वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा
There are currently 353 names in this directory beginning with the letter A.
A
ए ; फुलाच्या सूत्रमय वर्णनात (पुष्पसूत्रात) वापरण्याचे केसरमंडलासंबंधीचे व इंग्रजीतील ँड्रोशियमचे आंतरराष्ट्रीय आद्याक्षर; फुलांतील ह्या नर पुष्पदलांची संख्या या आद्याक्षरापुढे लिहून दर्शविता येते. floral formula androecium
abaxial
अपाक्ष, अक्षविमुख खोड अथवा अक्ष यांच्या विरुद्ध बाजूकडील अथवा त्यांच्या केंद्रापासून दूर असलेला (अवयव, उपांग इ.) - side अपाक्ष (अक्षविमुख) पार्श्व खोडापासून दूर असलेली (पानाची) बाजू - sporangium अपाक्ष बीजुककोश पानाच्या अथवा त्यासारख्या अवयवाच्या खालच्या
aberration
विपथन नित्यापासून भिन्न (अनित्य) प्रकार. उदा. परिस्थितीतील विशिष्ट घटकामुळे किंवा अनित्य अंतस्थ घटनेमुळे प्राप्त झालेले एखाद्या वनस्पतीतील विशिष्ट लक्षण किंवा लहान मोठ्या अवयवाचा अनित्यपणा chromosome
abiogenesis
अजीवजनन; जडोत्पत्तिवाद जड किंवा निर्जीव वस्तूपासून सर्व सजीव सहज उत्पन्न झाले असावे अशी जुनी समजूत biogenesis special creation
abjection
अपक्षेपण तुटून किंवा अलग होऊन जोराने फेकले जाण्याची प्रक्रिया; उदा. काही कवक वनस्पतींची बीजुके बीजुकधरापासून सुटून निघण्याचा प्रकार - of spores बीजुकक्षेपण वर वर्णिल्याप्रमाणे बीजुकांचे तंतूपासून तुटून जाणे
abnormal
असामान्य, विकृत सामान्यपणे न आढळणारे, उदा. फार मोठे फळ, नित्यापेक्षा अधिक मोठा किंवा संख्येने अधिक (अवयव), एका केळाच्या सालीत दोन स्वतंत्र मगज
abortion
१ अविकसन २ गर्भाभाव ३ गर्भपात १ एखाद्या अवयवाची अर्धवट वाढ किंवा क्वचित वाढ खुंटण्याची प्रक्रिया उदा. कळ्या किंवा बारीक अपक्व फळे गळून पडणे, फुलांतील केसरदलात संक्षेप २ पक्व बीजातील गर्भाच्या अभावामुळे बीज वांझ असण्याचा प्रकार ३ गर्भ गळून जाण्याची प्रक्रिया
abortive
अविकसित, सदोष, वंध्य अर्धवट बनलेला किंवा अवशेषरुप (अवयव) उदा. सूर्यफुलाच्या किरण पुष्पकातील वांझ किंजमंडल, बीजके नसलेला किंजपुट, न रुजणारे बी
abrupt
अकस्मात एकदम फरक पावणारे, हळूहळू निमुळते न होता एकदम टोकदार बनलेले (पान), टोकास दल नसलेले संयुक्त पान (उदा. टाकळा.)
absciss (abscission) layer
अपाच्छेदक स्तर पान अथवा तत्सम अवयव निसर्गतः गळून पडण्यापूर्वी खोड व पानाचा (देठाचा) तळ यांमध्ये प्रथम असलेला व नंतर हळुहळु नाश पावणारा विशिष्ट कोशिकांचा थर, य्च्या खोडाकडील बाजुस बुचासारख्या पदार्थाच्या घटकांचा (त्वक्षा) थर असल्याने पान गळून पडल्यावर खोडा
abscission
अपाच्छेदन, झड स्वाभाविकपणे अवयव गळून पडण्याची (झडण्याची) वर वर्णिलेली प्रक्रिया. उदा. काही झाडाच्या सालीचे तुकडे, पाकळ्या, फळे इ.
absorb
शोषणे बाहेरील द्रवरुप अथवा वायुरुप पदार्थ शरीरात ओढून घेणे, यात बहुधा भौतिक प्रक्रियेचा (विसृति) संबंध असतो. diffusion
absorption
१ शोषण २ अभिशोषण १ शोषून घेण्याची प्रक्रिया (कार्य) २ विशेषप्रकारे (विसृतीने) झालेली शोषणाची प्रक्रिया
abstriction
विबीजुकक्षेपण विशिष्ट तंतूच्या टोकास बनलेली बीजुके आकुंचनाने सुटी होऊन फेकली जाणे, या संज्ञेत बीजुकसंभव व अपाच्छेदन ही अभिप्रेत आहेत.
abundance
वैपुल्य विशिष्ट स्थानी निसर्गतः आढळणाऱ्या वनस्पतींच्या समुदायातील एखाद्या किंवा प्रत्येक जातीच्या संख्येबद्दलची माहिती. frequency, density.
Acanthaceae
वासक कुल, ऍकँथेसी वासक (अडुळसा), कोरांटी, कोळसुंदा इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, बेसींच्या वर्गीकरणाप्रमाणे या कुलाचा समावेश नीर बाम्ही गणात (स्क्रोफ्युलारिएलीझ) केला असून हचिन्सन यांनी पर्साएनेलीझ गणामध्ये केला आहे. या कुलातील वनस्पतींची लक्षणे पाने
acanthaceous
१ कंटकित २ वासक कुलोत्पन्न १ काटेरी २ वासक कुलांतील (वनस्पती), उदा. तालीमखाना (Asteraccantha longifolia Nees)
acaullescent
अस्कंध, स्कंधहीन, क्षोडहीन जमिनीवर (सहज) न दिसणारे खोड असलेली (वनस्पती), उदा. घायपात, कोरफड, कांदा, शेवरा (Phoenix acaulis Roxb.) इ.
accessory
अतिरिक्त, गौण, साहाय्यक प्रमुख अवयवाशिवाय इतर (अधिक); उदा. आगंतुक व साहाय्यक कळ्या -- fruit अतिरिक्त फळ किंजपुटाखेरीज फुलातील इतर भागांपासून (पुष्पासन, देठ इ.) बनलेला फळासारखा मांसल अवयव उदा. काजू, सफरचंद, स्ट्रॉबेरी इ.
accrescent
सहवर्धिष्णु - इतर अवयवाबरोबर वाढत जाऊन न गळता राहणारा उदा. फळाबरोबर वाढत जाणारा फुलातील एखादा अवयव (वांग्याचा संवर्त, काजूचा देठ)
aceae
- कुल कुलवाचक लॅटिन संज्ञा बनविताना लॅटिन वंशनामापुढे लावण्याचा प्रत्यय, उदा. वृन्ताक (वांगे) कुल (Solanaceae या नावात Solanum या वंशनामापुढे प्रत्यय लावला आहे), वांग्याचे शास्त्रीय नाव Solanum melongena L. हे आहे.
aceous
- प्रमाणे, - सम वनस्पतींच्या लॅटिन वंशनामापुढे किंवा कुलनामापुढे विशेषणात्मक संज्ञा बनविण्यास लावलेला प्रत्यय, उदा. गुलाबसम अथवा गुलाबाप्रमाणे किंवा गुलाब कुलातील Rosaceous
Aceraceae
किनार कुल, ऍसरेसी किनार (ऍसर किसीयम), मॅपल, सिकॅमूर, शुगर मॅपल इत्यादी विशेषतः उत्तर गोलार्धातील द्विदलिकित फुलझाडांचे कुल, बेंथॅम व हूकर यांनी या कुलाचा समावेश अरिश्ट (रिठा) गणात केलेला आढळतो. प्रमुख लक्षणे- वृक्ष व झुडपे, साधी, पिसासारखी किंवा हस्ताकृती खंडित, समोरासमोर पाने, द्विलिंगी किंवा एकलिंगी, अरसमात्र फुले, संदले व प्रदले ४-५, कधी पाकळ्या नसतात, केसरदले बहुधा ८, किंजदले दोन व ऊर्ध्वस्थ, केसरदलाबाहेर किंवा मध्ये बिम्ब, किंजपुटात दोन कप्पे व प्रत्येकात दोन बीजके, दोन पंखांचे व शुष्क (पालिभेदी) फळ, किंवा सपक्ष कृत्स्नफळ, अपुष्प बिया
acerose
सूच्याकृति, सूचिसम सुईसारखे टोक, धारदार कडा व अत्यंत निमुळते, उदा. चीड- (चिल) चे पान, शतावरीची फांदी
achene
कृत्स्नफल शुष्कफळाचा एक प्रकार, हे न फुटणारे, एकबीजी, पातळ सालीचे, एका किंजदलाचे व ऊर्ध्वस्थ किंजपुटापासून बललेले असून बीजावरण व फलावरण अलग असतात. उदा. मोरवेल, स्ट्रॉबेरी, कमळ यांच्या फळातील एक सुटा भाग
achenial fruit
कृत्नाभ फल सर्वसाधारणपणे वर वर्णन केल्याप्रमाणे शुष्क एकबीजी व न तडकणारे कोणतेही फळ, उदा. सूर्यफूल, माठ, मका, गहू इ.
