वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
There are currently 23 names in this directory beginning with the letter J.
jacket
वेष्टन अंदुककलश व बीजुकाशय यासारख्या अवयवांभोवती आच्छादन करणारा कोशिकांचा थर.

jacket initial
आद्यवेष्टी (कोशिका) जिच्यापासून पुढे रेतुकाशयाचे आवरण बनते, अशी प्रारंभिक कोशिका

jacket layer
वेष्टनस्तर रेतुके निर्माण करणाऱ्या कोशिकाभोवती असलेला प्रारंभिक संरक्षक थर

jaculator
उत्क्षेपक, अंकुशाभ काही फळातील बीजकाधानीवरचा बीज सुटून फेकणारा आकड्यासारखा भाग (उपांग), उदा. वासक कुलातील वनस्पती Acanthaceae  a darter

Jasmine
जॅस्मिन जॅस्मिनम या शास्त्रीय वंशनावो ओळखल्या जाणाऱ्या वेली उदा. चमेली, जाई, जुई, मोगरा इ.

jel
जेल पाण्यात न विरघळता निलंबित अवस्थेत राहिलेली सूक्ष्म घनकणांची अवस्था. विरघळलेली (विलीन) अवस्था ही विद्रवी अथवा सोल (sol)

jelly
जेली, अवलेह, थलथली वर वर्णन केल्याप्रमाणे असलेला पदार्थ, उदा. काही फळांचा किंवा वनस्पतींच्या इतर भागांचा किंवा काही समुद्र शैवलांचा उपयोग करून उदा. (अगार) बनविलेला पदार्थ, जेलीतील पाण्याचा अंश कमी होत जाऊन ती घट्ट बनत जाते, फुड जेली, आइस्क्रीम जेली, औषधी अवलेह इ. थलथलीत पदार्थ

Jelly fungi
अवलेह कवक गण, जेली फंजाय थलथलीत शरीर असलेले कवक, सत्यकवक उपवर्गात यांचा समावेश होतो Eubasidii  Tremellales

joint
संधि, पर्व सांधा, पेरे, दोन स्वतंत्र अवयवांना जोडणारा भाग. रेषा, कंगोरा किंवा फुगीरपणामुळे हा ओळखू येतो.

jointed
संधियुक्त, पर्वयुक्त पेरेदार, पेरी किंवा संधी स्पष्ट असणारा, उदा. ऊस, बांबू इत्यादींची खोडे, एक्किसीटम, कारा शैवल articulated

Juglandaceae
अक्षोट (अक्रोड) कुल, जुग्लँडेसी ह्या द्विदलिकित वनस्पतींच्या लहान कुलाचा अंतर्भाव अक्षोट गणात (जुग्लँडेलीझ) केला जातो, नतकणिशे (लोंबते कणिश फुलोरे) धारण करणाऱ्या वनस्पतींच्या गणात (ऍमेंटिफेरी) पूर्वी समावेश असे, परंतु त्यातील इतर कुलातील वनस्पतींची लक्षणे प्रारंभिक की ऱ्हसित हे विवाद्य आहे. प्रमुख लक्षणे- वृक्ष, एकाआड एक सोपपर्ण पाने, स्वतंत्र फुलोऱ्यावर दोन प्रकारची एकलिंगी फुले, परिदले ४ किंवा ५, नर फुलात ३-४० केसरदले, स्त्री फुलात दोन अधःस्थ जुळलेल्या किंजदलांचा, एक कप्प्याचा व एकच बीजक असलेला किंजपुट, तलयुती (जुग्लॅन्स वंशात), वायुपरागण, कपाली किंवा आठळी फळ, अपुष्क बी.

