वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
There are currently 191 names in this directory beginning with the letter F.
face
१ पृष्ठ २ मुख १ पानाची खोडाकडील किंवा प्रकाशाकडील बाजू २ परागकोशाची तडकणारी बाजु

facies (societies)
१ संहति, समाज २ स्वरुप १ पादपसंगतीतील जातींच्या संख्येत विलक्षण फरक दर्शविणारे लहानमोठे समुदाय २ वनस्पतीएचे सामान्य रुप (आकार) association, society

factor
कारक, घटक आनुवंशिक गुण किंवा लक्षणे यांना कारणीभूत मानलेले रंगसूत्रातील सूक्ष्म कण, वनस्पतींच्या परिस्थितीविषयक चर्चेत समाविष्ट असलेली प्रत्येक बाब, उदा. जैव घटक, हवामानासंबंधी घटक इ.

facultative
प्रासंगिक, प्रसंगोपात्त परिस्थिति (प्रसंगा)नुरुप वर्तन करणारे, उदा. काही जंतू, कवक इत्यादी गरजेनुसार जीवोपजीवी किंवा शवोपजीवी f. anaerobe प्रासंगिक अननिल हवेशिवाय जगणे आवश्यक असल्यास तसे करणारा (सूक्ष्मजंतू, सूक्ष्मजीव इ.) f. parasite प्रासंगिक जीवोपजीवी

Fagaceae
बंज (बान) कुल, ओक कुल, फॅगेसी ओक (बान), बीच, चेस्टनट इत्यादी द्विदलिकित फुलझाडांचे लहान कुल, क्युफ्युलिफेरी असेही याला म्हणतात. प्रमुख लक्षणे - वृक्ष, साधी सोपपर्ण पाने, नतकणिश फुलोरा, वायुपरागित एकलिंगी फुले, ४-७ खवल्यासारखी परिदले, केसरदले संख्येने अनियमित, तीन, अधःस्थ व जुळलेली किंजदले, किंजपुटात तीन कप्पे व प्रत्येकात दोन बीजके, छदांच्या पेल्याने वेढलेली कवची फळ (कपाली), पुष्कहीन बिया, भूर्ज कुलाशी (बेट्युलेसी) साम्य

fairy ring
भूछत्र वर्तुळ जमिनीवर वर्तुळाकार उगवलेली भूछत्रे, त्यांचा उगम जमिनीतील कुजकट पदार्थावर वर्तुळाकार बहुवर्षायू तंतंउपासून होतो, रात्री जणू स्वर्गीय पऱ्या तेथे फेर धरून नाचल्या असाव्या अशा जुन्या गैरसमजुतीमुळे त्या अर्थाचे इंग्रजी नाव पडले असावे mushroom

falcate
दात्राकृति कोयत्यासारखे, उदा. काही कवकातील (काणी) विबीजुके, फळे उदा. मेढशिंगी (Dolicandrone falcuta Seem).

fall of leaves
पानगळ वर्षातून एकदा होणारी पानांची गळून पडण्याची प्रक्रिया, निष्पर्ण होणे

false (pseudo)
छदमी, आभासी, खोटे खऱ्याचा फक्त भास उत्पन्न करणारा अवयव f.axis छदमी अक्ष अनेक उपाक्षांचा बनलेला, पण एक दिसणारा अक्ष f.fruit छद्मफल, आभासी फल भोंदू फळ, किंजपुटापासून न बनता इतर भागांपासून (देठ, पुष्पस्थली, पुष्पदले इ.) बनलेले व सामान्यपणे फळ मानले गेलेले

family
कुल अनेक संबंधित वंशांचा गट genus, order

fan shaped
व्यंजनाकृति पंख्यासारख्या पसरट आकाराचे, उदा. ताडाचे (borassus flabelifer L.) पान flabelliform

farinaceous
१ भुरकट २ पिष्टमय १ पिठुळ आवरण असलेले २ स्टार्च किंवा तत्सम पदार्थ असलेले. farinose

fasciated
सपाट अनित्यपणे सपाट झालेले (खोड), एक विकृति, उदा. शतावरीची एक जाती.

fascicle
वृन्द गट, संच, झुबका, उदा. अनेक फुलांचा किंवा वाहिन्यांचा गट

fascicular
वृन्दस्थ गटामध्ये असलेला f. cambium वृन्दस्थ ऊतककर वाहिन्यांच्या गटातील नवीन घटक बनविणारे ऊतक tissue

fasciculate leaves
वृन्दपर्णे एकत्र झुबक्यात असलेली अनेक पाने, उदा. पाइन, भुईचाफा, निशिगंध, कुमूर, नागदवणा इ.

fastigate
समृजु परस्परांच्या फार जवळ वाढणाऱ्या उभ्या शाखा असलेला (वृक्ष)

fat
मेद, वसा स्निग्ध (तुपकट) किंवा चरबीयुक्त पदार्थ, चरबी

father plant
पितृ वनस्पति संकर प्रक्रियेत पराग (नर गंतुके) देणारी वनस्पती

fatty acid
मेदी आम्ल, मेदाम्ल स्निग्ध पदार्थाचा एक घटक, दुसरा घटक म्हणजे ग्लिसरिन f.body मेदकण, मेदीकाय चरबी इ. स्निग्ध पदार्थांचे कण

fauna
प्राणिजात विशिष्ट प्रदेशातील सर्व प्राणी अथवा त्यांची संकलित नावांची यादी, पूर्ण माहितीचा ग्रंथ flora

feather-veined
पिच्छसिराल पिसासारखी शिरांची मांडणी असलेले (पान), आंबा, रामफळ इ. penninerved

fecundation
फलन अंदुक व रेतुक यांचा संयोग, स्त्री- व पुं- गंतुकांचे मीलन (एकरुप होणे). fertilisation