acquired
अर्जित, संपादित स्वतःच्या प्रयत्नाने मिळविलेले किंवा परिस्थितीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणामामुळे घडून आलेले (फरक), उदा. पुरेशा पोषणाअभावी वनस्पतीस आलेला खुरटेपणा, एकाच बाजूने सतत लागलेल्या वाऱ्यामुळे आलेला बाक
acro-
अग्र- टोक किंवा शेंडा या संदर्भात उपसर्गाप्रमाणे वापरलेली संज्ञा a. carpus अग्रफलयुक्त, अग्रफली शेंडेफळ असलेले a. petal अग्रवर्धी केवळ टोकाशीच वाढणारे (खोड, अक्ष इ.) a. succession अग्रवर्धी अनुक्रम खोडाच्या किंवा इतर अवयवांच्या टोकास सदैव वाढ होत
actino-
अरीय, अर- आरे (किरणासारखे भाग) असलेला उदा. मोरपंखी (Actiniopteris dichotoma Bedd.) या नेचाची पाने a. meter प्रकाश मापक छायाचित्राच्या कागदाचा उपयोग करून प्रकाशाच्या भिन्न तीव्रतेचे मापन करण्याचे उपकरण a. morphic अरसमात्र, नियमित एखाद्या अवयवाच्या (उदा.
activator
प्रभावक, क्रियाप्रवर्तक, त्वरक वितंचकाची क्रिया चालू करणारा पदार्थ, येथे वितंचक स्वयंपूर्ण नसते, कधी कधी हा क्रियाप्रवर्तक धातुस्वरुप असतो proenzyme, coenzyme
active
सचेष्ट, सक्रिय, क्रियाशील नैमित्तिक किंवा सतत हालचाल करणारे, सुप्तावस्थेत नसून वाढ होत असलेले, उदा. गंतुक, बीजुक, कळी इ. a. transport क्रियाशील परिवहन पाणी किंवा अन्नद्रव्य यांचे जलद स्थलांतर. dormant
aculeate
कंटकित, काटेरी काटे असणारे, तीक्ष्ण टोक असलेले उदा. वेडी बाभूळ (Parkinsonia aculeata L.) कणगर (Dioscorea aculeata L.)
acuminate
प्रकुंचित, पुच्छाकार शेपटीसारखे हळूहळू निमुळते होत गेलेले उदा. पिंपळाच्या पानाचे टोक, सफेद कचनार (Bauhinia acuminate L.)
acute
आकुंचित, लघुकोनी, टोकदार लघुकोनासारखे टोकदार, उदा. कण्हेरीच्या पानाचे टोक खैरचाफा (Plumeria acutifolia Poir) दोडका (Luffa acutangula (L.) Roxb.)
acyclic
अमंडलित, अचक्रिक, अचक्रीय चक्राकार किंवा मंडलाकार मांडणी नसलेली, मळसूत्राप्रमाणे सर्पिल मांडणी असलेली (पाने किंवा पुष्पदले) उदा. कमळाचे फूल cyclic
adaptability
अनुयोजकता परिस्थितीशी जमवून घेण्याची (समरस होण्याची) क्षमता, हे सर्व सजीवांचे लक्षण समजले जाते.
adaptive (inducible) enzyme
जिवंत कोशिकेतील चयापचयात, परिस्थितिसापेक्ष विशिष्ट कार्यद्रव्यांनी तेथेच निर्मिलेले नवीन आणि विशिष्ट वितंचक (कार्बनी निदेशक) उदा. एश्रेचरिया कोली या सूक्ष्मजंतूंचे गाही वाण ग्लुकोज व अमोनिया या कार्बनयुक्त व नायट्रोजनयुक्त प्राथमिक उग्दमावर वाढविले असता त
adaptor RNA (+ RNA)
योजक आर एनए प्रथिन संश्लेषणात प्रभावित अमिनो अम्ल ज्या विशिष्ट लहान, विद्राव्य आरएनए रेणूला चिकटून राहतात त्याला ही संज्ञा वापरतात. RNA
adaxial
अभक्ष्य, अक्षसंमुख खोडासमोरचे, खोडाजवळचे, अक्षालगत असलेले, उदा. सिलाजिनेला किंवा लायकोपोडियम या वनस्पतींचे बीजुककोश a. surface of the leaf अभ्यक्ष पर्णपृष्ठ - पान खोडाशी समांतर नसल्यास, पानाची वरची (प्रकाशाकडे वळलेली) बाजू व ते समांतर असल्यास खोडाकडे
adhension
आसंग फुलातील एका मंडलाची दले दुसऱ्या मंडलातील दलांशी अंशतः किंवा पूर्णपणे चिकटून असण्याचा प्रकार, उदा. धोत्र्याच्या फुलातील केसरदले पाकळ्याशी तळात चिकटलेली परंतु वर सुटी असतात. epipetalous, episepalous, gynandrous
adherent
आसक्त, अभिलग्न दोन निराळे अवयव परस्परास चिकटून असणे उदा. किंजपुटास चिकटून राहिलेला संवर्त, काकडी, पेरु इ.
adhesive
आसंगी, आसंजक चिकटून राहण्याची क्षमता असलेला, उदा. भिंतीस चिकटून राहणारी मुळे किंवा ताणे काही वेलींना वर चढण्यास मदत करतात (नागवेल, मिरवेल, अंजनवेल) a. disc आसंगी बिम्ब चिकटण्यास उपयुक्त असा चकतीसारखा भाग, उदा. Parthenocissus tricuspidata Planch या वेलीचे
adnate
पृष्ठाबद्ध एकादा अवयव दुसऱ्याच्या पृष्ठभागास पूर्णपणे चिकटून वाढलेला असणे, उदा. गुलाबाच्या पानाची उपपर्णे, काही फुलातील परागकोशाची एक बाजू संपूर्णपणे तंतूस चिकटून असते (कमळ). dorsifixed
adsorption
पृष्ठशोषण काही घन किंवा द्रव पदार्थाच्या पृष्ठबागावर लवणे (रेणू किंवा आयने) चिकटून राहण्याची प्रक्रिया, जमिनीतील चिकणमातीचे व कुजकट जैव पदार्थाचे कलिल कण तेथील लवण पदार्थ या पद्धतीने धरुन ठेवतात.
adventitious
आगंतुक अनपेक्षितपणे दुसऱ्या अवयवावर उगम पावलेले काही अवयव उदा. कलमांवर येणारी मुळे किंवा नवीन कळ्या, पानफुटीच्या तुटून पडलेल्या पानावर येणारी नवीन रोपे
aeciospore
वर्षाबीजुक तांबेरा रोगाच्या कवकाचे द्विगुणित प्रकल असलेले, लैंगिक प्रक्रियेने बनलेले व बहुधा पावसाळ्याच्या सुमारास निर्मिले जाणारे बीजुक. aecidiospore
aerenchyma
वायूतक वायूने भरलेल्या पोकळ्या असलेला कोशिकांचा समूह, पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींत हवेच्या पुरवठ्याकरिता असे समूह (ऊतक) आढळतात, तसेच समूद्रकिनाऱ्यावरील खाऱ्या दलदलीत वाढणाऱ्या अनेक वनस्पतींतील हे ऊतक त्वक्षाकरापासून बनलेले असते, उदा. शिंगाडा, तिवर, कमळ, चि
aerial
वायवी, हवाई जमिनीवरच्या भागात (हवेत) वाढणारा (अवयव) उदा. खोड, पाने, क्वचित मुळे a. root वायवी मुळे हवेत वाढलेले मूळ, मुळे सामान्यपणे जमिनीत वाढतात, तथापि कधी हवेतही ती खोडापासून उगम पावतात उदा. वडाच्या पारंब्या, खाऱ्या चिखलात वाढणाऱ्या काही वनस्पतींची
aerobic
सानिल हवेच्या सान्निध्यातच घडून येणारी (प्रक्रिया), उदा. श्वसन, प्रकाशसंश्लेषण a. respiration सानिल श्वसन हवेतील प्राणवायुचा उपयोग करून पदार्थातील ऊर्जा मिळविण्याची प्रक्रिया, जलवनस्पतीत पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूचा श्वसनार्थ उपयोग होतो respiration,
aerophyte
अपिवनस्पति दुसऱ्या वनस्पतीच्या फक्त आधाराने वाढणारी वनस्पती, हिचा जमिनीशी संपर्क नसतो, उदा. शैवाक (धोंडफूल), शेवाळी, आमरे, काही नेचे इ. epiphyte
aerotactic
वातानुचलनी हवेच्या दिशेकडे किंवा त्याविरुद्ध दिशेकडे स्थानांतर करणारी (वनस्पती उदा. काही शैवले, सूक्ष्मजंतू)
aerotaxis
वातानुचलन हवेतील प्राणवायूच्या चेतनेनुसार घडून येणारी हालचाल उदा. अस्थिर वनस्पती किंवा स्थिर वनस्पतींचे सुटे भाग
aerotropism
वातानुवर्तन हवेच्या दिशेकडे किंवा दिशेविरुद्ध होणारी वनस्पतींच्या अवयवांची वाढ, उदा. खाऱ्या दलदलीतील झाडांची मुळे chemotropism
aestival aspect
वासंतिक दृश्य, उष्मकालीन प्रभाव. उन्हाळ्यात दृष्टीस पडणारे वनस्पतिसमुदायाचे स्वरुप, फुलांनी भरलेले (उदा. गुलमोहर) अथवा नवीन पालवीमुळे हिरवेगार दिसणारे (उदा. वड)
aestivtion
पुष्पदलसंबंध कळीतील पुष्पदलांची (संदले व प्रदले) परस्परसंबंध दर्शविणारी मांडणी ptyxis, vernation
aethalium
उपधानक श्लेष्मकवक वनस्पतींत कधी कधी सूक्ष्म व अनेक बीजुककोश एकत्र होऊन बनणारा प्रजोत्पादक अवयव Myxomycetes
affinity
आप्तभाव वनस्पतींतील (अथवा प्राण्यांतील) सादृश्यामुळे दिसून येणारे व्यक्तींतील (अथवा लहानमोठ्या गटातील) रक्ताचे नाते, त्यांचे नैसर्गिक वर्गीकरण या नात्यावर केले जाते.
after-ripening
अनुपक्कन, अनुपाक वनस्पतींचे बीज पूर्णपणे तयार झाल्यानंतरही लागलीच न रुजता काही वेळानंतर (विश्रांतिकालानंतर अथवा प्रसुप्तावस्थेनंतर) रुजते., ह्या मध्यावधीला वरील संज्ञा वापरतात. या कालात बीजामध्ये काही क्रियावैज्ञानिक (शरीरव्यापारविषयक) बदल घडून येतात.
