वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा
There are currently 196 names in this directory beginning with the letter B.
bacca
मृदुफळ आठळी (बाठा) नसलेले मगजयुक्त किंवा रसाळ साधे फळ उदा. केळ, संत्र, पेरु, बहुधा यातील कठीण बिया भगजात विखुरलेल्या असतात. उदा. बिर्मी (Taxus baccata L.) (baccate, fruit , berry)
bacillus
दंडाणु साधारणपणे अत्यंत साधी, अतिसूक्ष्म, एककोशिक, लांबट, हरितद्रव्यहीन, परोपजीवी वनस्पती, कधी कधी ही संज्ञा बीजुकजनक दंडाणूंच्या वंशालाच फक्त वापरतात. उदा. विषमज्वर व धनुर्वात इत्यादींचे रोगकारक सूक्ष्मजंतू bacterium
back cross
पूर्वसंकर संकरजाच्या आईबापापैकी एकाशी केलेला (झालेला) त्याचा संकर, या प्रयोगामुळे आनुवंशिक लक्षणांचे अनुहरण कसे होते यावर प्रकाश पडतो.
bacterioid
विकृतजंतू शारीरिक बिघाड झालेला जंतू, शिंबी (शेंगा येणाऱ्या) वनस्पतींच्या मुलावरील गाठीत हे जंतु आढळतात.
Bacterium
शाकाणु, जीवाणु, सूक्ष्मजंतु साधी, अतिसूक्ष्म, एककोशिक, भिन्न आकार दर्शविणारी, हरितद्रव्यहीन, परोपजीवी वनस्पती, काही हालचाल करतात. काही स्वोपजीवी (स्वावलंबी) व काही मृतोपजीवी व जीवोपजीवी असतात. कुजणे, आंबणे, नासणे इत्यादी प्रक्रिया घडविण्याचे व प्रकाश, रंग
balausta
दाडिमक, दाडिमसम डाळिंबासारखे फळ, बीजाभोवती रसाळ आवरण असणारे व अधःस्थ किंजपुटापासून बनलेले मृदुफळ, bacca
Balsaminaceae
तेरडा तेरणा कुल, बाल्समिनेसी रिठा (्अरिष्ट) गणातील फुलझाडांचे एक लहान कुल, याचा समावेश हचिन्सन यांनी हल्ली जिरॅनिएलीझमध्ये (भांड गणात) केला आहे. बेंथॅम व हूकर यांनी यातील वनस्पतींचा समावेश जिरनिएसी कुलात (भांड कुलात) केला आहे. तेरडा कुलात दोन वंश व सुमारे
banner
ध्वजक पतंगरुप फुलात आढळणारी मोठी, रुंद व ठळकपणे दिसणारी पाकळी, उदा. गोकर्ण, तूर, अगस्ता papilionaceous.
bare area
अनावृत क्षेत्र, नग्न प्रदेश वनस्पतीची वस्ती ज्यावर अद्याप झाली नाही किंवा असलेली पूर्णपणे नाश पावलेली आहे अशी भूमी.
bark
वल्क, साल जुन्या काष्ठमय खोडाची किंवा मुळाची बाहेरुन संरक्षण करणारी बव्हंशी मृत कोशिकांची बनलेली साल, वल्क या संज्ञेत सजीव त्वक्षाकरासह त्यावरील सर्व मृतकोशिकांचे थर समाविष्ट करतात. cork cambium, cork, ring bark, scale bark
barren
१ ऊषरा २ वंध्य, वांझ १ जीवनास आवश्यक त्या परिस्थितीच्या अभावी नापिक राहिलेली जमीन उदा. वाळवंट, खडकाळ किंवा हिमाच्छादित प्रदेश २ फळ किंवा कार्यक्षम बीज न बनवणारे (फूल) उदा. लागवडीतील केळ, अलू, गुलाब इ. b. bract वंध्यछद बगलेत फूल नसलेले छद उदा. अननस b.
barrier
प्रतिबंधक, अवरोधक, रोधक अडसर, अडथळा करणारे, वनस्पतींच्या जातींच्या मुक्त प्रसाराला मर्यादा घालणारा घटक, उदा. उंच पर्वत, प्रतिकूल हवामान, महासागर इ.
basidiocarp
गदाफल गदाकवक वर्गात बहुतेक आढळणारा व गदाकोशिका आणि त्यावरची गदाबीजुके निर्माण करणारा प्रजोत्पादक अवयव
Basidiomycetes
गदाकवक वर्ग, बेसिडिओमायसेटिज सत्यकवकांपैकी काहींमध्ये विशिष्ट प्रकारची गदेसारख्या बीजुककोशावर निर्माण होणारी गदाबीजुके निर्माण करणारा एक गट, उदा. भूछत्रे, तांबेरा, काणी इ. Eumycetae, Eubasidii, Hemibasidii (Basidiomycetae)
basidiospore
गदाबीजुक गदाकवकामध्ये आढळणारे व गदेसारख्या कोशिकेबाहेर निर्माण होणारे एककोशिक व एकगुणित बीजुक (प्रजोत्पादक अलिंग कोशिका).
basidium
गदाकोशिका गदाकवकात आढळणारी विशिष्ट, काहीशी गदेसारखी व प्रजोत्पादक, अखंड किंवा विभागणारी कोशिका, हिच्या टोकावर दोन किंवा चार बीजुके बनून ती सुटून जातात व रुजल्यावर नवीन एकगुणित कवकतंतूंचे जाळे बनते. गदाबीजुके बनण्यापूर्वी गदाकोशिकेत द्विगुणित प्रकल असतो. बीजुके बनण्यापूर्वी न्यूनीकरण विभाजनाने एकगुणित प्रकल बनतात व प्रत्येक बीजुकात एक याप्रमाणे प्रवेश करतात.
