वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा
There are currently 434 names in this directory beginning with the letter S.
saccate
१ कोशवंत २ कोशकल्प १ कोश असलेला संवर्त उदा. मोहरी, कोश असलेला पुष्पमुकुट उदा. स्नॅपड्रॅगॉन २ कोशाप्रमाणे कार्यक्षम gibbous
saccharatus
शर्करायुक्त साखर असलेला (ज्यापासून साखर मिळू शकेल असा पदार्थ) उदा. उसाचा रस, ताड वृक्षातील रस, मॅपल (Arenga saccharifera La bill) व बीट यांच्या काही जातींतील रस. ऊस (Saccharum officinarum L.) saccharinus
Saccharomyces
किण्व शर्करासंबंधित एका धानीकवक वंशाचे नांव, यातील जाती (वनस्पती) साखरेच्या द्रवात वितंचन घडवून आणून त्याचे रुपंआतर अल्कोहॉल (मद्यार्क) मध्ये करतात व उत्पन्न होणारी ऊर्जा आपल्या जीवनात उपयोगात आणतात. बेकरी (पाव, केक बनविण्याचा उद्योग) व बीर नांवाच्या मद्य
safforn
केशर केशराच्या (कंदयुक्त वनस्पतींच्या) फुलातील किंजल्कापासून काढलेले रंगद्रव्य, केशर वनस्पती (Crocus sativus L.)
sagittal plane
अरीय प्रतल दोन सारखे भाग (द्विपार्श्व समात्र) होण्याकरिता केलेल्या विभागणीतील मध्यरेषेची उभी पातळी bilateral symmetry.
sagittate
शराकृति बाणाच्या टोकासारखा आकार असलेले (पान, परागकोश इ.) तळाशी रुंद व दोन बाजूस सरळ टोकदार खंड असलेले, उदा. करवीर कुलातील काही वनस्पतींतील परागकोश (उदा. कण्हेर, सदाफुली) अळूचे पान hastate.
sago
साबुदाणा काही वनस्पतींच्या भेंडापासून काढलेल्या पिष्ठयुक्त पदार्थांपासून बनविलेली कणी. त्या वनस्पती - Metroxylon sagu Rottle and M.rumphvi Mart. Cycas sp. sago palm, भेर्ली माड (Caryota urens L.)
salep
सालममिश्री, सालेप आमराच्या एका जातीच्या वनस्पतीची ग्रंथिल सुकी मुळे (Orchis latifolia L.) salop, saloop
Salicaceae
वालुंज कुल, सॅलिकेसी ऍस्पेन, वाळुंज (विलो), बहान (पॉप्लर) इत्यादी वनस्पतींचे कुल, यात फक्त दोनच वंशांचा समावेश केला जातो. या कुलाचा अंतर्भाव (भूर्जकुल, ओककुल, वंजकुल, अक्रोडकुल, इत्यादीबरोबर) ऍमेंटिफेरी गटात करतात. यांना नतकणिश (लोंबत्या कणसासारख्या प्रकारचे) एकलिंगी फुलोरे येतात. हा सर्व गट ऱ्हास पावलेल्या द्विदलिकित वनस्पतींचा असावा असे मानतात. यांच्या फुलात बहुधा परिदले नसून वाऱ्याकडून परागण होते. वालुंजाचे पुं-फुलोरे सरळ असतात. पुं-पुष्पात २-३० केसरदले छदाच्या बगलेत व स्त्री पुष्पात दोन जुळलेली किंजदले, बीजे अपुष्क व अनेक आणि केसाळ.
salvadoraceae
पीलु कुल, सॅल्व्हॅडोरेसी पीलू, किंकानेला, मिरजोळी इत्यादी समुद्रकिनारी वाढणाऱ्या वनस्पतींचे लहान तीन वंशाचे कुल. याचा अंतर्भाव अरिष्ट गणात (एंग्लर व प्रँटल) किंवा किराइत गणात (बेंथॅम व हूकर) करतात.
salver shaped
अपछत्राकृति दांड्यावर उलटे छत्र (समईसारखे) असल्याप्रमाणे (पुष्पमुकुट) उदा. सदाफुली, पारिजातक, जाई इ. hypocrateriform.
samara
सपक्ष कृत्स्नफळ, सपक्षफल शुष्क, न तडकणारे, एकबीजी, ऊर्ध्वस्थ किंजपुटापासून बनलेले पंखधारी फळ उदा. बिबळा, वावळा, सिकॅमूर
sand binder
वालुका बंधक आपल्या मुळांनी किंवा जमिनीतील खोडाच्या फांद्यांनी वाळूचे कण एकत्र धरुन त्यात वाढणारी (वनस्पती), यामुळे जमीन मोकळी न राहता स्थिर (घट्ट) बनते.
santalaceae
चंदन कुल, सॅटॅलेसी या चंदनाच्या कुलाचा समावेश चंदनगणात (सॅटॅलेलीझमध्ये) केला जातो. प्रमुख लक्षणे- अर्धवट दुसऱ्या वनस्पतीवर जगणाऱ्या वनस्पती (औषधी, झुडपे, व वृक्ष) पान साधी, एकाआड एक किंवा समोरासमोर, फुले द्विलिंगी किंवा एकलिंगी, सारख्या परिदलाची, परिकिंज किंवा अपिकिंज बिंब, परिदले २+२ किंवा २+ ३, तितकीच त्यावर आधारलेली केसरदले, अधःस्थ किंजपुटात एकच कप्पा व त्यात १-३ बीजके, कपाली किंवा आठळीफळ, एकबीजी, सपुष्क बीज.
sap
पादपरस, रस कोशिकांतील किंवा कोवळ्या वाहिका व वाहिन्यांतील अन्नयुक्त द्रवपदार्थ, फुलोऱ्याचे दांडे किंवा काही खोडे यातून जखमेमुळे स्त्रवणाऱ्या व अन्नघटक असलेल्या रसालाही ही संज्ञा वापरतात. s.wood रसकाष्ठ अन्नरस वाहून नेणारा काष्ठाचा भाग
sapindaceae
अरिष्ट कुल, सॅपिडेसी रिठा (अरिष्ठ), कपाळफोडी, रामबुतन, लिची, जखमी इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे लहान कुल, याचा समावेश अरिष्ट गणात (सॅपिंडेलीझमध्ये) करतात. संदले व प्रदले प्रत्येकी पाच, दहा केसरदले व त्याखाली बिंब. तीन जुळलेली किंजदले, ऊर्ध्वस्थ किंजपुट व त्यात तीन कप्पे व तीनच बीजके, फळे विविध
sapindales
अरिष्ट गण, सॅपिंडेलीझ आम्र कुल व अरिष्ट कुल या दोन्हींचा येथे अंतर्भाव होतो. बेंथॅम व हूकर यांच्या पद्धतीत शेवगा (शिग्रु) कुलही घातले आहे. एंग्लरांच्या पद्धतीत पीलु कुल अंतर्भूत आहे. द्राक्ष कुल व बदरी कुल यांचेशी या गणाचे जवळचे नाते आहे. याच्या गणापासून म्हणजे ज्योतिष्मती (सेलॅस्ट्रलीझ) गणापासून अरिष्ट गण अवतरला असावा असे मानतात. यामध्ये फुलातील प्रपिंडयुक्त बिंबापासून केसरदले व प्रदले वाढतात.
sapotaceae
मधूक (मोह) कुल, सॅपोटेसी चिकू, मोह, खिरणी, बकुळ इत्यादी चिकाळ वनस्पतींचे द्विदलिकित कुल, याचा अंतर्भाव बेंथॅम व हूकर यांच्या पद्धतीत टेंबूर्णी गणात (एबेनेलीझमध्ये) केला जातो. प्रमुख लक्षणे- काष्ठयुक्त व एकाआड एक साध्या पानांच्या वनस्पती, सच्छदक द्विलिंगी फुले, संदले ४-८ दोन मंडळात व जुळलेल्या तितक्याच पाकळ्यांचे एक वर्तुळ किंवा दोन वर्तुळे, अनेक जुळलेल्या ऊर्ध्वस्थ किंजदलांचा किंजपुट, मृदुफळात अनेक बीजे असतात.
saprophyte
शवोपजीवी, मृतजीवी मृत व कुजकट जैव पदार्थावर उपजीविका करणारी वनस्पती उदा. काही सूक्ष्मजंतू व कवक
sarraceniales
कलश (घट) पर्णी गण, सॅरारेनिएलीझ एंग्लर व प्रँटल यांनी हा गण आर्किक्लॅमिडी गटात समाविष्ट केला असून हचिन्सन यांनी हर्बेसीत घातला आहे. प्रमुख लक्षणे- साधी, एकाआड एक, कीटक भक्षक अवयवात (घट, कलश, चंबू) रुपांतर पावलेली पाने असलेल्या लहान औषधी, फुले नियमित, अवकि
sativus
आरोपित, संवर्धित लागवडीत असलेली किंवा पिकविलेली (पेरुन वाढविलेली) वनस्पती उदा. आळीव (Lepidium sativum L.), वाटाणा (Pisumsativum L.)
savannah
रुक्षवन, सॅव्हाना काही थोडे पानझडी वृक्ष किंवा झुडपे असलेला गवताळ प्रदेश. हे गवत रुक्ष, केसाळ, जाडेभरडे पण उंच असून झुबक्यांनी वाढते.
saxifragaceae
पाषाणभेदकुल, सॅक्सिफॅगेसी गूजबेरी, पाषाणभेद (हिं. पाखानभेद), बसक इत्यादी द्विदलिकित फुलझाडांचे एक कुल, याचा अंतर्भाव गुलाब गणात केला जातो. हचिन्सन यांनी पाषाणभेद गणात (सॅक्सिफॅगेलिझमध्ये) केला आहे. एकूण वंश तीस व जाती सुमारे सहाशे (रेंडल- ऐंशी वंश व अकराश
scalariform
श्रेणीरुप शिडीप्रमाणे दिसणारे, उदा. वाहिका व वाहिन्या यातील आडव्या दांड्याप्रमाणे जाड रेषा असलेले. s.conjugation श्रेणीरुप युगुलीभवन काही शैवलांमध्ये (स्पायरोगायरा, झायग्नीमा) दोन तंतुमध्ये समोरासमोरच्या कोशिकांमध्ये निर्माण झालेल्या आडव्या आरपार
scale
शल्क, खवला पातळ व अनेकदा काहीसा ताठर, क्वचित मांसल व फार लहान पानासारखा अवयव, s.bark शल्कीवल्क खवल्याच्या स्वरुपात सुटून निघणारे सालीचे तुकडे, उदा. चीड (पाइन) व पेरु इत्यादींचे खोड एs. hair शल्ककेश पहा ramenta s. leaf (cataphyll) शल्कपर्ण बहुधा भूमिगत
scales, interseminal
आंतर (अंतरा) बीजी शल्क शंकूतील एकावर एक असलेल्या बीजांमधून किंवा बीजकांमधून वाढलेले खवले. उदा. सायकॅडीऑइडिया (अश्मीभूत शंकुमंत वनस्पती), काही विद्यमान शंकुमंत वनस्पती.
