habeas corpusहेबिअस कॉर्पस (पु.), देहोपस्थिति (स्त्री.)
habit१ सराव (पु.), सवय (स्त्री.), अभ्यास (पु.) २ पोषाख (पु.)
habitation१ वसतिस्थान (न.) २ वास (पु.)
habitual१ सराईत, अभ्यस्त २ नित्याचा, सरावातला, सवयीतला
habitual criminalसराईत गुन्हेगार (सा.)
habitual defaulterसराईत कसूरदार (सा.)
habitual drunkardसराईत दारुबाज (सा.), सराईत दारुड्या (सा.)
habitual offenderसराईत अपराधी (सा.)
habitually१ सराईतपणे २ नित्यशः, नित्य, सदा
habitually negligentनित्य हयगयी, सदा हयगयी
half blood१ सापत्न नाते (न.) २ सापत्न भावंड (न.)
half blooded१ सापत्न २ (having one parent of good and one of inferior stock) संकरजात
half brotherसापत्न भाऊ (पु.)
half sisterसापत्न बहीण (स्त्री.)
hall mark(an official mark serving as proof of quality) प्रमाणचिन्ह (न.)
hand१ हात (पु.), हस्त (पु.) २ हस्ताक्षर (न.) ३ सही (स्त्री.), स्वाक्षरी (स्त्री.)
hand outप्रसिद्धिका (स्त्री.)
hand writingहस्ताक्षर (न.)
handcuffहातबेडी घालणे, हातकडी घालणे
handicapअडथळा (पु.), लोढणे (न.)
handicapped childअधु बालक (न.)
hang१ टांगणे, लटकवणे २ लटकणे ३ फाशी देणे
harassmentसतावणी (स्त्री.), गांजणुक (स्त्री.)
harbour१ बंदर (न.) २ आसरा (पु.)
harbour duesबंदर जकात (स्त्री.)
hard१ कठोर, २ कठीण ३ कडक, टणक ४ कष्टाचा ५ दारुण
hardजोराने, परिश्रमपूर्वक
hard casesदारुण प्रकरणे (न.अ.व.)
hard cashनगदी रक्कम (स्त्री.), रोख रक्कम (स्त्री.)
hard currencyदुर्लभ चलन (न.)
hard factsकठोर वस्तुस्थिति (स्त्री.)
hard labourसक्त मजुरी (स्त्री.)
hard money(metallic money) नाणी (न.अ.व.)
hardshipकष्टावस्था (स्त्री.)
harm१ अपहानी पोचवणे, अपहानी करणे २ इजा करणे, अपाय करणे
harm१ अपहानी (स्त्री.) २ इजा (स्त्री.), अपाय (पु.)
harmfulघातुक, हानिकारक, घातक, अपायकारक
harmonious१ सुसंवादी २ एकोप्याचा
harsh punishmentकठोर शिक्षा (स्त्री.)
hatredद्वेष (पु.), द्वेषभावना (स्त्री.)
haulage१ मालवाहणी (स्त्री.) २ वाहणावळ (स्त्री.)
haulage chargesवाहणावळ (स्त्री.)
haulage rate१ मालवाहणी दर (पु.) २ वाहणावळीचा दर (पु.)
hazard१ जोखीम (स्त्री.) २ धोका (पु.)
hazardous१ जोखमी, जोखमीचा २ धोक्याचा
hazardous employmentधोक्याचे काम (न.), जोखमीचे काम (न.), धोक्याची नोकरी (स्त्री.)
hazardous insuranceजोखमीचा विमा (पु.)
hazardous occupationजोखमीचा व्यवसाय (पु.), धोक्याचा व्यवसाय (पु.)
head of chargeदोषारोपाचे शीर्ष (न.)
head of the familyकुटुंब प्रमुख (सा.)
head of the villageगावाचा मुखिया (सा.), गाव प्रमुख (सा.)
head on collisionसमोरासमोर टक्कर (स्त्री.)
headmanमुखिया (सा.), प्रमुख (सा.)
headquartersमुख्यालय (न.), मुख्य कार्यालय (न.)
hear१ सुनावणी करणे २ ऐकणे
hear and determineसुनावणी करून निर्णय देणे
hearing of the caseखटल्याची सुनावणी (स्त्री.)
hearing of the suitवादाची सुनावणी (स्त्री.)