basipetal
तलवर्धी टोकापासून तलाकडे क्रमाने होणारी (फुलोऱ्याची) वाढ, यामुळे सर्वात जून भाग (उदा. फुले) टोकाजवळ व सर्वात कोवळा (अपक्व फुले, कळ्या) तळाजवळ असा प्रकार, उदा. जाई, चमेली, रानटी गुलाब यांचे फुलोरे acropetal, centripetal
bast
परिकाष्ठ वनस्पतींच्या शरीरात अन्नरसाची ने-आण करणाऱ्या जिवंत, लांबट कोशिका (सछिद्र नलिका) व त्यासमवेत आढळणाऱ्या इतर कोशिका, सूत्रे इत्यादींचा संच (ऊतक) b. fibre परिकाष्ठ सूत्र परिकाष्ठातील दृढ आवरणाच्या लांब व मजबूत कोशिका b. hard उपकाष्ठ परिकाष्ठालगतचा
beaded
मणिमालाकृति अनेक गाठींचे बनलेले व मण्यांच्या माळेप्रमाणे दिसणारे, उदा. काही मुळे, काही लाल शैवलाचे तंतू, काही केसरदलावरचे केस monoliform
Begoniaceae
शोभापर्ण कुल, बिगोनिएसी बिगोनिया, बिगोनिएला इत्यादी चार लॅटिन नावाच्या वंसातील द्विदलिकित फुलझाडांचे कुल. बेसींनी यांचा अंतर्भाव लोझेलीझ गणात व हचिन्सन यांनी कर्कटी गणात (कुकर्बिटेलीझ) केला आहे. तत्पूर्वी बेंथॅम व हूकर यांनी कृष्णकमळ गणात केला होता. प्रमुख लक्षणे - बहुवर्षायु, भूमिस्थित खोडाच्या औषधीय वनस्पती, काही मुळांच्या साहाय्याने वर चढणाऱ्या वेली, मूलज, सोपपर्ण किंवा एकाआड एक, असमात्र ,साधी पाने, बगलेतील लहान ग्रंथिल अवयव किंवा पानाचे तुकडे यांपासून नवीन वनस्पती बनतात. फुले एकलिंगी, परिदले सुटी, नरफुलात दोन किंवा चार परिदले व स्त्री फुलात दोन ते पाच, केसरदले अनेक, जुळलेल्या दोन ते तीन अधःस्थ किंजदलापासून बनलेल्या किंजपुटात दोन ते तीन कप्पे व त्यात अनेक अधोमुखी बीजके, पंखयुक्त बोंड व अपुष्क बिया, शोभादायक पानांमुळे शोभापर्ण कुल असे या कुलाला म्हटलेले आढळते.
bell jar
घंटापात्र, हंडी घंटेच्या आकाराचे प्रयोगाकरिता वापरात असलेले खाली अधिक रुंद व वरच्या बाजूस थोडे निरुंद व फुगीर असे काचपात्र
bell shaped
घंटाकृति फुलातील घंटेच्या आकाराचा संवर्त किंवा पुष्पमुकुट उदा. लाल भोपळा, पिवळी कण्हेर इ. campanulate
belt life
जैवपट्ट वनस्पतींच्या (पादप) समुदायांच्या भौगोलिक वाटणीवरुन केलेल्या वर्गीकरणातील कमी पातळीवरचे एकक, जैव जिल्हे व जैव प्रांत हे अनुक्रमे त्यापेक्षा वरच्या पातळीतील आहेत. zonation.
belt transect
अनुच्छेदी पट्ट वनस्पतींच्या मोठ्या समुदायातील नमुन्यादाखल निश्चित केलेल्या क्षेत्रातील एक अरुंद जमिनीचा पट्टा, यातील वनस्पतींची मोजदाद वगैरे करून त्या समुदायातील पादपसंघटनाची माहिती घेण्याची पद्धत आहे.
Bennettitales
बेनेटायटेलीझ मध्यजीव महाकल्पातील विलुप्त प्रकटबीज वनस्पतीचा गण, बाह्यरुप, खोड व पान यांची संरचना सायकॅडेलीझ प्रमाणे. दोन्ही प्रकारची बीजुकपर्णे एकाच शंकूत असतात Cycadales, Gymnospermae
benthos
जलतलस्थ जीवसमूह खाऱ्या किंवा गोड्या पाण्यात तळाशी राहून जगणारा प्राणी वा वनस्पती यांचा समूह plankton, nekton, pelagic
Betulaceae
भूर्जकुल, बेच्युलेसी भूर्ज, हॅझेल, कुनिस इत्यादी द्विदलिकित प्रारंभिक (किंवा ऱ्हसित) वनस्पतींचे कुल. याता अंतर्भाव मोरवेल गणात (रॅनेलीझ) सर्वसाधारणपणे केला जातो. तत्पूर्वी नतकणिश गणात (ऍमेटिफेरी) किंवा ओक गणात (क्कर्सिफ्लोरीत) केला जात असे. प्रमुख लक्षणे
biciliate
द्विकेसली दोन केसले असलेली (कोशिका), उदा. काही शैवले (क्लॅमिडोमोनॅस) अथवा त्यांची गंतुके (क्लॅडोफोरा, उल्व्हा इ.) cilium. gamete
bicollateral
द्विसंलग्न दोन बाजूंनी वेढलेला, प्रकाष्ठाच्या दोन्ही बाजूस ऊतककर व परिकाष्ठ असलेला (वाहकवृंद), उदा. काकडीचे खोड vascular bundle
bicolor
द्विवर्णी, दुरंगी पानाचे वरचे व खालचे पृष्ठ भिन्न रंगाचे असलेले उदा. बिगोनिया, ताराफळ, कमळ, ट्रॉडेस्कॅन्शिया, उदीचिराइत Exacum bicolor Roxb. two coloured
bicrenate
द्विस्थूलदंतुर पानाच्या कडेवरचे बोथट दाते पुन्हा प्रत्येक दात तसाच बोथट दात्यांनी भरलेला असणे crenate
bidentate
द्विप्रदंतुर बाहेर वळलेले पानाच्या कडेवरचे दाते, पुन्हा तसेच दारेरी असण्याचा प्रकार dentate
biennial
द्विवर्षायु बीरुजल्यापासून ते पुन्हा बीजाची निर्मिती व त्यानंतर मृत्यु या सर्व घटना दोन वर्षात संपविणारी (वनस्पती), कोबी, मुळा, गाजर इ.