feeder
१ पोषक २ पोषकावयव १ आश्रय वनस्पती २ अन्नपाण्याचा पुरवठा करणारा अवयव (साधन), उदा. सिलाजिनेलाच्या गर्भांकुराचा तळभाग (पद), नीटेसी

feeding process
अशनक्रिया अन्नपाणी घेऊन ते आत्मसात करणे

felted
ऊर्णजालकित बुरणुसासारखे केसाच्या गुंतवळ्याचे (नमनाचे) आवरण असलेले f. tissue ऊर्णाएतक वर वर्णिल्याप्रमाणे ऊतक (कोशिकांचा समूह)

female
मादी, स्त्री स्त्रीत्व दर्शविणारे विशेषण, आंतरराष्ट्रीय चिन्ह o + f.cone स्त्री शंकु प्रकटबीज वनस्पतींत आढळणाऱ्या दोन प्रकारच्या शंकूपैकी बीज निर्मिणाऱ्या अवयवांचा (शंकूसारखा) समूह (फुलोरा) पहा cone उदा. चिल, देवदार इ. f. flower स्त्री पुष्प फक्त किंजदले

female cell
स्त्री पेशी, स्त्री कोशिका अंडे, अंदुक female gamete.

feminine
किंजी, किंजदलयुक्त, स्त्रीलिंगी उच्च दर्जाच्या वनस्पतींत किंजदलांचे मंडल असलेले (फूल, वनस्पती), उदा. पपई.

fenestrate
सच्छिद्र अनेक बारीक भोके असलेले.

feral
वन्य जंगली, रानटी, वनात आढळणारी किंवा लागवडीत नसलेली (वनस्पती)

ferment
वितंचक, विरजण enzyme

fermentation
वितंचन कार्बनी पदार्थांचे वितंचकाने (कार्बनी निदेशकाने) घडवून आणलेले रासायनिक रुपांतर (विघटन) उदा. दूधाचे दह्यात रुपांतर, लोणी खंवट होणे, साखरेचे रुपांतर मद्यार्कात होणे, मद्यार्कापासून ऍसेटिक आम्ल बनणे, सामान्य भाषेत आंबणे, अशा प्रक्रिया प्राणवायूचा उपयो

fern
नेचा (वनस्पती) Filicinae, Filicales

ferrobacteria
लोहजंतु लोखंडाच्या लवणात बदल घडवून आणणारे सूक्ष्मजंतू

ferruginous
१ ताम्रवर्णी, गंजवर्णी २ लोही, लोहयुक्त, लोहमय १ गंजलेल्या लोखंडाच्या रंगाचे २ लोखंड असलेले

ferrugo
तांबेरा कवक वनस्पतींपैकी (गदाकवक) एका प्रकाराने आश्रय वनस्पतीवर आलेला तांबूस ठिपके पाडणारा जीवोपजीवी रोग (rust) उदा. गहू, जोंधळा, चमेली, कुसर इ.

fertile
१ सुपीक २ फलनक्षम, अवंध्य १ चांगले पीक येईल अशी (जमीन), पिकाऊ २ फळ (अपत्य, गर्भ) उत्पन्न करण्याचे सामर्थ्य असलेले, उदा. फूल, पराग, बीजक

fertilisation
फलन नर व स्त्री प्रजोत्पादक कोशिकांची (घटकांची) एकरुप होण्याची प्रक्रिया, लैंगिक प्रजोत्पादनातील मौलिक प्रारंभीची प्रक्रिया f.cross परफलन दोन भिन्न व्यक्तींच्या (एकाच जातींच्या) प्रजोत्पादक कोशिकांचा संयोग व रंदुकाची निर्मिती. f. self आत्मफलन एकाच

fertilise
१ फलित करणे (होणे) २ फलनक्षम करणे १ अंदुक व रेतुक यांचे मीलन होणे २ जमिनीची सुपीकता वाढविणे, त्याकरिता खते घालणे fertilize

fertility
१ जननक्षमता २ सुपिकता १ फलित होण्याची पात्रता २ जमिनीचा पिकाऊपणा

fertilizer
खत जमिनीची सुपिकता वाढविणारे पदार्थ

fetidus
दुर्गंधित, दुर्गंधी वाईट वास येत असलेले, उदा. कृष्णकमळाची एक जाती (Passiflora foetida L.) foetid

fibre
सूत्र, धागा वनस्पतींच्या अवयवांत बळकटी आणणारी जाड कोशिकावरणाची लांबट कोशिका f. crop धागा पीक उपयुक्त धाग्यांच्या उत्पादनाकरिता केलेली लागवड उदा. अंबाडी, घायपात, ताग इ. prosenchyma, sclerenchyma

fibril
सूत्रक अतिसूक्ष्म धागा, कोशिकावरणात व प्राकलात हे धागे आढळतात.

fibrillose
सूत्रकी अनेक सूत्रकांनी बनलेले

fibro vascular bundle
सूत्रल वाहक वृंद अनेक कठीण लांबट कोशिका असलेला वाहक ऊतकांचा जुडगा vascular bundle

fibrous
सूत्रमय, सूत्रल धागेदार, अनेक धाग्यांचे बनलेले, उदा. वाहकवृंदात धागे आढळतात. f. covering सूत्राच्छादन, सूत्रावरण सूत्रांचे आवरण, उदा. नारळ व सुपारी यासारख्या कित्येक फळात जाड धाग्यांचे मध्यकवक असते. या धाग्यांस काथ्या म्हणतात पहा mesocarp. f. drupe सूत्रल