hearsay evidenceऐकीव पुरावा (पु.)
heavy calls१ अनेक मागण्या (स्त्री.अ.व.), मोठ्या प्रमाणात मागण्या (स्त्री.अ.व.) २ मोठ्या मागण्या (स्त्री.अ.व.)
heinous offenceगहर्य गुन्हा (पु.), घृणास्पद गुन्हा (पु.)
heirवारस (सा.), वारसदार (सा.)
heir and deviseeवारस व मृत्युपत्राधिकारी (सा.)
heir and legateeवारस व उत्तरदानग्राही (सा.)
heir apparent१ प्रत्यक्ष वारसा (सा.) २ युवराज (पु.)
heir at lawविधितः वारस (सा.)
heir by customरुढिसिद्ध वारस (सा.), रुढिने वारस (सा.)
heir by deviseमृत्युपत्रसिद्ध वारस (सा.), मृत्युपत्राने वारस (सा.), मृत्युपत्रीय वारस (सा.)
heir expectantअपेक्षी वारस (सा.)
heir general(an heir who generally represents the deceased and succeeds to everything not specially provided to other heirs) सर्वसाधारण वारस (सा.)
heir of line(one who succeeds lineally by right or blood) रेषीय वारस (सा.)
heir of provision(one who succeeds as heir by virtue of a particular provision of a deed or instrument) संलेखीय वारस (सा.)
heir of the bodyकायिक वारस (सा.)
heir presumptiveसंभावी वारस (सा.)
heirlooms(any furniture and other personal chattles which law descent to the heir with th inheritance) वंशपरंपरागत वस्तू (स्त्री.अ.व.), जंगम दायत्व (न.)
heirs and assignsवारस व अभिहस्तांकिती (सा.अ.व.)
heirshipवारसा (पु.), वारसदारी (स्त्री.)
held in trustन्यास म्हणून धारण केलेला
held under attachmentजप्तीत ठेवलेले
henceforwardइतःपर, येथून पुढे
herbage(right of pasture) चराईचा अधिकार (पु.)
hereafterयापुढे, यानंतर, इतःपर
herediatary character१ आनुवंशिक लक्षण (न.) २ आनुवंशिक स्वरुप (न.), वंशपरंपरागत स्वरुप (न.)
herediatary claimआनुवंशिक दावा (पु.), वंशपरंपरागत दावा (पु.)
hereditaryआनुवंशिक, वंशपरंपरागत
hereditary leaseआनुवंशिक पट्टा (पु.), वंशपरंपरागत पट्टा (पु.)
hereditary officeआनुवंशिक पद (पु.), वंशपरंपरागत पद (पु.)
hereditary right to cultivateलागवडीचा आनुवंशिक अधिकार (पु.), कसणुकीचा वंशपरंपरागत अधिकार (पु.)
hereditary successionआनुवंशिक उत्तराधिकार (पु.), वंशपरंपरागत उत्तराधिकार (पु.)
hereditary tenantआनुवंशिक कूळ (न.), आनुवंशिक पट्टेदार (सा.), आनुवंशिक भाडेकरी (सा.), वंशपरंपरागत कूळ (न.)
hereditary tenureआनुवंशिक भूधृति (स्त्री.) वंशपरंपरागत भूधृति (स्त्री.)
hereditary titleआनुवंशिक उपाधि (स्त्री.), वंशपरंपरागत उपाधि (स्त्री.)
hereditay allowanceआनुवंशिक भत्ता (पु.), वंशपरंपरागत भत्ता (पु.)
hereditementदायाप्ती (स्त्री.), वारसाप्राप्य संपदा (स्त्री.)
heredites(inheritance the rights and liabilitis to which an heir succeeds) वारसा (पु.)
heredity१ आनुवंशिकता (स्त्री.) २ वंशपरंपरा (स्त्री.)
hereinafterयात यापुढे, यात पुढे
hereinunderयात याखाली, यात खाली
heretoforeयापूर्वी, या अगोदर, येथवर, इथवर, आतापर्यंत
hereunto annexedयास जोडलेला, यासोबत जोडलेला
heritable and transferable propertyवारसागामी व हस्तांतरणयोग्य संपत्ति (स्त्री.)
heritable rightsवारसागामी अधिकार (पु.अ.व.)
heritage१ वारसा (पु.) २ वंशार्जित संपत्ति (स्त्री.)
