वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा
There are currently 145 names in this directory beginning with the letter I.
identical
समरुप, समान सर्व दृष्टीने सारखे, उदा. व्यक्ती, अवयव, अपत्य i. twins समान (समरुप) जुळी एकाच फलित अंड्यापासून बनलेली दोन सारखी अपत्ये, दोन स्वतंत्र अंड्यापासून बनलेल्या दोन सारख्या अपत्यांना सहजात (fraternal twins) म्हणतात.
identification (of plant or parts)
अभिज्ञान वनस्पतीचे अथवा तिच्या अवयवांचे इतर वनस्पतीशी विरोध अथवा साम्य निश्चित करून ती ओळखणे, वर्गीकरणातील स्थान समजून घेणे i.idea (-ideus)- सम साम्यदर्शक प्रत्यय, उदा. पाकळीसारखे (प्रदलसम) petaloideus, ऑलिव्हसारखे (oleoides), ऑर्किडसारखे (orchioides) इ.
idioblast
विषम कोशिका, भिन्न कोशिका ऊतकातील इतर कोशिकांपेक्षा भिन्न अशी एखादी कोशिका, उदा. कमळाच्या पानाच्या किंवा फुलाच्या देठातील ऊतकात आढळणाऱ्या तारकाकृति कोशिका, अशा काही कोशिकात टाकाऊ पदार्थ (राळ, टॅनिन, स्फटिक इ.) असतात, stellate cell
illegitimate name
अवैध नाम आंतरराष्ट्रीय संकेत व नियम यांनी मान्य न केलेले प्राणी व वनस्पतीचे शास्त्रीय नाव.
imbibe
विचोषण करणे, अंतःशोषण करणे शोषून घेऊन संचय करून ठेवणे, उदा. बीजाची साल पाण्याशी संपर्क होताच ते शोषून घेऊन धरुन ठेवते, सुके लाकूड, कोशिकावरण किंवा कोशिकांतर्गत द्रव्य पाणी शोषून फुगते.
imbricate
परिहित १ छपरावरील कौलाप्रमाणे एकावर दुसरे अंशतः असलेली (पुष्पदले) २ कळीमध्ये विशिष्ट पुष्पदलांच्या (पाकळ्यांच्या) मांडणीत काही दले वर वर्णिल्याप्रमाणे तर इतर एखाद्या दलाच्या दोन्ही कडाजवळच्या दोन दलांनी अंशतः झाकलेल्या व दुसऱ्याच्या दोन्ही कडा पूर्णतः बाह
immersed (plunged)
निमज्जित बुडलेले, पाण्याच्या किंवा पानाच्या पृष्ठभागाखाली राहिलेले, असलेले अथवा वाढलेले
immutability
अपरिवर्त्यता सजीवांची वर वर्णन केलेली, न बदलण्याची प्रवृत्ति (एक जुनी गैर समजूत). fixity
impermeable
अपार्य द्रवरुप, वायुरुप अथवा घनरुप पदार्थ आरपार सूक्ष्म गतीने (विसरणाने) जाऊ न देणारा (पडदा) diffusion, osmosis
impervious
अप्रवेश्य छिद्रांच्या अभावी आरपार जाऊ न देणारा, उदा. मेणाच्या लेपामुळे, उपत्वचेमुळे किंवा वल्कामुळे पाणा आतबाहेर जाऊ देणारा (पानाचा अथवा इतर अवयवांचा पृष्ठभाग) cuticle, bark
impregnating tube
फलन नलिका दोन विरुद्धलिंगी प्रजोत्पादक कोशिकांच्या संयोगाचे वेळी रेतुकाशयापासून वाढलेला नळीसारखा अवयव, उदा. पिथिमय कवक
impression
मुद्रा, ठसा मऊ चिखलावर वनस्पतीच्या अवयवाचा ठसा उमटून तो पुढे कठीण दगड झाल्याने बनलेला जीवाश्म (एक प्रकारचा शिलारुप अवशेष) fossil i.fossil जीवाश्म मुद्रा वनस्पतीचा, प्राण्याचा किंवा त्यांच्या अवयवांचा ठसा दर्शविणारा दगडाचा तुकडा
inae
वनस्पतींच्या वर्गीकरणात वंशाच्या वरच्या दर्जाच्या गटाचे शास्त्रीय नाव हा प्रत्यय लावून दर्शवितात. उदा. Rosinae (Rose हे वंशाचे नाव), येथे वरच्या दर्जाचा गट म्हणजे subtribe. पूर्वी वर्गाकरिता हा प्रत्यय वापरीत.
