वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
There are currently 34 names in this directory beginning with the letter K.
K
के K पुष्पसूत्रात संवर्ताबद्दल वापरलेले अक्षर floral formula calyx

Karyo-
प्रकल कोशिकेतील नियंत्रक बिंदू (भाग), या अर्थी उपसर्ग

karyogamete
गंतुक प्रकल प्रजोत्पादक कोशिकेतील प्रकल nucleus

karyogamy
प्रकलयुति दोन प्रकलांचा (विशेषतः गंतुकातील प्रकलांचा) संयोग

karyokinesis
प्रकल विभाजन एका (द्विगुणित) कोशिकेची दोन कोशिकात समविभागणी होते वेळी त्यातील प्रकलांत होणारे अनेक बदल व त्यानंतर त्यांची सारख्याच घटकात विभागणी mitosis

karyology
प्रकलविज्ञान प्रकलासंबंधी सर्व अधिकृत ज्ञान

karyolymph
प्रकलमातृक प्रकलातील जालकात असलेले आधारद्रव्य

karyolysis
प्रकल विलयन प्रकलाचे अंशतः अगर पूर्णतः कोशिकेतील द्रव्यात रुपांतर

karyoplasm
प्रकलद्रव, प्रकलरस nucleoplasm

karyoplast
प्रकल nucleus

karyosome
१ प्रकलकणसमूह २ प्रकल ३ रंगसूत्र ४ प्रकलक १ प्रकलातील अनेक घन व सूक्ष्मकणांचा पुंजका २ पहा nucleus ३ पहा chromosome ४ प्रकलातील (स्थिर अवस्थेत) एक विशिष्ट बिंदूसारखे कोशिकांगक nucleolus

karyotype
सूत्रसमूहचित्र निकट संबंध असलेल्या वनस्पतींच्या गटातील शरीराच्या कोशिकेतील रंगसूत्रांचे आकार, आकारमान, संख्या इत्यादी दर्शविणारा आकृतिबंध (चित्र)

katabolism
अपचय शरीरातील अन्न अथवा तत्सम जटिल पदार्थ यांचे साध्या पदार्थात रुपांतर करण्याची विध्वंसक प्रक्रिया, यामध्ये ऊर्जेचे उत्पादन होऊन ती उपयोगात येते. ऊर्जा व कार्बन डायॉक्साइड साखरेच्या रुपांतराने मिळतात.

katabolite
अपचयज अपचयात निर्माण झालेले पदार्थ उदा. वायू, पाणी

katalase
कॅटॅलेज तंबाखुच्या ताज्या पानात आढळणारे वितंचक

keel
१ प्रदलांजली २ नौकातल, कटक, आढे, कणा १ नावेप्रमाणे किंवा ओंजळीसारख्या आकाराची फुलातील जोड पाकळी (उदा. वाटाणा, अगस्ता) २ नावेच्या तळाशी असलेली व पाण्यात बुडलेली ऊभी कोर, संदलावर, तुसावर किंवा पाकळीवर बाहेरील बाजूस असलेली तशी कोर किंवा तसा कटक carina

keeled
१ नौकातलित, कटकित २ प्रदलांजलित १ नौकातलाप्रमाणे कटक असलेले २ नावेप्रमाणे आकृती असलेले carinate

kelp
बृहत् शैवल समुद्रातील मोठ्या आकाराच्या शैवलांचे सामान्य नाव, उदा लॅमिनेरिया, मॅक्रोसिस्टिस इ.

kernel
गाभा आठळीफळातील अंतः कवचाने वेढलेला आतील भाग (बी)उदा. नारळातील खोबरे, बदाम बी nut

kernel
गाभा आठळीफळातील अंतः कवचाने वेढलेला आतील भाग (बी)उदा. नारळातील खोबरे, बदाम बी nut

ketone
केटोन उडून जाणाऱ्या (बाष्पनशील) एका तेलाचे नाव उदा. कापूर

key
१ किल्ली, उकल २ किल्ली फळ १ वंश, जाती, कुल इत्यादीसंबंधी वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये उपयोगात आणलेल्या वैकल्पिक गुणांची किल्लीच्या आकाराची संक्षिप्त जंत्री, हिच्या साहाय्याने एखाद्या वनस्पतीचे वर्गीकरणातील स्थान निश्चित करता येते. २ सपक्ष फळ उदा. सिकॅमूर, ऍश

kidney shaped
वृक्काकृति मूत्रपिंडाच्या (किंवा काजूफळाच्या आकाराचे), लंबगोल व एका बाजूस मध्ये खाच असलेले, उदा. बाम्हीचे पान (reniform)

kind
प्रकार सामान्यपणे निश्चित लक्षणांमुळे ओळखता येणाऱ्या एखाद्या वनस्पतींच्या जातीतील वा उपजातीतील भेदयुक्त वनस्पती उदा. द्राक्षातील भिन्न प्रकार, गुलाबातील प्रकार इ.

kinesis
हालचाल, गति, बदल कोशिकेतील जीवद्रव्य व त्यातील कमी अधिक सूक्ष्म पदार्थ यांच्या हालचाली, स्थलांतर इत्यादी क्रिया

kinetic energy
गतिज ऊर्जा वस्तूला गति मिळणारी अथवा हालचाल करण्यास उपयुक्त अशी कार्यान्वित झालेली शक्ति

kinetochore
तर्कयुज रंगसूत्राची हालचाल दिग्दर्शित करणारा व वैशिष्ट्य पावलेला, त्यातील भाग centromere.

kingdom
कोटी सजीवांच्या वर्गीकरणात प्राणी किंवा वनस्पती यांपैकी कोणत्याही एका प्रकारच्या व्यक्तींचा सर्वात मोठा संच दर्शविणारी संज्ञा

kino
विखदिर पाण्यात विरघळणारा, स्तंभक, औषधोपयोगी, राळेसारखा पदार्थ, कातडी कमाविण्यासही उपयुक्त, पळस, निलगिरी, बिबळा इत्यादींत आढळतो. k. plasm सूत्रकल कोशिकेतील जीवद्रवाच्या विभागणीमध्ये त्यातील तर्कूच्या सूत्रात रुपांतर होणारा भाग. k. spore चरबीजुक समविभाजनाने

knee
जानु, गुडघा १ खोडावर अचानक गुडघ्याप्रमाणे आलेला बाक २ काही झाडांच्या मुळापासून जमिनीवर झालेली वाढ, हिचा उपयोग हवा शोषून घेण्यास होतो. उदा. तिवार

knob
गुंडी, गुळुंब बारीक दांड्याचे गोलाकृती टोक

knot
ग्रंथि, गाठ खोडावरचा फुगीर उंचवटा, अगर पेरे, गांठीसारखे खोड (उदा. बटाटा, कारंदा इ.) tuber

knotted
ग्रंथिल, गाठाळ गाठी असलेले (खोड, मूळ इ. अवयव) knotty

kolla-plankton
श्लेष्मप्लवक बुळबुळीत पदार्थाने वेढलेला व तरंगणारा जीवसमूह उदा. काही निळी हिरवी शैवले.