Ficoideae
वालुक कुल, फायकॉइडी (फायकॉइडेसी, ऐझोएसी) वळू (वालुक), झरस, धाप, वसू, दसरा साग इ. नावांनी ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतींचा अंतर्भाव करणाऱ्या द्विदलिकित फुलझाडांचे एक लहान कुल. याचा अंतर्भाव हचिन्सन यांनी फायकॉइडेसी नावाने पाटलपुष्प गणात (कॅरिओफायलेलीझमध्ये) केल

fid
खंडित, भिन्न अंशतः विभागलेले या अर्थाचा पत्यय cleft

fidelity
निष्ठा विशिष्ट प्रकारच्या पादप समुदायातच आढळण्याचे एखाद्या वनस्पतीच्या जातीएचे प्रमाण, अनेक भिन्न समुदायांत आढळणाऱ्या जातीची निष्ठा (प्रमाण) कमी दर्जाची असून फार कमी समुदायातील आढळणाऱ्या उच्च दर्जाची निष्ठा (प्रमाण) दर्शविते. f.exclusive अनन्य निष्ठा

fig-insect
उदुंबर कीटक उंबर, अंजीर, पिंपळ, वड इ. यांच्या फळात आढळणारे व फुलोऱ्यात परागण घडवून आणणारे वराटक प्रकारचे कीटक (केंबरे).

filament
तंतु बारीक दोऱ्यासारखा अवयव, अनेक कोशिकांची माळ, उदा. युलोथिक्स, स्पायरोगायरा इ. शैवले किंवा अनेक कवक f. of stamen केसरतंतु केसरदलाचा परागकोशधारी देठासारखा अवयव hypha

filamentous
तंतुमय, तंतुयुक्त तंतूंचे बनलेले, शेवाळीतील गंतुकधारीची आरंभीची अवस्था, शैवलांचे किंवा कवकांचे शरीर

filar
सूत्राभ लांबट व पातळ (केस, उपांग इ.)

filial
पैतृक, संतानक संततिविषयक f.generation संतानीय पिढी संकरापासून प्रसवलेली पिढी, संकरज पिढी f. regression संतानीय परागति एखाद्या लोकसमुदायामध्ये, सरासरीने पाहता, एखाद्या आनुवंशिक लक्षणांबाबत, मुले सामान्य पातळीहून आईबापापेक्षा कमी ढळतात, म्हणजेच मुले शक्य तो

Filicales
नेचे गण, फिलिकेलीझ नेचे वर्गातील एकमेव गण. काही नेचाभ पादपातील एक वर्ग मानतात. एंग्लर यांना याचे दोन गट (स्थल नेचे व जल नेचे) केले होते. लक्षणे- पहा Filicinae

Filicinae
नेचे वर्ग, फिलिसीनी नेचाभ पादप (टेरिडोफायटा, वाहिनीवंत अबीजी वनस्पती) या विभागातील एक वर्ग, काही शास्त्रज्ञांनी यात दोन उपवर्ग (स्थूलबीजुककोशी व तनुबीजुककोशी) केले असून त्यापैकी एकात समबीजुक सत्यनेचे (फिलिसीज) व असमबीजुक जल नेचे असे दोन गण अंतर्भूत केलेले

filiform
तंतुसम सुतासारखे बारीक, तंतूप्रमाणे बारीक व लांबट, उदा. अमरवेलीचे खोड (Cassytha filimformis L.)

fimbriate
कंकतिकाकृति फणीसारखे दातेरी, झालरीसारखे, उदा. पिंक (डायांथस) च्या पाकळ्या, माकडशिंगाच्या (Caralluma fimbriata Wall). फुलाच्या पाकळ्या fringed

fimicolous
शमलवर्धी खताच्या ढिगावर वाढणारी (वनस्पती)

fissile
विखंडी, विखंडनशील चिरलेले, चिंबलेला किंवा ती क्षमता असलेला (अवयव)

fissiparous
द्विभंजन, भंजन सहज दोन अथवा अधिक संपूर्ण भाग होणे (भंगणे) उदा. सूक्ष्मजंतूच्या कोशिका, नील हरित शैवले, यामध्ये प्रकलाची तपशीलवार विभागणी नसते.

fissured
स्फाटित, भेगाळ बाहेरुन भेगा (चिरा) पडलेली (मोठ्या झाडाची साल), उदा. चिंच, बाभूळ, शिरीष इ. उन्हाळ्यात सुकल्यामुळे तडकून भेगा पडलेली जमीन

fistular
नलिकासम नळीसारखे लांब व पोकळ, उदा. कांद्याचे पान व फुलोऱ्याचा दांडा, बाहव्याची (Cassia fistula L.) शेंग प्रथम पोकळ परंतु नंतर त्यात अनेक आडवे पडदे बनतात.

fixation
१ अवबंधन, रोपण २ स्थिरीकरण १ कुंडीत अथवा जमिनीत वनस्पती बसविणे २ सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करण्याकरिता वनस्पती अथवा त्यांचे पातळ काप, प्राणी किंवा त्यांचे सूक्ष्म भाग रासायनिक प्रक्रियेने कायम करणे f.of carbon dioxide कार्बन सात्मीकरण, कार्बन स्थिरीकरण

fixative
स्थिरकारी स्थिर करणारा पदार्थ

fixity
अपरिवर्त्यता पिढ्यानुपिढ्या सजीवांत काहीही बदल न होता ते आरंभापासून होते तसेच राहिले आहेत अशी जुनी समजूत, क्रमविकासाची उपपत्ती याउलट आहे. organic evolution  immutability

flabellate
व्यजनाकृति पंख्यासारखे fan shaped  flabelliform

flaccid
शिथिल, सैल कोशिकेतील पाणी कमी झाल्यावर तिला येणारी अवस्था (limp, floppy)

flaccidity
शैथिल्य शिथिलता, म्लानता उदा. कोमेजलेल्या (पाणी कमी झालेल्या) पानांची स्थिती