Agaricales
पटलकवक गण, ऍगॅरिकेलीझ सत्यकवक विभागातील गदाकवक वर्गात अंतर्भूत असलेल्या दोन उपवर्गातील सत्य गदाकवकातील एक गण, भूछत्रे, शूलकवक इत्यादींचा येथे समावेश असून यामध्ये प्रथमपासून गदाकोशिका उघड्याच असतात किंवा गदाबीजुके बनून पक्व होतेवेळी त्या उघड्या होतात.
Agavaceae
घायपात कुल, ऍगॅव्हेसी घायपात गणातील एक कुल (एकदलिकित फुलझाडे), अरुंद, लांबट किंवा भाल्यासारख्या पानांचा झुबका खोडाच्या टोकावर राहतो, फुलातील परिदले शुष्क नसून बहुधा ती जुळून नलिका बनते, किंजपूट ऊर्ध्वस्थ किंवा अधःस्थ, इतर लक्षणे पुढे घायपात गणात दिल्याप्रमाणे, उदा घायपात, दर्शना, युका, नागीन, फर्क्रिया इत्यादी.
Agavales
घायपात गण, ऍगॅव्हेलीस हचिन्सन यांनी बनविलेला एकदलिकित फुलझाडांचा एक गण. याचा प्रसार उष्ण व उपोष्ण खंडातील शुष्क प्रदेशात व ऑस्ट्रेलियात आहे. प्रमुख लक्षणे - वृक्षासारख्या व अनेक वर्षे जगणाऱ्या वनस्पती, काष्ठमय खोडावर किंवा जमिनीवर वाढणाऱ्या खोडाच्या टोकास जाड, मांसल, सूत्रल, कधी कधी काटेरी असलेल्या पानांचा झुबका, फुले लहान, सच्छद, अनेक शाखायुक्त परिमंजिरीवर येतात, ती बहुधा अरसमात्र, द्विलिंगी, किंवा एकलिंगी व दोन स्वतंत्र झाडावर येतात, परिदले शुष्क किंवा मांसल, केसरदले सहा व परागकोशात दोन कप्पे, ऊर्ध्वस्थ किंवा अधःस्थ किंजपुटात तीन किंवा एक कप्पा व त्यात अक्षावर किंवा मध्यावर बीजके, बोंडे किंवा मृदुफळ, बीजे सपुष्क, या गणात फक्त एकच कुल (घायपात कुल) घातले आहे.
agent
मध्यस्थ, माध्यम वनस्पतीतींल परागण, फलप्रसार व बीजे अथवा बीजुके यांचा प्रसार घडवून आणण्यास साहाय्य करणारे वारा, प्राणी इत्यादीसारखे घटक pollination
aggregate fruit
संघफळ, घोसफळ एकाच फुलातील अनेक सुट्या किंजदलापासून बनलेल्या अनेक साध्या फळांचा, घोस, मोरवेल, पिवळा किंवा हिरवा चाफा, रुई इ. carpel etaerio
aggregation
जमाव अनेक वनस्पतींच्या निसर्गतः एकत्र वाढण्याने बनलेला समूह, हा प्रकार त्यांचे प्रजोत्पादक घटक एकत्र आल्याने व अनुकूल परिस्थितीमुळे घडून येतो. उदा. शेवाळी, गवते, टाकळा इ.
air
हवा, वायु, वात, अनिल a. bladder वायुकोश, वाताशय हवेने भरलेला फुग्यासारखा अथवा गेळ्यासारखा अवयव उदा. चीडचे परागकण, सरगॅसम किंवा फ्यूकस शैवलाच्या कायकाचे भाग a. canal (air passage) वायुमार्ग, हवामार्ग वनस्पतीच्या शरीरात हवेची ये-जा होण्याकरिता बनलेले लहान
aka
पक्ष, पंख काही फुलांच्या पुष्पमुकुटातील पंखासारख्या दोन पाकळ्या, उदा. गोकर्ण, वाटाणा इ. wing, pl. alae
albinism
श्वेतत्त्वः, विवर्णता शरीराचा एखादा अवयव किंवा सर्व शरीर रंगहीन (पांढरट) असण्याचा प्रकार, उदा. पांढऱ्या फुलांचे प्रकार (गुलाब, गोकर्ण, कण्हेर, जास्वंद इ.), कित्येक पशूंतही असे प्रकार सामान्यपणे आढळतात (मांजर, कुत्रा, ससा, मेंढी, गाय इ.)
albino
विवर्ण (श्वेत), रंजकहीन पांढऱ्या फुलांची किंवा पानांची (वनस्पती) किंवा पांढरे प्राणी, उदा. धोतरा, पांढरा वाघ
alburnum (sap wood)
रसकाष्ठ काही बहुवर्षायू झाडांच्या जुन्या खोडांमध्ये सालीच्या आतील फिकट रंगाच्या काष्ठाचा व कार्यक्षम भाग, द्रव पदार्थांची ने आण याच भागातून होते duramen (heart wood)
ales
गणवाचक प्रत्यय उदा. Sapindales अरिष्ट (रिठा) गण, लॅटिन वंशनामापुढे (Sapindus) प्रत्यय लावून गणवाचक संज्ञा बनविली जाते.
aleurone grain
अपांडुर कण प्रथिनाचा सूक्ष्म कण, वनस्पतीच्या भिन्न अवयवांतील संचित अन्न या स्वरुपात कधी कधी आढळते a. layer आपांडुर स्तर वर वर्णन केलेल्या पदार्थाने भरलेल्या कोशिकांचा थर, उदा. मक्याचे दाणे protien
alga
शैवल (अ. शैवले), आल्गा (अ. आल्गी) बहुधा पाण्यात वाढणारी, बीजहीन, एक किंवा अनेक कोशिकांची बनलेली, साधी, (कायकाभ) हिरवी, पिंगट, लालसर किंवा निळसर वनस्पती thalloid, thallophya (pl. algae)
alien
अन्यदेशीय विशिष्ट निमित्ताने बाहेरील प्रदेशातून आलेली व कायम रहिवासी झालेली तणासारखी वनस्पती, उदा. पिवळा धोत्रा, गाजरी, ओसाडी इ.
allelomorph (allel)
विकल्प वनस्पतीच्या एकाच जातीतील दोन प्रकारांचे भिन्नत्व (विरुद्धपणा) दर्शविणारा गुण (लक्षण) किंवा जनुक, उदा. वाटाण्याच्या जातीतील उंचपणा व खुजेपणा, फुलांचा पांढरेपणा व लाली gene
allelomorphic pair of characters
वैकल्पिक गुणयुगुल वर वर्णन केलेल्या विरुद्ध गुणांची जोडी असे भिन्न गुण असणाऱ्या व्यक्तींच्या प्रजोत्पादनामुळे होणाऱ्या संततीस संकरप्रजा (सकरज) म्हणतात. या संततीत आईबापांच्या भिन्न गुणांपैकी कधी एकाचाच प्रभाव दिसतो व दुसरा गुण सुप्तावस्थेत असून पुढील पिढ्य
alliance
१ संघ, संघसमष्टी २ उपवर्ग १ वनस्पतींच्या अनेक व विशिष्ट प्रकारच्या समुदायांनी (संगतीनी) बनलेला नैसर्गिक व मोठा समुदाय, पादप संघटना व पादपसमाजशास्त्र याबाबत परस्परात आप्तभाव दर्शविणाऱ्या अनेक पादप संगतींचा गट २ काही विशिष्ट व नैसर्गिक वनस्पति कुलांचा एकत्र
allogamy
परयुति वनस्पतींच्या एकाच जातीतील दोन भिन्न व्यक्तींच्या प्रजोत्पादक कोशिकांचे (गंतुकांचे) मीलन (फलन) autogamy
allogenic succession
परजात (परजनित) अनुक्रमण, परानुक्रमण बाह्य परिस्थितीमुळे पादपसमुदायाला विशिष्ट चरमावस्थेप्रत पोचविणारी प्रक्रिया autogenic, succession.
allopatric speciation
अवरोधी जातिनिर्मिती भौगोलिक कारणांमुळे पूर्वी अलग पडलेल्या पूर्वजांपासून स्वतंत्रपणे अवतरणाऱ्या नवीन जातींची निर्मिती.
allopolyploidy
असमगट गुणन व्यक्तीच्या शरीराच्या कोशिकेतील रंगसूत्रंआची संख्या तिप्पट, चौपट इ. अशी असून त्यापैकी एखादा (किंवा अधिक) संच एका जातीच्या वनस्पतीचा व उरलेले संच दुसऱ्या जातीच्या वनस्पतींचा असण्याचा प्रकार autopolyploidy
allotetraploid
उभयद्विगुणित आई व बाप यांच्या द्विगुणित रंगसूत्रांचा संच मिळालेली चतुर्गणित (जाती), द्विगुण संकरजातील रंगसूत्रे दुप्पट झाल्यामुळे बनलेली असमगट गुणित जाती. allopolyploidy, amphiploid.