bifacial
द्विपार्श्व वरचा व खालचा असे दोन भिन्न पृष्ठभाग असलेले (पान व खोड) उदा. जमिनीवर सरपटणाऱ्या वेलीचे (रताळे) किंवा जमिनीत आडवे वाढत असणाऱ्या वनस्पतीचे (आले, कर्दळ) खोड, खोडाशी काटकोन करून वाढणारे पान (जास्वंद, रुई, पेरु इ.) dorsiventral
bifoliate
द्विदली दोन दले असलेले संयुक्त पान, उदा. अंजन (Hardwickia binata Roxb.), हिंगण इ. binate, bifoliolate
biglandular
द्विप्रपिंडी दोन प्रपिंड (स्त्रवणाऱ्या ग्रंथि) असलेले उदा. चेंडूफळ (Parkia biglandulosa W A)
Bignoniaceae
टेटू कुल, बिग्नोनिएसी आकाशनिंब, टेटू, पाटल, वाघनखी, मेढशिंगी, कारंजवृक्ष, खडशिंगी, निळा गुलमोहोर (जॅकरंदा) इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा समावेश हचिन्सन यांनी पर्साएनलीझ व बेसीनी नीरबाम्ही गणात (स्क्रोफ्यूलारिएलीझमध्ये) केला आहे. याची प्रमुख लक्षणे - वृक्ष व मोठ्या वेली, संयुक्त, पिसासारखी व समोरासमोर पाने, द्विलिंगी, अनियमित आकर्षक फुले, संदले जुळलेली, पुष्पमुकुट द्व्योष्ठक व जुळलेल्या पाकळ्यांचा, चार केसरदलांपैकी दोन लांब, दोन किंजदलांच्या ऊर्ध्वस्थ किंजपुटात दोन कप्पे, बोंडात सपक्ष बिया
bilabiate
द्व्योष्ठक दोन ओठांप्रमाणे (संवर्त किंवा पुष्पमुकुट) उदा. तुळस, अडुळसा इ. b. personate द्व्योष्ठक संवृत पाकळ्यांच्या खालच्या ओठावरील उंचवट्यामुळे तोंडाचे भोक फार लहान असणारे, उदा. हरणखुरी b. ringnet द्व्योष्ठक विवृत पाकळ्यांचे दोन्ही ओठ उघडलेल्या
bilateral
द्विपार्श्व दोन बाजु (डावी व उजवी), वरची व खालची) असलेले, दोन्ही बाजूवर असलेली (उदा. पाने) b. symmetry द्विपार्श्व समात्रता परस्परांशी काटकोन करणाऱ्या दोन पातळ्यांनी किंवा एकाच पातळीने विभागल्यावर दोन सारखे अर्ध होणारी (संरचना)
bilaterally symmetrical
द्विपार्श्व समात्र दोन किंवा एका पातळीने विभागल्यावर दोन सारखे अर्ध होतात असा (अवयव, बहुधा फूल)
bilobed
द्विखंडी, द्विपाली, द्विखंडित दोन भाग पडलेले, उदा. कांचन, मर्यादवेल यांची पाने, काही परागकोश (गारवेल, सॅल्व्हिया) गिंको (Gingko biloba), मर्यादवेल (Ipomoea biloba Forsk) ही शास्त्रीय नावे द्विखंडी पानांची सूचक आहेत. bilobate
bilocular
द्विपुटक १ दोन कप्पे असलेला (किंजपुट) उदा. मोहरी, कोथिंबीर २ दोन कप्यांचे (परागकोश) anther (two celled)
binary
द्वैती दोन भागांचा, दोन मूलतत्त्वांचा, जोड्यांचा संबंध येत असलेला b. fission द्विभाजन, द्वैती विभाजन प्रत्यक्षपणे एका कोशिकेच्या दोन बनणे, उदा. काही सूक्ष्म वनस्पती व प्राणी
binomial nomenclature
द्विपद नामकरण वनस्पती व प्राणी यांना दोन भाग असलेल्या संज्ञांनी व्यक्त केली जाणारी शास्त्रीय नावे देण्याची पद्धती, यापैकी पहिला भाग वंशनाम व दुसरा त्या वनस्पतीचे (किंवा प्राण्याचे) जाति वैशिष्ट्यदर्शक असतो, एकाच वंशनामाच्या अनेक जाती असतात त्यावेळी भिन्न जातींतील आप्तभाव या पद्धतीने सहज कळून येतात. उदा. वड, पिंपळ, अंजीर व उंबर यांच्या शास्त्रीय नावांतील वंशनाम (Ficus) यावरुन त्या एकाच वंशातील जाती आहेत हे कळून येते. तसेच जातिवाचक नामावरुन प्रत्येकाचे वैशिष्ट्य कळून येते (Ficus benghalensis, F. religiosa, F. carica, F. glomerata इ.), हल्ली या लॅटिन नावापुढे मूळ नाव देणाऱ्या शास्त्रज्ञांचे संक्षिप्त नाव देण्याची पद्धत आहे. (उदा. F. carica L., F.glomerata Roxb.)
binomial system
द्विपदनाम पद्धति दोन भाग असलेली नावे (संज्ञा) वापरण्याची पद्धत, उदा. प्राणी व वनस्पती यांची शास्त्रीय नावे
biochemistry
जीवरसायनशास्त्र सजीव प्राणी व वनस्पती यांच्या शरीरात चालू असलेल्या किंवा त्यांच्या मध्यस्थीने शरीराबाहेर चाललेल्या रासायनिक प्रक्रियेसंबंधीच्या माहितीचे शास्त्र, उदा. शरीरातील पचन, विघटन, संघटन, ऊर्जानिर्मिती, शरीराबाहेरील कुजणे, आंबणे, इत्यादी सूक्ष्मजंतुद्वारे होणाऱ्या घटना, वितंचन
biociation
जैव संगति विशिष्ट स्थानातील काही वनस्पती व प्राणी यांचा संयुक्त व मोठा समावास, उदा. टंड्रा, आल्पीय शाद्वल (गवताळ प्रदेश), काष्ठवन, मरुवन इ. यांमध्ये वनस्पती व प्राणी यांचे संयुक्त, लहान व अनेक समुदाय असू शकतात.