scaly
शल्कयुक्त, खवलेदार खवले असलेले s.bulb शल्ककंद अनेक लहान मांसल खवल्यांनी वेढलेला लहान कंद, उदा. आंबुटी, लसणाच्या गड्डीत अनेक लहान पातळ खवले असून त्यांच्या बगलेत मांसल कुड्या (कळ्या) असतात. पहा bulb.
scape
पुष्पाक्ष, पुष्पबंधाक्ष जमिनीतील खोडापासून वर वाढलेला व बहुधा पर्णहीन असून टोकास एक किंवा अनेक फुले धारण करणारा दांडा, उदा. गुलछडी, घायपात, कोरफड, झेफिरलिली, नागीन, कांदा इ., काही भूछत्रात आढळणारा दांडा.
scar
किण, वण जखमेची राहिलेली खूण (वण), फांदी कापल्यावर,पान, बीज, फूल, फळ पडून गेल्यावर मूळ जागी राहिलेला वण उदा. पपईचे खोड, बीजावरची खूण (नाभि) hilum
schizocarp
पालिभेदी अनेक एकबीजी तुकडे तुटून पडणारे शुष्क फळ, प्रत्येक तुकडा (फलांश) तडकणारा किंवा न तडकणारा असतो. उदा. लाजाळू, गाजर, एरंड, भांड (जिरेनियम), मुद्रा, गुलखेरा इत्यादींची फळे mericarp. schizocarpic
schizogenous
भेदोद्भव सामान्य कोशिकावरणात फूट पडून त्या कोशिका अलग होण्यामुळे निर्माण झालेली (पोकळी किंवा नलिका) उदा. राळनलिका lysigenous. schizogenetic
schizomycophyta (Bacteria)
सूक्ष्मजंतू विभाग सर्व प्रकारच्या सूक्ष्मजंतूंचा (बॅक्टेरिया) समावेश करणारा विभाग, वर्गीकरणाच्या भिन्न पद्धतीत यालाच Schizophyta, Schizomycetes असे म्हणतात. काही अपवाद सोडल्यास हे सर्व जंतू परोपजीवी आहेत. त्यांचा आकार भिन्न परंतु आकारात फारच लहान व संरचना अत्यंत साधी तथापि त्यांचे क्रियाशीलत्व महत्त्वाचे असते. त्यांचे प्राचीनत्व वादातीत आहे. त्यांची प्रजोत्पत्ती द्विखंडनामुळे होते म्हणून त्या अर्थाचे ग्रीक नाव दिले आहे. तसेच त्यांचे कवकांशी असलेले साम्य (हरितद्रव्याचा अभाव) त्याच नावात सूचित केले आहे.
schizopetalous
भेदित प्रदली चिरलेल्या (फाटलेल्या) पाकळ्या असलेले, उदा. गोंड्याची जास्वंद (Hibiscus schizopetalous Hook)
scitamineae
कदली गण, सिटॅमिनी केळ, कर्दळ, आले इत्यादी एकदलिकित वनस्पतींचा गण. यामध्ये आराट कुल, कर्दळ कुल, कदली व शुण्ठी गण (झिंजिबरेलीझ) म्हटले आहे. बेसींच्या पद्धतीत याच गणाला इरिडेलीझ असे नाव देऊन त्यामध्ये अननस कुल व मुसळी कुल यांचाही समावेश केला आहे. वेखंड, वेलच
sclerenchyma
दृढोतक घन कोशिकावरण असलेला मृत व लांबट कोशिकांचा समूह, वनस्पतींना काठिण्य आणण्यास भिन्न अवयवात याचा वापर आढळतो, लांबट कोशिकांना दृढसूत्र म्हणतात. (sclerenchymatous fibre)
sclerite
कठक घनावरणाची कठीण कोशिका, यामध्ये भिन्न आकार असून कधी आवरणावर स्फटिक असतात. उदा. कमळाचा देठ
sclerotium
जालाश्म काही कवकातील (उदा. अर्गट) सुप्तावस्थेतील अनेक तंतूंचा घन जुडगा, हा निष्क्रीय अवस्थेत जमिनीवर पडून रहतो, पुढे तो रुजून नवीन बीजुके बनतात व त्यापासून नवीन तंतू वाढतात.
scorpioid cyme
वृश्चिकाभ वल्लरी कुंठित फुलोऱ्यातील एकपद प्रकारापैकी एक, यामध्ये मुख्य अक्षावर फूल येऊन वाढ खुंटल्यावर अनेक नवीन अक्ष एकाआड एक येऊन त्यापैकी प्रत्येकाची वाढ तशीच खुंटते, सर्व अक्षांचा मिळून एक सलग अक्ष (संयुक्त पद) बनतो, त्यावर फुलांच्या दोन रांगा व टोक व
scrophulariaceae
नीरबाम्ही कुल, स्क्रोफ्यूलारिएसी नीरबाम्ही, कुटकी, टारफुला, केश, तिलपुष्पी, अंबुली, बांबू, हरिणखुरी, दुधाळी, धोल इत्यादी वनस्पतींचे कुल, याचा अंतर्भाव नीरबाम्ही गमात (स्क्रोफ्यूलारिएलीझ) केला जातो. हचिंसन यांचा पर्साएनेलीझ गण हा बेसींच्या नीरबाम्ही गणासारखा आहे. प्रमुख लक्षणे- औषधी व झुडुपे, द्विलिंगी, पंचभागी, एकसमात्र फुले, केसरदले २-५, किंजदले दोन, ऊर्ध्वस्थ, जुळलेली व मृदुफळात किंवा बोंडात सपुष्क अनेक बिया.
scrub
खुरटे पाण्याचा अभाव व बाष्पोच्छवासाचे अधिक्य यामुळे वाढ खुंटलेले (झाड) s. jungle खुरटी झाडी (जंगल) खुज्या (खुरटलेल्या) झाडांचा समुदाय (एक समावास)
scutellum
पुष्कादनी गर्भ व पुष्क यामध्ये ढालीप्रमाणे असणारा जाड भाग, हिलाच कोणी दलिका म्हणतात. कारण पुष्कातील अन्नाचे रुपांतर करून गर्भास पुरवठा करण्याचे काम ती करते. उदा. मका, गहू आणि कित्येक गवते.
scutiform
फलकाकृति ढालीसारखे s.leaf फलकपर्ण ढालीप्रमाणे आकाराचे बालपर्ण उदा. साल्व्हिनिया जलनेचा. scutate
seaweed
सागरी शैवल समुद्रात सदैव तरंगत किंवा बुडलेल्या (निमग्न) स्थितीत राहणारे शैवल (किंवा अन्य प्रकारची वनस्पती).
secondary
दुय्यम, द्वितीयक प्रारंभिक किंवा प्रमुख नसलेले, पहिल्यानंतर बनलेले (दुसरे). s.bast द्वितीयक परिकाष्ठ प्रारंभिक परिकाष्ठानंतर द्वितीयक विभज्येपासून बनलेले नवीन परिकाष्ठ (अन्नाची ने आण करणारे घटक) पहा bast, phloem. s. cortex द्वितीयक मध्यत्वचा, उपत्वक्षा
secretion
स्त्रवण, स्त्राव विशिष्ट कोशिकांतून (प्रपिंडीय) पाझरणारा द्रव पदार्थ, कधी हा वनस्पतीच्या तशा कोशिकेबाहेर पडून शरीरातील पोकळीत साचून राहतो (उदा. चीक, राळ इ.) तर कधी तो शरीराबाहेर पडतो (उदा. मधुरस, गोंद इ.) पाझरलेल्या पदार्थांना वनस्पति जीवनात काही कार्य अस
secretory
स्त्रावक पाझर (स्त्रवण) करणारी (कोशिका अथवा ऊतक) s. duct स्त्रावी नलिका स्त्रावक कोशिकांनी वेढलेली नळीसारखी पोकळी. s. gland स्त्रावक प्रपिंड s. product स्त्रावोत्पाद, स्त्राव पाझरलेला पदार्थ पहा gland s. sac स्त्रावक कोश गोंद, राळ यासारखे उत्सर्जित पदार्थ
section
काप, छेद सूक्ष्मदर्शकाने निरीक्षण करण्याकरिता तीक्ष्ण चाकूने (पात्याने, वस्तऱ्याने) कापून काढलेला पातळ चकतीसारखा तुकडा (उभा किंवा आडवा).
seed
बीज, बी बीजी वनस्पतींच्या फुलातील किंवा शंकूतील बीजकात घडून आलेल्या लैंगिक प्रक्रियेनंतर त्यापासून बनलेला, पुढील पिढीच्या निर्मितीस जबाबदार असलेला, तसेच वनस्पतींच्या प्रसारात मदत करणारा सुटसुटीत व महत्त्वाचा अवयव, ovule, Phanerogamae
seed coat
बीजावरण बीजातील गर्भ (आदिमूल, आदिकोरक व दलिका) व असल्यास पुष्क व परिपुष्क या सर्वांचे वेष्टन testa, tegmen, aril.
seed coat
बीजावरण बीजातील गर्भ (आदिमूल, आदिकोरक व दलिका) व असल्यास पुष्क व परिपुष्क या सर्वांचे वेष्टन testa, tegmen, aril.
segment
खंड, खंडक निसर्गतः विभागल्याने निर्माण झालेला एखाद्या कोशिकेचा किंवा अवयवाचा भाग, उदा. पान, फळ, अग्रस्थ कोशिका, रंदुक इ.
segmentation
खंडीकरण, खंडीभवन, खंडन खंड (भाग) निर्मितीची प्रक्रिया, उदा. रंदुकाच्या खंडीभवनाने गर्भविकासास सुरवात होते.
segregation
विभक्तीकरण प्रजोत्पादनात गंतुकनिर्मितीचे वेळी जनककोशिकात एकत्र आलेले वैकल्पिक गुण अलग होऊन, जोडीतील प्रत्येक गुण भिन्न गंतुकातून स्वतंत्रपणे पुढील पिढीत उतरतो, ती प्रक्रिया (घटना) assortment, allelomorphic characters.
seismonastic
कंपानुकुंचनी कंपनामुळे ग्रहणशील अवयवात बदल घडून येण्याची क्षमता असणारे, त्यामुळे संबंधित अवयवाची प्रतिसादात्मक हालचाल करण्याची क्षमता असणारे, कंपनाला संवेदनाक्षम असणारे अवयव अथवा त्यांची प्रतिक्रिया.