alpine vegetation
आल्पीय वनश्री पर्वत शिखरावर वृक्षमर्यादेपलीकडे असलेली खुरटी (फक्त औषधी व लहान झुडपे असलेली) वनश्री.
alternate
एकांतरित, एकाआड एक अक्षाच्या (खोडाच्या) प्रत्येक पेऱ्यावर एक अशा क्रमाने आलेली, उदा. पाने, पुष्पदले अथवा शाखा
alternation of generations
पिढ्यांचे एकांतरण लिंगभेद न दर्शविणाऱ्या (द्विगुणित) एका पिढीपासून दुसरी लैंगिक पिढी (एकगुणित) निर्माण होणे व पुनरपि हिच्यापासून अलैंगिक पिढीची उत्पत्ती होणे, याप्रकारचे जीवनचक्र, काही शैवले, शेवाळी व नेचाभ ह्या वनस्पतींच्या गटात ही घटना स्पष्टपणे दिसून य
alternative inheritance
वैकल्पिक (पर्यायी) अनुहरण संततीमध्ये काही व्यक्ती आईबापांच्या दोन (वैकल्पिक - प्रभावी व अप्रभावी) गुणांपैकी एकच गुण दर्शवितात तर काही दुसरा (पर्यायी) गुण दर्शवितात असा प्रकार.
alveolus
विवर १ वस्तूच्या पृष्ठभागावरील रिकामी खोलगट जागा (पोकळी) उदा. मधमासांचे पोळे, सूर्यफुलाच्या पुष्पासनावरील खाच २ अनेक छिद्रे असलेल्या कवकाच्या शरीरावरील कप्पा ३ कोशिकेतील जीवद्रव्याच्या फेसासारख्या अवस्थेतील रिती जागा
Amarantaceae
अपामार्ग (आघाडा) कुल, ऍमरँटसी अपामार्ग (आघाडा), कुरडू, माठ, पोकळा, राजगिरा, तांदुळजा इत्यादि द्विदलिकित वनस्पतींचे (फुलझाडांचे) कुल, हचिन्सन यांनी या कुलाचा अंतर्गत चक्रवर्त गणात (चाईनोपोडिएलिझ) केला असून बेसींच्या पद्धतीत कार्याएफायलेलीझ केला असून बेसींच्या पद्धतीत कार्याएफायलेलीझ या गणात केला आहे व त्यात चक्रवर्त कुल समाविष्ट आहे. प्रमुख लक्षणे- बहुतेक औषधीय वनस्पती, एकलिंगी किंवा द्विलिंगी,छदे व छदके असलेली बिनपाकळ्याची फुले, संदलासमोर बहुधा पाच केसरदले, ऊर्ध्वस्थ किंजपुट आणि न फुटणारे किंवा करंड्या एक किंवा अनेक. सपुष्पक
amaryllidancease
मुसळी, कुल,ऍमारिलीडेसी मुसळी, घायपात, नार्सिसस, कुमूर, नागदवणा इत्यादी एकदलित वनस्पतींचे कुल. या कुलाचा अंतर्भाव केसर गणात (इरिडेलीझ) बेसींच्या पद्धतीत केला असून हचिन्सन यांनी मुसळी गणात (ऍमारिलिडेलीझ) केला आहे. या कुलाची प्रमुख लक्षणे- कंद, दृढकंद प्रकारचे खोड, मूलज पाने, फुलोऱ्यास प्रथम महाछदाचे आवरण, परिदले सहा, खाली नळीसारखी व वर सुटी, सहा केसरदले, अधःस्थ, तीन कप्यांचा व अनेक बीजकांचा किंजपुट, मृदुफळ किंवा बोंड इ.
Amentiferae
नतकणिश गण, ऍमेंटिफेरी नतकणिश फुलोरा असलेल्या वनस्पतींचा गट, यामध्ये भूर्ज कुल, ओक कुल, वालुंज कुल, अक्षोट कुल इत्यादींचा समावेश केला जात असे.
amentum (catkin)
नतकणिश फुलोऱ्याचा एक प्रकार, यावर बिनदेठाची लहान, एकलिंगी, सच्छद व बिनपाकळ्याची फुले असुन फुलोरा बहुधा लोंबता कणिश प्रकारचा असतो. उदा. भूर्ज, मिरवेल, वंजू (ओक), नागवेल, हॅझेल, पॉप्लर इ. spike, inflorescence
amitosis
असम विभाजन एका कोशिकेची दोन किंवा अधिक भागात होणारी प्रत्यक्ष विभागणी, विभागणीनंतर ते विभाग पूर्णपणे सारखे होतातच असे नाही, यामध्ये कोशिकेतील प्रकलादी भागांची साधीच विभागणी होते, तसेच त्यानंतर कोशिकावरण लागलीच बनते असे नाही, केव्हा तर यामुळे बहुप्रकली कोश
amoeboid
आदिजीवसदृश अत्यंत सूक्ष्म व प्रारंभिक प्राण्याप्रमाणे (ऍमीबा प्रमाणे) उदा. श्लेष्मकवकातील गंतुके a. movement आदिजीवसदृश हालचाल आदिजीवाप्रमाणे छद्मपादांनी सरकवण्याची प्रक्रिया, कोशिकावरण नसलेल्या सजीव (प्राकल) घटकांचे स्थलांतर या पद्धतीने होते. उउदा.
AMP
ईमपी ऍडिनोसीन मॉनोफॉस्फेट या रासायनिक पदार्थाच्या नावाचे संक्षिप्त रुप. ऍडॅनेलिक अम्ल, एक न्यूक्लीओटाइड (प्रकलातील संयुग), nucleotide.
amphibious
जलस्थलवासी, जलस्थलीय पाण्यात व जमिनीवर जगणारे (जीव) उदा. दलदलीत वाढणारी वनस्पती, कमळ, पाणकणीस, प्राण्यांच्या बाबतीत उभयचर ही संज्ञा वापरतात.
amphicribral
मध्यप्रकाष्ठक प्रकाष्ठाभोवती परिकाष्ठ अशी मांडणी असलेले (एकमध्य वाहक वृंद), उदा. काही नेचे (ग्लीकेनिया ऑस्मुंडा) xylem, phloem, stele
amphiploid
उभयद्विगुणित दोन जातींच्या संकराने प्राप्त झालेल्या प्रत्येकी दुप्पट रंगसूत्रामुळे एकूण चौपट रंगसूत्रे असलेली संकरज वनस्पती उदा. तंबाखूच्या व धोत्र्याच्या काही जाती amphidiploid
amphithecium
बाह्यकोश विकासावस्थेतील अतिशय कोवळ्या (अपक्व) बीजुकाशयाचे बाहेरील आवरण उदा. शेवाळी endothecium
amphitropous
तिर्यङ्मुख, उभयवर्ती बीजबंधाशी काटकोन केलेले (बीजक), याचे बीजकरंध व बीजकतल विरुद्ध टोकास असून नाभि या दोन्हीपासून सारख्या अंतरावर असते, रंध, तल व नाभि यांचा त्रिकोन बनतो. उदा. लेग्ना (डकवीड) Lemnaceae.
amphivasal
मध्यपरिकाष्ठक परिकाष्ठाभोवती प्रकाष्ठ असलेले (एकमध्य वाहक वृंद, रंभ), उदा. दर्शना (Dracaena Sp.)
anabolism
उपचय पिष्ठ, प्रथिन, मेद इत्यादी पदार्थ किंवा प्राकल (कोशिकेतील सजीव पदार्थ) काष्ठ, तूलीर (कौशिकावरण) इत्यादी बनविण्याची विधायक प्रक्रिया katabolism
Anacardiaceae
आम्रकुल, ऍनाकार्डिएसी आंबा, काजू, चारोळी, मोई इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा अंतर्भाव अरिष्ट (रिठा) गणात (सॅपिंडेलीझ) केला जातो. या कुलाची प्रमुख लक्षणे- राळयुक्त चीक, लहान, एकलिंगी किंवा द्विलिंगी, नियमित फुले, संदले ३-७ जुळलेली, पाकळ्या ३-७ सुट्या, पेल्यासारखे बिम्ब, केसरदले ३-७ किंवा दुप्पट, ऊर्ध्वस्थ किंजपुट व बहुधा आठळीयुक्त फळ.
anaerobe
अननिल, अवायुजीवी हवेशिवाय जगणारे, उदा. नायट्रेट क्षारांचा नाश करणारे जमिनीतील सूक्ष्मजंतू anaerobic
anaerobic respiration
अननिल श्वसन प्राणवायू बाहेरुन आत घेतल्याशिवाय चालणारी काही सजीवांतील ऊर्जा निर्माण करणारी प्रक्रिया, उदा. काही सूक्ष्मजंतु, किण्व (यीस्ट), या प्रकारात विशिष्ट पदार्थाच्या विघटनातून ऊर्जा प्राप्त केली जाते.
