वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
There are currently 176 names in this directory beginning with the letter D.
daily period of growth
दैनिक वर्धनभेद दर चोवीस तासात होणारा वाढीतील चढ उतार

Darwinism
डार्विनवाद, डार्विनची उपपत्ती नैसर्गिक निवडीच्या तंत्रानुसार नवीन जातींची निर्मिती, स्पष्टीकरण - सर्व सजीवांची संख्या भूमितिश्रेणीने वाढते, परंतु जीवनावश्यक वस्तू मर्यादित असल्याने त्या प्राप्त करून घेण्यास सजीवांमध्ये स्पर्धा होते (जीवनार्थ कलह), सजीवांमध्ये सबल व दुर्बल असे भेद निसर्गतःच असतात. साहजिकच स्पर्धेमध्ये सबल यशस्वी होऊन दुर्बल नाश पावतात, म्हणजेच जगण्यास लायक अशा सबलांची सृष्टीकडून निवड केली जाते. ज्या भेदांमुळे सबल यशस्वी होतात ते भेद आनुवंशिकतेमुळे नवीन पिढीत उतरतात, तीव्रतर होत जातात व काही नवीन फायदेशीर भेदही दिसून येतात, यांचेही अनुहरण होऊन व असा प्रकार शेकडो पिढ्यात चालू राहून नवीन गुणधर्मयुक्त सजीव निर्माण होत जातात, हानिकारक भेद पण असतात व नवीन येतात, परंतु ते धारण करणाऱ्या व्यक्ती दुर्बल ठरून नवीन संततीची परंपरा फाल काल चालू ठेवीत नाहीत. या प्रकारे सर्व सजीव साध्या समान पूर्वजांपासून उत्क्रांत झाले असून ते परवर्तनीय आहेत व सध्या आहेत तसे पूर्वी एकेवेळी एकदम निर्मिलेले नाहीत.

daughter cell
जन्य कोशिका, जन्य पेशी मूळच्या एका कोशिकेपासून जन्मलेली नवीन कोशिका, मूळची कोशिका मातृकोशिका ठरते.

daughter chromosome
जन्य रंगसूत्र मूळच्या रंगसूत्रापासून बनलेले नवीन रंगसूत्र

daughter-axis
जन्याक्ष एका अक्षापासून उद्भवलेला नवीन उपाक्ष

day length
दिनावधि दिवसातील प्रकाशपूर्ण काल

day position
दिनस्थिति दिवसा उजेडी असलेली स्थिती, उदा. चिंच, बाहवा इत्यादी झाडांची पाने दिवसाच्या प्रकाशात सपाट राहतात परंतु रात्री त्यांची दले मिटून लोंबती राहतात त्याला रात्रि स्थिती म्हणतात.

de novo
नवीन, नूतन पूर्वी असलेल्यापासून नसून, पूर्णपणे नवीन उत्पत्ती

decapitation
विमुंडकन विशेष प्रकारची छाटणी

deciduous
पतिष्णु विशिष्ट ऋऋतूत किंवा वेळी आपोआप गळून पडणारी, उदा. पांगारा, पळस, वड इत्यादींची पाने, वडाची उपपर्णे, गुलाबाच्या पाकळ्या इ. d. tree कदापर्णी वृक्ष, पानझडी वृक्ष पाने झडून जाणारा वृक्ष, उदा. शाल्मली, ओक, पांगारा, साग, भूर्ज, खैरचाफा इ.

declinate
अभिनत पुढे किंवा खाली वाकलेले, उदा. काही फुले, केसरदले, किंवा किंजले इ.

decoloratus
वर्णहीन, विवर्ण, रंगहीन discoloured

decolouration
वर्णनाश, विरंजन रंगद्रव्याचा नाश होणे किंवा करणे

decomposer
अपघटक ecosystem.

decompound
बहुदलित, बहुदली तीनपेक्षा अधिकवेळा पूर्णपणे, पानाचे पाते विभागून बनलेले संयुक्त पान, उदा. गाजर, शेवगा

decorticated
वल्कहीन साल काढलेले, मध्यत्वचेपासून बाहेरचा भाग सोलून काढलेले (उदा. खोड) girdling

decumbent
पार्श्वारोही जमिनीवर सरपट वाढून टोकास वर वळलेले (खोड) उदा. पुनर्नवा

decurrent
अधोगामी खोडास चिकटून पर्णतलाच्या खाली काही अंतरावर वाढत गेलेले (पाते), उदा. गोरखमुंडी running down

decussate opposite
जात्यसम संमुख समोरासमोर असलेल्या पानांच्या जोड्या एकाआड एक (खोडाच्या) पेऱ्यावर, एकमेकांशी काटकोनात असण्याचा प्रकार, उदा.रुई, पेरु, झिनीया, कडू (Swertia decussata Nimmo. ex. Grah) इ.

dedoublement
द्विखंडन पाने किंवा पुष्पदले यांच्या दुभंगण्यामुळे त्यांची संख्या दुप्पट किंवा अधिकपट होणे उदा. मोहरीच्या फुलातील केसरदले (doubling, chorisis)

deficiency
न्यूनता, त्रुटि, अभाव आवश्यक रासायनिक घटकाचा अभाव, रंगसूत्राच्या टोकाचा भाग नाहीसा होणे (लोप होणे), त्या भागात तर्कयुज नसतो centromere.