selenotropism
चंद्रानुवर्तन चंद्रप्रकाशाच्या चेतनेमुळे घडून येणारी वनस्पतींच्या अवयवाची वृद्धियुक्त हालचाल.
self bred
स्वफलित (संतती) स्वपरागणामुळे निर्माण झालेली (संतती). s.fertilisation स्वफलन स्वपरागणामुळे किंवा स्वतः निर्माण केलेल्या प्रजोत्पादक घटकांमुळे घडून आलेली लैंगिक प्रक्रिया (अंदुकाचे फलन). s. pollination स्वपरागण एकाच फुलातील पराग तेथील किंजल्कावर पडणे
semester ring
वर्षार्ध वलय उष्णकटिबंधातील कित्येक वृक्षांत, एका वर्षात दोनदा वाढ व एकदा विश्रामकाल यामुळे बनलेली वलयाकार काष्ठनिर्मिती.
semi-
अर्ध उपसर्गाप्रमाणे किंवा प्रत्ययाप्रमाणे मराठीत वापरतात. s.amplexicaul अर्धसंवेष्टी तळाशी अर्धवटपणे खोडास वेढणारे (पान) उदा. तापमारी (Aralia sp.), तंबाखू, म्हातारा (Sonchus oleraceous L.) s. aquatic plant अर्धजलवनस्पति जमिनीत मुळे असून काही पाने पाण्यात
seminiferous scale
बीजधारी शल्क शंकुमंत वनस्पतींच्या बीजकधारी शंकूतील छदशल्काव्यतिरिक्त बीजक धारण करणारा खवला किंवा तत्सम उपांग.
semiorbicular
अर्धगोलाकृति अर्ध्या वर्तुळाप्रमाणे आकार असलेला अवयव, उदा. बाम्हीचे किंवा काही नेचांचे पान.
semiparasitic
अर्धजीवोपजीवी हिरवी पाने अगर खोड असलेली परंतु पाणी व खनिजे इतर स्वतंत्र वनस्पतीपासून घेणारी वनस्पती, उदा. बांडगुळ (लोरँथस, व्हिस्कम इ.), चंदन इ.
semipermeable
अर्धपार्य पूर्णपणे पाणी व विरघळलेले पदार्थ आरपार जाऊ न देणारे, कोशिकावरण पूर्ण पार्य असते. परंतु प्राकलाचा बाहेरील अधिक दाट भाग काही पदार्थ आत जाऊ देतो तर आतील काही पदार्थ बाहेर जाण्यास प्रतिबंध करतो. s. membrane अर्धपार्य पटल वरप्रमाणे बाह्यप्राकलाचा भाग
semiterete
अर्धशूलाकृति लांब, अर्धगोल व टोकाकडे निमुळते असलेल्या काठीप्रमाणे (देठ, खोड, फळ इ.), उदा. ताडाच्या किंवा केळईच्या पानाचा देठ
sensory
संवेदी चेतनाग्रहण करून प्रतिसाद देणारे, केस कोशिका इ. उदा. काही कीटकभक्षक वनस्पतींच्या पानावरचे केस (उदा. डायोनिया). काही वेलींच्या तणाव्यांची (प्रतानांची) किंवा खोडांची टोके.
sepal
संदल फुलाच्या देठावर असलेल्या व फुलातील दलांच्या चार मंडलातील पहिल्या (संवर्त) मंडलाचा एक भाग, calyx
sepaloid
संदलाभ, संदलसम संदलासारखे (बहुधा हिरवे व आकाराने लहान निमुळत्या पानासारखे), उदा. हिरव्या चाफ्याच्या किंवा सिताफळाच्या फुलातील पाकळ्या.
septicidal
पटभिदुर फळातील पडद्यांच्या संधिरेषेवर तडकण्याचा प्रकार, उदा. पोपटवेल, सापसंद इ. येथे फळाची शकले बियांसह स्वतंत्र होतात.
septifragal
पटभंगुर फळातील पडदे केंद्रापासून तुटून निघण्याचा प्रकार. यामध्ये पटभिदुर व पुटकभिदुर या दोन्हीपैकी एक प्रकारही आढळतो. उदा. धोत्रा, तूण, येथे फळाची शकले बियांशिवाय अलग होतात. loculicidal
sere
क्रमक वनस्पतींच्या (पादपांच्या) समुदायात क्रमाने होणाऱ्या बदलातील अवस्था, विकासावस्थेतील पादपसमुदायांची प्रत्यक्ष मालिका अथवा अनुक्रमी अवस्था xerosere, psamnosere.
series
क्रम, श्रेणी १ सर्वात कमी मूल्य असलेल्यापासून ते ओळीने (नियमितपणे) सर्वात अधिक मूल्य असलेल्यापर्यंतची एक माला (रांग) २ वर्गीकरणात भिन्न अर्थाने वापरलेले एकक, बहुधा उपवर्गाच्या खालच्या दर्जाचे
serotinal aspect
शारददृश्य, शरद प्रभाव शरद ऋतूच्या हवामानाशी अनुरुप अशी पादप समुदायाची प्रतिक्रिया किंवा त्यामुळे आलेले विशिष्ट स्वरुप. autumnal
serrate
दंतुर, दातेरी टोकाकडे वळलेले टोकदार दाते असलेली (कडा), उदा. तुळस, जास्वंद, सालई (Boswellia serrata Roxb.)
seta
दंड, रोम शेवाळी वनस्पतींत आढळणाऱ्या बीजुकधारीच्या तीन भागांपैकी (पद, दंड, बीजुकाशय) एक बहुधा लांब दांड्यासारखा भाग, गवतांच्या तुसावरील टोकदार केस (रोम) awn
sex
लिंग, लिंगभेद वनस्पतींतील (किंवा प्राण्यातील) नर- व स्त्री- विषयक भेद किंवा कार्ये अथवा तद् विषयक संरचना s.cell लिंगकोशिका नर किंवा स्त्री यापैकी एकाचे कार्य करणारी कोशिका (प्रजोत्पादक घटक, गंतुक). s. chromosome लिंगसूत्र शरीरातील कोशिकांत किंवा
sex determination
लिंगनिश्चिती, लिंगनिर्णय संततीत नर अथवा मादी (हे फरक ज्या सजीवांत स्पष्ट असतील तेथे) व्यक्ती जन्मास यावी ही बाब नरगंतुके व स्त्री गंतुके यांच्या संयोगाचे वेळी (उदा. मनुष्ये) किंवा तत्पूर्वी लिंगसूत्रामुळे ठरण्याची प्रक्रिया अथवा इतर प्रकारच्या लिंगयंत्रणे
sex differentiation
लिंग प्रभेदन नर व मादी असा भेद व्यक्ती, अवयव, प्रजोत्पादक कोशिका इत्यादींत दिसून येण्याचा प्रकार. वनस्पतींत भिन्न वर्गात हे प्रभेदन भिन्न प्रमाणावर आढळते.
sex linkage
लिंग सहलग्नता वनस्पती व प्राणी यांच्या भिन्न जातींत आढळणारी काही लक्षणे नर किंवा मादी यांच्या विशिष्ट रंगसूत्रांशी संबंधित असण्याचा प्रकार, यामुळे अनुहरण (एका पिढीतून दुसऱ्या पिढीत) गंतुकातील लिंगसूत्रावरील जनुकातर्फे होत असावे.
sex ratio
लिंग प्रमाण लोकसंख्येतील स्त्री पुरुषंआचे परस्परांशी प्रमाण हे प्रत्येक शंभर स्त्रियांना किती पुरुषांची संख्या पडते यावरुन काढले जाते. प्राथमिक गुणोत्तर रंदुकोत्पत्तीनंतर, द्वितीयक गुणोत्तर जन्मानंतर व तृतीयक गुणोत्तर पूर्ण वाढीनंतर काढतात, कारण त्यामुळे काही उद्बोधक निष्कर्ष काढता येतात.
sex reversal
लिंगविपर्यय, लिंगबदल काही नैसर्गिक घटनेमुळे व्यक्तीच्या विद्यमान लिंगलक्षणांत बदल घडून येण्याचा प्रकार, यामुळे नराचे रुपांतर मादीत किंवा त्या उलट होते. प्राण्यांत कधी कधी पण वनस्पतीत फार क्वचित ही घटना आढळते.
sexual dimorphism
लैंगिक द्विरुपता भिन्न लिंगाप्रमाणे बाह्यलक्षणांतील फरक असणे. s. generation लैंगिक पिढी, गंतुकधारी पहा gametophyte s. organ लैंगिक अवयव, जननेंद्रिय फक्त लैंगिक प्रक्रियेशीच संबंध येणारे अवयव, उदा रेतुकाशय, अंदुककलश इ. s. reproduction लैंगिक जनन सलिंग
shade leaf
छायापर्ण नियंत्रित प्रकाशाशी समरस होणाऱ्या (अनुकूलित) संरचनेचे पान s. plant छायापादप छायेत चांगली वाढू शकणारी व तेथील परिस्थितीशी समरस झालेली वनस्पती उदा. नेचे s. loving छायाप्रिय छाया पसंत करणारे अथवा छायेतच आढळणारे (झाड) s. tree छायी वृक्ष छाया (सावली)
sheath
आवरण नळीसारखा किंवा तत्सम लपेटणारा भाग किंवा अवयव उदा. गवताच्या पानाचा तळभाग, केळ, कर्दळ यांचे देठ s. bundle- वृंदावरण वाहक वृंदाभोवती असलेला ऊतकांचा मर्यादक थर पहा vascular bundle.
shell
कवच, करवंटी १ अश्मगर्भी फळातील (उदा. नारळ, अक्रोड, आंबा इ.) आठळीचे कठीण आवरण २ शुष्क, न तडकणारे, एकबीजी, कठीण फळाचे बाह्य आवरण, उदा. काजू, ओक (वंजूफल)
shield shaped
ढालाकृति १ ढालेच्या आकाराचे (पान), उदा. शैवाकांतील मुक्त धानीफल, कारेसी (कांड शरीरिका) कुलातील वनस्पतींत आढळणारी रेतुकाशयाशी संबंधित ढाल कोशिका २ शंकूतील खवल्यांचे बाहेरचे समचतुर्भुज टोक इ.
