वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा
There are currently 211 names in this directory beginning with the letter L.
labellum
पुष्पोष्ठ, ओष्ठक बहुधा पसरट व मोठी उंचवट्यासारखी पाकळी, उदा. कर्दळ, आमरे, आले, आरारुट, सुवर्णपुष्प इ.
Labiatae
तुलसी कुल, लॅबिएटी (लॅमिएसी) तुळस, सब्जा, पुदीना, फांगळा, पाच, दीपमाळ, माइनमूळ, सॅलव्हिया इत्यादी परिचित द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याता अंतर्भाव बेसी व हचिन्सन यांनी लॅमिएलीझ गणात केला आहे. प्रमुख लक्षणे- चौकोनी खोडाची क्षुपे व औषधी, पाने व खोडावर तैलप्र
labiate
१ ओष्ठाकृति २ ओष्ठवंत, ओष्ठी १ एक किंवा दोन (वरचा व खालचा) ओठ असलेल्या तोंडाप्रमाणे २ ओठ असलेला (पुष्पमुकुट, संवर्त)
lac
लाख लाखेच्या किड्यांच्या कातडीतून बाहेर पडणारा राळेसारखा पदार्थ हे किडे पळस, क्रोटन व वडाच्या वंशातील अनेक जातीवर वाढतात.
lacerate
विदारित, विदीर्ण खोलवर अनियमितपणे फाटल्याप्रमाणे उदा. केळीचे पान, काही नेचांचे बीजुककोशावरचे आच्छादन (पुंजत्राण), भामुर्डी (Blumea lacera DC).
laciniate
संदीर्ण, विच्छिन्न झालरीप्रमाणे अरुंद भाग पडलेले (पान), उदा. तिळाच्या वंशातील एक तण वनस्पती (Sesamum laciniatum L.)
lacuna
१ रिक्तिका २गर्तिका ३ रिकमार्ग १ कोशिकांच्या समूहातील मोकळी जागा २ दगडफुलाच्या शरीरावरील खाच ३ खोडातील वाहक वृंदातील पोकळी, उदा. बंधकतृण (Equisetum)
lacunar tissue
सुविरल ऊतक, पोकळीयुक्त ऊति अनेक रित्या जागा (पोकळ्या) असलेला पेशईंचा (कोशिकांचा समूह) aerenchyma
laevigate
चिक्कणपृष्ठी गुळगुळीत व चकाकीत पृष्ठभाग असलेले (पान, साल, फळ इ.) उदा. Ehretia laevis Roxb. धत्रंग (अजानवृक्ष). laevis, levigate
lageniform
तुंबाकृति खाली (तळाशी) फुगीर व तेथून अरुंद नळीसारखे होत आलेले, दूधभोपळ्यासारखे, त्यावरून त्याचे नाव (Lagenaria leucantha Rusby, Bottle gourd)
Lamarckism
लामार्कची उपपत्ति नवीन जातींच्या उत्पत्तीसंबंधीचा फेंच प्राणिशास्त्रज्ञ जे.बी.लामार्क यांचा सिद्धांत - बाह्यपरिस्थितीचा सजीवांवर होणारा प्रत्यक्ष परिणाम पुढच्या पिढीत उतरून सजीवांच्या विद्यमान जातींत फरक पडतो व परिस्थितीशी समरस होणाऱ्या नवीन जाती उदयास ये
lamella
पटल पातळ पडदा, खवला अथवा तत्सम उपांग, उदा. भूछत्रे, कोशिकाविभाजन l.middle मध्यपटल परस्पराशी चिकटून असलेल्या दोन नवकोशिकांमधील प्रारंभी बनलेला पेक्टिक पदार्थांचा पातळ पडदा, ह्यावर दोन्ही बाजूंनी नंतर तूलीराचे थर बसून कायम स्वरुपाचे कोशिकावरण बनते.