biogenesis
जीवजनन विद्यमान व पूर्वी असलेल्या सजीवांपासूनच नवीन जीव उत्पन्न होण्याची नैसर्गिक व सनातन परंपरा abiogenesis
biological
जीवशास्त्रीय, जैव, जीवविज्ञानीय जीवशास्त्रासंबंधी, जीवशास्त्राच्या माहितीचा उपयोग करून, जीवासंबंधी
biological clock
जैव घड्याळ, जैव कालगणक वनस्पती व प्राणी यांच्या शरीरक्रियेत आढळणारी नियमित दैनिक लयबद्धता, प्रकाश व अंधार यांचा शरीरक्रियेवर होणारा परिणाम अटळ असतो व शरीरक्रियेतील लयबद्धता घड्याळाच्या नियमितपणाशी तुल्य असते. परंतु घड्याळाने दर्शविलेल्या कालगणनेशी संबंधित
biological spectrum
जैव वर्णपट एखाद्या मर्यादित विशिष्ट क्षेत्रातील विविध प्राणी व वनस्पती यांच्या उपस्थितीची प्रतिशत (शेकडा) वारंवारता दाखविणारे कोष्टक. b. type (life form) जीवाकृति, जीवरुप सजीवाचे स्वरुप (आकार, आकारमान इ.) पहा life form.
bioluminescence
जीवदीप्ती काही जीवांच्या विशिष्ट रासायनिक शारीरिक प्रक्रियेमुळे उत्पन्न होणारा नैसर्गिक प्रकाश, यामध्ये वितंचनाचा संबंध असावा. उदा. काजव्यांचा प्रकाश, काही सूक्ष्मजंतू व कवक (भूछत्रे) या घटनेस जबाबदार असतात. वास्तविक ही रासायनिक दीप्ती आहे कारण रासायनिक विक्रियेतून ही घटना होते. काही कुजट लाकडातून असा प्रकाश येतो. तसेच अनेक समुद्रातील प्राणीही या प्रकाशामुळे ओळखू येतात.
biome
जीवसंहति विशिष्ट प्रकारच्या परिस्थितीशी समरुप होऊन एकत्र राहणाऱ्या सर्व सजीवांचा सापेक्षतः स्थिर व प्रभावी वनश्रीयुक्त समुदाय, तेथील सर्व सजीवांत एक समतोल आढळतो, उदा. टंड्रा, धुवीय प्रदेश, गवताळ प्रदेश.
biometer
जीवमापक सजीवांचे प्रमाण मोजून निश्चित करण्याची पद्धती, उदा. एखाद्या जमिनीतील मातीच्या नमुन्यात असलेल्या जीवांचे प्रमाण निश्चित करण्याची पद्धत.
biometry
जीवसांख्यिकी सजीवांच्या अभ्यासात गणित व सांख्यिकी यांचा वापर करून बनविलेले शास्त्र व संपादन केलेले ज्ञान. पैतृक अनुहरण (Law of ancestral heredity) आणि पितृपरागति (Law of filial regression) यांचे सिद्धांत अशा अभ्यासानेच काढले आहेत.
biophysics
जीवभौतिकी भौतिक (वास्तव) शास्त्राच्या दृष्टिकोनातून केलेला सजीवांचा अभ्यास, तपमान, आर्द्रता, वातावरणाचा दाब, समुद्रसपाटीपासून उंची इत्यादी घटकांचा सजीवावर होणारा परिणाम अथवा त्यांच्या प्रतिक्रिया, भौतिक नियमाप्रमाणे घडून येणाऱ्या शारीरिक प्रक्रिया
biosphere
जैवगोल, जीवावरण जेथे जीवन शक्य होते असा पृथ्वीभोवतालचा भाग, यामध्ये जमीन, पाणी व वातावरणाचा काही भाग समाविष्ट होतो.
biotic
जैव जीवासंबंधी, जीवनविषयक b. adaptation जैवानुकूलन इतर वनस्पतीशी यशस्वी स्पर्धा करण्यास स्वरुपात व शरीरक्रियात फरक पडून परिस्थितीशी समरस होण्याची घटना. b. climax जैव चरमावस्था सजीवांनी निश्चित केलेली वनस्पतीसमुदायाची अंतिम अवस्था, उदा. आगीमुळे किंवा
biotic
जैव जीवासंबंधी, जीवनविषयक b. adaptation जैवानुकूलन इतर वनस्पतीशी यशस्वी स्पर्धा करण्यास स्वरुपात व शरीरक्रियात फरक पडून परिस्थितीशी समरस होण्याची घटना. b. climax जैव चरमावस्था सजीवांनी निश्चित केलेली वनस्पतीसमुदायाची अंतिम अवस्था, उदा. आगीमुळे किंवा
biotype
जैव समुदाय b. (physiological race) १ क्रियावैज्ञानिक वाण २ समजननिक वाण ३ जनुकविद्या १ शरीर क्रियांमधील फरक दर्शविणारा त्याच जातीतील लहान प्रकार २ वांशिक (जनुक संचाच्या) दृष्टीने ऐक्य असलेली दुसरी व्यक्ती अथवा अनेक व्यक्तींचा गट ३ स्थानिक समुदायातील सारखी
biparous
द्विपद अक्षाच्या टोकापासून दोन्ही बाजूस वाढलेला b. cyme द्विपद वल्लरी मुख्य अक्षावर शेंड्याला फूल येऊन वाढ खुंटते व नंतर दोन्ही बाजूस दोन फुले येतात, ती साधी वल्लरी उदा. जाई, मोगरा इ. अधिक जटिल प्रकारात त्याऐवजी बाजूस दोन उपाक्ष येऊन त्यांना प्रत्येकी
bipinnate
द्विगुण पिच्छाकृति पिसासारखी दलांची मांडणी असलेल्या संयुक्त पानाच्या मधल्या दांड्याच्या (पर्णाक्ष) दोन्ही बाजूस असलेली दले पुनश्च तशीच विभागलेली असण्याचा प्रकार, उदा. गुलमोहोर, बाभूळ, संकेश्वर, कॉसमॉस (Cosmos bipinnatus Cav.) इ.