inanimate
निर्जिव, जड, अचेतन जीवनव्यापार अथवा सजीवात आढळणारी क्रियाशीलता न दर्शविणारे, कसल्याही चेतनेला प्रतिक्रिया न करणारे
inbred
अंतःप्रजनन फारच जवळच्या आप्तांमध्ये शरीरसंबंध होऊन प्रजानिर्मिती होण्याची घटना (प्रक्रिया) heterosis, outbreeding
incision
छेदन निसर्गतः कापून पडलेली अथवा कृत्रिमपणे पाडलेली चीर, उदा. पानाच्या किंवा पाकळ्यांच्या कडा कमी जास्त प्रमाणात फाटलेल्या (चिरलेल्या) आढळतात.
included
अंतःस्थित आत (दुसऱ्या अवयवाच्या पोकळीत) राहिलेले, उदा. पुष्पमुकुटात असलेली केसरदले, धोत्रा, गारवेल इ. exerted
incomplete flower
अपूर्ण पुष्प साहाय्यक पुष्पदलात (परिदलात) न्यूनता असलेले (फूल), उदा. पुनर्नवा, चाकवत, शेर, शेंड इ.
incrustation
पुट, कवच १ खनिज द्रव्याने लपेटलेले वनस्पतींचे अवशेष (जीवाश्म), यात कार्बनी द्रव्याचा अभाव असून शरीर संरचनेतील वैशिष्ट्य मात्र आढळते. २ खपलीसारखे आच्छादन
incumbent
१ प्रणत २ आधारित १ जमिनीवर भार टाकून वाढणारे (खोड) २ इतरावर भार टाकणारी व वाढणारी (वनस्पती)
indefinite
१ अमर्याद, असंख्य २ अकुंठित १ संख्या व आकारमान यात मर्यादा नसणारे, उदा. बीजके, केसरदले, पाकळ्या इ., आंतरराष्ट्रीय चिन्ह ०० २ प्ररोह किंवा फुलोरा यांच्या प्रमुख अक्षाची न थांबता चालू राहणारी वाढ racemose
indehiscence
अस्फुटन स्फोट (तडकणे, उकलणे) न होणे, उदा. बीजुकाशय, बीजुककोश किंवा फळ आपोआप न फुटण्याचा प्रकार dehiscence
independent assortment
स्वतंत्र व्यवस्थापन आईबापापासून संकरप्रजेत आलेले काही वैकल्पिक गुण पुढील पिढीत स्वतंत्रपणे उतरुन त्यातील संततीत त्या गुणांची अलग वाटणी
indeterminate
१ अनिश्चित, अनिर्धारित २ अकुंठित १ पुढील घटनांची (उदा. वाढ, बदल इ.) खात्रीपूर्वक माहिती नसण्याचा प्रकार २ अक्षाची वाढ मर्यादित नसलेला (फुलोरा)
indicator species
निदर्शक जाती आपल्या अस्तित्वाने परिस्थितीची (हवामान किंवा त्यातील बदल) जाणीव करून देणारी वनस्पतीची जाती उदा. रामेठा ही जाती अधिक उंच, अधिक पावसाचे प्रमाण व कमी तपमान इत्यादी असलेल्या प्रदेशाची जाणीव उत्पन्न करते, कारण ती अशा ठिकाणीच आढळते.