jugum
जोडी, युगुल उदा. अंजनाचे दोन दलांचे संयुक्त पान, कोशिकेच्या प्रकलातील रंगसूत्रांची जोडी

juice
रस वनस्पतींच्या भिन्न अवयवात साठविलेला व सहज दाबाने निघणारा किंवा जखमेतून वाहणारा पातळ पदार्थ, चीक या नावाने असणाऱ्या पदार्थाची सामान्य संज्ञा, तथापि त्याहून काही अंशी भिन्न, उदा. उसाचा रस हा चीक नव्हे परंतु केळीच्या खोडातून येणारा रस हा चीक असतो latex

juicy
रसाळ रसयुक्त अवयव किंवा उपांग, उदा. संत्री, काकडी, डाळिंबे, द्राक्षे ही रसाळ फळे, उसाचे खोड व कोरफडीचे पान हे रसाळ अवयव होत.

juliform
नतकणिशाभ लोंबत्या कणिशाप्रमाणे, उदा. शमी (Prosopis juliflora DC) amentum, catkin

Juncaceae
प्रनड कुल, जुन्केसी जुन्कस (प्रनड), लुझुला इत्यादी शास्त्रीय नावाच्या वंशांतील वनस्पतींचे एकदलिकित कुल, याचा समावेश एंग्लर व प्रँटल यांनी पलांडु गणात (लिलिफ्लोरी) केला असून याचे पलांडु कुलाशी (लिलिएसी) आप्तभाव व अनेक बाबतीत साम्य आहे. हचिन्सन यांनी प्रनड गणात (जुन्केलीझमध्ये) अंतर्भाव केला आहे. इंग्रजीत ह्यातील वनस्पतींना रशेस (Rushes) म्हणतात. प्रमुख लक्षणे- गवतासारख्या व दलदलीत वाढणाऱ्या वनस्पती, द्विलिंगी, त्रिभागी, वायुपरागित फुले, खवल्यासारखी हिरवट परिदले, परागकणांचे चौकडे, तीन लांबट किंजल्क व त्यावर पुरळ, एक किंवा तीन कप्प्यांचा ऊर्ध्वस्थ किंजपुट, सपुष्क बियांचे बोंड

jungle
जंगल भारतातील दाट झाडी पण वॉर्मिंग यांच्या मते रुक्ष वनासारखी भरपूर गवते असलेली, झुडुपे अधिक असल्यास खुरटे जंगल, भरपूर पाऊस असल्यास वृक्ष अधिक व दाट (गर्दीने) वाढल्यास घन जंगल म्हणतात.

Jurassic period
जुरासिक पीरीयड (कल्प) सुमारे १८ ते १५ कोटी वर्षापूर्वीचा प्राचीन भूवैज्ञानिक कालखंड, फान्स आणि स्वित्झर्लंड यांमधील ज्यूरा पर्वतांच्या नावावरुन बनविलेली संज्ञा.

jute
ज्यूट, ताग, पाट ताग (Corchorus capsularis L. व C.Olitorius L.) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतींतील धागे, सुतळी व पोती बनविण्यास वापरतात.

juvenile
नवजात काही वनस्पतींचा अथवा त्यांच्या अवयवांची आरंभीची अवस्था, काहींत हे पहिले स्वरुप नंतर बदलते, विशेषतः आरंभीची पाने (बालपर्णे) व नंतरची पाने यात फरक आढळतो, उदा. नेफोलेपिस नेचा, निंब, चीड (चिल Pinus longifolia Roxb.)

juvenile leaf
बालपर्ण आरंभी येणारे पान, कित्येक संयुक्त पाने प्रथम साधी असून काही अंशतः विभागलेल्या पानांची पाती प्रथम तशी नसून अखंड किंवा फारच कमी विभागलेली असतात.

juvenile stage
बाल्यावस्था एखाद्या वनस्पतीचे नित्य शरीर ज्यापासून वाढते ते प्रारंभिक विशिष्ट शरीर (अवस्था), उदा. काही शैवले (कांड शरीरिका, काही लाल शैवले) characeae, Rhodophyceae.

juxtaposition
निकटस्थिती, सान्निध्य अवयवांचे परस्पराशी संबंधित असलेले स्थान अथवा निकटपणा