definite
कुंठित, मर्यादित अक्षाची मर्यादित वाढ होण्याचा प्रकार, पुष्पबंधाच्या (फुलाऱ्याच्या) अक्षाची वाढ फूल टोकास आल्यावर थांबणे d. inflorescence कुंठित पुष्पबंध

definitive nucleus
अंतिम प्रकल फुलझाडांच्या बीजकातील गर्भकोशात त्याच्या दोन्ही टोकांकडून आलेल्या एकेक एकगुणित प्रकलाच्या संयोगाने बनलेला एक द्विगुणित प्रकल d. host अंत्याश्रय जीवोपजीवी वनस्पतींच्या अनेक आश्रय देणाऱ्या वनस्पतींपैकी शेवटचा (निश्चित) diploid, haploid

deflexed
बहिर्नत बाहेरच्या बाजूस वाकलेले उदा. संकेश्वराची केसरदले reflexed

defoliation
पर्णत्यजन, पर्णत्याग, पानगळ निसर्गतः पानांचा त्याग करण्याची (पाने गळण्याची) प्रक्रिया

deformation
विरुपण, विकृति कुरुपता येण्याची प्रक्रिया, रोग, जखम इत्यादी कारणांमुळे अवयवांना अनित्य आकार येणे उदा. पाने किंवा फळे वाकडीतिकडी होणे

deformity
विकृति, विद्रूपता अनित्य आकार, नित्यस्वरुपात बदल

degeneration
अवनति, ऱ्हसन, अपकर्ष निकृष्टपणा येण्याची प्रक्रिया, विशिष्ट अवयवांतील कार्यक्षमता व त्यांचे मूलस्वरुप यात कमीपणा येणे, एखादी पिढी व जाती क्रमाने निकृष्ट होत जाणे, उदा. पानाऐवजी खवले येणे, जलवनस्पतीतील संरचनेत काही भागांचा (उदा. वाहक संच, काठिण्य इ.) अंशतः लोप होण्याची घटना

degradation
परागति, प्रतिगमन retrogression

dehiscence
स्फुटन, स्फोट बीजुकाशय, बीजुककोश, परागकोश किंवा शुष्क फळे यांची आपोआप तडकण्याची प्रक्रिया, उदा. शेवाळी, नेचे, बोंड, शेंगा इत्यादी फळे d. lateral पार्श्विक स्फुटन बाजूच्या चिरीतून किंवा भोकातून फुटून बी किंवा बीजुके बाहेर पडण्याचा प्रकार, उदा. एक्किसीटमचा

dehiscent
स्फुटनशील, फुटीर आपोआप तडकणारे (अवयव), उदा. फळ, बीजुककोश इ.

dehydration
निर्जलीकरण पदार्थातील पाणी काढून टाकण्याची प्रक्रिया

deletion
लोप, उच्छेद, वगळणे रंगसूत्राच्या मधल्या भागाचा नाश होण्याची प्रक्रिया, यात तर्कुयुज नसतो.

delimitation
परिच्छेदन निश्चित मर्यादा घालून काही भाग वेगळा करणे, उदा. एखाद्या कोशिकेतील प्राकलाचा काही भाग विशिष्ट कार्याकरिता मध्ये पडदा घालून वेगळा करणे

delimited
परिछिन्न वर वर्णन केल्याप्रमाणे वेगळा केलेला (भाग), उदा. शैवले, कवक

deliquescent
१ बहुशाखित २ चिघळणारा १ जमिनीवर वाढणाऱ्या प्रमुख अक्षावर (खोडावर) काही उंचीवर अनेक फांद्या असलेली वनस्पती, उदा. वड २ हवेतील ओलावा शोषून काहीसा अर्धवट विरघळत जाणारा अवयव, उदा. काही कवक, काहींच्या फुलातील परिदले, उदा. केना, इकॉर्निया इ. Phallaceae

deltoid
त्रिकोनी तीन कोन असलेल्या आकृतीप्रमाणे (उदा. पान, छद).

dendroid
शाखित, वृक्षाभ वृक्षासारखा, अनेक शाखा असलेला

dendrology
वृक्षविज्ञान वृक्षांसंबंधीच्या माहितीची ज्ञानशाखा

denitrification
विनायट्रीकरण नायट्रोजनयुक्त पदार्थातील अपघटनामुळे नायट्रोजन वेगळा होऊन जाणे

density
घनता एखाद्या स्थलविषयक एककातील (ठराविक क्षेत्रातील) व्यक्तींची संख्या abundance.

dentate
प्रदंतुर, दंतुर, सरलदंती बाहेरच्या बाजूस टोके असलेले दाते असणारी (कडा किंवा किनार), उदा. शिंगाडा

denticulate
लघुदंतुर बाहेर टोके असलेले पण लहान दाते असणारी (किनार)

depressed
अवनत झुकलेला किंवा खाली दबलेला (भाग)

dermatogen
त्वचाजनक खोड अथवा मूळ यांच्या टोकास असलेल्या व सतत वाढ चालू असलेल्या भागातील सर्वात बाहेरचा कोशिकांचा थर, यापासून अपित्वचा बनते. protoderm  protoderm

dermis
त्वचा कोशिकांचा थर epidermis, hypodermis, endodermis इ.

descending axis
अवरोही अक्ष खाली वाढत जाणारा वनस्पतीचा आस d. ovule अवरोही बीजक किंजपुटाच्या बाजूच्या भिंतीत उगम पावून खाली वाढत गेलेले बीजक

descent
१ अवरोह २ अवतरण १ भूमीत किंवा भूमीकडे खाली वाढण्याची (वाहण्याची) प्रक्रिया २ एका पिढीतून दुसरी पिढी याप्रमाणे चालू राहणारा क्रम d. doctrine of common सामान्य अवतरण सिद्धांत सर्व सजीव सारख्याच व प्राचीन (प्रारंभिक) पूर्वजांपासून क्रमाक्रमाने बदल होत जाऊन

desert
मरुभूमी, मरुस्थल रुक्ष प्रदेश, पाण्याची कमतरता, भयंकर ऊष्णता, कडाक्याची थंडी, रेताड किंवा खडकाळ जमीन इत्यादीमुळे वनस्पतींच्या वाढीस प्रतिकूल असा प्रदेश, उदा. गोबी, सहारा, कलहारी, धुव प्रदेश, कच्छचे रण इ. d. flora मरुपादपजात प्रतिकूल परिस्थितीतही (वर

desertion of host
आश्रयत्याग ज्या सजीवावर आपली उपजीविका चालू असते तिला विशिष्ट काली सोडून अलग होण्याची प्रक्रिया, उदा. अर्गट lipoxeny

dessication
आर्द्रशोषण ओलावा काढून घेण्याची कृति (प्रक्रिया)

destarched
निर्ताऐकीकृत विशिष्ट अवयवात असलेले तौकीर (स्टार्च) नाहीसे केलेले अथवा त्याचे साखरेत रुपांतर करून ते इतरत्र नेलेले.