shoot
प्ररोह, धुमारा सर्वसाधारणतः वनस्पतीचा जमिनीवर वाढणारा खोड, पाने, फुले इत्यादींनी युक्त असा भाग, याउलट जमिनीत वाढणारा भाग- मूळ ही व्याख्या सापवाद असूनही वरील संज्ञा तशाच वापरतात. फक्त फुलाला पुनरुत्पादक प्ररोह असे म्हणतात, कारण त्यामध्ये अक्ष व पुष्पदले अस
shrub
क्षुप, झुडूप वृक्षापेक्षा लहान, अनेक वर्षे जगणारी, काष्ठयुक्त वनस्पती, याला जमिनीच्या पातळीपासूनच अनेक फांद्या येतात. उदा. घाणेरी, कण्हेर, गुलाब, संकेश्वर, चिनी कंदिल. s. land क्षुपवन झुडपांच्या आकाराच्या ( व प्रकाराच्या) वनस्पतींचा नैसर्गिक समुदाय. s.
sieve cell
चालनी कोशिका चाळणीतील आडपडदे असलेला नळीसारखा घटक, अनेक वनस्पतींत याचे कार्य अन्नरसाची ने आण करण्याचे असते. s. element चलनी घटक चाळणी घटक, चाळणी असलेली कोशिका किंवा नळी. s. plate चालनी पटाटका, चाळण, चालनी बिम्ब चाळणी असलेल्या लांबट कोशिकेतील किंवा नलिकेतील
silage
मुरघास उंच कप्प्यात बंदिस्त ठेवून व वितंचन (काहीसे कुजवून) घडवून आणलेले गवत (वैरण), मुरलेले गवत.
silicification
सिकताधान, वालुकाधान कोशिकावरणात बारीक रेतीचे कण जाऊन बसण्याची प्रक्रिया, उदा. गवतांची पाती, करंडक वनस्पतींचे कोशिकावरण
siliqua
सार्षप दोन किंजदलापासून बनलेले, शुष्क, अनेकबीजी, दोन्ही शिवणीवर तडकणारे व मध्ये असलेल्या खोट्या (छद्मपट) पडद्यावर बिया राखून ठेवणारे फळ, फळाची शकले (तुकडे) खालून वर तुटत जातात, उदा. मोहरी, कोबी इ. silique
silurian period
सिल्यूरी कल्प, सिल्यूरियन पीरियड (कल्प). सुमारे ४२ ते ४० कोटी वर्षापूर्वीचा भूशास्त्रीय कालखंड. डेव्होनी कल्पापूर्वीचा आणि प्राचीन बिटन मधील सिल्यूर्स लोकांच्या वसतिस्थानावरुन प्रथम तेथे शोधला गेल्यामुळे, नावरुपास आलेला.
simple
साधे s. fruit साधे फळ एका किंजपुटापासून बनलेले फळ, उदा. आंबा, पेरू s. inflorescence साधा पुष्पबंध एकाच अक्षावर आलेल्या फुलांचा घोस, उदा. मंजरी, कणिश इ. क्वचित एकच फूल असलेला अक्ष s. leaf साधे पान मुख्य देठाला (असल्यास) जोडून असलेला पानाच्या पात्याचा एक
sinus
१ कोटर, विवर २ फट १ दोन खंडातील खोलगट भाग, उदा. डेस्मिड शैवलाच्या कोशिकेच्या दोन अर्धामधील भाग २ पानाच्या दोन खंडामधला रुंद फटीसारखा भाग
siphonostele
नलिकारंभ नळीसारखी मध्यवर्ती वाहक घटकांची (ऊतकांची) संरचना, यामध्ये भेंडाभोवती प्रकाष्ठ व त्यानंतर परिकाष्ठ असते. कधी प्रकाष्ठाच्या दोन्ही बाजूस परिकाष्ठ असते. उदा. ऑस्मुंडा, ऍडिँटम amphiphloic, ectophloic
sleep movement
निशानुकुंचनी क्रिया प्रकाशाच्या मोठ्या बदलामुळे घडून येणारी हालचाल, उदा. अनेक शिंबी वनस्पती. Leguminosae.
sliding growth
सर्पणवृद्धि वाढ चालू असताना एका कोशिकेच्या आवरणाचा शेजारच्या आवरणाशी संबंध तुटून ती दुसऱ्यावर घसरुन नवीन आवरणाशी संपर्क साधण्याचा प्रकार. gliding growth
sling mechanism
गोफण यंत्रणा फळ किंवा बी यांशी संबंधित अशा स्फोटक यंत्रणेमुळे बिया दुरवर फेकल्या जाण्याची अंतर्गत योजना, यामध्ये फळाच्या किंवा बियाच्या एखाद्या भागातील अतिस्फीतता किंवा काही भागाची वाढती रुक्षता कारणीभूत होतात. उदा. काटेरी इंद्रायण व तेरडा यांची फळे पूर्ण पिकली असता स्फीतता वाढीमुळे तडकून बिया बाहेर फेकतात, एरंड, गेवा व भांड यांची फळे शुष्कतेच्या विशिष्ट बिंदूप्रत पोचल्यावर तडकतात व फलांश किंवा बिया अलग होऊन दूरवर पडतात, अशा बाबतीत गलोल किंवा गोफण ह्या साधनांनी फेकल्या जाणाऱ्या खड्यांशी साम्य दिसते. अशा फळांना गोफण फळे (sling fruits) म्हणतात.
slip
मुनवा, अधश्चर, फुटवा खोडाच्या तळापासून निघालेला व लागणीकरिता पुनः उपयोगात आणला जाणारा प्ररोह (शाखा)
smut (disease)
काणी, काजळी (रोग) उस्टिलॅगो कवकांमुळे अनेक पिकांवर (मका, बार्ली, ओट, जोंधळा, गहू, ऊस इ.) रोग होऊन फळात काळ्या बीजुकांचे उत्पादन होते व पिकाचा नाश होतो म्हणून त्या अर्थाची नावे पडली आहेत.
snail pollination
शंबूक परागण गोगलगाय किंवा तत्सम प्राण्यांकडून पराग नेण्याची व ते किंजल्कावर टाकण्याची घटना.
soboliferous
क्षुपाभ झुडपासारखे, जमिनीतून वाढून वर येणारे अनेक प्ररोह (खोडासारख्या शाखा) असलेले उदा. रूई, कण्हेर, गुलाब.
sociability
समाजप्रियता भिन्न प्रकारचे व भिन्न दर्जाचे समुदाय करून राहण्याची प्रवृत्ती, परिस्थितिविज्ञानात पादप समुदायातील एखाद्या जातीतील अनेक व्यक्तींचे परस्परसंबंध काय आहेत, हे दर्शविणारी संज्ञा.
social
सामाजिक, संगतिप्रिय १ एकाच जातीच्या व मोठ्या जागेवर निसर्गतः एकत्र वाढणाऱ्या अनेक वनस्पती उदा. टाकळा. २ वनश्रीचे वैशिष्ट्य दर्शविणारी प्रभावी वनस्पती, उदा. साग वनातील साग.
social flowers
संगतिप्रिय फुले गेंदासारख्या स्तबक फुलोऱ्यातील (उदा. सूर्यफूल कुलातील) अनेक पुष्पके compositae.
society
संहति, समाज संगति (association) व संघात (consociation) या वनस्पति समुदायात गौण मानलेल्या व्यक्तींचा छोटा उपसमुदाय, यातील एखादी व्यक्ती प्रधान (प्रभावी) व इतर त्यापेक्षा गौण असतात, परंतु ही प्रधान व्यक्ती संगति व संघात यातील प्रधानाहून भिन्न असते. म्हणून स
sociological plant
पादपसमाजशास्त्रीय वनस्पतींच्या समुदायासंबंधीच्या शास्त्रासंबंधी अगर त्या शास्त्रात अंतर्भूत होणारे.
sociology plant-
पादपसमाजशास्त्र वनस्पतींच्या नैसर्गिक समुदायांचे स्थान, त्यांचा उगम विकास, संरचना, वर्गीकरण, भौगोलिक वाटणी (वितरण) इत्यादींची परिस्थितीसापेक्ष माहिती. synecology. phytosociology
soil
मृदा, जमीन, माती, भूमी पृथ्वीवर पसरलेला व निसर्गतः कमी जास्त होणारा लहान मोठ्या कणांचा थर, यामध्ये बारीक रेतीचे कण, जैव पदार्थाचे कण, पाणी व त्यात विरघळलेली खनिजे व काही सूक्ष्मजीव (सूक्ष्मजंतू, कवक इ.) कमी अधिक प्रमाणात असून या भिन्न घटकांच्या प्रमाणावर
solanaceae
धोतरा (धोत्रा) कुल, सोलॅनेसी वांगे (वृत्तांक), बटाटा, टोमॅटो, मिरची, धोतरा, तंबाखू, अश्वगंध, रिंगणी इ. वनस्पतींचे कुल, याचा अंतर्भाव बेसींच्या पद्धतीत पोलेमोनिएलिझ गणात व हचिन्सन यांच्य मते धोतरा गणात (सोलॅनेलीझ मध्ये) केला जातो. प्रमुख लक्षणे- धोतरा कुलातील वनस्पती औषधीय किंवा झुडपे असून पाने साधी व एकाआड एक फुले नियमित, अरसमात्र, द्विलिंगी आणि पंचभागी, संवर्त बहुधा दीर्घस्थायी किंवा सहवर्धिष्णु, पुष्पमुकुट जुळलेल्या पाकळ्यांचा, केसरदले पाच आणि पाकळ्यास तळाशी चिकटलेली, ऊर्ध्वस्थ, दोन किंजदलांचा किंजपुट आणि फळ मृदु किंवा शुष्क (बोंड) असते. या कुलाला वृंत्ताक कुल असेही म्हणतात कारण वृंत्ताक (वांगे) ज्या वंशात घातले आहे तो वंश (सोलॅनम) प्रमुख आहे.
solenostele
खंडित रंभ प्रकाष्ठाच्या आतील व बाहेरील बाजूस परिकाष्ठ असून पर्णविवरामुळे अखंडपणा नाहीसा झालेले रंभ, उदा. नेचे, मार्सिलियाचे मूलझोड
solitary
एकाकी एकटे (उदा. फूल) उदा. झेफिर लिली, कमळ s. gregarious एकाकी सांघिक एकाच जातीच्या अनेक वनस्पतींचा एक झुबका (समूह).
soluble
द्राव्य, विद्राव्य पाणी किंवा तत्सम द्रवात (पातळ माध्यमात) विरघळणारा (त्याशी एकरुप होणारा) घन पदार्थ, ती प्रक्रिया संपल्यावर बनतो तो त्या घन पदार्थाचा द्राव (solution) अथवा विद्रव, द्रावण, विलयन इ.
solvent
द्रावक, विद्रावक घन पदार्थाला विरघळवून त्याशी एकरुप होणारा द्रव पदार्थ उदा. पाणी, मद्यार्क, ईथर इ.
