, निलंबिएसी व निम्फिएसी अशी तीन कुले केली आहेत.