destructive metabolism (katabolism)
अपचय, विध्वंसक (भंजक) चयापचय संयुक्त अन्नकणांचे अथवा ऊतकांचे अनुक्रमे साध्या पदार्थात अथवा थोड्याफार नाशात रुपांतर करण्याची रासायनिक प्रक्रिया उदा. रूजणाऱ्या बिया, बटाटे व तत्सम कंद अथवा मुळे

determinant
निर्धारक, गुणघटक (कारक) संततीत उतरणाऱ्या गुणांची (लक्षणांची) अगाऊ निश्चिती करणारा प्रजोत्पादक कोशिकेच्या (गंतुकाच्या) रंगसूत्रातील घटक, याचे स्वरुप जनुक प्रकारचे असते, जनुके व त्यांचे रासायनिक स्वरुप याबद्दलच्या कल्पना आता काही अंशी निश्चित झाल्याने, वरील

determinate
१ निश्चित, निर्धारित २ कुंठित १ पुढे कोणती घटना, ऊतक, गात्र इ. होणार त्याची अगाऊ निश्चिती २ टोकावरच्या फुलामुळे मर्यादित झालेल्या अक्षाचा फुलोरा, वल्लरी d.growth निश्चित वर्धन (वृद्धि) वनस्पतींच्या कोणत्याही अवयवाची आधी निश्चित झालेली अथवा मर्यादित वाढ,

determination
निश्चिती, निर्धारणा, निर्णय निश्चित करणे उदा. वनस्पतीचे नाव (ती पूर्वी नोंदली असल्यास) व तिचे वर्गीकरणातील स्थान नक्की करणे d. of sex लिंगनिश्चिती, लिंगनिर्णय भावी पिढीतील संततीच्या लिंगभेदासंबंधी फलनापूर्वी अथवा फलनक्रियेत घडून येणाऱ्या घटना, कोणत्या

deuteromycetes
अपूर्ण कवक वर्ग, ड्युटेरोमायसेटीज (ड्युटेरोमायसेटी) ज्यांच्या विषयी पूर्ण माहिती उपलब्ध नाही किंवा त्यांच्या प्रजोप्तादक अवयवांसंबंदी पूर्ण कल्पना येत नाही व त्यामुळे ज्यांचा इतर कवकवर्गात अंतर्भाव करता येत नाही अशा कवकांचा (काहीसा तात्पुरता) गट

development
विकास, विकसन प्राप्त परिस्थितीत सजीवाच्या किंवा त्याच्या एखाद्या अवयवाच्या प्रारंभिक अवस्थेपासून ते पूर्णावस्थेपर्यंत होणाऱ्या बदलाची प्रक्रिया, यामध्ये संरचनात्मक प्रभेदन अभिप्रेत असते.

deviation
विचलन, अपगम ठराविक अवस्थेपासून किंवा नित्यस्थितीपासून काही कारणामुळे (उदा. भेदामुळे) घडून आलेला बदल. उदा. एखाद्या फळाच्या किंवा बियाच्या वजनात किंवा आकारमानात आणि नित्याच्या सरासरी वजनात किंवा आकारमानात आढळलेला फरक.

Devonian period
डेव्होनियन पीरीयड, डेव्होनी कल्प सुमारे ४० कोटी ते ३६.५ कोटी वर्षापूर्वीचा भूशास्त्रीय कालखंड, सिल्यूरियन व कॉर्बाएनिफेरस कल्पांमधील कालखंड.

dextral
सव्य, दक्षिणावर्त, उजवा d. twiner सव्य वलयिनी, उजवी वेल पहा clockwise twiner  clockwise  dextrose, clockwise, right handed

di-
द्वि- दोन किंवा दुप्पट या अर्थाचा उपसर्ग

diad
युगुल, जोडी, द्वय उदा. द्विसंयोजी रंगसूत्रे dyad

diadelphous
द्विसंघ केसरदलांचे दोन जुडगे (गट) असलेले उदा. अगस्ता, वाटाणा यांच्या फुलातील केसरमंडले

diageotropic
क्षितिजानुवर्तनी, भूपृष्ठानुवर्तनी क्षितीजाशी किंवा भूपृष्ठाशी समांतर (आडवी) वाढत राहणारी किंवा गुरुत्वाकर्षणाच्या रेषेशी काटकोनात वाढणारी उदा. मुळाशी अगर खोडाची बाजूची फांदी, काही फुलांचे देठ, पाने इ.

diageotropism
क्षितिजानुवर्तन, भूपृष्ठानुवर्तन वर वर्णन केल्याप्रमाणे वाढीची प्रक्रिया किंवा प्रवृत्ती, गुरुत्वाकर्षणाच्या चेतनेमुळे दर्शविलेली (वाढ अभिप्रेत असलेली) प्रतिक्रिया

diagnosis
प्रवर्णन लॅटिन भाषेत वनस्पतीचे अधिकृत व आंतरराष्ट्रीय संकेतानुसार केलेले वर्णन

diagonal plane
कर्ण प्रतल फुलाच्या पुढच्या (पुरश्च, खोडापासून दूरच्या) व मागच्या (पश्च, खोडाजवळच्या) बाजूतून जाणारी पातळी व ह्या पातळीस काटकोनात छेदणारी पातळी. ह्या दोन्हींच्या मधल्या कोनाला सारखी विभागणारी तिसरी पातळी. anterior, posterior

diagrammatic representation
रेखाकृति प्रतिरुपण वस्तूचा, व्यक्तीचा किंवा अवयवाचा आकार किंवा रचना रेषांनी दर्शविणारी आकृती

diaheliotropic
प्रकाशजात्यानुवर्तनी प्रकाशकिरणांशी काटकोनात वाढणारे, उदा. सामान्य (द्विपार्श्व) पाने

diaheliotropism
प्रकाशजात्यानुवर्तन वर वर्णिलेली वनस्पतींच्या काही अवयवांची प्रतिक्रिया उदा. पानांची (सामान्यपणे) स्थिती.

diakinesis
चतुष्ट्यावस्था प्रकलातील न्यूनीकरण विभाजनातील मध्यावस्थेतील रंगसूत्रांची अंतिम स्थिती, यावेळी समजात रंगसूत्रांच्या जोड्या तयार होऊन त्यांच्या अर्धांनी आपल्या काही भागांची अदलाबदल केलेली असते, प्रकलावरण अद्याप टिकून असते व एकंदर रंगसूत्रे चारीच्या संचात असतात.