indigenous
स्वकीय, रहिवासी एतद्देशीय, बाहेरुन न आलेली, उदा. आंबा, कोकम, पांगारा, मोह इत्यादी वृक्ष भारतीय असल्याने त्यांच्या लॅटिन नावात त्या अर्थाची जातिवाचक संज्ञा (indica) समाविष्ट आहे. cultigen indigen
individual
व्यक्ति एकाच जातीतील प्रत्येक प्राणी किंवा वनस्पती, अनेक सारख्या व्यक्तींची जाती बनते, species
induced
प्रवर्तित, प्रेरित बाहेरील चेतकामुळे (चेतना देणाऱ्या घटकामुळे) घडून आलेली (वनस्पतीतील प्रतिक्रिया) उदा. अवयवांचे वलन, सुट्या भागांचे स्थलांतर i. polyploidy प्रवर्तित बहुगुणन चेतकाच्या साहाय्याने कृत्रिमपणे घडवून आणलेली रंगसूत्रांची संख्यावाढ
induplicate
अंतर्नत धारास्पर्शी कलिकावस्थेतील मांडणीचा एक प्रकार, प्रत्येक लहान पानाच्या दोन्ही कडा आतील बाजूस वळलेल्या असून जवळच्या तशाच दुसऱ्या पानांच्या कडांना स्पर्श करतात.
ineffective publication
अननुवृत्त प्रकाशन अनुवृत्त प्रकाशनाच्या पद्धतीने केला नसलेला वनस्पतींच्या नावाचा मजकूर effective publication.
inermis
अकंटकित बिनकाटेरी, काटे नसलेली (वनस्पती), उदा. वनजाई (Clerodendron interme (L.) Gaertn.) unarmed
infection
संसर्ग रोगजंतूंशी प्रत्यक्ष संबंध व जंतूंचा शरीरप्रवेश i.tube संसर्ग नलिका रोगजंतूंना प्रवेश मिळवून देणारा नळीसारखा भाग
inferior
अधःस्थ, निम्न इतर पुष्पदलांच्या खालच्या पातळीवर असणारा (किंजपुट), उदा. पेरु, डाळिंब, भोपळा इ., पुष्पसूत्रात हे लक्षण G किंवा जी या आद्याक्षरापुढील आकड्यावर, आडवी रेषा काढून दर्शवितात floral formula.
inflated
फुगीर फुगवलेले, हवा अथवा पाणी यामुळे तुडुंब भरलेले, उदा. काही शैवलांचे तरंड, काही फळांचे आच्छादन, काही फळाभोवती असलेले संवर्त (पोपटी व कपाळफोडी)
inflorescence
पुष्पबंध, फुलोरा १ फुले असणाऱ्या फांदीवरील (अक्षावरील) त्यांची मांडणी, पुष्पविन्यास २ अनेक फुलांचा घोस, (झुबका), फांदीच्या टोकाचे एकच फूल
infra-
अव- खालचा या अर्थी उपसर्ग. i.axillary अवकक्षस्थ, कक्षतलीय पानाच्या बगलेखाली असलेले i.foliar अवपर्ण पानाखाली असलेले (उपांग, ग्रंथि इ.) i. nodal अवपर्वस्थ, पर्वतलीय, पर्वतलस्थ खोडावरील पेऱ्याच्या खालच्या बाजूस उगवलेले
infrageneric
१ अंतर्वेशी २ अववांशिक १ पहा intrageneric २ वंशापेक्षा खालच्या दर्जाचे, उदा. उपवंशातील किंवा त्या दर्जाचे.
infraspecific
१. अंतर्जातीय २ अवजातीय १ पहा intraspecific २ वर्गीकरणात जातीपेक्षा खालच्या दर्जाचे उदा. उपजाती, प्रकार, वाण इ. च्या दर्जाचे.
inherent
अंगभूत, स्वाभाविक निसर्गदत्त, नैसर्गिक प्रवृत्तीमुळे असणारे किंवा येणारे (गुण), उदा. जीवद्रव्याची प्रमुख लक्षणे
inheritance
अनुहरण वारसा, एका पिढीतून दुसऱ्या पिढीत गुण उतरण्याची प्रक्रिया, यामुळे संततीत व आईबापात कमी जास्त साम्य दिसुन येते, तसेच जातिविषयक गुणांच्या (लक्षणांच्या) अनुहरणामुळे प्रत्येक जीव आपल्यासारखीच प्रजा निर्माण करतो. cytoplasmic inheritance.
inhibition
कुंठन, अवरोधन थांबविण्याची क्रिया, स्थगित करण्याचा प्रकार, उदा. वाढ, विकास, प्रजोत्पादन, शोषण इ.