bipolar
द्विधुवी दोन टोके असलेले, कोशिकेतील प्रकलाची अप्रत्यक्ष विभागणी सुरु असता प्राकलाचे अनेक धागे तर्कूसारख्या (घोट्यासारख्या) आकृतीत बांधले गेल्यामुळे दोन टोके असलेली व मध्ये फुगीर असलेली मांडणी
biseriate
१ द्विश्रेणीबद्ध २ द्विमंडलित १ दोन रांगांत असलेले २ दोन वर्तुळे असलेले उदा. संवर्त व पुष्पमुकुट
bisexual
द्विलिंगी, आंतरराष्ट्रीय चिन्ह ४ + नर व स्त्री प्रजोत्पादक अवयव निर्माण करणारे (दोन्ही अवयव एकाच व्यक्तीवर असणारे) उदा. फूल, वनस्पतीची पिढी. बहुतेक प्राण्यांत दोन स्वतंत्र व्यक्तीवर हे अवयव असतात. काही वनस्पतींत दोन प्रकारची फुले (नर व मादी) एकाच झाडावर (
bisporic
द्विबीजुकी लघु व गुरु अशी दोन प्रकारची बीजुके असलेली (वनस्पती), उदा. सिलाजिनेला, मार्सिलिया, सायकस इ. bisporangiate या संज्ञेला हाच मराठी पर्याय वापरता येईल, कारण दोन प्रकारच्या बीजुककोशात ती बीजुके बनतात sporangium, spore bisporous
biternate
द्विगुण त्रिदली तीन दले असलेल्या संयुक्त पानाचे प्रत्येक दल पुनरपि तिन्हीत विभागून तीन दलके असलेले, ternate
bivalent chromosomes
द्वियुजी रंगसूत्रे कोशिकेच्या न्यूनीकरण विभागणीत एकत्र येऊन जोडी जमविणारी समरचित रंगसूत्रे, यापैकी एक नर-गुंतकातून व दुसरे स्त्री गुंतकातून आलेले असून त्यावरील जनुके वैकल्पिक किंवा अविभाज्य गुणाबद्दल जबाबदार असतात. gene, allelomorph, gamete
Bixaceae
केसरा कुल, बिक्सेसी केसरी (कडुकवीठ), बिक्सा व इतर दोन वंशांतील जातींचे फार लहान द्विदलिकित वनस्पतींचे कुल, प्रमुख लक्षणे- वृक्ष व झुडपे, सोपपर्ण, अखंड, एकाआड एक पाने, द्विलिंगी पंचभागी फुले, केसरदले अनेक, ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा व त्यात अनेक बीजके, बोंडात अनेक सपुष्प बिया असतात. केसरी (Bixa orellana L.)
Blackman reaction
ब्लॅकमन विक्रिया प्रकाशाच्या साहाय्याने अन्ननिर्मिती (प्रकाश संश्लेषण) करण्याच्या वनस्पतींतील प्रक्रियेत प्रकाशाच्या अभावी घडून येणाऱ्या सर्व रासायनिक विक्रिया, यानाच तिमिर विक्रिया म्हणतात. ब्लॅकमन या शास्त्रज्ञांनी प्रथम निदर्शनास आणल्याने त्यांचे नाव दिले गेले आहे. अंधार विक्रिया असेही म्हणतात.
bladder
गेळा, फुगा, आशय हवेने भरलेला व त्यामुळे हवेत किंवा पाण्यात तरंगण्यास उपयुक्त असा अवयव उदा. शैवले (सरगासम, फ्यूकस), चीडचे परागकण
blade
पाते पानाचा पसरट व बहुधा हिरवा भाग, काही जमिनीवरील खोडांची खवल्यासारखी पाने हिरवी नसून पाती अरुंद असतात. पाकळ्यांचा पसरट भाग, phyllode lamina, epipodium
blastogenic
उपजत, जन्मजात जन्मापासून असलेले व बाह्यपरिस्थितीमुळे प्राप्त न झालेले उदा. शारीरिक फरक, भेद germinal, congenital
bleeding
रक्तस्त्राव वनस्पतींच्या बाबतीत जखमेतून रस किंवा चीक वाहण्याची प्रक्रिया, नीरा, माडी, ताडी हे रसच होत exudation
blending inheritance
संमिश्र अनुहरण आईबापापासून संततीत उतरताना पूर्वी असलेल्या पर्यायी लक्षणांचे होणारे मिश्रण, येथे एका लक्षणाचा दुसऱ्यावर अंशमात्र प्रभाव दिसतो. गुण दोष युक्त लक्षणे अनेक जनुकांमुळे प्राप्त होतात त्यावेळी संततीत त्यांचा आविष्कार पूर्णपणे आढळणे शक्य नसते.
blepharoplast
आधार कणिका कोशिकेतून बाहेर निघालेल्या केसासारख्या बारीक (प्रकेसलाच्या), जीवद्रव्याच्या धाग्याच्या तळाशी असलेला सूक्ष्म कण flagellum.
bloom (on surface)
१ राग २ बहर, पुष्पपुंज १ पृष्ठभागावर येणारा पातळ थर, उदा. शैवलाचा थर पाण्यावर विशिष्ट ऋऋतुत येतो, मेणाचा थर पानावर येतो. २ फुले येणे (बहार) किंवा फुलांचा झुबका येणे
Blue green algae
नील हरित शैवले, निळी हिरवी शैवले (वर्ग), सायनोफायसी निळसर, काळसर, क्वचित गर्द हिरव्या रंगाच्या शैवल वनस्पती, इतर शैवलांशी तुलना करता, ह्या अधिक साध्या व पुरातन आणि काही बाबतीत सूक्ष्मजंतूशी तुल्य असतात. प्रमुख लक्षणे - एककोशिक किंवा अनेक कोशिक, तंतुमय, प्
body cell
कायकोशिका, तनुकोशिका प्रजोत्पादक अवयवांखेरीज शरीराच्या इतर कोणत्याही भागातील कोशिका, काही शंकुधारी वनस्पतींत ज्या पासून नर कोशिका बनतात तिला हीच संज्ञा वापरतात.