Dialypetalae
मुक्तप्रदली गोत्र द्विदलिकित वनस्पतींतील संवर्त व सुट्या पाकळ्या असलेल्या फुलांच्या वनस्पतींचा एक गट, एका गोत्रात अनेक गण व कुले असून वरील लॅटिन संज्ञा एंडलिकर व् जुस्यू या वनस्पतीशास्त्रज्ञांनी दिली आहे. cohort (गोत्र) Polypetalae

diandrous
द्विकेसरी फक्त दोन केसरदले असलेले, उदा. जाई, जुई, इत्यादींची फुले

diaphragm
अंतःपटल, मध्यपट शरीरांतर्गत पातळ पडदा, उदा. कमळाचा देठ

diarch
द्विसूत्र, द्विसूत्री खोड व मूळ यांच्या अंतर्रचनेत दोन ठिकाणी आद्यप्रकाष्ठ असलेले (प्रकाष्ठ अगर रंभ) d. stele द्विसूत्र रंभ काही नेचे

diastase
डायास्टेज तौकिराचे शर्करेत रुपांतर करणारे कार्बनी निदेशक (वितंचक) amylase

diaster stage
द्वितारकावस्था समविभाजनात रंगसूत्रे विभागून कोशिकेच्या दोन टोकाकडे जात असताना (मध्यावस्था) त्यांच्या दोन तारकेसारख्या होणाऱ्या आकृती

diastole
प्रसरण जीवद्रव्यातील (प्राकलातील) संकोचशील रिक्तिकांचे (रित्या जागांचे) प्रसरण पावणे systole

Diatomacae
करंडक कुल, डायाटोमेसी, बॅसिलॅरिओफायसी शैवल वनस्पतींपैकी अएककोशिक व एकावर दुसरे डबीप्रमाणे (करंड्याप्रमाणे) बसणाऱ्या दोन (वालुकामय झाकणाचे) सारख्या भागांचे शरीर असलेल्या गोड्या किंवा खाऱ्या पाण्यातील सूक्ष्म वनस्पती. (Bacillariophyceae, Diatomeae, Diatoms)

diatomaceous earth
करंडकीय मृदा करडक वनस्पतींच्या मृत शरीराची अवशेषरुपी माती (रेती)

dicarpellary
द्विकिंज bicarpellary

dicaryon
प्रकलयुग्म एका कोशिकेच्या प्राकलात असलेल्या दोन स्वतंत्र प्रकलांच्या संयोगाचा एक संयुक्त प्रकल, अथवा हे सतत जोडीने पण अलग राहणारे दोन प्रकल, उदा. काही कवक (तांबेरा)

dichasial cyme
द्विशाख वल्लरी biparous cyme  dichasium

dichlamydeous
द्व्यावृत संवर्त व पुष्पमुकुट अशी दोन परिदलमंडले असलेले (फूल) उदा. चिंच, बाहवा, गुलाब monochlamydeous, achlamydeous

dichogamy
भिन्नकालपक्वता, असमपकता केसरदले व किंजदले एकत्र असूनही (एकाच फुलात) एकाच वेळी पक्क न होण्याचा प्रकार, यामुळे परपरागण अथवा असमयुति सहज साध्य होते. फुलझाडांखेरीज इतर वनस्पतींच्या बाबतीतही ही संज्ञा वापरतात.

dichotomous
द्विशाखी एका अक्षाच्या टोकाची कळी विभागुन दोन अक्ष वाढतात व पुढे त्या प्रत्येकाची वाढ अशाच प्रकारे होते. उदा. डिक्टिओटा शैवल, रिक्सिया शेवाळी, केवडा, शंखपुष्पी (Canscora sp.), भोकर (Cordia dichotoma Forst) इ.

dichotomy
द्विशाखाक्रम, द्विपदशाखाक्रम प्रमुख खोडाच्या टोकास वाढ थांबून, बाजूच्या बगलेतून दोन फांद्या (अक्ष) वाढून व त्याच पद्धतीने वाढ चालू राहून शाखा विस्तार होण्याचा प्रकार d. false छद्मी (आभासी) द्विशाखाक्रम अक्षावरची शेंड्याची कळी निसर्गतः किंवा अपघाताने नाश

diclinous
विभक्तलिंगी नर व मादी हे दोन प्रकारचे प्रजोत्पादक अवयव एकत्र (एका फूलात) नसणारे (फूल), उदा. मका, एरंड, काकडी इ. unisexnal, imperfect

dicliny
विभक्तलिंगता वर वर्णन केलेला प्रकार अथवा स्थिती

Dicotyledoneae
द्विदलिकित वनस्पती वर्ग बीजामध्ये दोनच दलिका (गर्भावस्थेतील पाने) असलेल्या वनस्पतींचा मोठा गट, याचा अंतर्भाव फुलझाडांमध्ये (आवृतबीज वनस्पतींच्या उपविभागात) करतात. सामान्य भाषेत द्विदल वनस्पती म्हणतात. दुसरा वर्ग एकदलिकितांचा होय. Monocotyledoneae,

dicotyledonous
द्विदलिकित, द्विबीजपत्री दोन दलिका (डाळिंब्या) असलेलं (बीज), उदा. पावटा, मोहरी, आंबा इत्यादी. अशी बीजे असलेल्या सर्व वनस्पतींना हेच विशेषण सामान्यपणे लावतात. द्विदळ अशी संज्ञा सामान्यपणे रुढ आहे. ह्या वनस्पतींची इतर प्रमुख लक्षणे - पानांमध्ये शिरांचे जाळे

dictyostele
जलरंभ, बहुलाद्यरंभ अनेक प्रारंभिक (साधे) रंभ असलेले, उदा. नेफोलेपिस नेचा protostele