inhibitor
रोधक, दमक, निरोधक, निरोधी, अवरोधक रासायनिक व जैव प्रक्रियांचा वेग कमी करणारा किंवा प्रक्रिया थांबविणारा घटक, संततीत एखादे लक्षण प्रकट होण्यास विरोध करणारा (घटक, कारक)
injection
१ अंतःक्षेपण २ सूचिकाभरण १ बाहेरुन आत सोडण्याची प्रक्रिया, उदा. अंतराकोशिकी पोकळ्यात जवळच्या कोशिकेतून पाणी सोडण्याची क्रिया २ सुईसारख्या सूक्ष्म नळीने द्रवरुप अथवा वायुरुप पदार्थ शरीरात घालणे
inner
१ अंतः २ अंतस्थ १ आतील या अर्थी उपसर्ग २ आतील, केंद्राजवळचे i.bark अंतर्वल्क मृत अपित्वचा, त्वक्षाकोशिका व (द्वितीयक) त्वक्षाकर (सर्व मिळून वल्क) यांच्या आतील भाग पहा bark i. glume अंतस्नुष पहा glume i. integument अंतरावरण बीजकाच्या दोन्हीपैकी आतील आवरण
inrolled
अंतर्वलित आतील बाजूस गुंडाळलेली, उदा. कळीमध्ये पाकळीची किंवा पानाची किनार, कमळ, अळू, पहा involute
insertion
निवेशन, संलग्नता एका अवयवाचा दुसऱ्याशी असलेला निकट संबंध, उदा. पाने व खोड, पुष्पस्थली व पुष्पदले, पाकळ्या व केसरदले इ. epipetalous
insusceptible
ग्रहणाक्षम, अग्रहणशील ग्रहण न करु शकणारी अथवा एखाद्या रोगाच्या जंतूंना पूर्ण विरोध करणारी (व्यक्ती)
integerrimus
अखंडित अवयवाच्या अखंडत्वाची विशेष ग्वाही देणारी संज्ञा, उदा. पांशी (Carallia integerimma DC).
integrifoloius
अखंडपर्णी अखंड कडा असलेल्या पानाची (वनस्पती), उदा. फणस Artocarpus integra (Thumb.) Merr.syn.A. integrifolia L.
integument
आवरण बीजकाचे (प्रदेहाभोवतीचे) आच्छादन, यापासून बीजावरण बनते, हे एक किंवा दोन असतात indusium, testa, tegmen
interaction
अन्योन्य क्रिया, आंतरक्रिया दोन पदार्थांमध्ये होणारी परस्परावर परिणामकारक क्रिया, उदा. एकाच लक्षणाबाबत दोन जनुकांमध्ये होणाऱ्या परस्पर संबंधामुळे कधी कधी संततीत अनपेक्षित परिणाम दिसून येतो. complimentary factor
intercalary
मध्यस्थित दोन कायम ऊतकांमध्ये असलेले अथवा वनस्पतीच्या दोन्ही टोकास नसून अक्षावर मध्ये असलेले (ऊतक, कोशिका, वर्धनशील भाग इ.) i.growth मध्यस्थित वृद्धि (वर्धन) अवयवाच्या टोकास नसलेली (इतरत्र असलेली) वाढ, उदा. काही एकदलिकित वनस्पतीत पेऱ्यांजवळ अधिक काळ वाढ
intercalation
मध्यस्थापन जुन्या कणांमध्ये नवीन कण प्रविष्ट होण्याचा प्रकार, उदा. कोशिकावरणाची वाढ, कधी नवीन कोशिका पूर्वीच्या कोशिकासमूहात प्रवेश करून समूहाकार वाढतो.