Flacourtiaceae
अत्रुण कुल, फ्लॅकोर्टिएसी तांबट, अत्रुण, अट्टाक व काकर इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. बेंथॅम व हूकर यांनी याला सॅमिडेसी असे संबोधले असून एंग्लर व प्रँटल यांनी फ्लॅकोर्टिएसी नावानेच त्याचा उल्लेख व अंतर्भाव पराएटेलीझ गणात केला आहे. हचिन्सन यांनी बिक्सेलीझ (केसरी गण) मध्ये समाविष्ट केले आहे. प्रमुख लक्षणे - वृक्ष व झुडपे, पाने चिवट, साधी एकाआड एक, सोपपर्ण, नियमित चार किंवा अधिक भाग प्रत्येक पुष्पमंडलात असतात. पुष्पदले कधी सर्पिल, कधी पाकळ्यांचा अभाव, असल्यास सुट्या व अनेक, संदले २-१५ सुटी किंवा जुळलेली, केसरदले अनेक व कधी त्यांचे अनेक संघ, बहुधा ऊर्ध्वस्थ, २-१० किंजदलांच्या किंजपुटात तटलग्न बीजकाधानीवर अनेक बीजके, मृदुफळात किंवा बोंडात एक किंवा अनेक सपुष्क बिया व त्यावर कधी बीजोपांग

flaescence
पीतता पिवळेपणा

flagellate
प्रकेसलयुक्त (प्रकेसलवान), कशाभिकायुक्त प्रकेसल असलेले

flagelliform
कशाभिकारुप, प्रकेसलाभ, प्रकेसलासारखे

flagellum
प्रकेसल, कशाभिका कोशिकेच्या बाहेर आलेला, प्राकलाचा लांबट, केसलापेक्षा मोठा व जटिल संरचनेचा धागा, यांची संख्या बहुधा एक किंवा दोन, क्वचित अधिक असून कोशिकेला ते गति प्राप्त करून देतात. सुक्ष्मजंतूंची केसले लहान व साधी असतात. चर बीजुके, चर गंतुके (नेचे) इत्य

flask shaped
सुरईप्रमाणे, कलशाकृति गोलसर बसका तळभाग व लांब मान असलेले प्रायोगिक काचपात्र, उदा. शेवाळी व नेचांतील अंदुककलश.

flavescent
पीत पिवळट, वनस्पतींच्या अवयवांना येणारा नैसर्गिक फिकट पिवळा रंग

flavous
पिवळेजर्द

fleixble
नम्य, लवचिक दाबामुळे वाकून (न मोडता) पुनः पूर्ववत होणारे. उदा. लव्हाळ्याचा दांडा, कित्येक पानांचे देठ, अनेक खोडे, ताणे इ.

fleshy
मांसल, रसाळ, मगजयुक्त गर (मगज) असलेले, रसयुक्त (केस अथवा कोशिकांनी भरलेले) काही वनस्पतींच्या शरीराचा एखादाच भाग मांसल किंवा रसाळ असतो, उदा. निवडुंगाचे खोड, पानफुटीची पाने, तुतीच्या फळातील किंवा फणसातील परिदले, काजूचा देठ, सफरचंदाची पुष्पस्थली, नारळातील पुष्क (खोबरे), अननसाच्या फुलोऱ्यातील दांडा व फुलाचे भाग, संत्री व मुसुंबातील पातळ अंतःकवचातील केस, विलायती चिंचेतील बीजोपांग

flexibility
नम्यता वर वर्णन केलेला गुण

flexuous
वाकडातिकडा, नागमोडी flexuose

float
तरंड तरंगणारा किंवा तरंगण्यास मदत करणारा अवयव, उदा. फ्यूकस शैवलाची एक जाती, सरगॅसम शैवल, पाण्यातील हायसिंथ अथवा शिंगाडा यांचे देठ, फळातील काथ्यामुळे नारळ (शहाळा) तरंगतो.

floating
प्लवमान, प्लव, प्लवन तरंगणारे

floating mechanism
तरंडयोजना, प्लवनयोजना वर वर्णिल्यासारखी व इतर काही तशी तरंगण्याची साधने, बहुधा अशा साधनांत हवायुक्त पोकळी असते, उदा. कमळाच्या बिया, ऊंडीची फळे, नारळातील काथ्याचे आवरण

floccose
ऊर्णी, तूलीय, तूलाच्छादित लोकरीसारख्या दिसणाऱ्या नरम केसांनी आच्छादलेला (अवयव)

flocculent
ऊर्णाभ लोकरीसारखे दिसणारे व सहज निघून जाणारे (केस)

flora
पादपजात १ देशातील किंवा प्रदेशातील सर्व वनस्पती २ विशिष्ट स्थानातील वनस्पतींच्या वर्णनाचा ग्रंथ यामध्ये वनस्पती ओळखून काढण्याकरिता विशिष्ट योजनाही असते. उदा. Flora of India म्हणजे भारतातील पादपजात.