bog
रुतण, दलदल ओली व अत्यंत भुसभुशीत (सुविरल) जमीन, यात विशिष्ट वनस्पतीच वाढू शकतात. उदा. स्फॅग्रेसी कुलातील शेवाळी, ओक, क्रेनबेरी इत्यादींच्या काही जाती
Bombacaceae
शाल्मली कुल, बॉम्बॅकेसी लाल सावर, सफेत सावर, गोरख चिंच, बाल्सा इत्यादी द्विदलिकित फुलझाडांचे स्वतंत्र कुल Malvaceae (जास्वंद कुल)
Boraginaceae
भोकर कुल, बोरॅजिनेसी भाकर, छोटा कल्प, धत्रंग (दत्रंग, अजानवृक्ष) त्रिपक्षी, गोंदणी, लिचरडी इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल याचा अंतर्भाव बेसींच्या पद्धतीत भोकर गणात (पोलेमोनिएलीझ) केला असून हचिन्सनच्या पद्धतीत भोकर गण (बोरॅजिनेलीझ) वरच्याहून अलग केला आहे. या कुलाची प्रमुख लक्षणे- फुलोरा- वृश्चिकाब वल्लरी, फुले द्विलिंगी, बहुधा नियमित, पंचभागी, पाकळ्या जुळलेल्या, नलिकाकार, विविधाकृति पुष्पमुकुट, केसरदले पाच व पाकळ्यास तळाशी चिकटलेली, दोन किंजदलांचा ऊर्ध्वस्थ किंजपुट, फळ अश्वगर्भी किंवा चार कपालिकांचे, वृंत्ताक कुल (सोलॅनेसी) व हरिणपदी कुल यांचे या कुलाशी आप्तभाव असून त्यांचाही अंतर्भाव याच गणात (पोलेमोनिएलीझमध्ये) केला जातो.
Bordeaux mixture
बोर्डाए मिश्रण साधारणपणे ४ पौंड मोरचूद, ४ पौंड चुना, सुमारे ५० गॅलन पाण्यात एकाचवेळी मिसळून कवकजन्य रोगावर (रोगी वनस्पतीवर) शिंपडण्याचे मिश्रण, यातील घटकांचे प्रमाण जरुरीप्रमाणे बदलून वापरतात.
border parenchyma
मृदुतकावरण, सीमावर्ती मृदुतक वाहक घटकाभोवती असलेले, मृदु कोशिकांच्या एक किंवा अधिक थरांचे आवरण.
bordered pit
अनुलिप्त खात (खाच), वलयी गर्त सभोवार वलय असणारी खाच, विशेषेकरून प्रकाष्ठाच्या कोशिकावरणावर (प्रकटबीज वनस्पतीतील) आढळते, दोन जवळच्या कोशिकावरणाची जाडी वाढत असता काही भाग पातळ राहून, काही भाग पूर्वीच्या आवरणापासून अलग राहतो तो खाचेभोवती वलयाप्रमाणे दिसतो.
bostryx
एकपद शुंडी (वल्लरी) शेंड्याला फूल आल्याने मुख्य अक्षाची वाढ खुंटते व नंतर एका बाजूस बगलेतील कळीपासून उपाक्ष वाढतो व त्याचीही तीच गत होते. पुढे हाच प्रकार एकाच बाजूस नवीन उपाक्ष क्रमाने वाढून शेवटी एक वाकडा सोंडेसारखा फुलोरा बनतो. उदा. गेळफळ, हॅमेलिया इ.
botanical garden
शास्त्रीय उद्यान वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने वनस्पतींची मांडणी केली असून त्याशिवाय प्रायोगिक कार्याच्या व संशोधनाच्या सोयी उपलब्ध असलेली बाग
botanist
वनस्पतिशास्त्रज्ञ, वनस्पतिविज्ञ वनस्पतिशास्त्राचा संपूर्ण अभ्यास करून तसेच त्यामधील काही शाखांमध्ये संशोधन करून एकंदरीत पारंगत असलेली व्यक्ती.
botanize
वनसंचार आपले नैसर्गिक जीवन जेथे अनेक वनस्पती चालू ठेवतात अशा वने, उद्याने, उपवने इत्यादी ठिकाणी जाऊन त्यांच्या विषयीची माहिती मिळविणे
Botany
वनस्पतिविज्ञान, वनस्पतिशास्त्र १ सर्व प्रकारच्या वनस्पतींची तात्त्विक व व्यावहारिक माहिती मिळवून त्यांच्यासंबंधींचे निश्चित ज्ञान संकलन करणारी ज्ञानशाखा. यालाच कोणी उद्भिज्जशास्त्र, वानसशास्त्र अशीही नावे दिली आहेत. २ वनस्पतिविज्ञानाबद्दलचे पाठ्यपुस्तक, स
bound water
बद्धजल प्राकृतिक गुणधर्मामुळे एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागात शोषून ठेवलेला पाण्याचा अंश adsorption, free water
brachy-
ऱ्हस्व- आखुडपणा किंवा खुजेपणा दर्शविणारा उपसर्ग. b. blast ऱ्हस्व प्ररोह मर्यादित वाढ असलेला पल्लव पहा spur b. cladous ऱ्हस्वशाखी फार आखूड फांद्या असलेले (झाड) b. form ऱ्हस्वरुपी एकाच आश्रय वनस्पतीवर वाढणाऱ्या तांबेरा नावाच्या कवकीय रोगातील वर्षाबीजुकीय
bract
छद फुले अथवा फुलोरा व त्याच्या फांद्या यांच्या तळाशी असलेला लहान खवल्यासारखा संरक्षक अवयव, केळीच्या फुलोऱ्यावर जाड तांबूस व चिवट मोठी छदे (महाछदे) येतात तर केवड्याच्या फुलोऱ्यावर मोठी पण सुवासिक छदे येतात. spathe (hypsophyll)
bract scale
छदशल्क शंकुधारी वनस्पतींवरील स्त्री शंकूवर बीजधारी खवल्याखाली असणारा लहान खवल्यासारखा संरक्षक अवयव
bracteole
छदक फुलोऱ्याच्या तळास असणारे अवयव ते छद मानून फुलाच्या तळास असलेल्यास छदक म्हणतात. उदा. गोकर्ण, घेवडा इ. bractlet
branch
शाखा फाटा, फांदी, मुख्य खोडापासून (अक्षापासून) वाढलेला व सर्वसाधारणपणे तशीच संरचना, आकार व कार्य असलेला दुय्यम अथवा तिय्यम दर्जाचा अक्ष.