intercellular
अंतराकोशिकी दोन किंवा अनेक कोशिकांमधून असलेले (उदा. पदार्थ, पोकळ्या इ.) i.passage (duct) अंतराकोशिकी मार्ग (नलिका) i. space अंतराकोशिकी पोकळी i. substance अंतराकोशिकी पदार्थ
interfascicular
अंतरावृंदीय दोन किंवा अधिक वाहक संचांमधील i. cambium अंतरावृंदीय ऊतककर वाहक संचांमद्ये असलेले वर्धनशील ऊतक
intermediate host
मध्याश्रय, मध्यस्थ आश्रय जीवोपजीवी वनस्पतीच्या किंवा प्राण्याच्या सतत आश्रयाखेरीज अल्पकाळ असणारा दुसरा एक आश्रय, उदा. गव्हावरील तांबेऱ्याचा मध्यस्थ आश्रय, दारुहळद (बार्बेरी, Berberis aristata DC).
internal phloem
अंतःपरिकाष्ठ प्रकाष्ठाच्या आतील (भेंडाजवळच्या) बाजूस असलेले परिकाष्ठ, उदा. काकडीचे खोड bicollateral bundle
interseminal
अंतराबीजी, आंतरबीजी अनेक बीजकांमधून किंवा बीजांमधून असलेले (विखुरलेले), उदा. सायकॅडिऑइडियाच्या उभय बीजुककोशधारी शंकूतील खवले.
interxylary phloem
अंतराप्रकाष्ठीय परिकाष्ठ प्रकाष्ठ भागात पसरलेला परिकाष्ठाचा भाग उदा. वाघनखी, टेटू, यांमध्ये प्रकाष्ठाचे त्रिज्येप्रमाणे खंड पडून त्यामधून परिकाष्ठ असते. xylem, phloem
intra-
अंतः आतील या अर्थी उपसर्ग i. axillary अंतःकक्षी पानाच्या बगलेतील (अवयव, उपांग) i. cambial अंत ऊतककर ऊतककराच्या आतील बाजूने i. cellular अंतःकोशिकी कोशिकेच्या आतील बाजूचे i. fascicular अंतर्वृन्दी वाहक घटकांच्या संचातील (उदा. ऊतककर) i. floral अंतर्पुष्पदली,
introduction of plants
वनस्पतिप्रवेशन नवीन वनस्पतींची लागवड करणे किंवा ती यदृच्छया आणली जाऊन तिची वाढ व प्रसार होणे
intrusion
अंतभेदन, अंतर्वेशन आत घुसून राहण्याची (वाढण्याची) प्रक्रिया), उदा. एक अन्यदेशीय वनस्पती दुसऱ्या क्षेत्रात प्रविष्ट होणे, एक ऊतक दुसऱ्यात प्रविष्ट होणे.
intrusive
अंतर्भेदी, अंतर्वेशी आत घुसणारे, आत वाढणारे अथवा आत प्रवेश करणारे (ऊतक). i.growth अंतर्भेदी वृद्धि दुसऱ्या संरचनेत होणारी (झालेली) वाढ
intussusception
कणाधान पूर्वी असलेल्या पदार्थाच्या कणांमध्ये नवीन कणांचा प्रवेश. उदा. कोशिकावरणाच्या आकारमानात वाढ होण्याची एक प्रक्रिया.
inulase
इन्यूलेज इन्यूलिन नावाच्या स्टार्चसारख्या कार्बाएहायड्रेट पदार्थांचे शर्करेत (लेव्ह्युलोज) रुपांतर करणारे वितंचक द्रव्य, हे सूर्यफूल कुलातील वनस्पतीत स्फटिकावस्थेत प्रथम आढळले होते. उदा. डेलियाची ग्रंथिल मुळे
invasion
आक्रमण परकीय वनस्पतीचा नवीन प्रदेशात प्रवेश व तेथे स्थिर (स्थायी) होणे, यामध्ये तिचे झालेले स्थानांतरही अंतर्भूत आहे. ecesis, colonisation
inverse
अधोमुख, व्यक्त उलटे, बीजकरंध खाली व बीजकतल वर असलेले (बीजक), उदा. सूर्यफूल anatropous, obovate, obcordate इ. inverted
inversion
व्युत्क्रम स्थान किंवा क्रम उलटा होणे, उदा. कोशिकाविभाजनात, एखाद्या रंगसूत्राचा काही भाग उरलेल्याशी उलटा लागल्याने जनुकांचा क्रम बदलतो, यामुळे संततीतील लक्षणात फरक होतो.