floral
पुष्पीय, पुष्प- फुलांचा, फुलासंबंधी, फुलांतील f.axis पुष्पीय, पुष्प- फुलांचा, फुलासंबंधी, फुलांतील f.bud पुष्पाक्ष फुलाचा किंवा फुलातील अवयवांचा दांडा (अक्ष) f.diagram पुष्पचित्र फुलातील सर्व भाग, त्यांचे परस्परांशई व खोडाशी संबंध दर्शविणारी छेदासारखी

florescence
पुष्पकाल फुले येण्याचा मोसम anthesis

floret
पुष्पक स्तबक फुलोऱ्यातील (उदा. सूर्यफूल, झिनिया, झेंडू, शेवंती इ.) असंख्य लहान फूलांतील एक फूल

floribundus
विपुलपुष्पी, बहुपुष्पी खूपच फुले येणारी (वनस्पती), उदा. ऊक्षी Calycopteris floribunda lam), धायटी (Woodfordia floribunda salish)

floriculture
पुष्पसंवर्धन विशेषतः फुलांची पैदास करण्याचा प्रयोग (उद्योग)

floridean starch
फ्लॉरिडी स्टार्च, फ्लॉरिडी मंड लाल शैवक वनस्पतींत आढळणारे आरक्षित कार्बाएहायड्रेट, याचे कण परिकलात विखुरलेले असून त्यांवर आयोडिनचा थेंब टाकल्यास ते लाल किंवा पिंगट दिसतात. खऱ्या स्टार्चप्रमाणे ते जांभळट दिसत नाहीत तसेच ते वर्णकणूंत नसतात.

floriferous
पुष्पी, पुष्पधारी, सपुष्प फुले धारण केलेला (अक्ष, वनस्पती)

floriform
पुष्पाकृति, पुष्पाकार फुलासारखा आकार असलेले

florist
१ पुष्पसंवर्धक २ पादपजातलेखक १ फुलझाडांची लागवड, फुलांची पैदास व खरेदी विक्री करणारा २ फ्लोरा (पादपजाती) संबंधीचा ग्रंथकर्ता

floristic
पादपी, पादपजातीय पादपजातीसंबंधी flroa

floristic composition
पादपी संघटना (रचना) विशिष्ट क्षेत्रातील भिन्न वनस्पती व त्यांचे शेकडा प्रमाण इत्यादी माहिती

floristics
पादपीसंघटनाशास्त्र पादपजाती, त्यांचा उगम, विकास, स्थानिक व भौगोलिक प्रसार इत्यादी सर्व बाबींच्या तपशीलवार माहितीची विज्ञानशाखा

florus
- पुष्पी फुले असलेले, उदा. एकपुष्पी, द्विपुष्पी, बहुपुष्पी (अनुक्रमे एक, दोन किंवा अनेक फुले असलेले) cauliflorus  flowered

flower
पुष्प, फूल सुमन, कुसुम, सुम, प्रसून ही नावेही संस्कृत वाङमयात आढळतात. केसरदले व किंजदले यापैकी निदान एकाचे मंडल व सामान्यतः त्याभोवती परिदलांचे निदान एक मंडल यांनी बनलेले संक्षिप्त प्रजोत्पादक इंद्रिय (प्ररोह). परिपूर्ण फुलात चार प्रकारची मंडले (संवर्त, प

flowering
पुष्पविकसन फुलांच्या कळ्या उमलणे, झाड मोहरणे (बहरणे) f. glume बाह्यतुष गवतांच्या फुलांचे बाहेरचे छद, त्या बाहेरील छदास परितुष (outer glume) म्हणतात., f. plant सपुष्प वनस्पती, फुलझाड पहा Angiospermae, Phanerogamae

flowerless plant
अपुष्प वनस्पति फुले नसलेल्या वनस्पती Gymnospermae, Cryptogamae

fluctuating variation
चंचलित भेद एखाद्या लक्षणासंबंधी सामान्य स्थितीच्या (मूल्याच्या) आसपास ढळणारा फरक, उदा. फळाच्या सर्वसामान्य आकारापेक्षा कमी व जास्त आकार असलेली फळे त्याच झाडावर (किंवा त्याच जातीच्या दुसऱ्या झाडावर असल्याने दिसणारा फरक continuous variation

fluorescent
प्रतिदीप्तीशील अतिनील किंवा इतर प्रारणात ठेवल्यानंतर प्रकाश देणारे

flush
१ पुनर्वृद्धी २ आकस्मित जलवृद्धी १ काष्ठमय वनस्पतीचा पुन्हा वाढ होण्याचा काळ २ पाऊस किंवा अन्य कारणाने मर्यादित क्षेत्रात पाण्याचा पुरवठा व त्यामुळे येणारी वनश्रीतील संपन्नता

fluviatile
नदीय प्रवाहात किंवा नदीत वाढणारी (वनस्पती).

fly flower
मक्षिका पुष्प माश्यांच्या साहाय्याने परागित होणारे फूल, उदा. सुरण, पपनस, मेंदी इ.

fly trap
मक्षिका पJण्जर माशा किंवा तत्सम कीटक आकर्षून, पकडून, मारुन त्यांचा अन्नाप्रमाणे वापर करण्याचे साधन (सापळा, चापासारखी यंत्रणा), उदा. डायोनिया, ड्रॉसेरा इ. कीटकभक्षक वनस्पतींची पाने)

flying hair
उड्डानकेश वाऱ्याने तरंगत दूर जाण्यास व हवेत अधांतरी राहण्यास उपयुक्त केस (धागा) उदा. सहदेवीचा संवर्त, कुडा, कापूस, रूई, सावर यांच्या बीजावरील केस (धागे)

flying membrane
उड्डानपटल फळ किंवा बी यांना चिकटून असलेला पंखासारखा पातळ व पसरट भाग, उदा. शाल, पेट्रिया, चिल, शेवगा, वावळा, बिबला, टेटू इ.

flying tissue
उड्डानोतक वर वर्णन केलेल्या पंखातील विशिष्ट ऊतक (कोशिका समूह).