branch gap
शाखा विवर खोडावरील ज्या स्थानापासून शाखा निघते तेथील वाहक उतकांच्या चितीत (स्तंभात) पडलेली फट (खिंड)
branching
शाखाबंध, शाखाविन्यास प्रमुख अक्षापासून निघालेल्या नवीन शाखांचा उगम, विस्तार व मांडणी (अथवा त्या संबंधीची माहिती).
brand spore
ग्रीष्मबीजुक जाड आवरणाचा बहुधा काही काळ विश्रांति घेणारा व बहुधा काळपट रंगाचा काही कवकात आढळणारा प्रजोत्पादक घटक (बीजुक), उदा. काणी Ustilaginales. ureldospore, summer spore
breathing pore
श्वसन रंध, वातरंध हवा आत बाहेर जाण्याकरिता असलेले छिद्र b. root श्वसनमूळ वायुविनिमय करण्याकरिता विशेषत्व पावलेले मूळ अथवा मुळाचा भाग. खाऱ्या दलदलीतील जमिनीतील मुळापासून जमिनीवर आलेल्या उभ्या शाखा, त्यावरील वल्करंधातून हवेची ये-जा घडून येते कारण अशा जमिनीत
breed
१)प्रजा, संतति २) प्रजनन १ विशिष्ट गुणयुक्त प्रकार, वंश किंवा अवलाद २ पैदास करणे, प्रजनन करणे वनस्पतींतील किंवा प्राण्यांतील जाती व विशिष्ट प्रकारांची निर्मिती b. in अंतःप्रजनन अगदी जवळच्या आप्तसंबंधात प्रजोत्पादन घडवून आणणे, हा प्रकार सुप्रजाननाच्या
brevi-
ऱ्हस्व- खुजेपणा (आखुडपणा) दर्शविणारा उपसर्ग. b. stigma ऱ्हस्वकिंजल्क फार आखूड किंजल्क (स्त्री केसराचे टोक) असलेले, उदा. सोमलता (Sarcostemma brevistigma Wight)
bridle
प्राकलतंतु कोशिकेतील मध्यवर्ती प्राकलखंडापासून निघून कोशिकावरणाच्या जवळ असलेल्या प्राकलस्तराशी जोडणारा तंतूसारखा भाग (धागा), उदा. स्पायरोगायरा शैवलाच्या तंतूतील कोशिका
Bromeliaceae
अननस (आपनस) कुल, बोमेलिएसी अननस, टिलँड्सीया इत्यादी एकदलिकित वनस्पतींचे कुल. बेसींच्या पद्धतीत या कुलाचा अंतर्भाव केसर गणात (इरेडेलीझ) केला असून हचिन्सन यांनी अननस गण या स्वतंत्र गणात केला आहे. प्रमुख लक्षणे- काही गुच्छाकृती औषधीय वनस्पती व अपिवनस्पती, फुलोरा सच्छद, द्विलिंगी किंवा एकलिंगी विभागी फुले, परिदल मंडले दोन, केसरदले सहा व कधी तळाशी चिकटलेली, किंजपुटात अक्षलग्न बीजके व तीनच कप्पे, बीजे सपुष्क, सपक्ष व केसाळ
Brown algae
पिंगल शैवले, फीओफायसी (वर्ग) हरितद्रव्याव्यतिरिक्त एक पिंगट द्रव्य प्राकणूत असणाऱ्या व बहुधा खाऱ्या पाण्यात आढळणाऱ्या शैवलांचा गट, वनस्पती अनेककोशिक व मोठ्या, प्रजोत्पादक कोशिका (बीजुके, गंतुके) चलनशील व बाजूस दोन असम केसले असलेल्या, सलिंग व निर्लिंग प्रज
Brownian movement
बाऊनी हालचाल (आंदोलन) कलिल विद्रवातील सूक्ष्म कणांची सतत चालू असणारी सूक्ष्म हालचाल, द्रवपदार्थांच्या रेणूंशी त्या सूक्ष्म कलिककणांच्या असंतुलित (तोल नसलेल्या) भडिमारामुळे (माऱ्यामुळे) ती घडून येते.
Bryophyta
शेवाळी विभाग, बायोफायटा शैवलांपेक्षा अधिक प्रगत तथापि वाहक उतकांचा पूर्ण अभाव असलेल्या आणि नेचाभ (टेरिडोफायटा) वनस्पतींशी प्रजोत्पादक अवयव (रेतुकाशय व अंदुककलश) व पिढ्यांचे एकांतरण या बाबतीत साम्य असलेल्या हरितद्रव्ययुक्त वनस्पतींचा गट. सर्वसाधारणपणे या वनस्पती स्थलवासी असूनही त्यांचे प्रजोत्पादन बाहेरील पाण्यावाचून घडून येत नाही म्हणून त्या संदर्भात यांना जलस्थलवासी म्हणणे योग्य, ह्या वनस्पतींमध्ये ठळकपणे ओळखली जाणारी (एकगुणित) पिढी प्रजोत्पादक नर व स्त्री कोशिका (गंतुके) बहुकोशित अवयवांत निर्माण करते व त्यांच्या संयोगाने बनलेली संयुक्त कोशिका (रंदुक) त्याच जनक वनस्पतीवर पोसली जाते व तिच्यापासून दुसरी अलिंगी प्रजोत्पादक कोशिका (बीजुके) बनविणारी पिढी (द्विओगुणित किंवा बीजुकधारी) वाढते. या बीजुकांपासून पुनरपि पहिली (गंतुकधारी) सारखी प्रमुख वनस्पती निर्मिली जाते. याप्रमाणे या दोन पिढ्यांत (एकगुणित व द्विगुणित) एकांतरण असते. ह्यापैकी अत्यंत प्रगत वनस्पतींना नाजुक पाने, खोड व केसासारखी मुळे असतात व त्यांची संरचना फारच साधी असते. यकृतका, शृंगका व हरितका असे यामध्ये तीन वर्ग मानतात.