somatic
कायिक, स्थातव शरीरासंबंधी, शरीरातील s. cell स्थातुक, काय कोशिका, कायिक पेशी शरीरातील शाकीय (प्रजोत्पादक नसलेली) कोशिका
somatoplasm
स्थातुकल वाइझमान या शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे सजीवांच्या शरीराच्या दोन घटकांपैकी प्रजोत्पादनाशी संबंध नसलेला जीवद्रव्यरुप बाग, पिढ्यानुपिढ्या वाटचाल करीत हा राहात नाही. तो मर्त्य आहे परंतु दुसरा भाग (गंतुकल) प्रजोत्पादक असल्याने भावी पिढीचा स्थातुकल व ग
soredium
प्रजनी शैवाक (धोंडफूल) वनस्पतीत आढळणाऱ्या व अनेक कवकतंतूंनी वेढलेल्या एक अथवा अनेक शैवल कोशिका. यांचा नूतन धोंडफुले निर्मिण्याकरिता उपयोग होतो.
sorosis
फलपुंज कणिश फुलोऱ्याच्या अनेक फुलांपासून बनलेल्या अनेक फळांचे एकच संयुक्त फळ, बहुधा हे मांसल असून फुलोऱ्याचा अक्ष व फुलांचे इतर भाग फळात समाविष्ट होतात उदा. फणस, अननस, बारतोंडी, तुतू, केवडा इ.
sorus
बीजुककोशपुंज अनेक बीजुककोश एकाच स्थानापासून (बीजकाधानी) निर्मिल्याने बनलेला समूह, उदा. नेचे sporangium, placenta.
spandix
स्थूलकणिश जाडजूड किंवा मांसल दांडा (पुष्पबंधाक्ष) असलेला फुलोरा (कणिश) उदा. अळू, सुरण, नारळ इ.
spathulate
चमसाकृति आयत व टोकास रुंद व सपाट आणि तळाशी अरुंद होत गेलेल्या कलथा किंवा चमच्याप्रमाणे आकाराचे, (उदा. पान, पाकळी किंवा तत्सम अवयव).
spcific
जातिविशिष्ट, जातीय जातीसंबंधी,विशेषत्व असलेली (लक्षण) s.character जातीविशिष्ट गुण एखाद्या जातीत आढळणारा विशेष प्रकारचा गुण किंवा दोष, उदा. सुगंधी किंवा दुर्गंधी फुले. s. epithet जाति गुणनाम पहा epithet s. name जातिवाचक नाम वनस्पतींच्या (किंवा
special creation, doctrine of
विशेष जनन सिद्धांत सध्या अस्तित्वात असलेले सर्व सजीव आहेत तसेच पूर्वी एकदाच परमेश्वराने निर्माण केले असून त्यांत काही बदल झालेले नाहीत असा जुना परंतु आता पुराव्याअभावी न मानला जाणारा सिद्धांत. organic evolution.
species
जाति कोणताही एक पण दुसऱ्याहून निराळा व वर्गीकरणातील सर्वात लहान घटक (एकक) समजला जाणारा सजीव. s. differential प्रभेदी जाति विशिष्ट जातींचे दुर्भिक्ष्य असलेल्या पादपसंगती परस्परांपासून ओळखू येण्यास उपयुक्त वनस्पती. पहा association. s. exclusive अनन्य जाति
species
जाति कोणताही एक पण दुसऱ्याहून निराळा व वर्गीकरणातील सर्वात लहान घटक (एकक) समजला जाणारा सजीव. s. differential प्रभेदी जाति विशिष्ट जातींचे दुर्भिक्ष्य असलेल्या पादपसंगती परस्परांपासून ओळखू येण्यास उपयुक्त वनस्पती. पहा association. s. exclusive अनन्य जाति
sperm nucleus
रेतुक प्रकल, पुं-प्रकल रेतुकातील प्रकल, परागनलिकेतील किंवा तत्सम अवयवांतील नर गंतुकाप्रमाणे क्रियाशील होणारा म्हणजेच अंदुकाशी (स्त्री गंतुकाशी) संयोग पावणारा प्रकल nucleus.
spermogonium
पलिघ अचर रेतुकांची निर्मिती करणारा पेल्यासारखा अवयव, उदा. धानीकवक पहा pycnium. spermogone
sphaeraphide
स्फटिकपुंज अनेक स्फटिकांचा गोलाकार पुंजका, हे स्फटिक कॅल्शियमच्या ऑक्झॅलेट व कार्बाएनेटचे असतात.
sphaeroid
गोलाकार चेंडूसारखे, वाटोळ्या घन वस्तूप्रमाणे उदा.बाभूळ, लाजाळू किंवा कदंब यांच्या गोल गेंदासारखे (स्तबकाप्रमाणे)
spike
कणिश लांबट अक्षावर बिनदेठाची फुले असलेला अकुंठित फुलोरा (अकुंठित फुलोऱ्याचा एक प्रकार) उदा. आघाडा, काटेमाठ, निशिगंध इ. २ प्ररोहाच्या (फांदीच्या) टोकाशी असलेला बीजुकपर्णांचा झुबका, उदा. सिलाजिनेला, लायकोपोडियम, एक्किसीटम इ. s.compound संयुक्त कमिश प्रमुख
spikelet
कणिशक सामान्य छदांनी (तुसांनी) वेढलेला फक्त एक किंवा दोन फुल असलेला दुय्यम प्रकारचा कणिश फुलोरा, उदा. गवते.
spindle
चाती, तर्कु प्रकलाच्या विभागणीमध्ये कोशिकेच्या मध्यभागी अनेक प्रथिनयुक्त धाग्यांची बनलेली दोन टोके व मध्ये फुगीर असलेली संरचना, हिच्या फुगीर भागात एका पातळीत (बिंब) रंगसूत्रार्धे पसरलेली असून त्यांना अलग करून दोन टोकांकडे त्यांचे गट करण्याचे कार्य या अवस्थेनंतर (मध्यावस्था) होते.
spiral
सर्पिल, कुंडलित अक्षाभोवती गुंडाळल्यासारखे, फिरकीप्रमाणे. s. flower सर्पिल पुष्प पुष्पदलांची मांडणी वर्तुळात नसून एकाआड एक पद्धतीने पुष्पाक्षाभोवती असलेले फूल, उदा. सोनचाफा, कमळ इ. s. phyllotaxy सर्पिल पर्णविन्यास पहा phyllotaxy. s. vessel (duct) सर्पिल
spireme
कुंडल कोशिकेतील प्रकलाच्या विभागणीपूर्वीचा त्यातील रंगसूत्रांच्या अखंड फितीसारख्या धाग्याचा गुंता (गुंडाळा), हा पूर्वावस्थेच्या आरंभी दिसतो. mitosis.
spongy
सुच्छिद्र, सुविरल स्पंजासारखे, अनेक छिद्रे व पोकळ्या असलेले s. tissue (parenchyma) विरलोतक पोकळ्यांनी भरलेला कोशिकासमूह, उदा. द्विपार्श्व पानातील खालच्या भागातील ऊतक, जलवनस्पतींच्या खोडातील, देठातील, फळातील किंवा बीजावरणातील ऊतक
spontaneous generation
स्वयंजनन, उत्स्फूर्त जनन निर्जीवापासून विद्यमान सजीव आपोआप उत्पन्न झाले असावे अशी जुनी परंतु हल्ली न मानलेली समजूत biogenesis.
sporangium
बीजुककोश बहुधा एककोशिक व लिंगहीन प्रजोत्पादक कोशिका (बीजुके) अंतर्भागात बनविणारा पिशवीसारखा अवयव, येथे बीजुके संख्येने क्वचित एक ते चार पण बहुधा अनेक असतात. spore case
spore
बीजुक, बीजाणु प्रजोत्पादनाचे कार्य करणारी व त्याकरिता जनक वनस्पतीपासून अलग होणारी लिंगहीन सूक्ष्म कोशिका. s.sac (moss-capsule) बीजुकाशय बीजुकांनी भरलेली पिशवी, उदा. शेवाळीतील बीजुकधारीचा प्रमुख अग्रस्थ भाग.
sporeling
बीजुकापत्य बीजुक रुजून बनलेला लहान रोपा (पूर्वकायक व गंतुकधारी यांची पूर्वावस्था) prothallus, gametophyte.
sporocarp
बीजुकफल १ लैंगिक प्रक्रियेनंतर बनणारा, अनेककोशिक व स्वतः बीजुककोश निर्माण करणारा व त्यांचे संरक्षण करणारा अवयव, उदा. कवक २ जलनेचांतील बीजुककोशपुंजाभोवती असलेल्या संरक्षक वेष्टनासह (पुंजत्राण किंवा पर्णखंड- दल अथवा रुपांतरित पर्ण) बनलेले व फळासारखे दिसणारे
sporocyte
बीजुकजनक कोशिका बीजुक निर्माण करणारी मातृकोशिका, बहुधा ही द्विगुणित असून अर्धसूत्रणाने ती चार एकगुणित बीजुके बनविते. sporogenous cell
sporogenous
बीजुकजनक बीजुके बनविणारी (कोशिका, संरचना) s. layer (hymenium) बीजुकजनकस्तर बीजुके निर्मिणारा (फलनक्षम) कोशिकांचा थर, उदा. गदाकवक पहा Basidiomycetes.
sporogonium
बीजुकधर शेवाळीतील गंतुकधारीवर (प्रमुख पिढीवर) लैंगिक प्रक्रियेनंतर रंदुकापासून बनलेली बीजुकधारी पिढी, पद, दंड व बीजुकाशय हे तिचे भाग होत. बीजुकाशयातून बीजुके बाहेर पडतात.
sporophyll
बीजुकपर्ण बीजुके (किंवा बीजुककोश) निर्मिणारा पान किंवा छद यांसारखा अवयव, उदा. नेचे, नेचाभ पादप (सिलाजिनेला), लायकोपोडियम, आयसॉएटिस इ.)
sporophyte
बीजुकधारी बहुधा बीजुकांच्या साहाय्याने प्रजोत्पादन करणारी द्विगुणित (प्रकलयुक्त) पिढी, गंतुकधारी पिढीशी ह्या पिढीचे एकांतरण असते., नेचे व शेवाळी ह्यांत एकांतरण अधिक स्पष्ट असते. नेचे व इतर उच्च वनस्पतींत बीजुकधारी पिढी प्रमुख असते.
sport
नवोदय, लीला, उत्परिवर्तन कळीतून किंवा बीज रुजल्यानंतर त्यातून उद्भवणाऱ्या वनस्पतीवरची नवीन स्पष्ट संरचना (प्रभेदन, एक नैसर्गिक लीला, क्रीडा) mutation
spot
ठिपका, स्थान, बिन्दू, लक्ष्म s.disease टिक्का रोग पानांवरचा ठिपक्यांनी दिसून येणारा रोग, उदा. भुईमूग.