foetid
दुर्गंधी fetidus उदा. हिंगडा (Ferula foetida Regel)

folded
संमीलित दुमडलेले, मध्यशिरेवर पात्याचे दोन्ही भाग पुस्तकाप्रमाणे मिटविलेले conduplicate

foliaceous
पर्णसम पर्णाभ हिरव्या पानासारखे, उदा. वाटाण्याची उपपर्णे phylloclade, cladode

foliage
पर्णसंभार सर्व हिरव्या पानांचे खोडावरील आवरण f. leaf हरितपर्ण कोणतेही रुपांतर न पावलेले हिरवे पान

foliar
पर्णसम, पर्णसंबंधित पर्णरुप, पानासारखे, पानाशी संबंधित f.gap (leaf gap, folial gap) पर्ण विवर, पर्णांतराल खोडाच्या रंभामदील, पानात जाणाऱ्या वाहक ऊतकांमुळे (वृंदामुळे) मूळच्या वाहक चितीत पडलेली खिंड (पोकळी), उदा. काही नेचे पहा stele f. spur पर्णप्ररोह पहा

foliate
पत्री, दली दले असलेले (संयुक्त पान), उदा. दोन दलांचे ते द्विदली (हिंगणबेट), तीन दलांचे ते त्रिदली (बेल), लिंबूचे पान हे एकदली संयुक्त पान मानतात. foliolate

foliation
पर्णागम, पर्णन वनस्पतील पाने किंवा पालवी येणे (पल्लवित होणे) leafing

folicole
पर्णजीवी जिवंत किंवा मृत पानावर जगणारी (दुसरी वनस्पती)

folicolous
पर्णवासी पानावर राहणारी (अन्य वनस्पती) epiphyte

foliicolous
पर्णवासी पानावर वाढणारी अपिवनस्पती, उदा. काही शैवले, कवक, धोंडफुले

foliiferous
पर्णधारी, सपर्ण पाने असणारे (उदा. खोड)

foliolose
दलयुक्त दलांचे (पानासारख्या लहान उपांगांचे) बनलेले

foliose
१ सपर्ण २ पर्णाभ १ अनेक पाने दाटीवाटीने उगवली आहेत अशी (वनस्पती) उदा. हरिता वर्ग २ पानासारखे पातळ, हिरवे व पसरट उदा. काही धोंडफुले, शैवले, गंतुकधारी इ. Musci (mosses) Lichen  foliaceous

folium (folius)
-पर्णी पानाचे या अर्थी प्रत्यय उदा. खंडितपर्णी, लंबपर्णी, ऱ्हस्वपर्णी, हिरवा अशोक (Polyalthia longifolia Thw.)

follicetum
पेटिकागुच्छ एकाच फुलातील अनेक सुट्या किंजदलांपासून बनलेला पेटीसारख्या फळांचा घोस, उदा. सोनचाफा, रायणी (Manilkana hexandra Roxb.) follicle.

follicle
पेटिकाफल पेटीसारखे (तळ व झाकण असलेले) उघडणारे फळ, एका ऊर्ध्वस्थ किंजदलापासून बनलेले, एका शिवणीवर तडकणारे शुष्क फळ उदा. रूई, सोनचाफा, सदाफुली इत्यादींच्या घोसफळांतील प्रत्येक लहान फळ

food body
खाद्यपिंडिका, अन्नगुलिका पानाच्या आसपास असलेली व कीटकांस अन्नाकरिता उपयुक्त अशी कोशिकांची गाठ, उदा. बाभळीच्या एका जातीतील पानांच्या दलावरची गाठ f. pollen खाद्यपराग वांझ परागकण, कधी अलग व विशिष्ट परागकोशात बनलेले व कीटकांस आकर्षक खाद्य असे परागकण f.

food chain
अन्नशृंखला अन्न व त्यापासून प्राप्त होणारी ऊर्जा ज्या अनेक सजीव व्यक्तींच्या (किंवा सजीव गटांच्या) श्रेणीतून (मालिकेतून) पूर्णपणे खर्ची पडण्यापूर्वी, स्थानांतर करते ती साखळी.

foot
पद १ काही वनस्पतींच्या गर्भांकुराचा तळचा पोषक व शोषक भाग उदा. शेवाळी, नेचे इ. २ केसाचा तळ

forbe
प्रशाक गवताशिवाय इतर कोणतीही लहान वनस्पती herb

force
प्रेरण कृत्रिम उपायांनी वनस्पतींना पाने, फुले व फळे लवकर किंवा उशीरा बनविण्यास लावणे, मोसमापूर्वी किंवा नंतर भाज्यांचे पीक काढणे

forcipate
चिमटाकार चिमट्याच्या आकाराचे

forest
अरण्य, वन मुख्यतः मोठी झाडे, वेली व काही त्यांखाली अथवा त्यांमधून वाढणारी झुडपे व रोपटी असलेले घनदाट जंगल (वनश्रीचा प्रकार), मोठ्या वनस्पतींचा समावास f.climax वनचरम अनेक वृक्ष असलेली पादपसमुदायाची अंतामावस्था (चरमावस्था) f. product वनोत्पाद वनात

forestry
वनविज्ञान वनासंबंधी सर्व प्रकारची (संवर्धन, संरक्षण, उपयोग इ.) माहिती देणारी ज्ञानशाखा

foriculate
कर्तनीरुप कात्रीच्या आकाराचे

forked
द्विशाखी प्रत्येक वेळी दोन फाटे फुटलेले उदा. देठ, शिरा इ. f.venation द्विशाखी सिराविन्यास मध्यशीर व विशेषतः बाजूच्या शिरा पुनः पुनः दुभंगल्याप्रमाणे असलेली मांडणी, उदा. नेचे furcate

form
१ आकृति २ रुप १ संपूर्ण शरीराचा किंवा अवयवाचा आकार २ स्वरुप व लक्षणांत फरक असलेले दोन किंवा अधिक वंश किंवा जाती. उदा. लोंबती पाने व ताठ पाने असणारी झाडे, यामध्ये त्यातील व्यक्तींच्या अवतरणातील संबंध (नाते) अनिश्चित असतो. f.genus रुप वंश अनेक रुप जातींचा