dicyclic
द्विचक्रिक, द्विमंडलित विशिष्ट प्रकारच्या पुष्पदलांची एकाऐवजी दोन मंडले असणारे (फूल), उदा. मोहरीच्या फुलातील केसरमंडल, निशिगंधा (गुलछडी) च्या फुलातील परिदले, हिरव्या चाफ्याचे फुल

didymous
द्विभक्त १ फलांशाच्या जोड्या असलेले (फळ), उदा. धने, जिरे, अरसूळ (Conthium didymum Gaertn.) २ दोन भाग असलेले, उदा. काही परागकोशखंड उदा. साल्व्हिया

didynamous
दीर्घद्वयी, द्व्योन्नत दोन लांब व दोन आखूड केसरदले असलेले उदा. तुळशीच्या फुलातील केसरमंडल, पातेरी, टोरेनिया

differentiated
विभेदित आकार व संरचना यात विशेष रीतीने फरक (भेद) पडलेले (शरीर किंवा अवयव)

differentiation
प्रभेदन, विभेदन शरीरातील भिन्न कार्याला उपयुक्त असे भिन्न संरचनेचे व आकारमानाचे घटक बनण्याची प्रक्रिया, अवयवांच्या विकासात ही प्रक्रिया प्रमुखपणे आढळते. संरचनेत भेद वाढत जाणे हे येथे अभिप्रेत आहे.

diffuse
प्रसूत, विरलशाखी पसरुन वाढणारी वनस्पती, उदा. पुनर्नवा (Boerhaavia diffusa L.)

diffusion
विसृति, विसरण वनस्पतींच्या शरीराबाहेरील वायू, पाणी, जमिनीतील विद्राव (त्यातील आयने) इत्यादींचा भौतिक नियमाने होणारा शरीरात प्रवेश, विशिष्ट परिस्थितीत त्यांचे आतून शरीराबाहेर येणे. gland, stoma, hydathode, osmosis

digestive gland
पचन प्रपिंड, पचन ग्रंथि अन्नाचे सात्मीकरण होण्यास त्याचे रुपांतर करण्याकरिता उपयुक्त द्रव पदार्थ (उदा. वितंचक) स्त्रवणारे उपांग (संरचना, ग्रंथि, कोशिका इ.) उदा. कीटकभक्षक वनस्पती. d. sac पचनकोश मुळातून त्याची शाखा बाहेर पडत असताना मुळाच्या सालीतून बाहेर

digitaliform
हस्ताकृति हातमोज्याप्रमाणे आकार असलेले उदा. तीळ, विंचवी, तिलपुष्पी (Digitalis purpurea) इत्यादींच्या फुलांचे पुष्पमुकुट

digitate
चपेटाकृति बोटासह तळहाताप्रमाणे (पंज्याच्या) आकाराचे उदा. सावर, पून, गोरखचिंच इत्यादींची संयुक्त पाने, भुईकोहोळा (Ipomea digitata L.)

digonous
द्विकोनी आडवे कापल्यास दोन कोन दिसणारे,

digonous
द्विकोनी आडवे कापल्यास दोन कोन दिसणारे,

dihybridisation
द्विसंकरण वर सांगितलेली गुणद्वय संकरप्रक्रिया (प्रयोग)

dilation
विस्तार, विस्फारण प्रकाष्ठाच्या परिसरातील मृदूतकाच्या कोशिकांच्या विभागणीमुळे प्रकाष्ठात मधून मधून खंड पडल्यामुळे ते सर्वच फुगण्याचा प्रकार

Dilleniaceae
करंबळ कुल, डायलेनिएसी करंबळ, करमळ इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, एंग्लरच्या पद्धतीत याचा समावेश पराएटेलीझ गणात व हचिन्सन यांना याचा अंतर्भाव करंबळ गणात (डायलेनिएलीझमध्ये) केला आहे. प्रमुख लक्षणे- वृक्ष, झुडुपे कधी वर चढणारी, जाड एकाआड एक पाने व कुंठित फुलोऱ्यावर द्विलिंगी, अवकिंज फुले, सदले ३-५ किंवा अनेक व सर्पिल आणि फळावर सतत राहतात. पाकळ्या ३-५ व सुट्या, केसरदले अनेक, तसेच किंजदले १ ते अनेक, सुटी किंवा जुळलेली व बीजकेही एक किंवा अनेक. मृदुफळ किंवा पेटिकाफळ, सपुष्क बीजावर बीजोपांग.

dimerous
द्विभागी प्रत्येक मंडलात दोनच पुष्पदले असणारे (फूल) उदा. मोहरी

dimorphic
द्विरुप दोन आकारात आढळणारे (अवयव, सजीव) उउदा. काही नेचंआची पाने

dimorphism
द्विरुपता वर वर्णन केलेला प्रकार, उदा. बिशकोप्रा heterostyly, trimorphic

dioecious
विभक्तलिंगी भिन्न लिंगभेद दर्शविणारे अवयव (उदा. केसरदले किंजदले, अंदुककलश, रेतुकाशये इ.) दोन भिन्न वनस्पतीवर असणारी जाती, उदा. पपई, कुंकुमवृक्ष, सायकस, कॉलेर्पा आणि कोडियम या हरित शैवलांच्या काही जाती, एक्किसीटम अर्वेन्से इ.

dioecism
विभक्तलिंगता वर वर्णन केलेला प्रकार

Dioscoriaceae
आलुक कुल, डायॉस्कोरिएसी कणगर, गोराडू, कारंदा इत्यादी एकदलिकित वनस्पतींचे कुल, बेंथॅम व हूकर यांनी पलांडु गणात घातले आहे. प्रमुख लक्षणे- वेली, भूमिस्थित ग्रंथिल खोड व मुळे, साधी, एकाआड एक पाने (जाळीदार शिरांची), नियमित, एकलिंगी, त्रिभागी, लहान फुले भिन्न वनस्पतीवर असतात, अधःस्थ किंजपुटात १-३ कप्पे व प्रत्येकात २ बीजके, मृदुफळ किंवा बोंड, सपुष्क बी

diplo-
द्वि जोडी या अर्थाचा प्रत्यय d. coccus द्विगोलाणु जोडीने असणारे गोलाणु (गोल सूक्ष्मजंतू). d. idization द्विगुणन कोशिकेतील रंगसूत्रांंची संख्या दुप्पट होण्याची प्रक्रिया, एका एकगुणित प्रकलाऐवजी दोन तशीच प्रकले एकत्र येणे. d.phase (diploid phase)