lamina
पाते, पत्र पानाचा सपाट किंवा पसरट भाग, क्वचित हा निमुळता अरुंद किंवा सुईसारखा असतो व कधी देठ अगर खोड पात्यासारखे असतात. phyllode, phylloclade, oladode blade
Laminarietum
लॅमिनेरिया संघात फक्त लॅमिनेरिया नावाच्या शैवलाचा समुद्रातील विशिष्ट ठिकाणी आढळणारा समुदाय.
laminated
१ पत्रयुक्त २ अनेकपत्री १ पाते असलेले २ अनेक पात्यासारखे भाग असलेले l. bulb प्रावृत कंद bulb
lanceolate
कुंतसम, कुंताभ भाल्यासारखे, तळाशी अरुंद, मध्ये रुंद व टोकाकडे निमुळते होत गेलेले, उदा. पांढरा चाफा (पान), कुरासना (Pluchea lanceolata Oliv. Hien).
land capability
भूक्षमता, मृदाक्षमता जमिनीत असलेल्या विविध प्रकारच्या उपयुक्त भिन्न घटकांच्या गुणधर्मानुसार तिचे (पोषण) सामर्थ्य (क्षमता, गुणवत्ता), बव्हंशी हे जमिनीतून होणाऱ्या धुपावर अवलंबित असते. जितकी धूप कमी, तितकी गुणवत्ता अधिक.
larval
डिंभकीय, डिंभी वनस्पतीच्या सुप्तावस्थेतील भागासंबंधी, उदा. अर्गट या कवकाची निष्क्रीय अवस्था (ग्रीष्मावस्था). काही शंकुमंत वनस्पतींच्या प्रारंभिक अवस्थेबद्दल, काही प्राण्यांच्या विकासावस्थेसंबंधी
latency
१ अप्रकटत्व २ सुप्तता १ गुप्त रीतीने असण्याचा किंवा प्रत्यक्ष उघडपणे न दिसण्याचा प्रकार (गुण), काही आनुवंशिक लक्षणे एका पिढीत न दिसता त्यापुढील पिढीत दिसतात. २ चेतनेच्या अभावी क्रिया न दर्शविण्याचा गुण (प्रकार), अनुकुल परिस्थितीच्या अभावी बियांना अंकुर न फुटणे
latent
अप्रकट, सुप्त l.bud सुप्तकलिका, सुप्तकोरक भावी कालात उमलणारी कळी l.factor सुप्त कारक, सुप्त घटक उघडपणे न दिसणाऱ्या एखाद्या लक्षणाबद्दल जबाबदार असलेला रंगसूत्रातील घटक (जनुक) पहा factor l.period (stage) सुप्तावस्था, सुप्तकाल प्रकटावस्थेपूर्वीची अवस्था,
lateral
पार्श्व, पार्श्विक, पार्श्वीय वनस्पती अगर प्राणी यांच्या शरीराच्या अथवा एखाद्या अवयवाच्या मुख्य अक्षाच्या बाजूस असलेले, उदा. बगलेतील कळ्या l.branching पार्श्वशाखाबंध मुख्य अक्षाच्या बाजूवरील कळ्या वाढून बनलेल्या फांद्यांची मांडणी l. meristem पार्श्विक
laterality
समात्रता, पार्श्वता विभागणीनंतर दोन किंवा अनेक सारखे अर्ध होण्याची क्षमता symmetry symmetry
laterinervis
पार्श्वसिराल पात्याच्या तळापासून टोकापर्यंत सरळ (बाजूच्या) शिरा असणारे, उदा. गवताचे पान laterinervius
latex
चीक काही वनस्पतीत आढळणारा व बहुधा चिकट दुधासारखा पांढरा किंवा पातळ, पांढरट किंवा पिवळट रस उदा. वड, केळ, कोकम, रबर, अफू, इ. यांमध्ये अनेक खनिजे, कार्बनी द्रव्ये (मेद, शर्करा, स्टार्च इ.), क्वचित विषारी व दाहक पदार्थ इत्यादी आढळतात.