spring wood
वसंतकाष्ठ वसंत ऋतूत बनलेला खोडातील लाकडाचा थर (वलय), यातील वाहिका व कोशिका त्यानंतरच्या पेक्षा मोठ्या असतात.
sprout
अंकुर, प्ररोह, कोंब बीज अथवा बीजुक रुजल्यावर त्यातून आलेला भावी वनस्पतीचा आरंभीचा खोड व पाने यांचा किंवा तत्सम शाकीय भाग (पूर्वकायक), बटाटा, कांदा यासारख्या किंवा कलमासारख्या अवयवांतून फुटलेला नवीन कोंब.
spur
१ शुंडिका २ ऱ्हस्व प्ररोह १ संवर्त किंवा पुष्पमुकुट यापासून वाढलेली लहान सोंडेसारखी अरुंद, लांबट (बंद नळीसारखी) व मधुयुक्त पिशवी. उदा. लार्कस्पर, तेरडा, हरणखुरी, पॅन्सी. २ मर्यादित वाढ असलेली व पाने धारण करणारी बाजूची शाखा उदा. पाइन (चिल, चीड, चिलघोजा).
spurious
आभासी, छद्मी, छद्म भ्रामक (खोटे), भासमान होणारे, उदा. काजू फळ (बोंडू) हा वास्तविक रसाळ देठ असतो s.dissepiment छद्मपट किंजदलाच्या किनारीपासून किंवा पुष्पस्थलीपासून न बनलेला परंतु नंतर वाढलेला किंजपुटातील आडपडदा, उदा. मोहरीचे फळ पहा siliqua. s. tissue
squamose
खवलेदार, शल्काभ, शल्कयुक्त खवल्यासारखे दिसणारे किंवा खवल असलेले उदा. सिताफळाचा पृष्ठभाग खवले असल्यासारखा दिसतो त्यावरुन Annona squamosa L. हे त्याचे नाव.
stabilisation
स्थिरीकरण विशिष्ट परिस्थितीच्या संदर्भात पादपसमुदायाच्या अनुक्रमणातील प्रत्येक अवस्था अधिकाधिक स्थिर होण्याची (बदल न होण्याची) प्रवृत्ती, समान स्थळावरच्या पादपसमुदायात असलेल्या एकजीनसीपणातील कोणतेही भेद स्थिरीकरणाचा दर्जा दर्शवितात.
stable
स्थिर, अपरिवर्तनीय स्थानात किंवा संघटनेत बदल न झालेला उदा. वनस्पतीसमूह (समुदाय) s. formation स्थिर समावास वर सांगितल्याप्रकारचा वनस्पतींचा विशिष्ट प्रकारचा समूह.
stage
अवस्था टप्पा, पादपसमुदायात होणाऱ्या बदलातील एक टप्पा. s. final अंत्यावस्था विशिष्ट परिस्थितीतील पादप समुदायाच्या विकासाचा शेवटचा टप्पा (चरमावस्था) पहा climax. s. pioneer प्रारंभिक अवस्था नवीन भूमीवर होणारा पादपसमुदायाचा सुरवातीचा टप्पा. s. transition
stain
अभिरंजक सूक्ष्मदर्शकातून वनस्पती व प्राणी आणि त्यांचे भाग तपासून त्यांतील सूक्ष्मरचनेचा अभ्यास करण्याकरिता त्यावर केलेल्या प्रक्रियेत वापरलेले द्रव्य, त्यामुळे विशिष्ट भाग काही रंगद्रव्यच शोषून इतरांपासून निराळा दिसतो व ओळखू येतो.
stalk
देठ, दांडा, दंड, वृंत फूल, पान, फळ इत्यादी अवयवांचा खोड अथवा शाखा यांचेशी संबंध जोडणारा आधारभूत भाग. शैवले, कवक, शेवाळी इत्यादी वनस्पतींतही असा आधारभूत भाग आढळतो. s.cell वृंत कोशिका परागकण रुजताना त्यातील कार्यक्षम (रेतुक जनक) प्रकलाच्या विभागणीने
stamen
केसरदल, पुं-केसर प्रजोत्पादक पुं-गंतुके निर्माण करण्यास जबाबदार असलेले परागकण (लघुबीजुक) बनविणारा फुलातील (पुं-शंकूतील) अवयव (पुष्पदल), बहुधा एक लांब तंतू व त्यावर परागकणांनी भरलेली पिशवी (परागकोश) हे केसरदलाचे भाग होत. microsporophyll, anther,
staminate flower
पुं-पुष्प, केसर पुष्प, नर पुष्प फक्त कार्यक्षम केसरदले असलेले फूल, उदा. भोपळा, पपई इ.
standard petal (vexillum)
ध्वजक पतंगरुप पुष्पमुकुटातील सर्वात मोठी पाकळी, उदा. गोकर्ण, वाटाणा इ. papilionaceous.
starch
मंड, पिष्ट, स्टार्च वनस्पतींत सामान्यपणे आढळणारा कणस्वरुप व तूलीरसम (सेल्यूलोजसारखी) रासायनिक संघटना असलेला कार्बाएहायड्रेट प्रकारचा संचित पदार्थ s. sheath मंडस्तर, अंतस्त्वचा प्राथमिक मध्यत्वचेच्या सर्वात आतील कोशिकांचा थर पहा endodermis.
stasophyta
स्थिर जलपादप साचलेल्या पाण्यातील वनस्पती, उदा. गोंडाळ, डकबीड, कुमुद इ. stagnant water plants
station
स्थानक, अधिनिवास एखाद्या वनस्पतीचे विशिष्ट (नैसर्गिक) स्थान उदा. काही वनस्पती ओसाड जागी (पडीत जमिनीवर) आढळतात (एरंड, धोत्रा, काटेमाठ इ.)
statocyst
संतुलन पुटी पिष्टकण व बाह्याप्राकल असलेल्या गुरुत्वसंवेदी कोशिका, खोडात व मुळात असलेल्या अंतस्त्वचेच्या कोशिका गुरुत्वाकर्षणाला प्रतिसाद देणाऱ्या कोशिका (संवेदी) असल्याने, वनस्पतीला तिच्या स्थितीतील बदल जाणवतो म्हणून हा भाग गुरुत्व संवेदनाक्षम मानतात.
statolith
संतुलनाश्म वर सांगितलेल्या संरचनेतील उच्च विशिष्टगुरुत्व असलेले कोणतेही घन कण (पिष्टकण), वनस्पतीची सापेक्ष स्थिती बदलल्यास हे स्वतंत्र कण कोशिकेत स्थानभ्रष्ट होतात व त्यांचा बाह्यप्रकलाशी असलेला संपर्कही बदलल्याने पूर्वपरिचित स्थिती पुन्हा आणण्यास तो अवयव (खोड, मूळ) वक्र होतो.
stele
रंभ द्विदलिकित वनस्पतींच्या खोड व मूळ या अवयवांतील अंतस्त्वचेच्या आतील सर्व भाग, विशेषेकरून वाहक वृंदांचा संच, काही एकदलिकित वनस्पतींत व इतर वाहिनीवंत वनस्पतींतही रंभ स्पष्टपणे आढळते, कधी अनेक रंभ असतात. प्राथमिक विभज्येतील मध्यवर्ती अप्रभेदित भागापासून र
stellate
तारकाकृति, ताराकृति अनेक किरणासारखे भाग (शाखा) असलेली (कोशिका), भेंडी कुलात तारकाकृति केस आढळतात.
stem
खोड, क्षोड, स्तभ, प्रकांड, स्कन्ध वनस्पतींचा बहुधा गुरुत्वाकर्षणाविरुद्ध उभा वाढणारा प्रमुख अक्ष, खाली सरपटणाऱ्या (जमिनीवर पसरणाऱ्या) वनस्पतींचे खोड व फांद्या गुरुत्वाकर्षणाच्या दिशेशी काटकोनात वाढतात.
stem parasite
स्तंभोपजीवी आश्रय देणाऱ्या वनस्पतींच्या खोडावर राहून त्यातून अन्नरस शोषणारी वनस्पती, उदा. बांडगूळ (लोरँथस, व्हिस्कम) अमरवेल.
stem tendril
क्षोडप्रतान खोडाच्या रुपांतरामुळे बनलेला ताणा (प्रतान) उदा. कृष्णकमळ, कांडवेल, द्राक्षवेल इ.
stemless
खोडहीन, क्षोडहीन सकृद्दर्शनी खोडाचा अभाव दर्शविणारी (बिनखोडाची) वनस्पती उदा. मुळा, गाजर, गुलगा इ.
steppe
तृणसंघात कोरडी, खुरटी व इतस्ततः झुबक्यांनी वाढणारी आणि मरुवनस्पतीशी साम्य असणारी गवते निसर्गतः वाढणारा विशिष्ट हवामानातील व वृक्षहीन प्रदेश, याचा प्रसार समशीतोष्ण कटिबंधात विशेषेकरून आढळतो, गवताळ प्रदेशाचा एक प्रकार.
sterculiaceae
मुचकुंद कुल, स्टर्क्युरिएसी मुचकुंद,मुरुडशेंग, कोको, कांडोळ, सारडा, नवा, रुद्राक्षी, कौशी, इत्यादी वनस्पतींचे कुल, याचा अंतर्भाव भेंडी गणात (माल्व्हेलीझमध्ये) करतात पण हचिन्सन यांनी परुषक गणात (टिलीएलीझमध्ये) केला आहे. भेंडी कुलाशी (माल्व्हेसी) या कुलाचे साम्य असून द्विपुटक (दोन कप्प्यांचा) परागकोश, क्वचित पाकळ्यांचा अभाव अथवा एकलिंगी फुले या लक्षणांनी हे कुल ओळखता येते. पहा Malvaceae.
stereid
घनकोशिका,दृढकोशिका वनस्पतींना किंवा त्यांच्या अवयवांना आधार व मजबुती देणारी कोशिका, दृढोतकातील घटक. sclerenchyma.
stereome
आधार ऊतक वनस्पतींना आधारभूत कोशिकासमूह. दृढोतक व स्थूलकोनोतक यांचा किंवा यापैकी एकाचा (अर्थात त्यातील फक्त घटकांचा) येथे अंतर्भाव करतात कारण दोन्हीचे कार्य सारखे असते, संरचनेत काही फरक असतात. collenchyma, sclerenchyma. stereom, mechanical tissue
sterigma
प्रांगुल कवकामध्ये बीजुक क्षेपण करणारा देठासारखा भाग, उदा. गदाकवक, पेनिसिलियम इ. pl. sterigmata
sterile
१ वंध्य २ निर्जंतुक १ कार्यक्षम नसलेला (वांझ) प्रजोत्पादक अवयव, उदा. केसरदल, किंजदल, बीजुक, बीज २ जंतूंपासून मुक्त केलेला (द्रव पदार्थ, माध्यम)
stigma
किंजल्क युक्त किंजपुटाच्या किंवा (किंजलाच्या) टोकाचा ग्राहक व परागकणास आधारभूत भाग, किंजदल स्वतंत्र असल्यास प्रत्येकाचा अग्रभाग, स्त्रीकेसराग्र हा शब्दही वापरलेला आढळतो. style.