Dipterocarpaceae
शाल कुल, डिप्टेरोकार्पेसी चालन (गुर्जन), शाल (साल), बोर्निओ कापूर इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. बेंथॅम व हूकर यांनी वृंदार (कोकम) गणात समावेश केला आहे. प्रमुख लक्षणे - साध्या एकाआड एक, जाड, सोपपर्ण पानांची उंच झाडे (वृक्ष), अकुंठित फुलोऱ्यावर, द्विलिंगी, नियमित, पंचभागी, अवकिंज फुले, ऊर्ध्वस्थ किंजपुटात तीन कप्पे व त्या प्रत्येकात दोन बीजके, सतत संवर्ताने वेढलेले कपाली सपक्ष फळ. साल (Shorea robusta Gaertn)

disc
विम्ब, चकती १ फुलातील पुष्पदलांमध्ये पुष्पस्थलीची वर्तुळाकार चकतीसारखी वाढ २ स्तबक फुलोऱ्यातील पसरट पुष्पासन ३ कंदातील खोडाचा संक्षिप्त चकतीसारखा भाग ४ थाळी, तबकडी इत्यादी अर्थाने वापरतात. d. adhesive आसंगी बिम्ब पहा adhesive disc. d. floret बिम्बपुष्पक

Disciflorae
बिम्बपुष्पी श्रेणी वर्गीकरणाच्या बेंथॅम व हूकर यांच्या पद्धतीत फुलझाडांच्या द्विदलिकित वर्गातील सुट्या पाकळ्या असणाऱ्या उपवर्गातील बिम्बयुक्त फुले असलेल्या वनस्पतींची श्रेणी Thalamiflorae

disciform
बिम्बसदृश सपाट व गोलाकार चकतीसारखे अथवा वर्तुळासारखे

discoid gland
बिम्बाभ प्रपिंड चकतीसारखे किंवा अर्धगोलाकार डोके असलेली, लांब अथवा आखुड दांड्यावर आधारलेली स्त्रावक ग्रंथि

discolour
भिन्नवर्णी दोन्ही पृष्ठभाग निरनिराळ्या रंगाचे असलेले, उदा. काळा चाफा (Unona discolour Vahol.) कानवला (Rhoeo discolour Hans), बिगोनिया इ. ची पाने

discontinuous
खंडित, असंतत सलगपणा (क्रमिकपणा) नसलेले (उदा. भेद) d.variation खंडित भेद अनेक व्यक्तींमध्ये (एकाच जातीच्या) आढळणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान अशा भेदांमध्ये ठराविक क्रमाचा अभाव. उदा. फळाचे सरासरी आकारमान व भेददर्शक असे मोठे फळ यामध्ये काही सलगपणा नसणे

disjunction
वियोजन प्रजोत्पादन कोशिका (गंतुके) निर्मिणाऱ्या जनक कोशिकेच्या न्यूनीकरण विभाजनात प्रथम एकत्र येणाऱ्या समजात लिंगसूत्रांच्या जोडीतील (एक बापाकडील व एक मातेकडील) प्रत्येक नंतर नित्याप्रमाणे अलग होण्याची प्रक्रिया, त्यानंतर त्यापैकी प्रत्येक स्वतंत्र गंतुकात राहतो. रंदुकात ते दोन्ही परत एकत्र येतात. मात्र क्वचित ते वर सांगितल्याप्रमाणे अलग न होता दोन्ही एकाच गंतुकात येतात व दुसऱ्या गंतुकात त्या रंगसूत्राचा अभाव आढळतो. या प्रकारास 'अवियोजन' म्हणतात (non disjunction) हाच प्रकार इतर रंगसूत्रांच्या बाबतीतही होणे शक्य असते. ह्यामुळे संततीच्या लिंगभेदात व काही लक्षणात फरक (भेद) पडतात, तसेच विशिष्ट लिंगभेदयुक्त व्यक्तींचे प्रमाणही बदलते.

disjunctive symbiosis
वियोजी (वियुक्त) सहजीवन परस्परांचे कायम निकट संबंध न राखता चालू असलेले सहजीवन (एकत्र जगणे). उदा. पक्षी आणि वृक्ष यांचा सहवास फक्त फळे खाण्यापुरता किंवा रात्री घरट्यात विश्रांतीकरताच असतो. ते कायमपणे चिकटलेले नसतात. conjunctive symbiosis

dispersal
विकिरण, प्रसार फळे, बीजे, बीजुके इत्यादींना जनक वनस्पतीपासून अलग करून इतरत्र नेण्याची नैसर्गिक प्रक्रिया

displacement
विस्थापन, स्थानच्युति एखादा अवयव निसर्गतः अनित्य जागी येणे. उदा. सूर्यफुलाच्या पुष्पासनाखाली, बाजूस दुसरे लहान स्तबक (फुलोरा) आलेले क्वचित आढळते.

dissected
१ खंडित २ विच्छेदित १ निसर्गतः अनेक भाग पडलेले, उदा. पाण्यातील पाने २ वर सांगितल्याप्रमाणे सुटे केलेले इ. (अवयव) उदा. फूल किंवा फळ

dissecting microscope
विच्छेदक सूक्ष्मदर्शक सूक्ष्म विच्छेदनाकरिता सोइस्कर असे उपकरण

dissection
विच्छेदन विशिष्ट पद्धतीनुसार वनस्पती अथवा प्राणी व त्यांचे भाग अभ्यासाचे दृष्टीने सुटे करणे, कापणे इ. प्रक्रिया

dissemination
प्रसार विशेषतः सूक्ष्म प्रजोत्पादक घटकांचे मूळ वनस्पतींपासून अलग करून दूरवर नेण्याची प्रक्रिया. उदा. बुरशी व भूछत्रे यांची बीजुके dispersal

disseminule
विकिर्णी स्थलांतराच्या अवस्थेतील वनस्पती, उदा. बीज, बीजुक, फळ इ.