High Court of Judicatureउच्चन्यायालय (न.), न्यायाधिकारी उच्च न्यायालय (न.)
high crimes and misdemeanors(in English Law, immoral and unlawful acts as are nearly allied and equal inquile to felony) गंभीर गुन्हे व दुष्कृत्ये (अ.व.)
high diligenceआत्यंतिक तत्परता (स्त्री.)
high rate of interestभारी व्याजदर (पु.), बेसुमार अधिक व्याजदर (पु.)
high treasonघोर राष्ट्रद्रोह (पु.)
highest bidसर्वाधिक बोली (स्त्री.)
highest bidderसर्वाधिक बोली बोलणारा (सा.), सर्वाधिक बोली देणारा (सा.), सर्वाधिक सवाल बोलणारा (सा.)
highest character१ उत्तम चारित्र्य (न.) २ उत्तम प्रत (स्त्री.)
highest considerationसर्वाधिक प्रतिफल (न.)
highest court of criminal appealफौजदारी अपिलाचे उच्चतम न्यायालय (न.)
highest rankवरिष्ठ दर्जा (पु.)
highly improbableअत्यंत असंभाव्य
highly probableअत्यंत संभाव्य
highway१ महमार्ग (पु.) २ हमरस्ता (पु.)
highway robberyवाटमारी (स्त्री.)
highwaymanवाटमाऱ्या (सा.)
hinderविघ्न आणणे, बाधा आणणे
hindranceविघ्न (न.), अडथळा (पु.)
Hindu Lawहिंदु विधि (पु.)
Hindu Marriage Registerहिंदु विवाह नोंदपुस्तक (न.)
Hindu undivided familyहिंदु अविभक्त कुटुंब (न.)
hinduism१ हिंदु धर्म (पु.), २ हिंदुत्व (न.)
hire१ मजुरीने लावणे २ भाड्याने घेणे ३ भाड्याने देणे
hire purchaseभाडे खरेदी पद्धति (स्त्री.)
hire purchaseभाडे खरेदीचा
hire purchase agreementभाडे खरेदी करार (पु.)
hire purchaserभाडे खरेदीदार (सा.)
hiredभाड्याने घेतलेला, भाडोत्री
hirer१ भाड्याने घेणारा (सा.) २ भाड्याने देणारा (सा.)
historic interestऐतिहासिक कौतूहल (न.), ऐतिहासिकदृष्ट्या कुतूहल (न.)
historical monumentऐतिहासिक स्मारकशिल्प (न.)
history ticket(in respect of a prisoner) वृत्तक (न.)
hoardअपसंचय करणे, साठेबाजी करणे
hoarding१ अपसंचय (पु.), साठेबाजी (स्त्री.) २ जाहिरातफलक (पु.)
hold१ धारण करणे २ निर्णय देणे, ठरवणे, धरणे
hold a lineधारणाधिकार असणे
hold a sittingबैठक भरवणे, बैठक घेणे
hold a trialसंपरीक्षा करणे, संपरीक्षा घेणे
hold an enquiryचौकशी करणे, चौकशी भरवणे
hold brief for-चे वकीलपत्र घेणे, -ची बाजू घेणे
hold good१ विधिग्राह्य असणे, लागू असणे २ सुयोग्य धरणे, सुयोग्य मानणे
hold in obeyanceआस्थगित ठेवणे
hold in pawnतारण म्हणून धारण करणे, हडप म्हणून धारण करणे
hold upon trustन्यास म्हणून धारण करणे
holderधारण करणारा (सा.), धारक (सा.)
holder for the time beingत्या त्या वेळचा धारक (पु.), तत्कालीन धारक (सा.)
holder for valueमूल्यार्थ धारक (सा.)
holder in due courseरीतसर क्रमातील धारक (सा.)
holder of a billविपत्र धारक (सा.)
holder of a life interestआजीव हितसंबंधाचा धारक (सा.)
holder of an estateसंपदेचा धारक (सा.)
holder of an office of profitलाभपदाचा धारक (सा.)
holder of landजमीनधारक (सा.)
holder of power (of attorney)मुखत्यारपत्रधारक (सा.)
holder of promissory noteवचनचिठ्ठीचा धारक (सा.)
holding१ धारण जमीन (स्त्री.) २ (share holding) धारण भाग (पु.)