analogous
समरुप, सदृश दोन किंवा अधिक अवयवांमध्ये समान कार्यामुळे आलेला सारखेपणा दर्शविणारे उदा. द्राक्षवेलीचे (खोड) ताणे व वाटाण्याचे (दल) ताणे, निवडुंगाचे व बाभळीचे काटे भिन्न अवयवांची रुपांतरे आहेत. homologous
analysis floristic
पादपजातीय विश्लेषण एखाद्या ठिकाणी आढळणाऱ्या वनश्रींच्या अन्वेषणात आवश्यक असलेली तेथील अनेक समुदायात आढळणाऱ्या वनस्पतींची तपशीलवार माहिती. उदा. नामनिर्देश, संख्या, प्रकार, प्रभाव स्थायिकता इ. तसेच भौगोलिक, स्वरुपविषयक, परिस्थितीविषयक माहितीही त्या वनश्रीती
anaphase
पश्चावस्था कोशिकेच्या समविभाजनातील चारीपैकी उपांत्य अवस्था, यामध्ये प्रकलातील रंगसूत्रांची विभागणी संपून त्यांचा एकेक संच कोशिकेच्या दोन टोकाकडे स्थिर होतो mitosis
anatomy
शारीर शरीरातील संरचनात्मक माहिती a. minute (histology) सूक्ष्म शारीर, उतकविज्ञान सूक्ष्मदर्शकाच्या साहायाने मिळणारी शरीराच्या भिन्न अवयवांची तपशीलवार संरचनात्मक माहिती, यामध्ये कोशिका व त्यांचे समूह (ऊतके) या संबंधीची माहिती असल्याने येथे ऊतकविज्ञान अशीही
anatropous
अधोमुख, अधोवर्ती खाली वळलेले बीजकरंध असलेले (बीजक) उदा. सूर्यफूल, येथे बीजबंध बीजकाच्या आवरणाशी चिकटलेला असून बीजकरंध व नाभि जवळ जवळ असतात. ovule, raphe
androecium
केसरमंडल, पुं-केसरमंडल फुलातील परागकण बनविणाऱ्या एक किंवा अनेक अवयवांचा (केसरदलांचा) संच stamen, pollen
androgenic haploid
पुंजनित एकगुणित रंगसूत्रांचा एकच संच असलेल्या (एकगुणित) नरकोशिकेपासून बनलेले (अपत्य) parthenogenesis, haploid
androgynophore
केसरकिंजधर फुलातील पाकळ्यांमधून वर वाढलेला व प्रथम केसरमंडल आणि नंतर किंजमंडल धारण करणारा अक्ष (दंड) उदा. पांढरी तिळवण
androsporangium
पुं बीजुककोश पुं-बीजुक (लघुबीजक) बनविणारी कोशिका, हिचेच रुपांतर (पक्व झाल्यावर) कोशात होते.
androspore
पुं बीजुक रुजल्यावर एक खुजा (ऱ्हस्व) पुं-तंतू उत्पन्न करणारे व हालचाल करणारे (चर) बीजुक उदा. इडोगोनियम शैवल nanandrium
anemophilous
वायुपरागित वाऱ्याच्या साहाय्याने परागांचे वहन (सिंचन) करणारी वनस्पती, उदा. गवते, सायकस इ.
anfractuose
सर्पिल, तरंगित नागमोडीसारखे, पिळीव, उदा. पांढरी सावर (Eriodendron anfractuosum DC) (sinuous, spirally twisted)
Angiospermae
आवृतबीज वनस्पती उपविभाग, ँजिओस्पर्मी बीजाला फलावरणाचे संरक्षण असणाऱ्या वनस्पतींचा गट, सामान्य भाषेत, फुलझाडे. वनस्पति कोटीतील बीजी वनस्पतींच्या विभागातील दोन्हीपैकी एक उपविभाग, दुसरा उपविभाग, प्रकटबीज वनस्पती Gymnospermae, flower
angle of divergence
परामुखता कोन एकाआड एक पानांच्या मांडणीत, भिन्न पातळीतील दोन जवळच्या (क्रमागत) पानांतील स्थानांतर, हे कोनाच्या अंशात दर्शविले जाते. उदा. गवताच्या खोडावर प्रत्येक पेऱ्यावर एक पान असून एकूण पाने दोन रांगांत असतात म्हणून परामुखता कोन १८० अंश मानला जातो.
angular
कोनयुक्त, कोनीय कोन असलेले, आडव्या छेदात अवयवाचा परीघ वाटोळा नसून चौकोनी किंवा षट्कोनी असलेले (उदा. खोड, फळ, बी इ.,) उदा. कांडवेल, मोथा, निवडुंग, तुळस, इत्यादींचे खोड, भेंडीचे फळ
animate
सजीव, चेतन हालचाल, श्वसन, वर्धन, पोषण व प्रजोत्पादन इत्यादी सजीवांची लक्षणे दर्शविणारे, जिवंत, अर्थात् प्राणी, वनस्पती, विषाणू, सूक्ष्मजंतू इ.
anisogametes
असमगंतुके सारखे नसलेले (नर व स्त्री असा भेद दर्शविणारे) प्रजोत्पादक घटक (कोशिका) isogametes
anisomerous
असमभागी प्रत्येक मंडलातील पुष्पदलांची संख्या सारखी नसलेले (फूल), उदा. वाटाण्याचे फूल (संदले पाच, प्रदले पाच, केसरदले दहा, किंजदले दोन) isomerous
anisophyllous
भिन्नपर्णी एकाच वनस्पतीवर दोन प्रकारची पाने असणारी, ती एकाच माध्यमात (हवेत किंवा पाण्यात) असतात उदा. सिलाजिनेला मार्टेन्सी.
anisostaminous
असमकेसर सर्व केसरदले सारखी नसणारी (वनस्पती) उदा. मोहरीच्या फुलात काही केसरदले आखूड तर काही लांब असतात anisostemonous
annual
वर्षायु वार्षिक, एकच वर्ष किंवा ऋऋतू आयुष्य असणारे उदा. मका, मिरची (Capsicum annuum L.), सूर्यफूल (Helianthus annuus L.) a. ring वार्षिक वलय खोडामध्ये दरवर्षी एक याप्रमाणे बनत असलेले प्रकाष्ठाचे वर्तुळ. बहुवर्षायू वृक्षांच्या खोडांतील वर्तुळे मोजून
annulus
वलय, स्फोटक वलय १ भूछत्र (कवक) वनस्पतीच्या दांड्यावर असलेले काकणासारखे कडे २ नेचे वनस्पतींच्या बीजुककोशावर असलेला जाड आवरणाच्या कोशिकांचा थर, यामुळे कोशाच्या स्फोटास चालना मिळते. ३ शेवाळी वनस्पतींच्या बीजुकाशयावर स्फोट घडवून आणणारा जाड कोशिकांचा थर
anomalous structure
असंगत संरचना सर्वसाधारणतः नित्य न आढळणारी खोड किंवा मुळे यांची अंतर्रचना, बहुधा द्वितीयक वाढीत ऊतककराच्या अनित्य क्रियेमुळे अशी अंतर्रचना निर्माण होते व कित्येकदा तिचे विशिष्ट कार्य असते. उदा. सायकस व मोठ्या वेलींची खोडे, मुळा, गाजर, बीट यासारखी मांसल मुळे
Anonaceae
सीताफल कुल, ऍनोनेसी सीताफळ, रामफळ, मारुतीफळ, हिरवा चाफा, हिरवा अशोक इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा अंतर्भाव मोरवेल गणात (रॅनेलीझ) मध्ये केला जातो, हचिन्सन यांनी सीताफळ गणात (ऍनोनेलीझमध्ये) केला आहे. या कुलाची सामान्य लक्षणे वृक्ष अथवा झुडुपे, साधी एकाआड एक पाने, फुलात तीन संदले, तीन किंवा सहा सुट्या पाकळ्या, अनेक केसरदलांची सर्पिल मांडणी व अनेक ऊर्ध्वस्थ व सुटी किंजदले, घोसफळ व सपुष्क रेषाभेदित बिया
antagonism
विरोध १ वनस्पतींच्या पोषणामध्ये खनिज लवणांच्या वैयक्तिक विषारी परिणामांचे परस्पराकडून निराकरण होण्याचा प्रकार २ एका जीवाच्या वाढीवर दुसऱ्याचा अवरोध
antagonistic symbiosis
विरोधी सहजीवन दोन सजीव एकत्र जीवन कंठत असताना एकाचा दुसऱ्यावर हानीकारक परिणाम होण्याचा प्रकार उदा. आश्रय देणारी एक वनस्पती व तिच्यावर जगणारी दुसरी वनस्पती (आकाशवेल, तांबेरा, काणी अर्गट यासारखे रोग) symbiosis
anterior
पुरश्च, अग्र, अग्रीय सजीवांच्या शरीराचा किंवा अवयवाचा पुढचा (डोक्याकडील, टोकाकडील) भाग, खोडावरील बाजूच्या फुलांच्या बाबतीत खोडाजवळची बाजू पश्च व त्याविरुद्ध असलेली बाजू ती पुरश्च.
antero-posterior
अग्रपश्च पुढचा व मागचा भाग यातून जाणारी किंवा परस्पराविरुद्ध टोकातून जाणारी (रेषा किंवा दिशा) a.plane अग्रपश्च प्रतल वर वर्णन केल्या प्रकारची उभी पातळी
anthella
निम्नाग्र पुष्पबंध गुलच्छ नावाच्या फुलोऱ्यात वरच्या पातळीत खोलगटपणा असणारा प्रकार उदा. प्रनड (Juncus) corymb.
anther
परागकोश फुलातील केसरदलाच्या तंतूच्या टोकास असणारी व परागकणांच्या भुकटीने भरलेली पिशवी, याचे बहुधा दोन खंड असून प्रत्येकात प्रथम दोन कप्पे असतात, पुढे त्याचा एक कप्पा (कोटर) बनतो. pollen sac
antheridium
रेतुकाशय पुं-गंतुके (प्रजोत्पादक नरकोशिका) निर्माण करणारा बहुकोशिक अवयव, शेवाळी, नेचे व नेचाभ वनस्पतीत आढळतो, काही शैवलांत एककोशिक अवयव याच नावाने ओळखतात.
antherizoid
रेतुक प्राणी व वनस्पती यामध्ये आढळणारी, हालचाल करणारी, केसलयुक्त प्रजोत्पादक पुं-कोशिका (पुं-गंतुक) gamete spermatozoid
anthesis
पुष्पविकसन, पुष्पकाल फुलणे, वनस्पतीला फुले येणे, कळ्या उमलणे, काही वनस्पती वर्षातून एकदाच फुलतात (उदा. गुलमोहोर), तर काही कमीजास्त प्रमाणात वर्षभर फुलतात उदा. कण्हेर, गुलाब इ., काहींच्या जीवनात एकदाच फुले येतात (उदा. बांबू).