dissepiment
पटल पातळ पडदा उदा. किंजपुटात किंजदलाच्या आत वाढलेल्या बाजू जुळून तयार झालेला पडदा, त्यामुळे त्यात कप्पे तयार होतात उदा. भेंडी d. spurious (replum) छद्मपटल किंजपुटाच्या बाजूकडून (शिवणीकडून) नंतर आत वाढत आलेला पडदा उदा. मोहरी partition

dissimilar
असम, विषम, असदृश सारखेपणा नसलेला (अवयव), उदा. वाटाण्याच्या फुलातील पाकळ्या, मुळे व खोड यांची संरचना, मुळे, खोड, पाने अनेक दृष्ट्या विषम असतात. unlike

dissolved
विलीन विरघळलेले

distal
दूरस्थ दूर असलेला, दूरचा उदा. पानाचे टोक देठाशी तुलना केल्यास खोडापासून दूर असते. proximal

distichous
द्विपंक्तिक दोन रांगांत असलेली उदा. गवताची पाने, रायआवळा (Phyllanthus distichous Muell).

distillation
ऊर्ध्वपातन एखादा द्रव पदार्थ उकळेपर्यंत तापवून व त्याची वाफ निववून तो परत द्रवरुपात (बहुधा पूर्वीपेक्षा अधिक शुद्ध स्वरुपात) आणण्याची प्रक्रिया

distinct
मुक्त, अयुक्त सुटे, न जोडलेले (न जुळलेले), उदा. काही केसरतंतू, परागकोश खंड, किंजदले, इत्यादी पुष्पदले

distractile
वियोजी परागकोशाच्या दोन खंडांना परस्परांपासून पूर्णपणे दूर ठेवणारी संधानी उदा. सॅल्व्हिया.

diurnal
१ दैनिक २ दिनचर १ दिवसा घडणारे २ दिवसा संचार करणारे d. sleep movements दैनिक (दिवा) निद्रावलन दिवसा (सूर्यप्रकाशात) रात्रीप्रमाणे घडून येणाऱ्या हालचाली उदा. लाजाळू, तरवड, चिंच इत्यादींची पाने daily

divaricate
अत्यपसारी परस्परापासून बव्हंशी दूर असलेले भाग, उदा. काही परागकोशांचे खंड, काही पानांतील शिरा divergent, forked.

divergence
परामुखता, अपसारण परस्परांपासून दुरावत जाणे, उदा. ताड, एरंड इत्यादींच्या पानातील शिरा, रुईची दोन पेटिकाफळे, कुडा, माकडशिंगी इत्यादींची फळे d.angle of उद्गमन कोन, परामुखता कोन पहा angle of divergence

divergent
परामुख, अपसारी परामुखता असलेले, परस्परापासून दूर होत गेलेल्या (उदा. शिरा)

divided
खंडित,मुक्त सुटे, एकमेकांपासून तळापर्यंत अलग झालेले (भाग), उदा. संदले, प्रदले, पानांची दले, पुष्पदले इ.

division
१ विभाग २ विभाजन १ वर्गीकरणातील मोठा गट (एकक), कोटीहून किंवा उपकोटीहून लहान २ विभागण्याची प्रक्रिया, उदा. कोशिका, प्रकल

DNA
डी एन ए प्राणी व वनस्पती यांच्या शरीरघटकातील एक रासायनिक पदार्थ, डी ऑक्सिरिबोज न्यूक्लीइक ऍसिड, प्रकलातील एक आम्ल chromosome, nucleotide

domesticated
१ संवर्धित २ पाळीव १ लागवडीमुळे टिकून राहिलेली (वनस्पती) २ पाळलेला प्राणी

dominance
१ प्रभाव २ प्राधान्य १ संकराच्या प्रक्रियेत दोन वैकल्पिक गुणांपैकी एकाची अधिक छाप संकरजात दिसण्याचा प्रकार २ वनस्पतिसमुदायातील काही व्यक्तींचा ठळकपणा ३ परिस्थितिविज्ञानात, एखाद्या पादपसमुदायातील प्रत्येक जातीच्या व्यक्तींनी व्यापलेली क्षेत्रमर्यादा, एखाद्या समुदायात अनेक थर असल्यास प्रत्येक थरातील प्रभाव स्वतंत्रपणे मोजला जाणे आवश्यक असते.

dominant
१ प्रभावी, प्रकट २ प्रधान १ संकरजात प्रत्यक्ष दिसून येणारे (लक्षण) पहा recessive २ संगति व संघात यातील सर्वात प्रभावी वनस्पती d. character प्रभावी लक्षण (गुण) संकरजातील प्रकट लक्षण association, consociation

dormancy
प्रसुप्तावस्था, तंद्रावस्था, प्रसुप्तता dormant

dormant
१ प्रसूर २ अप्रकट १ योग्य परिस्थितीच्या अभावी प्रकट न झालेले, उदा. कळी, बीज अथवा बीजुक यातील जीवन २ दोन वैकल्पिक गुणांपैकी संकरप्रजेत न दिसणारा पण त्यापुढच्या पिढीतील काही अपत्यांत आढळणारे लक्षण   d. bud सुप्तकलिका तात्पुरती वाढ थांबलेली कळी, मुका डोळा

dorsal
पृष्ठीन, पृष्ठीय, पश्च पाठीकडचा, पानाच्या बाबतीत वरची किंवा प्रकाशाकडे असलेली बाजू d.suture पृष्ठसेवनी पाठीकडची शिवण, किंजदलाची मध्यशीर, उदा. वाटाण्याच्या शेंगेतील बीजके न चिकटलेली शीर पहा ventral suture  adaxial

dorsifixed
पृष्ठालग्न, पृष्ठाबद्ध पाठीकडून चिकटलेले, उदा. कमळाचे परागकोश adnate  adnate