laticiferous cell
चिकाळ कोशिका चिकाचा संचय करणारी कोशिका (बहुप्रकली व शाखित), उदा. शेर, शेंड, पानचेटी व काही निवडुंगाच्या जाती. l.vessel चिकाळ वाहिनी चिकाचा संचय करणारी व चीक पसरविणारी शाखित वाहिनी, उदा. पिवळा धोत्रा, अफू, दुधळ, पाथरी इ. l. tissue चिकाळ ऊतक चिकाळ घटकांचा
latifoliate
विस्तृतपर्णी रुंद पाने असलेले, उदा. धावडा (Anogeissus latifolia Wall), घोगर (Gardnia latifolia Ait) latifolius
Lauraceae
तमाल कुल, लॉरेसी पिसी, मैदालकडी, तमाल, दालचिनी, कापूर, लॉरेल, ऍव्होकॅडो इत्यादी द्विदलिकित उपयुक्त वनस्पतींचे कुल, याचा अंतर्भाव एंग्लर व प्रँटल यांनी व बेसींनी मोरवेल गणात (रॅनेलीझमध्ये) केला आहे. प्रमुख लक्षणे- एकाआड एक, सोपपर्ण व चिवट पानांचे वृक्ष व झुडुपे, तैल नलिकायुक्त अवयव, अरसमात्र, अप्रदल, त्रिभागी, द्विलिंगी किंवा एकलिंगी फुले, परागकोश झडपांनी उघडतात. किंजदले १-३, ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा व एक बीजक, मृदुफळात अपुष्क बीज
lavender
लॅव्हेंडर १ फिकट निळसर करड्या रंगाचे उदा. Lavandula vera DC या वनस्पतीच्या फुलासारखे २ लव्हेंडर नावाचा सुवासिक अर्क हिच्या फुलांपासून काढतात.
Law of Ancestral heredity
पैतृक आनुवंशिकतेचा नियम सर्वसाधारणपणे कोणाही व्यक्तीच्या आनुवंशिक गुणांमध्ये आई-बाप, दोन आजी आजोबा, चार पणजी पणजोबा वगैरे पूर्वजांचा वाटा हा अनुक्रमे .५, .२५, .१२५ इत्यादी भूमितिश्रेणीच्या आकड्यांच्या बेरजेइतका असतो असा गॉल्टनचा नियम, संततीचे भिन्न पितरांशी साम्य यामुळे दिसुन येते व सर्वसाधारणपणे त्या त्या प्रमाणात ते असू शकते.
Law of Filial regression
संतानीय परागतीचा नियम सरासरीने पाहता असे आढळले आहे की, सर्वसाधारणपणे विशिष्ट जातीच्या (species) जीव समुदायामध्ये एखाद्या आनुवंशिक गुणाच्या बाबतीत आईबापांच्या सर्वसामान्य पातळीपासून त्यांची मुले त्यांच्यापेक्षा कमी ढळतात, म्हणजेच मुले (प्रत्येक पिढी) शक्यत
Law of Inheritance
अनुहरणाचा नियम आईबापांचे काही गुण संततीत फरक पावून किंवा तसेच उपरण्याबाबतची निश्चितता दर्शविणारी घटना (नियम) Mendelism
layer
स्तर, थर, पदर l.society स्तर संहति, स्तर समाज वनश्रीतील अनेक भिन्न थरांमध्ये आढळणारा व एकाच थरापुरता मर्यादित लहान समुदाय society
layer of vegetation
वनश्री-स्तर, पादप स्तर एकूण वनश्रीत आढळणाऱ्या अनेक आडव्या थरांपैकी एक थर, भिन्न विकासावस्थेत थरांची संख्या भिन्न असून एकूण वनश्रीचे स्वरुप बदलते असते, तसेच प्राण्यांच्या चरण्याच्या क्रियेने व इतर कारणांमुळे थरांची संख्या व स्वरुप बदलते.