Anthocerotae
शृंगकावर्ग, ँथोसिरोटी शेवाळी वनस्पतींच्या विभागातील एक वर्ग, काहींच्या मते यकृतका वर्गातील तीन गणांपैकी एक, ँथोसिरोटेलीझ, मार्चाशिएलीझ व युंगरमॅनिएलीझ हे तीन गण होत, हल्ली बहुतेक शास्त्रज्ञ हेपॅटिसी (यकृतका), ँथोसिरोटी (शृंगका) व मुस्सी (हरिता) असे शेवाळी
anthocyanin
वर्णद्रव्य, नील रक्त द्रव्य फुले, फळे, पाने इत्यादींमध्ये आढळणारे निळे किंवा लाल (गडद किंवा फिकट) रंगद्रव्य, हे कोशिकारसात विरघळलेले असते, विशिष्ट ऋऋतूत किंवा कोवळेपणी कित्येक पानात आढळते. यामुळे ते अवयव रंगीत दिसतात. नायट्रोजनच्या कमतरतेमुळेही हे लक्षण आढळते.
anthophyll
सवर्ण पुष्पदल रंगीत संदल किंवा प्रदल, कधी कधी केसरदले व किंजदले ही रंगीत असतात (उदा. कर्दळ)
anthracnose
करपा, कवडी १ द्राक्षवेलीचा एक रोग (Phoma) २ कापसावरचा एक रोग (Colleotrichum) यामध्ये फळांवर किंवा पानांवर पिंगट ठिपके येऊन पिकाची हानी होते. काकडी, टरबूज, भात इत्यादीवरही करपा रोग येतो.
antibiotic
प्रतिजैव काही सूक्ष्म जीवांच्या वाढीस आळा घालणारे नैसर्गिक कार्बनी पदार्थ, यांची निर्मिती बहुतेक काही सूक्ष्मजीव करतात.
anticlockwise
अपसव्य, वामावर्त, डावी घड्याळ्याच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने वळण घेणारी (वेल) (उदा. घेवडा, अमरवेल) clockse, dextrose, twiner sinistrorse
antipodal
तलस्थ फुलझाडांच्या बीजकातील गर्भकोशाच्या तळाजवळ असणारी उदा. कोशिका, सामान्यपणे या तीन असतात.
antisepalous
संदलसंमुख संदलाच्या समोर असलेला (संदलाशी एकाआड एक नसणारा) उदा. पाकळी किंवा केसरदलासारखा अवयव
antiseptic
पूतिरोधक जंतुनाशक, कुजणे, नासणे, आंबणे इत्यादी प्रक्रियेशी विरोध करणारे व त्यामुळे त्या प्रक्रियेला जबाबदार असणाऱ्या जंतूस मारक द्रव्य
Apetalae
अप्रदल (प्रदलहीन) उपवर्ग, एपेटॅली पाकळ्या नसलेली फुले असण्ऱ्चा द्विदलिकित वनस्पतींचा बेंथॅम आणि हूकर यांच्या वर्गीकरणातील उपवर्ग. या वनस्पती मूलतः प्रारंभिक समजून त्यांचा वेगळा गट केला गेला, तथापि त्यांपैकी कित्येक ऱ्हासामुळे प्रदलहीन असून मुक्तप्रदल (सुट
apetalous
अप्रदल, प्रदलहीन पाकळ्या (पुष्पमुकुट) नसलेले (फूल), उउदा. गुलबुश, एरंड. गुलबुशाच्या फुलातील रंगीत पाकळ्यासारखा भाग परिदलमंडल असून संवर्तासारखा तळातील भाग छदमंडल असते.
apheliotropism
ऋऋण प्रकाशानुवर्तन प्रकाशाच्या चेतनेमुळे वनस्पतींच्या अवयवांचे प्रकाशाच्या विरुद्ध दिशेकडे वाढणे अथवा वळणे (वाढण्याची प्रवृत्ति) heliotropism negative heliotropism
apocarpous
मुक्तकिंज, पृथक अंडपी सुटी (अलग) किंजदले असलेले, उदा. मोरवेल, पिवळा चाफा, कुडा इत्यादींची फुले
apocynaceae
करवीर कुल, ऍपोसायनेसी कण्हेर (करवीर), कुटज (कुडा), तगारी, पांढरा चाफा, करवंद, सातवीण इत्यादी फुलझाडांचे (द्विदलिकित) कुल. या कुलाचा अंतर्भाव बेसींच्या पद्धतीत किराइत गणात (जेन्शिएनेलीझ) केला असून हचिन्सन यांनी करवीर गणात (ऍपोसायनेलीझ) केला आहे. या कुलाची प्रमुख लक्षणे - दुधासारखा चीक, साधी पाने बहुधा समोरासमोर किंवा मंडलित, पूर्ण, नियमित, द्विलिंगी फुले, जुळलेल्या चार ते पाच पाकळ्या व त्यास चिकटलेली, सुटी, चार ते पाच केसरदले, ऊर्ध्वस्थ सुट्या किंवा जुळलेल्या दोन किंजदलांचे किंजमंडल, फळे विविध, पंखयुक्त किंवा केशयुक्त (कधी साध्या) बिया
apogamy
अफलित जनन, अनिषेक जनन लैंगिक प्रक्रियेच्या (फलनाच्या) अभावीही प्रजोत्पादन घडून येणे उदा. काही नेचे a. reduced (meiotic euapogamy) न्यूनित अनिषेक जनन गंतुकधारीच्या कोशिकांपासून नवीन बीजुकधारीची निर्मिती, हा बीजुकधारी एकगुणित असतो. a. vegetative शाकीय अफलित
apomixis
असंगजनन प्रजोत्पादनामध्ये गंतुकांचा संयोग किंवा प्रकलाचे न्यूनीकरण (विभाजन) न होता नवीन पिढीची निर्मिती, यामध्ये अफलित जनन, अबीजुक जनन व अनिषेक जनन यांचा समावेश होतो.
apophysis
१ आशयतल २ शल्कपीटिका १ शेवाळीतील बीजुकाशयाचा तळचा भाग २ काही शंकुमंत वनस्पतीतील बीजकाच्या खवल्यावर असलेला उंचवटा, उदा. चीड (पाइन)
apospory
अबीजुकजनन बीजुकनिर्मिती न होता बीजुकधारी (द्विगुणित) पिढीच्या इतर भागांपासून नवीन लैंगिक अवयव धारण करणाऱ्या (गंतुकधारी) पिढीची निर्मिती, उदा. काही नेचे, ही गंतुकधारी पिढी अनित्य (द्विगुणित) असते. haploid, diploid, gametophyte, sporophyte
apostrophe
विन्मुखावस्था तीव्र प्रकाशाच्या चेतनेमुळे हरितकणयुक्त कोशिकेच्या उभ्या भिंतीजवळ ते कण एकाखाली एक अशी ओळ करून राहण्याचा प्रकार (अथवा त्याकरिता केलेली हालचाल)
apothecium
मुक्त धानीफल शैवाक (धोंडफूल) व काही धानीकवकात आढळमारा उघडा, पेल्यासारखा किंवा वाटीसारखा, बीजुके निर्माण करणारा अवयव perithecium, ascus
appendage
उपांग शरीरावर किंवा अवयवावर वाढलेला गौण किंवा कमी प्रतीचा लहान अवयव, उदा. केस, खवला, काटा इ.