holding company(a corporation organised to hold the stock of another or other corporation) धारक कंपनी (स्त्री.)
holding outअभिवेदन (न.), अभिवेदन करणे (न.)
holding over(continuance in occupancy of land or exercising powers of an office beyond the limits of the term set or fixed) अतिधारण (न.)
homesteadघरवाडी (स्त्री.)
homestead right(a right to hold and use the land free from eecution for debt) घरवाडी अधिकार (पु.)
homicideमनुष्यवध (पु.), मनुष्यहत्या (स्त्री.), हत्या (स्त्री.)
homicide by misadventure(the accidental killing of another where a slayer is doing a lawful act unaccompanied by any careless or reckless conduct) अपघाती मनुष्यवध (स्त्री.), अपघाती मनुष्यहत्या (स्त्री.), अपघाती हत्या (स्त्री.)
homicide in self defenceस्वसंरक्षणार्थ मनुष्यवध (पु.), स्वसंरक्षणार्थ मनुष्यहत्या (स्त्री.)
homogeneity१ एकजिनसीपणा (पु.) २ एकजातीयता (स्त्री.)
homogeneous१ एकजिनसी २ एकजातीय
homosexualityसमलिंगी संभोग (पु.), समसंभोग (पु.)
honest beliefप्रामाणिक विश्वास (पु.)
honest claimप्रामाणिक दावा (पु.)
honorariumमानधन (न.), मानद्रव्य (न.)
honorary serviceमानसेवा (स्त्री.)
honourमान (पु.), सन्मान (पु.)
honour a chequeधनादेश संमानणे
honourably acquitनिष्कलंक दोषमुक्तता करणे
honoured billसंमानित विपत्र (न.)
hostileप्रतिकूल, विद्रोही
hostile possessionप्रतिकूल कब्जा (पु.)
hostile witnessविद्रोही साक्षीदार (सा.)
hotelपथिकनिवास (पु.), हॉटेल (न.)
houe of correctionसुधारगृह (न.)
housage(a fee for housing goods) आगार शुल्क (न.)
house accommodationनिवासस्थान (स्त्री.), निवासाची सोय (स्त्री.)
house breakerघरफोड्या (सा.)
house breakingघरफोडी (स्त्री.)
house breaking by nightरात्रीच्या वेळी घरफोडी (स्त्री.)
house of ill fameवेश्यागृह (न.), कुंटणखाना (पु.)
House of Parliamentसंसद सभागृह (न.)
house of refugeबालसुधाराश्रम (पु.)
House of the Legislature of the Stateराज्यविधानमंडळाचे सभागृह (न.)
House of the Peopleलोकसभा (स्त्री.)
house taxघरपट्टी (स्त्री.)
house trepassगृह अतिचार (पु.)
household effectsघरगुती जायदाद (स्त्री.अ.व.)
household goodsघरगुती चीजवस्तू (स्त्री.अ.व.)
howeverतथापि, तरी, तसे असताही
howsoeverकोणत्याही तऱ्हेने, कसेही
howsoever otherwiseअन्यथा कोणत्याही तऱ्हेने, अन्यथा कसेही असले तरी
human consumptionमानवी सेवन (न.)
human rightsमानवी अधिकार (पु.अ.व.)
humaneमानवोचित, माणुसकीचा, दयाशील
hurt१ दुखापत करे २ दुखवणे ३ नुकसान करणे
husband१ पति (पु.), नवरा (पु.) २ (of ship) अधिपति (पु.)
husband१ शेती करणे २ संवर्धन करणे ३ काटकसर करणे
husbandmanकृषिवल (सा.), शेतकरी (सा.)
husbandry१ शेतीकाम (न.), कृषिकर्म (न.) २ संवर्धन (न.)
hush money(money paid to secure silence) मुखपिंड (पु.), गोपन द्रव्य (न.)
hypothecaryजंगमगहाणविषयक, जंगमगहाण-
hypothecary actionजंगमगहाणविषयक कारवाई (स्त्री.)
hypothecateजंगमगहाण ठेवणे
hypothecateजंगमगहाण ठेवणे
hypothecationजंगमगहाण (न.)
hypothecation bond(in Maritime Law, a bond given in contract of bottomry) जंगमगहाण बंधपत्र (न.)
hypothecatorजंगमगहाणकार (सा.)