stigmaria
मूल जीवाश्म, मूलाश्म, स्टिग्मॅरिया काही अश्मीभूत वनस्पतींचा, खाचांच्या खुणा (किण) असलेला मूळ वंश.
stilt root
आधारमूळ, अवस्तंभ मूळ वनस्पतीच्या खोडापासून निघालेले तिरपे व तिला आधार देणारे मूळ उदा. केवडा, कांदळ इ.
stimulus
चेतक, उत्तेजक, उद्दीपक चेतना देणारे, सजीवांमध्ये एखादी प्रक्रिया सुरु होण्याकरिता चालना देणारे (द्रव्य, द्रव, प्रकाश, उष्णता, स्पर्श इ.) उदा. कीटकभक्षक वनस्पतीत कीटकांवर पाचक स्त्राव होण्यास कीटकाचा स्पर्श चेतना देतो, लाजाळूची पाने स्पर्शामुळे व अतिप्रकाशामुळे किंवा प्रकाशाच्या अभावामुळे हालचाल दर्शवितात.
stinging
कंडूत्पादक, दाहक, दंशक स्पर्श झाला असता खाज (आग)उत्पन्न करणारा, उदा. केस (आग्या, खाजकुइली, खाजोटी इ. वनस्पतींचे).
stipule
उपपर्ण पानाच्या तळाशी (देठ असल्यास त्याच्या तळाशी) असलेले भिन्न आकाराचे किंवा प्रकारचे उपांग उदा. वाटाणा, पिवळा चाफा, गुलाब, अनंत, बोर इ.
stock
खुंट १ चांगल्या जातीचे कलम करण्याकरिता वापरलेल्या मूळच्या वनस्पतीचे (आश्रय) खोड पहा scion host २ ज्यापासून मुळे निघतात असा मूलक्षोड किंवा शाखाहीन खोड
stolon
तिरश्वर जमिनीवर खोडापासून वाढल्यानंतर पुन्हा जमिनीकडे वळून व जमिनीशी संपर्क ठेवून नवीन वनस्पती निर्माण करणारी शाखा
stoloniferous
तिरश्वरवर्धिनी (वर्धी) तिरश्वरांच्या साहाय्याने वाढणारी (संख्यावाढ करणारी वनस्पती) उदा. नेचा, रॉसबेरी इ.
stoma
त्वग्रंध पानावरच्या अपित्वचेवर (क्वचित हिरवे खोड, हिरव्या फांद्या, किंजपुट इत्यादींच्या पृष्ठावर) दोन रक्षक कोशिकांनी नियंत्रित केलेले सूक्ष्म छिद्र, यातूनच वनस्पतीतील वाफेचा निचरा होतो व हवेची ये-जा चालू असते. सामान्य भाषेत सूक्ष्मछिद्र ही संज्ञा stoma ला वापरलेली आढळते. परंतु त्यामुळे pore व stoma तील फरक स्पष्ट होत नाही.
stone
अष्ठि, आठळी, बाठा, कोय अश्मगर्भी फळातील (उदा. आंबा, जरदाळू), कठीण कवच किंवा कवचासह बी s. cell घनकोशिका घन आवरणाची कोशिका s. fruit अश्मगर्भी फळ, आठळी फळ, कोयफळ, बाठी फळ पहा drupe endocarp, drupe
storage cell
संचयी कोशिका अन्नाचा साठा करणारी कोशिका, उदा. ग्रंतिक्षोड (बटाटा), मूलक्षोड (आले, हळद इ.), ग्रंथिमूळ (गाजर, मुळा, गाजरे इ.)
strain
१ वाण २ ताण १ एका जातीच्या अनेक प्रकारातील उपप्रकार २ एखाद्या अवयवावर पडलेला दाब, किंवा तो अवयव वाकल्याने एका बाजूस दाब व दुसरी बाजू ओढली जाणे.
strand
पेड, पट्ट १ दोरीप्रमाणे अनेक धाग्यांचा जुडगा किंवा जुडी उदा. वाहक ऊतकांचा पट्ट २ किनारा. s. vegetation वेलातटीय वनश्री समुद्र किनाऱ्यावर वाढणारा पादपसमूह
stratification
स्तरण, स्तरीभवन थरावर थर बनणे, उदा. कोशिकावरणाची जाडी, वनश्रीमध्ये भिन्न उंचीवर भिन्न प्रकारच्या वनस्पतींचे थर असणे. शैवाकाच्या शरीरातील शैवले व कवक यांची थरावर थर अशी मांडणी.
stratum
स्तर, थर s.ground भूमिस्तर जमिनीलगतचा वनस्पतींचा थर (शेवाळी, शैवल व फार लहान सरपटणाऱ्या वनस्पती) s. field औषधीस्तर, तृणस्तर गवते व लहान औषधीय वनस्पतींचा थर s. shrub क्षुपस्तर झुडुपांचा थर s. tree वृक्षस्तर लहानमोठ्या वृक्षांचा थर. s. tree
streaming
परिगमन, सरण, प्रवाही जीवद्रव्याचे कोशिकावरणाच्या आतील भागात प्रवाहाप्रमाणे वाहणे (भ्रमण). s. movement प्रवाही हालचाल, सरणक्रिया पहा cyclosis.
strobile
शंकू एकलिंगी किंवा द्विलिंगी (लघुबीजुकपर्णे किंवा गुरुबीजुकपर्णे अथवा दोन्ही असलेले), खवलेदार, तळाशी रुंद व टोकाकडे निमुळते होत गेलेले, बीजुककोशयुक्त (प्रजोत्पादक) प्ररोह, बहुधा रुक्ष व अनाकर्षक, काहींच्या मते पुष्पाशी, तर काहींच्या मते फुलोऱ्याशी (पुष्पब
strobiloid
शंक्काकृति शंकूसारखा आकार व संरचना असलेले s.theory शंकु सिद्धांत लायकोपोडियम व एक्किसीटम यासारख्या प्रारंभिक व साध्या बीजुकधारी पिढी असलेल्या पूर्वजांपासून इतर नेचाभ पादपांचा (टेरिडोफायटा वनस्पतींचा) उगम झाला असावा अशी एक उपपत्ती.
stroma
पीठिका अनक पलिघ धानीफले (धानीबीजुके निर्मिणारे अवयव) असलेली उशीसारखी संयुक्त कवक संरचना, उदा. अर्गट (क्लॅविसेप्स पुर्पुरिया) या कवकाचे जालाश्म रुजून त्यातून पीठिका बाहेर पडतात व त्यातून धानीबीजुके निर्माण होऊन त्या रोगाचा प्रसार करतात. sclerotium,
strombus
सर्पिल शिंबा गोगलगायीच्या लांबट शंखाप्रमाणे पिळीव (गुंडाळीसारखी) शेंग उदा. विलायती चिंच, लसून घास.
structure
संरचना वनस्पतींतील किंवा त्यांच्या अवयवांतील सर्व भागांची विशिष्ट मांडणी (आयोजन), संरचनात्मक वनस्पतिविज्ञानात शारीर, आकार विज्ञान, अवयवविकास, सूक्ष्मशारीर इत्यादींचा समावेश होतो.
style
किंजल फुलातील मध्यभागी असलेल्या पुष्पदलमंडलातील (किंवा स्त्रीकेसरातील) किंजपुट व किंजल्क यामधील बहुधा लांबट नलिकेसारखा भाग, बहुधा याचे कार्य किंजल्काला फुलाबाहेर परागणाकरिता भरपूर मोकळीक देणे हे असते.
sub family
उपकुल कुल व वंश यांमधील गट s. genus उपवंश वंश व जाती यांमधील गट s. inferior अल्पाधःस्थ काहीसा अधःस्थ (किंजपुट) s. kingdom उपकोटी वनस्पति कोटीचा प्राथमिक विभाग, उदा. बीजी वनस्पती, अबीजी वनस्पती. s. littoral समुद्रतट समीप, उउपवेलांचनीय भरती ओहोटीच्या
sub-
उप-, अल्प- विशिष्ट (मुख्य) दर्जाखालचे, काहीसे किंवा किंचित अशा अर्थाने उपसर्गाप्रमाणे उपयोगात असलेली संज्ञा. s. acute अल्पतीव्र कमी (काहीशी) तीक्ष्ण, उदा. पानाचे टोक s. arctic उत्तरधुवाजवळचे, उपोत्तरधुवीय लागवडीच्या उत्तर मर्यादेपलीकडचे (उदा. पादप जीवन).
suberin
त्वक्षा, स्यूबरिन बुचासारख्या वस्तूतील पदार्थ, परित्वचेच्या कोशिकात आतील तूलीर भिंत व बाहेरील मध्यपटल यांमध्ये हा पदार्थ साचून राहतो.
subsidiary
गौण कमी दर्जाच्या (महत्त्वाच्या) उदा. अपित्वचेतील त्वग्रंधांच्या रक्षक कोशिकाजवळच्या कोशिका.
subspecies
उपजाति जाती व प्रकार यांमधील अनिश्चित दर्जा असलेल्या वनस्पतींचा लहान गट. जातींतील कित्येकांशी त्यांचे साम्य नसून परस्परसाम्य मात्र आढळते, जातीपेक्षा लहान एकक.
substitution
प्रतिष्ठापन नाश पावलेल्या अवयवाऐवजी दुसरा तत्सम अवयव निर्माण होण, वनस्पतीतील द्वितीयक ऊतककरापासून बनलेल्या नवीन वाढीमुळे (वनस्पतीतील) जखम भरून येण्याची प्रक्रिया
substrate
कार्यद्रव्य रासायनिक विक्रियेतील (विशेषतः वितंचनात) ज्यावर विक्रिया होते तो प्रारंभिक पदार्थ, त्यात विक्रियेने बदल होऊन बनलेला तो उत्पाद.
succedanum
बदली एखाद्या कोशिकेऐवजी किंवा अवयवाऐवजी दुसरे कार्यक्षम अवयव किंवा जाती. उदा. काकडशिंगी (Rhus sucedanea L.)