appendicular theory
उपांगीय सिद्धांत ऊर्ध्वस्थ किंजपुटापासून अधःस्थ किंजपुटाचा क्रमविकास झाला असून त्यामध्ये इतर पुष्पदलंआच्या तळभागांपासून बनलेल्या आवरणाने तो किंजपुट प्रथमपासून क्रमाने वेढून तो बदल झाला असावा अशी एक उपपत्ती, ही दुसऱ्या उपपत्तीपेक्षा अधिक ग्राह्य मानली गेली
apposition theory
स्तराधान सिद्धांत कोशिकावरणाच्या प्राथमिक थरावर आतील बाजूस नवीन थर बसून वाढ होते अशी उपपत्ती
appresorium
आबंधक आश्रय वनस्पतीस बाहेरुन चिकटून राहण्यास उपयुक्त असा अवयव, उदा. जीवोपजीवी कवक वनस्पती
aqua culture
मृदुहीन कृषि, जलकृषि पोषक द्रावणाच्या साहाय्याने वनस्पतींची कृत्रिम पद्धतीने वाढ (संवर्धन) करण्याची पद्धती (प्रकार), यालाच soiless culture असे म्हणतात. कारण या पद्धतीत नित्याप्रमाणे जमिनीतील खनिज पोषणावर वनस्पती अवलंबून नसतात. water culture, hydroponics
aquarium
जलजीवपात्र, जलजीवालय सदैव पाण्यात असणाऱ्या वनस्पती व प्राणी यांना नैसर्गिक परिस्थिती प्राप्त करून देणारी व त्यांची वाढ व प्रजोत्पादन यास मदत करणारी कृत्रिम पेटी (पात्र), अशा अनेक पेट्यांतून मोठ्या प्रमाणावर वनस्पती व प्राणी ठेवून त्यांचा अभ्यास व प्रदर्शन करण्याची सोय असलेली संस्था (जलजीवालय)
aquatic
जलवासी, जलीय, जलचर सदैव पाण्यात असणारे, उदा. शैवले, मासे इ. उदा. नावळी (Ipomoea aquatica Forsk). a. life जलजीवन पाण्यातील जीवनक्रम, जलजीव (पाण्यात राहणारे सजीव)
aqueous
आप्य, जलीय पाणी असलेले, पाण्यात केलेले (विद्रव, द्रावण) a. tissue आप्योतक पाण्याचा संचय करणाऱ्या कोशिकांचा समूह, ह्या कोशिकामधून रित्या जागा (मोकळ्या) कमी असून हरितकणूंची संख्याही कमी असते. उदा. मांसल पाने, खोड इत्यादी मरुवनस्पतींचे अवयव watery
Araceae
सुरण कुल, ऍरेसी वेखंड, सुरण, अळू, गोंडाळ इत्यादी एकदलिकित वनस्पतींचे कुल. बेंथॅम आणि हूकर यांच्या वर्गीकरण पद्धतीत न्यूडिफ्लोरी (नग्नपुष्प) श्रेणीत परंतु हचिन्सन यांच्या पद्धतीत सुरण गणात (ऍरेलीझ) या कुलाचा समावेश आहे, प्रमुख लक्षणे - महाछदाने संरक्षित अस
Araliaceae
तापमारी, कुल, ऍरेलिएसी तापमारी (ऍरिलिया), फॅटसिया, पॅनॅक्स, हेडेरा इत्यादी उद्यानवनस्पतींचे लहान कुल, याचा समावेश चामर गणात केला जातो. प्रमुख लक्षणे - वृक्ष, झुडुपे, वेली, राळनलिकायुक्त, पाने साधी किंवा संयुक्त, फुलोरे चामरकल्प किंवा स्तबक, फुले द्विलिंगी
arbor
वृक्ष काष्ठयुक्त बहुवर्षायु झाड tree उदा. कुंभा (Careya arborea Roxb.), चिनी कंदील (Malvaviscus arboreus Cav.)
arboretum
१ वृक्षसंवर्धनस्थान, वृक्षालय, वृक्षोद्यान २ वृक्षविज्ञान १ वृक्षासंबंधीच्या संशोधनार्थ बनविलेली बाग २ वृक्षासंबंधीच्या माहितीचे पुस्तक (वृक्षविज्ञान)
archegoniophore
अंदुककलशधर एक अथवा अनेक अंदुककलशांना आधारभूत दांडा, उदा. मार्चांशिया, फिंबिऍरिया इ. शेवाळी
archegonium
अंदुककलश शेवाळी, नेचे व तत्सम (नेचाभ) वनस्पतींत आढळणारा सुरईच्या आकाराचा बहुकोशिक व स्त्रीगंतुक (अंदुक) असलेला अवयव
archesporium
बीजुकपूर्वक बीजुके निर्माण करणारी आद्य कोशिका, हिच्यापासून प्रथम अनेक जनक कोशिका बनून नंतर शेवटी बीजुके निर्माण होतात sporocyte, spore
aril
अध्यावरण, बीजोपांग बीजकाच्या तळापासून उगम पावून बीजकाभोवती अंशतः किंवा पूर्णपणे वाढणारे बीजावरण, उदा. लिची, कमळ, विलायती चिंच इ. caruncle arillus
arillode
छद्मी अध्यावरण बीजकरंधापासून वाढून बीजकावर पसरलेले बीजावरण, जायपत्री हे जायफळाच्या बीजावरील छद्मी आवरण बीजकाच्या दोन्ही टोकापासून (बीजकरंध व बीजकबंध यापासून) वाढते false aril
Aristolochiaceae
ईश्वरी कुल, ऍरिस्टोलोकिएसी पोपटवेल (कुक्कुटवेल), सापसंद (ईश्वरी) इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा अंतर्भाव मोरवेल गणात (रॅनेलीझ) केला जातो, याची प्रमुख लक्षणे- बहुधा एकाआड एक पानांच्या औषधी, क्षुपे किंवा वेली, फुले मोठी, एकसमात्र व द्विलिंगी, परिदले जुळलेली, केसरदले व किंजदले जुळून किंजकेसराक्ष बनतो, अधःस्थ किंजपुट, बिया अनेक, मृदुफळ किंवा बोंड. हचिन्सन यांनी हे कुल ईश्वरी गणात घातले आहे
armature
शस्त्रसंभार वनस्पतींच्या शरीरावर किंवा शरीरात आढळणाऱ्या स्वसंरक्षक योजना उदा. काटे, दाहक (दंशक, कंडूत्पादक) केस, दुर्गंध, चीक, विषारी द्रव्ये इत्यादी
arrangement
मांडणी, विन्यास खोडावरील पानांची, फुलातील दलांची, किंजपुटातील बीजकांची, इत्यादींची विशिष्ट व्यवस्था
articulated (jointed)
संधियुक्त, सांधेदार सांधे असलेले, सांधलेले, उदा. एक्किसीटमचे खोड, लिंबू किंवा पपनसाच्या पानाचे पाते
artificial selection
कृत्रिम निवड एका जातीतील अनेक वनस्पतींतून (किंवा प्राण्यातून) मनुष्याच्या आवडीप्रमाणे (गरजेप्रमाणे) विशिष्ट गुणयुक्त व्यक्तींची (प्रकारांची) पैदाशीकरिता (किंवा संकर घडवून आणण्याकरिता) केलेली निवड, कित्येक खाद्य वनस्पती किंवा पाळीव प्राणी मनुष्याने शेकडो वर्षे केलेल्या निवडीतूनच उगम पावले आहेत.
ascent
आरोह, उद्गम चढण, अवयव (खोड) अथवा वनस्पती किंवा त्यातील द्रव पदार्थ वर चढविला जाण्याची प्रक्रिया (रसारोह)
Asclepiadaceae
रुई (अर्क) कुल, ऍस्क्लेपीएडेसी रुई, मांदार, हरणदोडी, अंतमूळ, माकडी, सोमलता, उतरणी, कावळी, उपळसरी इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा समावेश किराईत गणात (जेन्शिएनेलीझ मध्ये) केला जातो, हचिन्सन यांच्या पद्धतीत करवीर गणात (ऍपोसायनेलीझमध्ये) केला आहे. प्रमुख लक्षणे- औषधी, क्षुपे व वेली, बहुधा दुधी चीक आढळतो, पाने साधी व समोरासमोर, द्विलिंगी, पंचभागी, पूर्ण व नियमित लहान फुले, पाकळ्या जुळलेल्या व त्यावर केसरदलांशी संबंधित तोरण (परिवलय) तसेच केसरदले व किंजदले यांचा किंजकेसराक्ष, बहुधा परागांचे पुंज असून दोन किंजपुटापासून दोन स्वतंत्र पेटिकाफळे व त्यात शिखालू (केसाळ झुबका असलेली) बीजे असतात.
ascocarp
धानीफल धानीकवक वनस्पतीत लैंगिक प्रक्रियेनंतर आढळणारा व धानीबीजुकांची निर्मिती करणारा अवयव apothecium, perithecium
Ascomycetes
धानीकवक वर्ग, ऍस्कोमायसेटीज कवक वनस्पतींपैकी विशिष्ट प्रकारची बीजुके (धानी बीजुके) निर्माण करणारा (सत्यकवक विभागातील) एक गट, उदा. बाजरीवरील अर्गट रोग Eumycophyta, ergot
ascospore
धानीबीजुक धानीकवकातील प्रातिनिधिक व विविध आकाराचा एककोशिक प्रजोत्पादक घटक, हे धानी नावाच्या कोशिकेत प्रकलाच्या न्यूनीकरण विभागणीनंतर बनतात, संख्येने ही बीजुके चार किंवा आठ असतात व ती निर्मिणाऱ्या कोशिकेस धानी म्हणतात.
ascus
धानी धानीकवकात बहुधा नेहमी आढळणारा बीजुककोश, यातील बीजुके रुजून नवीन कवक वनस्पतीची निर्मिती होते. उदा. किण्व (यीस्ट) या कवकातील धानीत चारच धानीबीजुके बनतात.
asexual
अलिंग, निर्लिंग, अलिंगी, अलैंगिक लिंगभेदयुक्त प्रजोत्पादनाचा संबंध नसलेली व बीजुकांच्या साहाय्याने घडून येणारी नवीन वनस्पतीची निर्माणपद्धती. a. organ अलैंगिक अवयव लिंगभेदयुक्त लक्षणाचा अभाव दर्शविणारा अवयव, उदा. बीजुककोश a. reproduction अलिंग जनन लिंगभेद
aspect
१ समुखांश २ प्रभाव १ सूर्यप्रकाश वारा पाऊस इत्यादींच्या समोर असण्याच्या प्रक्रियेचे प्रमाण २ वनश्रींच्या किंवा एखाद्या पादपसमुदायाच्या स्वरुपावर बदलत्या ऋतुमानाचा परिणाम.
aspection
ऋतुप्रभाव भिन्न हवामानाच्या कालाचा वनस्पति समुदायावर होणारा परिणाम अथवा दृश्य स्वरुपातील बदल.
assay, biological
जैव आमापन जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेले मूल्यमापन, नियंत्रित परिस्थितीत एखाद्या पदार्थाचा सजीवावर होणाऱ्या परिणामाचे मूल्यमापन, उदा. गवतांचे पशुखाद्य या दृष्टीने मूल्य निश्चित करण्यास शास्त्रीय पद्धतीचा उपयोग करणे.
assimilation
सात्मीकरण, समावेशन बाहेरुन घेतलेले अन्नघटक शरीरात सामावून घेणे अथवा शरीराशी एकरुप बनविण्याची प्रक्रिया, यामध्ये अन्नघटकांची रुपांतरे अभिप्रेत आहेत.