bud
मुकुल, कुङमल, कलिका, कळी, कोरक खोडावरील सर्व अवयव अविकसित अवस्थेत एकत्र सामावून ठेवणारी संरचना, विकास पूर्ण होताना तिचे रुपांतर साध्या शाकीय अवयवात किंवा फुलात होते, अविकसित प्ररोह, कायक वनस्पतींत ही संज्ञा शरीराच्या प्रजोत्पादक, साध्या व स्वतंत्र होणाऱ्या घटकास वापरतात.
bud scale
कोरक शल्क कळीच्या संरक्षणार्थ तिच्यावर प्रथम असणारे व नंतर गळून पडणारे खवल्यासारखे उपांग उदा. पिवळा चाफा, वड, फणस इत्यादींचे खवले उपपर्णे होत व ती पुढे गळून पडतात. आले, कर्दळ यांच्या जमिनीतील खोडावर खवले असतात.
budding
मुकुलन १ कळ्या येणे २ एका कोशिकेवर दुसरी व पुढे तिसरी किंवा चौथीही येणे उदा. किण्व ३ डोळा बांधणे, कळीचे कलम बांधणे gemmation, grafting
bulb
कंद रसाळ खवल्यांनी वेढलेले, बिंबात रुपांतर पावलेले व जमिनीच्या पृष्ठभागाखाली वाढणारे संक्षिप्त खोड, यापासून खाली आगंतुक मुळे असून खवल्यांच्या बगलेतून वाढणाऱ्या कळ्यापासून नवीन कंद बनतात व शाकीय उत्पत्ति होते. कंदाचे काही प्रकार हवेत खोडावर येतात. b. scaly
bulbiferous
कंदधर कंदधारी, कंद असणारी वनस्पती, कंदाचे काही प्रकार पानांच्या बगलेत किंवा फुलोऱ्यातही येतात उदा. घायपात, कारंदा (Dioscorea bulbifera var. sativa Prain) bulbil
bulbil
कंदिका लहान कंद, पानांच्या बगलेत किंवा कडेवर वाढलेली लहान गाठीसारखी किंवा फक्त सूक्ष्म मांसल पानांच्या झुबक्यासारखी प्ररोहरुप संरचना, ही मूळच्या वनस्पतीपासून योग्य काली तुटून पडते व नवीन वनस्पती निर्माण करते. उदा. कारंदा, घायमारी, घायपात इ. सायकसच्या खोडास तळाजवळ येणारी कळी (लहान प्ररोह) व अननसाच्या फळाखाली खोडापासून येणारी लहान कळी कंदिकाच मानतात. त्या अलग करून नवीन वनस्पती बनविता येतात.
bulbose
कंदधर, कंदकल्प कंद धारण करणारी किंवा कंदासारखी संरचना असणारी (वनस्पती) उदा. भुईचाफा, नागदवणा, निशिगंध bulbous
bulliform cell
चलिग्र कोशिका, प्रेरक कोशिका (पेशी) पूर्णपणे भरल्यावर फुगणाऱ्या व पाणी कमी झाल्यावर आकुंचन पावणाऱ्या अपित्वचेतील मोठ्या कोशिका. यांच्या प्रसरण व आकुंचन यामुळे पानांच्या कडा जवळ येऊन सुरळी बनणे किंवा ती पुन्हा उलगडून पान पसरणे घडून येते. अशा यंत्रणेमुळे बा
bundle
वृंद जुडगा. अनेक विशिष्ट कोशिकांचा किंवा उतकांचा संच. कोशिकारुप तंतूंचा किंवा सूत्रांचाही संच बनतो. वाहक कोशिका व वाहिन्या यांचेही संच आढळतात, त्यास वाहक संच म्हणतात. b. cap वृन्दत्राण वृन्दातील परिकाष्ठाबाहेरचा अर्धचंद्राकृति घनकोशिकांचा संच b. sheath
bundle end
वृंदान्त, वृंदाग्र वाहक संचाच्या शेवटी असलेला भाग, उदा. पानांच्या संरचनेतील मध्यभागी असलेल्या कोशिकांच्या समूहातील वाहक घटकांचा शेवटचा भाग.
bur
१ अंकुशफल २ कंटवेष्ट ३ ग्रन्थि १ आकड्यासारखे उपांग असलेले फळ २ फळाचे काटेरी आवरण, उदा. निचर्डी, धोत्रा ३ गाठ burr
Burgandy mixture
बर्गंडी मिश्रण चुन्याऐवजी सोडा (सोडियम कार्बाएनेट) मिसळलेले बोर्डाए मिश्रणासारखे फवारण्याचे औषध. Bordeaux mixture.
Burseraceae
गुग्गुळ कुल, बर्सेरेसी काकड, धूप, गुग्गुळ, बोळ, सालाई इत्यादी द्विदलिकित व उष्णकटिबंधातील वनस्पतींचे लहान कुल, याचा अंतर्भाव भांड गणात (जिरॅनिएलिझमध्ये) केला जातो. प्रमुख लक्षणे - वृक्ष व झुडपे, बहुधा संयुक्त, एकाआड एक पाने, बाल्सम व राळ यांनी भरलेल्या नलिका असतात. फुले लहान, बहुधा एकलिंगी, बिंबयुक्त, चार पाच भागी, दोन केसरमंडले असल्यास बाहेरचे पाकळ्यासमोर व आतील एकाआड एक, जुळलेली किंजदले ३-५ व ऊर्ध्वस्थ किंजपुटात अनेक कप्पे व प्रत्येकात २ बीजके, फळ अश्मगर्भी वा बोंड, बिया अपुष्क, काकड (Garuga Pinnata Roxb.)
button
कुड्म भूछत्राचे छत्र व दांडा स्पष्टपणे (पूर्णपणे) बनून दिसण्यापूर्वीची गोळीसारखी प्रारंभिक अवस्था mushroom.