formation
१ समावास २ संभवन १ सारख्या परिस्थितीत आढळणाऱ्या व समान वृत्तीच्या वनस्पतींचा समुदाय, उदा. वन, दलदल, तृणक्षेत्र. सारख्या आकृतींच्या समुदायांचे गट, वर्ग व वनश्री यांचे अनेक प्रकार करता येतात. २ निर्माण होण्याची प्रक्रिया, उदा. नवीन कळ्या, कोशिका, गर्भ, उपां

formative phase
संभवनावस्था, निर्मायी अवस्था वनस्पतींच्या अवयवांची वाढ होत असताना व त्यांना आकार येत असताना व त्यांना आकार येत असताना नवीन कोशिका बनण्याची अवस्था, मुळांच्या व खोडांच्या टोकांस हा भाग असतो व त्यामागे लंबनावस्था असलेला भाग असतो. f. region निर्मायी क्षेत्र

fossil
जीवाश्म, अश्मीभूत प्रशेष प्राचीन कालातील वनस्पती किंवा प्राणी यांचा किंवा त्यांच्या अवयवांचा दगडावरील ठसा अथवा कार्बन, रेती किंवा चुनखडीने पूर्णपणे व्याप्त असा अवशेष, उदा. दगडी कोळसा हा प्राचीन वनस्पतींचा अश्मीभूत पण कार्बनयुक्त भाग होय. f. animal जीवाश्म

foster(host) plant
आश्रय वनस्पति इतर वनस्पतींना पोषण किंवा आधार देणारी वनस्पती

fovea
गर्तिका लहान खाच, उदा. आयसॉएटिसच्या पानाच्या तळाशी असलेले खाच, त्यातच बीजुककोश असतो.

foveola
प्रगर्त अर्थ वर दिल्याप्रमाणे

foveolate
प्रगर्ती एक लहान खाच किंवा अनेक खाचा असलेला (अवयव)

fragment
खंड, शकल पूर्ण भागाचा एक लहान तुकडा

fragmentation
खंडन प्रत्यक्ष विभागणीने अनेक तुकडे (उदा. प्रकलाचे) होण्याचा प्रकार

free
मुक्त, सुटे इतर भागास न चिकटलेले, उदा. संदले, पाकळ्या इ. f.cell formation मुक्त कोशिका निर्मिति जनक कोशिकेत अनेक नवीन (बहुधा) आठ सुट्या कोशिका बनणे उदा. परागकण, धानीबीजुके f.central placentation मुक्त मध्यवर्ती बीजकविन्यास किंजपुटात सर्व बीजके मधल्या

frequency
वारंवारता, बाहुल्य वारंवार असण्याची किंवा आढळले जाण्याची घटना, एखाद्या पादपसंगतीतील अनेक नमुना क्षेत्रात विशिष्ट जाती किती क्षेत्रात आढळते व एकूण किती क्षेत्रे तपासली यांच्या गुणोत्तरावरुन बाहुल्याचे मापन करतात.

frequent
बहुल एखाद्या मर्यादित क्षेत्रात वारंवार आढळणारी (वनस्पती)

fringing forest
अनुतट वन, तटवर्ती वन किनारी वन, सतत वाहणाऱ्या पाण्याच्या ओहोळाच्या किंवा तळ्याच्या कडेने वाढणारे वन

frond
विपत्र, पाते १ सायकस, नेचे व तालवृक्ष यांच्या पानाचे विविध प्रकारे विभागलेले पाते २ समुद्रशैवलाचे पात्यासारखे कायक (शरीर) ३ शैवाकाचे (दगडफुलाचे) कायक stipe

frondose
विपत्रसम सपाट, पसरट विभागलेल्या किंवा अखंड पात्यासारखे

fructescence
पक्वकाल फळे पिकण्याचा काळ

fructiferous
फलधारी फळे असणारे किंवा निर्माण करणारे (झाड)

fructification
फलित १ बीजुकोत्पादन अवयव २ फलनानंतरची प्रजोत्पादक संरचना ३ फळे येण्याची प्रक्रिया ४ लैंगिक प्रक्रियेनंतर (वनस्पतीत) बनणारी बीजयुक्त किंवा बीजुकयुक्त संरचना

fructose
फलशर्करा फळापासून काढलेली विशिष्ट रासायनिक संघटनेची साखर, केटो-हेक्सोज शर्करा

fruit
फल, फळ सपुष्प वनस्पतींच्या फुलातील लैंगिक प्रक्रियेनंतर (फलनानंतर) किंजपुटापासून बनलेले, बीजास संरक्षण देणारे व बीजप्रसारास मदत करणारे इंद्रिय, लैंगिक प्रक्रियेचा फळ व बीज हा दृश्य परिणाम होय, क्वचित फलनाशिवाय अशी फळे बनतात व त्यात वांझ बिया असतात किंवा त

frutescens
क्षुपीय, क्षुपाभ झुडपासारखे (वाढलेले), उदा. मिरची (capsicum frutescens L.) frutescent

fruticose
क्षुपिल लहान झाडासारखे अवयव असलेले, क्षुपासारखे f. lichen क्षुपिल शैवाक अक्ष, उपाक्ष, फांद्या इत्यादी पण साधे (कायकाभ) अवयव असलेले धोंडफूल उदा. टंड्रातील रेनरियर मॉस, उस्निया

fucoxanthin
पिंगल शैवलद्रव्य, फ्यूकोझॅन्थीन पिंगट शैवलांतील रंगद्रव्य phaeophyceae.

fuligineus (sooty)
कज्जलाभ, काळेकुट्ट काजळासारखे उदा. काणी रोगासारखे

fumaginous
धूम्रवर्णी fumeous.