association
संगति, साहचर्य पादपीय समाजशास्त्रातील नैसर्गिक मूलभूत एकक, विशिष्ट पादपीय संघटना, स्थलविषयक घटकातील ऐक्य व स्वरुपदृष्ट्या असलेली एकता इ. वैशिष्ट्ये असलेला वनस्पतींचा नैसर्गिक समुदाय. अनेक वनस्पतींच्या समुदायातील दोन किंवा अधिक प्रधान जाती सतत एकत्र वाढल्य
association of species
जाति संगति, जाति साहचर्य दोन किंवा अधिक जाती नियमितपणे वारंवार एकत्र (जवळ जवळ) वाढण्याची घटना.
assortment
व्यवस्थापन एकत्र असलेल्या भिन्न वस्तू (किंवा गुण) भिन्न गटामध्ये विभागून ठेवण्याची प्रक्रिया उदा. आनुवंशिकीमध्ये एका व्यक्तीत आईबापाकडून आलेले पर्यायी (वैकल्पिक) गुण (घटक) स्वतंत्र राहून प्रजोत्पादनानंतर पुढच्या पिढीत (संततीत) भिन्न अपत्यांत स्वतंत्रपणे उ
aster stage
तारकावस्था कोशिकेतील प्रकलांच्या विभाजनात स्वतंत्र झालेली रंगसूत्रे कोशिकेच्या मध्यावर वर्तुळाकार मांडली गेल्याने ताऱ्याप्रमाणे भासणारे दृश्य, mitosis
asymmetrical
असमात्र, असममित शरीराच्या किंवा विशिष्ट अवयवांच्या बाबतीत प्रमाणबद्धतेचा अभाव, त्यामुळे कोणत्याही पातळीने त्या शरीराचे किंवा अवयवाचे दोन सारखे भाग करता येत नाहीत, उदा. निवडुंगाचे फूल
atmometer
बाष्पीभवनमापक वाफेच्या रुपाने हवेत जात असलेल्या पाण्याचे मापन करणारे उपकरण, एक सच्छिद्र मृत्तिकापात्र potometer
ATP
एटीपी (ऍडिनोसीन ट्रायफॉस्फेट) वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या सजीव द्रव्यात सदैव आढळणारा व ऊर्जासंचय करणारा आद्य रासायनिक पदार्थ (संयुग), ही ऊर्जा ऑक्सिडीकर विक्रियांत (कार्बाएहायड्रेट, प्रथिने व मेदी संयुगे यांच्या ऑक्सिडीकरणात) निर्माण होते व तिचा
atrophy
अपक्षयः, पुष्टिरोध शरीरावयवांच्या अगर विशिष्ट ऊतकांच्या किंवा कोशिकांच्या आकारमानात घट होणे, पोषणातील दोष किंवा रोग ही कारणे त्यास जबाबदार असतात, केव्हा तर अवयव अर्धवट बनतो अगर पूर्णपणे लोप पावतो.
attachment
अभिलाग १ चिकटून असण्याची वृत्ती किंवा घटना उदा. परागकोश केसरतंतूस चिकटून असण्याचा प्रकार २ रंगसूत्रातील तर्कयुजाचे स्थान centromere
auricle
कर्णिका मनुष्याच्या बाह्य कानाच्या खालच्या भागाप्रमाणे दिसणारा भाग (पानाचा तळभाग) उदा. नेफोलेपिस, नेचा, तरवडीची (Cassia auriculate L.) उपपर्णे
autecology
स्वस्थलविज्ञान, स्वपारिस्थितिकी एखादी वनस्पती जेथे निसर्गतः उगवते, वाढते, फुलते व तेथील परिस्थितीशी एकरुप होते त्यासंबंधीची (ते स्थल व ती वनस्पती यांचे परस्परसंबंधदर्शक) माहिती synecology
authority
प्राधिकारी, कर्ता एखाद्या कुलाचे, वंशाचे किंवा जातीचे नाव ज्या शास्त्रज्ञाने प्रथम प्रसिद्ध केले ती व्यक्ती उदा. Liliaceae Adanson या नावात अंतर्भूत केलेली व्यक्ती (Adanson).
autoecious
एकस्थ एकाच आश्रय वनस्पतीवर संपूर्ण जीवन काढणारी (वनस्पती) उदा. कवकापैकी काही जाती (काणी तांबेरा, मूळकूज इ.)
autogenesis
स्वयंजनन पूर्वी सजीव रुपात नसलेल्या कोणत्याही वस्तूपासून होणारी सजीवाची निर्मिती, हा समज अनेक वर्षे प्रचलित होता abiogenesis spontaneous generation
autogenic succession
स्वजात (स्वयंजनित) अनुक्रमण, स्वानुक्रमण वनस्पतींच्या समुदायाच्या स्थलातील बदल त्यांच्या प्रक्रियेमुळेच घडून आल्याने त्यात हळूहळू फरक पडून त्याचे अंतिम अवस्थेत रुपांतर होण्याची प्रक्रिया allogenic succession.
autogenous
स्वयंभव, स्वजात एकाच जातीतील अनेक वनस्पतींत (अथवा प्राण्यांत) दिसणारा, पण स्वसंपादित नसलेला (भेद, गुण, लक्षण).
autonomous
स्वयंप्रेरित, स्वायत्त शरीराबाहेरील चेतकाशिवाय घडून येणारे, उदा. कोशिकेतील प्राकलाची भ्रमंती, खोडाच्या टोकाची नागमोडीसारखी वाढ (प्रच्यवन) cyclosis, nutation spontaneous
autonomy (of characters or factors)
गुणघटकांचे स्वातंत्र्य (स्वायत्तता) आनुवंशिक गुणांचे,लक्षणांचे किंवा लक्षणांबद्दल जबाबदार असलेल्या घटकांचे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत उतरताना परस्परांवर अवलंबून नसणे
autophyte
स्वोपजीवी आपले अन्न स्वतः बनविणारी वनस्पती, दुसऱ्या सजीव किंवा मृत जीवावर अवलंबुन नसणारी वनस्पती.
autopolyploidy
समगट गुणन व्यक्तीच्या शरीराच्या कोशिकेतील रंगसूत्रांची संख्या तिप्पट, चौपट इ. अशी असून ते सर्व संच एकाच जातीच्या वनस्पतीतून गुणनामुळे आलेले असण्याचा प्रकार allopolyploidy
autotroph
स्वोपजीवी, स्वयंजीवी, स्वयंपोषी निर्वाहाकरिता दुसऱ्या सजीवावर किंवा मृत शरीरावर अवलंबून नसणारा स्वतंत्र (सजीव), उदा. सर्व हिरव्या वनस्पती autotrophic
autozygous
स्वयंयुग्मनजी, स्वरंदुकी स्वतःच निर्मिलेली स्त्री व नर गंतुके एकत्र होऊन बनलेल्या रंदुकाने प्रजोत्पादन करणारी
autumn wood
शरद्काष्ठ हिवाळ्यात तयार होणारा लाकडाचा (प्रकाष्ठाचा) भाग, वसंतऋऋतूत तयार होणाऱ्या लाकडापासून हा ओळखता येतो, दोन्हींचे मिळून एक वार्षिक वलय बनते annual ring
auxin (hormone)
वृद्धिसंप्रेरक, ऑक्सिन वनस्पतींत वाढीसंबंधी महत्त्वाचे कार्य घडवून आणणारा रासायनिक पदार्थ (दूत), प्राण्यांमध्ये अनेक नलिकाहीन प्रपिंडातून असा अंतःस्त्राव रक्ताद्वारे शरीरात पसरविला जातो. प्रकाशाच्या दिशेकडे खोड वळते याचे कारण प्रकाशाचा परिणाम ह्या संप्रेरकावर होतो
awl shaped
आराकृति तळापासून टोकाकडे निमुळते होत गेलेले (चांभाराच्या आरीसारखे) निरुंद व टोकदार, उदा. एरिओकॉलॉन व आयसॉएटिस यांची पाने subulate
awn
प्रशूक गवते व शूकधान्ये यांच्या परितुषावर किंवा इतरत्र वाढलेले राठ केसासारखे उपांग उदा. Berberia aristata DC दारुहळद arista
axile
अक्षलग्न अक्षाला (आसाला) चिकटून वाढलेले a. placentation अक्षलग्न बीजकविन्यास किंजपुटातील फक्त आसालाच चिकटून असणारी बीजकांची मांडणी, उदा. नागदवणा
axillary
कक्षस्थ, कक्षास्थ, कक्षीय पानाच्या किंवा छदाच्या बगलेत असलेला (अवयव), उदा. कळी, फूल, शाखा, काटा इ. उदा. काळा माका (Caesulia axillaris Roxb.)
axis
आस, अक्ष प्रमुख आधारभूत कण्यासारखा अवयव, उदा. खोड, फुलोऱ्याचा दांडा इ. a. daughter जन्याक्ष, उपाक्ष मुख्य दांड्यावर असलेला दुय्यम प्रतीचा अक्ष a. embryonic गर्भाक्ष गर्भावस्थेतील वनस्पतीचे अक्ष a. median अग्रपश्च अक्ष अग्रस्थ व उलट बाजूचा (तलस्थ) भाग
azygospore
अगंतुबीजुक (दोन सारख्या प्रजोत्पादक कोशिकांपैकी फक्त एकापासूनच संयोगाशिवाय बनवलेली प्रजोत्पादक कोशिका उदा. म्युकर उदा. भ्यूकर बुरशी, स्पायरोगायरा शैवल इ. parthenospore