layering
दाबकलम प्रक्रिया झाडाची फांदी वाकवून व जमिनीवर दाबात ठेवुन मुळे फुटल्यावर ती अलग करणे व अशा प्रकारे नवीन वनस्पतींचे कलम तयार करणे
leaching
अपक्षालन, निक्षालन जमीन धुपून जाऊन त्यामुळे पोषक द्रव्ये कमी होण्याची प्रक्रिया, बांध घालणे आणि गवत व झाडझाडोरा वाढू देण्याने जमिनीस स्थैर्य प्राप्त होते.
leaf
पर्ण, पान वनस्पतीच्या खोडापासून उगम पावून बहुधा बाजूस मर्यादित वाढ होणारा हरितद्रव्ययुक्त अवयव, मूलतः मर्यादित शाखा, परंतु अन्ननिर्मितीकरिता विशेषत्व पावलेला प्रमुख अवयव l. apex पर्णाग्र पानाचे टोक l. arrangement पर्णविन्यास उपहा phyllotaxis l. base
leafless
पर्णहीन, निष्पर्ण पाने नसण्याचा प्रकार, पाने लवकर गळून पडल्यामुळे खोड पर्णहीन दिसते. उदा. काही निवडुंगाचे प्रकार, नांग्या शेर, मुहलनबेकिया इ., वनस्पती कधी पाने मुळीच न आल्याने खोड पर्णहीन दिसते, उदा. सोमलता. अनेक पानझडी वृक्ष व झुडपे वर्षातून एकदा पर्णत्याग करतात व पर्णहीन दिसतात उदा. सावर, रामफळ, वड, पांगारा, पळस इ.
leaflike
पर्णसम, पर्णाभ पानासारखे दिसणारे (खोड, देठ, उपपर्ण इ.) phyllode, cladode, phylloclad, stipule foliaceous
lectotype
अभिप्ररुप, लेक्टोटाइप मूळच्या प्रातिनिधिक नमुन्यांपैकी निवडलेला वनस्पतीचा एक नमुना किंवा अन्य घटक, विशेषतः मूळचा नमुना उपबब्ध नसेल किंवा प्रसिद्धीच्या वेळी त्याचे नामकरण झाले नसल्यास घेतलेला नमुना, allotype holotype.
Lecythidaceae
समुद्रफल कुल, लेसिथिडेसी निवर (समुद्रफळ), इंगळी, तोफगोळा वृक्ष, बाझिल नट व सापुकेया नट इत्यादी द्विदलिकित फुलझाडांचे लहान कुल. याचा अंतर्भाव जंबुल गणात (मिर्टिफ्लोरी, मिर्टेलिझ) करतात. बेंथॅम आणि हूकर यांनी या वनस्पतींचा समावेश जंबुल कुलात केला आहे. प्रमुख लक्षणे- वृक्ष, पाने मोठी, एकाआड एक, साधी, द्विलिंगी फुले एकाकी किंवा मंजरीवर, ती नियमित अथवा प्रदले आणि केसरदले एकसमात्र, परिकिंज किंवा अपिकिंज संदले व प्रदले ४-६ व सुटी, पाकळ्या क्वचित जुळलेल्या, केसरदले अनेक व तळाशी जुळलेली, ४-६ जुळलेल्या किंजदलांच्या किंजपुटात अनेक कप्पे व त्यात अनेक बीजके, मृदुफळात किंवा बोंडात अपुष्क बिया.
legitimate fertilisation
वैध फलन द्विरुप किंवा त्रिरुप प्रकारच्या फुलांचे बाबतीत समरुप फुलांमध्ये घडून आलेले परागण व फलन, fertilisation
legume
शिंबा शेंग या सामान्य नावाने ओळखले जाणारे फळ परंतु शास्त्रीयदृष्ट्या एक किंजदलाच्या ऊर्ध्वस्थ किंजपुटापासून बनलेले, शुष्क व दोन्ही शिवणीवर तडकणारे फळ असे मानतात. या दृष्टीने शेवगा, मोहरी किंवा टेटू यांची शेंगेसारखी फळे शिंबा नव्हेत. शिंबाची उदाहरणे- वाटाणा, चिंच, शिकेकाई, बाभूळ, काही शिंबा मांसल (उदा. चिंच) तर काही न तडकणाऱ्या (उदा. नीळ, अगस्ता, शिसवे, बिबला इ.) असतात.