Fumariaceae
पर्पटकुल, फ्यूमॅरिएसी फुलझाडांपैकी द्विदलिकित वर्गातील पर्पट, भूतकेशी, मामिरान इत्यादी वनस्पतींचे कुल. याचा अंतर्भाव ऱ्हीडेलीझ ह्या गणात करतात. प्रमुख लक्षणे- पाण्याचा अंश अधिक असलेल्या औषधी, क्वचित वेलीसारख्या, पाने साधी, बहुधा एकाआड एक, मूलज किंवा स्कंधेय, कधी फार विभागलेली व काहीशी समोरासमोर, फुले द्विलिंगी, एकसमात्र, परिदले तीन मंडलात असून संदले दोन, प्रदले चार, केसरदले सहा व किंजपुटाच्या दोन्ही बाजूस तीनच्या गटात व जुळलेली, किंजदले दोन, ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा व त्यात दोन किंवा अनेक बीजके. फळ (बोंड) तडकणारे किंवा कपाली, बी एक किंवा अनेक. पर्पट अगर पित्तपापडा (Fumaria parviflora L.)

fumeus
धूमकल्प, धुरकट, धुरासारखे smoky

function
कार्य इंद्रियाने किंवा अवयवाने केले जाणारे काम

fundamental
मौलिक मूलभूत, आधारभूत, उदा. ऊतक, तंत्र, अवयव इ. f. (ground) tissue तल्पोतक मौलिक ऊतक, बाहेरील त्वचा व वाहक भाग वगळल्यास इतर सर्वसामान्य आधारभूत व इतर अनेक कार्ये करणारा कोशिकांचा समूह, बहुधा हा भाग मृदूतक स्वरुपाचा असतो. f. systme तल्पोतक तंत्र अभित्वचा,

fungal
कवकीय कवकासंबंधी fungus

Fungi Imperfecti
अपूर्ण कवक वर्ग Deuteromycetes

fungicidal
कवकनाशक कवकांचा (त्यापासून होणाऱ्या रोगांचा) नाश करणारे (द्रव्य) fungicide

fungicolous
कवकवासी कवकावर आधार किंवा कवकापासून अन्नरस घेणारी (वनस्पती).

fungiform
भूछत्राकृति भूछत्रासारखे दिसणारे mushroom

fungoid parasite
जीवोपजीवी कवक इतर वनस्पतींवर उपजीविका करणारी कवक प्रकारची वनस्पती, उदा. भुरी, तांबेरा, काणी, अर्गट इ.

fungous
कवकजन्य कवकापासून झालेला (रोग), उदा. भुईमुगावरील टिक्का रोग

fungus
कवक, अलिंब, अळभे हरितद्रव्यहीन परोपजीवी साधी वनस्पती, पूर्वी कायक वनस्पती (थॅलोफायटा) विभागातील हा गट एक उपविभाग मानला जात असे व यामध्ये सर्वच हरितद्रव्य नसलेल्या वनस्पतींचा (सूक्ष्मजंतू, श्लेष्मकवक, सत्यकवक इ.) समावेश असे, परंतु हल्ली ही संज्ञा सामान्य भ

funicle
बीजबंध, बीजांड वृंत किंजपुटातील बीजकास जोडणारा तंतूसारखा भाग अथवा बीजकाचा देठ funiculus

funicular
तंतुसम, तंतुवत् बारीक दोऱ्यासारखे, सुतासारखे

funiform
रज्जुसम लहान दोरासारखे, जाडजूड दोरीसारखे.

funnel cell
नालिका कोशिका नाळक्याच्या आकाराचा (वरच्या बाजूस रुंद व खाली क्रमाने निमुळता होत गेलेला) शरीरातील सूक्ष्म घटक. काही पानांच्या अंतर्रचनेत अपित्वचेखाली असलेल्या कोशिका समूहातील एक घटक (कोशिका).

funnel shaped
नालिकाकृति, नसराळ्यासारखा आकार असलेला, उदा. धोत्र्याच्या फुलाचा पुष्पमुकुट funneliform, infundibuliform

fur
मृदुकोम मऊ, पातळ व लहान केस

furcate
द्विशाखी forked उदा. रानभेंडीची (Hibiscus furcatus Roxb.) संदले

furcellate
अल्पद्विशाखी द्विशाखीचा संक्षिप्त प्रकार उदा. एक तांबडे शैवल (Scinaia furcellata)

furrow
सीता, खोबण लहान पन्हळ, चर, सरी

furrowed
ससीता पन्हळ किंवा खोबण असलेले उदा. केळीच्या पानाची मध्यशीर, एक्किसीटमचे खोड, खडशेरणीची फांदी

furry
लोमश मऊ केस असलेले उदा. समुद्रशोकाची व आघाड्याची पाने, नॅफॅलियम इंडिकम Gnaphalium indicum L. इ. pubescent

fusiform
लुंठसम, तर्कुरुप दोन बाजूस निमुळते (अरुंद) व मध्ये फुगीर, लाटणे, कुकडे यासारखे, उदा. रताळे

fusion
संयोग, मीलन, संगम एकरुप होणे, संपूर्णपणे मिसळून जाणे, उदा. प्रजोत्पादक घटकांच्या (गंतुकांच्या) मीलनामुळे रंदुक बनते. कोशिकांच्या संयोगाने वाहिन्या (उदा. चिकाळ नलिका, काष्ठवाहिन्या) बनतात. f.nucleus मलिन प्रकल दोन प्रकलांच्या संयोगाने बनलेला (बहुधा