invertase
इन्हर्टेज, परिवितंचक इक्षुजा (इक्षु-शर्करा) या सामान्य साखरेचे रुपांतर फलजा (फक्टोज) व द्राक्षजा (ग्लुकोज) अशा दोन साखरेत करणारे वितंचक, या प्रक्रियेला पर्यसन (इन्व्हर्शन) म्हणतात.
involucel
छदकमंडल फुलोऱ्यातील लहान छदांचे बनलेले वर्तुळ, उदा. गाजराचा संयुक्त चामरकल्प फुलोरा, यामध्ये प्रत्येक साध्या चामराखाली छदकमंडल असते, compound umbel, bracteole
involucre
१ छदमंडल २ परिधान १ फुलोऱ्यातील (विशेषतः स्तबक व चामरकल्प) फुलांच्या गुच्छाखाली असलेल्या मुख्य अक्षावरचे छदांचे वर्तुळ, उदा. सूर्यफूल, गाजर, कोशिंबीर, गुलबुशाच्या परिदलाखाली संवर्तासारखे दिसणारे छदांचे वर्तुळ २ शेवाळी वनस्पतींतील गंतुकधारीचे गर्भावरील आच्
involute
अंतर्वलित कळीमध्ये वरच्या बाजूस वळलेल्या (गुंडाळलेल्या) पानाच्या किनारी (कडा), उउदा. अळू, कमळ, येथे दोन स्वतंत्र सुरळ्या होतात व हा पर्णवलनाचा एक प्रकार आहे. ptyxis
Iridaceae
केशर कुल, इरिडेसी केशर, बाळवेखंड, ग्लॅडिओलस इत्यादी एकदलिकित वनस्पतींचे लहान कुल, याचा अंतर्भाव इरिडेलीझमध्ये (केशर गणात करतात. प्रमुख लक्षणे- भूमिस्थित खोड, बिनदेठाची पाने, परिदले नेहमी दोन वर्तुळात सारखी नसतात, केसरदले तीन व सुटी, अधःस्थ किंजपुट, बोंड,
irregular
१ अनियमित २ अरहीन १ आकार व आकारमान यामध्ये एखाद्या फुलातील एका मंडलातील पुष्पदले सारखी नसल्याने फुलाची समात्रता बिघडली असण्याचा प्रकार, उदा. कर्दळ २ कोणत्याही उभ्या पातळीने कापले असता दोन समभाग न होणारे (फूल), उदा. निवडुंग asymmetrical non radial
irritability
संवेदनक्षमता, संवेदनशीलता, चैतन्य बाहेरुन चेतवल्यामुळे प्रतिक्रिया दर्शविण्याची क्षमता, सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण
isidium
उत्प्रवाल, इसिडियम प्रवाळाप्रमाणे दिसणारी धोंडफुलावरील प्रजोत्पादक घडी किंवा वळी, ही अलग होऊन नवीन वनस्पती बनविते.
iso-
सम- सारखेपणा दर्शविणारा उपसर्ग i. bilateral १ समद्विपृष्ठी २ समद्विपार्श्व १ दोन्ही पृष्ठभाग सारखे असलेले (पान) उदा. केशर, बाळवेखंड, बेलमकँदा २ एकमेकांशी काटकोन करणाऱ्या दोन उभ्या पातळ्यांनी विभागल्यानंतर प्रत्येक वेळी दोन सारखे अर्ध होणारे, मात्र एका
Isoetales
शलपर्ण गण, आयसॉएटेलीझ नेचाभ पादपापैकी (वाहिनीवंत अबीजी वनस्पतींपैकी) लायकोपोडिनी (मुग्दल शेवाळी) वर्गातील हा एक गण असून यामध्ये प्राचीन (जीवाश्मरुप) व विद्यमान वनस्पतींच्या दोन कुलांचा (अनुक्रमे प्ल्युरोमिएसी व आयसॉएटेसी) अंतर्भाव होतो. या वनस्पती औषधीय अ
isotope
समस्थानिक दोन किंवा अधिक अणुभार असलेले मूलद्रव्य, अधिक अणुभार असलेली द्रव्ये बहुधा किरणोत्सारी असतात.