dorsiventral
द्विपार्श्व दोन बाजू असणारे d.(bifacial) leaf द्विपार्श्व पर्ण बाह्य स्वरुप व अंतर्रचना या बाबतीत दोन बाजू स्पष्ट दर्शविणारे पान d.(zygomorphic) flower द्विपार्श्व पुष्प एक पुरस्थ अर्ध दुसऱ्या (पश्च) अर्धाहून भिन्न असणारे (एकसमात्र) फूल, उदा. तेरडा पहा

dosage
मात्रा योग्य परिणामकारक व्हावे असे एखाद्या औषधाचे प्रमाण dose

double
द्विगुणित, दुहेरी, दुप्पट, द्वि (उपसर्ग) दुप्पट भाग असलेले, उदा. पाकळ्या (निशिगंध), तगर, मोगरा, जास्वंद, तेरडा इ.) d.cross दुहेरी संकर, द्विसंकर एका संकरजाचा दुसऱ्या संकरजाशी घडविलेला संकर d. fertilisation द्विफलन फुलझाडाच्या बीजकातील अंदुकाशई

down
मृदुलोम मऊ लव उदा. ऐसर (ईश्वर)

downy
मृदुलोमश, लवदार मऊ लव असलेले, उदा. रुई, तीळ d. mildew तंतुभरी जीवोपजीवी कवकापासून होणारा रोग, यामुळे पानांवर पांढरट रंगाचे मऊ लवीसारखे कवकतंतूंचे ठिपके येतात. उदा. द्राक्षाच्या वेलीवर हा रोग होतो. pubescent

draining point
निःसरणाग्र, प्रकुंचिताग्र acuminate apex  drip tip

drepanium
वक्रवल्लरी, दात्रवल्लरी कोयत्याच्या आकाराचा कुंठित फुलोरा helicoid

dropping
लोंबती, नत खाली लोंबणारी, उदा. फुले (कोरफड, कलांचो), फांद्या, पाने (हिरव्या अशोकाचा एक प्रकार)

drought
जलदुर्भिक्ष, जलाभाव पाण्याची दुर्मिळता (तुटवडा), रुक्षता d.physical भौतिक (वास्तव) जलदुर्भिक्ष वाळवंट किंवा खडकाळ ठिकाणी आढळणाऱ्या जमिनीतील पाण्याची टंचाई d. physiological क्रियावैज्ञानिक जलदुर्भिक्ष जमिनीत पाणी असूनही, क्षार, लवणे, अम्लता, अति थंडपणा,

drug
औषध शरीरातील दोष नाहीसे करून आरोग्यप्राप्तीचा लाभ देणारा पदार्थ

drupe
अश्मगर्भी फळ, अष्ठीला, आठळी फळ, बाठी फळ फलावरणाचा सर्वांत आतला कठीण (कवचासारखा) असलेले (बाठी असलेले) रसाळ फळ, उदा. आंबा, बदाम, अक्रोड, जरदाळु इ. d.fibrous तंतुमय अश्मगर्भी फळ रस किंवा मगज याऐवजी धाग्यांनी भरलेले पण करवंटी असलेले फळ उदा. नारळ nut  stone

drupelt
उपाष्ठीला अनेक आठळ्यांच्या घोसफळातील एक उदा. रासबेरी

duct
नलिका, वाहिनी राळ, श्लेष्मल (चिकट) द्रव्य, चीक यांसारखे पदार्थ साठविणे, किंवा बाहेर टाकणे, याकरिता शरीरातील सलग नळीसारखा घटक किंवा कोशिकांमधून जाणारा मार्ग उदा. चीड, चिल, अफू, सायकस इ.

dulcis
मधुर गोड, खारट, तुरट, कडवट इत्यादी नसलेले उदा. विलायती चिंचेतील (इंगा डल्सिस) बीजाभोवतालचा मगज (Pithecolobium dulce Benth). sweet

dune
वालुकाराशि वाऱ्याने किंवा मोठ्या लाटांनी किनाऱ्यावर किंवा वाळवंटात जमलेल्या वाळूचे लहान मोठे ढीग (उंचवटे)

duplex
द्विघटक विशिष्ट आनुवंशिक गुणांचे बाबतीत आई किंवा बाप यांच्याकडून एकाच लक्षणाचे दोन प्रभावी गुणघटक संततीत उतरण्याची घटना, एकच प्रभावी घटक उतरल्यास एकघटक (simplex) आणि एकही न उतरल्यास अघटक (nulliplex) अशा संज्ञा आहेत. dominant, allelomorph

duplicate
द्विगुण्य, द्विरुप दुप्पट संख्या असलेले उदा. आनुवंशिक परिमाणात्मक लक्षणांचे संततीत अनुहरण होताना दोन प्रभावी घटक जबाबदार असण्याचा प्रकार, उदा. गव्हाचा रंग

duplication
द्विगुणन दुप्पट होणे, उदा. फुलातील मंडले किंवा त्यातील अवयव, रंगसूत्रे, कोशिका इ.

duramen
अंतःकाष्ठ जून खोडाच्या मध्यभागी असलेले गडद रंगाचे (मृत) लाकूड, यांचे कार्य फक्त मजबुती आणण्याचे असते. alburnum  heart wood

duration of life
आयुर्मान, आयुःकाल वनस्पतीची सर्वसाधारण जीविताची मर्यादा

dwarf male
ऱ्हस्व पुं-तंतु, लघु नर फार लहान आणि फक्त पुं-गंतुके निर्माण करणारा तंतू, उदा. इडोगेनियम शैवल

dwarf shoot
ऱ्हस्व प्ररोह, लघु शाखा १ केवळ दोन किंवा तीन पाने असणाऱ्या लहान मर्यादित शाखा, उदा. चीड, चिल इ. २ अत्यंत मर्यादित वाढ असणाऱ्या शाखा, उदा. फणसाच्या खोडावरील फुलोऱ्याच्या शाखा

dwarfishness
ऱ्हस्वता, लघुत्व खुजेपणा, खुरटेपणा, वाढीमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे आलेला अथवा कृत्रिमरीत्या आणलेला, साधारणपणे निसर्गतः रुक्ष प्रदेशातील वनश्री खुरटी असते. dwarfism