succession
अनुक्रमण एकाच क्षेत्रात क्रमाने बदल होऊन भिन्न व चरम (अंतिम प्रकारचे) पादप समुदाय किंवा वनस्पति समावास निर्माण होण्याची प्रक्रिया.
successive whorls
अनुक्रमी वर्तुळे, क्रमागत मंडले. क्रमाने (एकानंतर दुसरे) निर्माण झालेली अवयवांची वर्तुळे (उदा. संवर्त, पुष्पमुकुट, केसरमंडल व किंजमंडल).
succulent
रसाळ, मांसल रसाने किंवा रसयुक्त मगजाने भरलेले उदा. खोड, पान, फळ इ. घोळीची किंवा कोरफडीची पाने, निवडुंगाचे खोड इ.
sucker
१ अधश्चर, मुनवा २ शोषक, चूषक १ जमिनीतील खोडापासून (फार क्वचित मुळापासून) जमिनीवर वाढत आलेली फांदी, उदा. पुदिना, शेवंती. २ पहा haustorium.
sugar
शर्करा, साखर स्फटिकरुप, विद्राव्य व गोड पदार्थ (कार्बाएहायड्रेट), उदा. बीटशर्करा, इक्षुशर्करा, फलशर्करा, द्राक्षशर्करा, मॅपलशर्करा, तालशर्करा इ. भिन्न प्रकाप भिन्न वनस्पतीत आढळतात.
summer-spore
ग्रीष्म बीजुक कवकांत उन्हाळ्यात निर्मिला जाणारा अलिंगी प्रजोत्पादक घटक, हा घटक बहुधा एककोशिक असतो, उदा. तांबेरा. फार थोड्या कालपर्यंत टिकणारे व लागलीच रुजणारे बीजुक teleutospore (winter spore) uredospore
sun leaf
सूर्यपर्ण भरपूर सूर्यप्रकाशात वाढण्यास अनुकूल अशी संरचना असलेले पान. उदा. निवडंउग, रुई, पानफुटी, कण्हेर इ.
sun plant
सूर्यपादप वर दिलेल्या परिस्थितीशी समरस होणारी वनस्पती. उदा. तगर, खैर, वड, काटेधोत्रा, बाभूळ इ.
super
अति-, बाह्य, अधि- वरचे, वरच्या दर्जाचे, अधिक, उच्च या अर्थी उपसर्गाप्रमाणे उपयुक्त संज्ञा. s.axillary अधिकक्षस्थ पानाच्या बगलेपेक्षा अधिक ऊंचीवर असलेले. supra
superior
ऊर्ध्व, ऊर्ध्वस्थ वरच्या पातळीत वाढणारे (असलेले). s. ovary ऊर्ध्वस्थ किंजपुट किंजमंडलाखेरीज इतर सर्व पुष्पदले किंजपुटाखालच्या पातळीवर वाढतात त्यावेळी किंजपुटाचे स्थान (ऊर्ध्वस्थ), पुष्पसूत्रात हे लक्षण दर्शविण्यास जी या आद्याक्षराच्या पुढील आकड्याखाली रेघ
superposed
अध्यारोपित उभ्या रेषेत खालच्या अवयवाच्या बरोबर वरच्या पातळीत असलेले, फुलांच्या बाबतीत एका पुष्पदलाच्या आतील दुसरे, उदा. पाळीसमोरचे केसरदल.
supporting fibre
तर्कुसूत्र, आधारसूत्र s.plant (host) आश्रय वनस्पति इतरांना आधार वा पोषण देणारी वनस्पती. s. tissue आधार ऊतक, आधार ऊति आधारभूत असलेला कोशिकांचा समूह. spindle-fibre
supra-
वरचे, अति-, अधि- उपसर्गाप्रमाणे उपयुक्त संज्ञा s. axillary अधिकक्षस्थ पहा superaxillary s. foliar अधिपर्णस्थ s. folius अधिपर्णस्थ पानावर वाढणारे. s, nodal अधिपर्वस्थ पेऱ्यावरील भागात असलेले. super
survival of the fittest
बलिष्ठांची (समर्थांची) अतिजीविता जीवनस्पर्धेत (जगण्याकरिता कराव्या लागणाऱ्या धडपडीत) सर्वात श्रेष्ठ (विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट गुणामुळे बलवान) असणाऱ्या सजीवांची (प्राणी वा वनस्पती) सरशी व दुर्बलांचा नाश ही डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतातील मुख्य कल्पना.
suspensor
आलंबक १ रंदुकापासून बनलेला व एका टोकाशी प्रत्यक्ष गर्भ धारण करणारा कोशिकांचा तंतू उदा. बीजी वनस्पती व काही नेचाभ पादप २ काही कवकांत आढळणारी व गंतुकाशयाला आधारभूत कोशिका उदा. म्यूकर बुरशी.
suture
सीवनी, शिवण संधिरेषा, किंजदलाच्या किनारी परस्पराशी सांधल्या जाऊन किंजपुटाची पोकळी निर्माण करते ती जोडरेषा (औदर सेवनी), किंजदलांच्या मध्यरेषेला पृष्ठसेवनी म्हणतात. dorsal suture ventral suture.
switch plant
अपर्ण पादप पाने लवकर गळून पडणारी अथवा पाने असून नसल्यासारखी किंवा नसणारी वनस्पती, उदा. नांग्या शेर, माकडशिंग (Caralluma fimbriata Wall), नेपती, खडशेरणी झाऊ इ.
sword shaped
खड्गाकृति तरवारीसारखे उदा. आबईची (canavolia nsiformis DC) शेंग, बाळवेखंडाचे (Iris germanica L.) पान इ. ensiform
syconus
औदुंबरिक लहान कलशासारख्या (कुंभासनी) फुलोऱ्यापासून बनलेले पोकळ व मांसल संयुक्त फळ उदा. उंबर, अंजिर इ. hypanthodium
symbiosis
सहजीवन सारख्या नसलेल्या दोन किंवा अधिक सजीव व्यक्तींचे एकत्र जगणे. उदा. जीवोपजीवी वनस्पती व तिचा आश्रय. s. antagonistic विरोधी सहजीवन सहकाऱ्यात स्पर्धा असलेले सहजीवन, उदा. जीवोपजीवी (अमरवेल) व तिचा आश्रय (कडवी, डुरांटा, शेर इ.), कीटकभक्षक वनस्पती. s.
symmetry
समात्रता दोन सारखे भाग होण्याची क्षमता. s. bilateral द्विपार्श्व, समात्रता एकाच उभ्या पातळीत विभागल्यावर दोन सारखे भाग होण्याची क्षमता, उदा. वाटाण्याचे फूल. पहा zygomorphic s. radial अरसमात्रता वस्तूच्या केंद्रातून कोणत्याही उभ्या पातळीत विभागल्यावर दोन
sympetalae
युक्तप्रदली उपवर्ग बेंथॅम व हूकर आणि एंग्लर व प्रँटल यांच्या वर्गीकरणपद्धतीतील फुलझाडांच्या द्विदलिकित वनस्पतीतील जळलेल्या पाकळ्यांचा वनस्पतींचा उपवर्ग. Gamopetalae
symphysis
सम संजनन अवयवाच्या सारख्या भागांची आरंभापासूनच जुळून वाढण्याची प्रक्रिया, उदा. युक्तप्रदल पुष्पमुकुट
synandrium
संकेसरमंडल केसरदलांच्या अंशतः किंवा पूर्णतः संयोगाने बनलेली संरचना, उदा. काकडी, भोपळा, सूर्यफूल, व सुरण कुलातील काहींचे केसरमंडल इ.
synangium
संधानी सर्व बीजुककोश परस्परांशी बाजूने चिकटल्याने बनलेली संयुक्त बहुपुटक (अनेक कोटरयुक्त) संरचना उदा. मॅरॅटिया नेचा Marattiales.
synapsis
समीपस्थिति कोशिकेच्या अर्धसूत्रण विभागणीपूर्वी प्रकलातील सर्व सूत्रमय गंउता प्रकलावरणात एका बाजूस साचून राहण्याची अवस्था meiosis.
syncarp
संयुक्त फळ कणिश फुलोऱ्यापासून बनलेले संयुक्त फळ अथवा मांसल घोसफळ उदा. तुतू, केवडा, अननस, spike.
syncarpous
युक्तकिंज दोन किंवा अधिक किंजदलांच्या संयोगाने बनलेला (किंजपुट) उदा. सूर्यफूल, चिकू, काकडी इ.
syndesis
युग्मन, युगुलीभवन प्रकलातील समीपस्थितीनंतर सजातीय रंगसूत्रांच्या जोड्या बनणे (अर्धसूत्रण विभाजनाकरिता) meiosis.
synecology
वनस्पति (पादप) समाजशास्त्र वनस्पतींच्या समुदायासंबंधईच्या माहितीची विज्ञानशाखा plant sociology, phyto (plant) sociology, ecology, autecology.
synergidae
साहाय्यक कोशिका, साहाय्यक पेशी फुलझाडांच्या बीजकातील (फलनपूर्वावस्थेत) गर्भकोशातील अंदुकाजवळच्या व फलनास साहाय्य करणाऱ्या दोन (वंध्य अंदुके) कोशिका, तिन्ही मिळुन अंदुकपरिवार बनतो व गर्भकोशाच्या वरच्या (बीजकरंधाजवळच्या) टोकाजवळ तो असतो.
synthetic fibre
कृत्रिम तंतू काही रसायने एकत्रित करून बनविलेला (संश्लेषित) कृत्रिम व नैसर्गिक धाग्याहून (सूत, रेशीम, वाख इ.) भिन्न धागा.
synusium
पादप संघ परस्परांच्या सन्निध (एकत्र) वाढणाऱ्या वनस्पतींच्या (समान) जीवरुपावर आधारलेले पारिस्थितिकीय (परिस्थितिविज्ञानातील) एकक (गट), यातील व्यक्ती कधी एकाच जातीच्या किंवा भिन्न जातींच्या परंतु सारख्या स्वरुपाच्या असतात. अशा अनेक संघांचा समावास बनतो व त्या
systematic botany
वर्गीकरणात्मक वनस्पतिशास्त्र वनस्पतीतील लक्षणांवरुन प्राकृतिक आप्तभाव ओळखून (लक्षात घेऊन) त्यांची वर्गीकरणाच्या साच्यात मांडणी करणारी विज्ञान शाखा.
systemic fungicide
दैहिक कवकनाशक रोगकारक कवकाच्या सर्व शरीरावर पडून त्याचा संपूर्ण नाश करणारा रासायनिक पदार्थ
systole
संकोच काही शैवले, चरबीजुके इत्यादींच्या कोशिकांतील प्रसरण व आकुंचन पावणाऱ्या रिक्तिकांचे (पोकळ्यांचे) आकुंचन.