Leguminosae
शिंबी (शिंबावंत) गण, लेग्युमिनाजी शिंबा (शेंग) फल असणाऱ्या या गटाचा पूर्वी कुल या अर्थी उल्लेख केला जात असे व त्यात तीन उपकुले समाविष्ट केली जात. आता (हचिन्सन यांनी) ह्याला गणाचा दर्जा देऊन उपकुलांना कुले म्हटले (सीसॅल्पिनेसी,मिमोजेसी, पॅपिलिऑनेसी) आहे. स
Lemnaceae
कारंडपादप कुल, लेम्नेसी टिकलीचे शेवाळे (टिकलीच्या आकाराची व पाण्यावर तरंगणाऱ्या शैवलासारखी दिसणारी) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अतिलहान एकदलिकित फुलझाडाचे फार लहान व ऱ्हास पावलेले कुल. याचा अंतर्भाव न्यूडिफ्लोरी (नग्नपुष्पी) गणात केलेला आढळतो, परंतु स्पॅडि
lens
१ भिंग २ मसूर l. shaped (lenticular) बहिर्गाएल, मसुराकार मसुरीच्या बियाप्रमाणे दोन्ही बाजू फुगीर असलेले
Lentibulariaceae
दृतिपर्ण कुल, लेंटिब्युलॅरिएसी युट्रिक्युलेरिया (गेळ्याची वनस्पती),पिंग्युइक्युला, बायोव्ह्युलेरिया इत्यादी लहान कीटकभक्षक वनस्पतींचे कुल, याचा अंतर्भाव द्विदलिकित फुलझाडांपैकी ट्युबिफ्लोरी या गणात करीत (एँग्लर), परंतु हल्ली (बेंथॅम व हूकर यांच्या व हचिन्
leptonema
तनुसूत्र, लेप्टानामा प्रकल विभाजनापूर्वी जालिकापासून बनलेला व पुढे गुंडाळी (कुंडल) सारख्या अवस्थेत जाणारा नाजूक धागा spireme, nucleus
leptosporangiate
तनुबीजुककोशिक, लेप्टोस्पोरँजिएट पातळ आवरणाचे व प्रत्येकी एका कोशिकेपासून बनलेले बीजुककोश असलेला नेचा
leptotene
तनुसूत्रावस्था, लेप्टोटीन पूर्ण विभागणीपूर्वी प्रकलाची अनेक सूक्ष्मतंतुयुक्त पुंजक्याची अवस्था, न्यूनीकरणात ही अवस्था पहिली असून यामध्ये समरचित व बारीक रंगसूत्रांच्या जोड्या नसतात. meiosis
lethal
मारक, घातक एखादी प्रक्रिया नाश करणारा (उदा. कारक, जनुक, तपमान, गुणक इ.) l. coefficient मारक गुणक मारक ठरणारे अति उष्ण किंवा अतिथंड तपमान यापासून सजीवांमधील कार्यक्षमता फारच कमी होते.
leucoplast
श्वेतकणु, श्वेतलवक वनस्पतींच्या कोशिकेतील प्राकलात आढळणारा वर्णहीन व स्टार्च संचय करणारा सजीव कण (प्राकणु) plastid leucoplastid
liana
महालता विशेषेकरून उष्ण कटिबंधात आढळणारी मोठी काष्ठयुक्त व अनित्य संरचनेची वेल, उदा. गारदळ, खाजकुइली, कोंबळ, वाघनखी इ. liane
liber
१ मुक्त २ अंतर्वल्क १ शेजारच्या सारख्या भागांशी संबंध नसलेले २ अनेकदा सूत्रमय असलेला परिकाष्ठाचा भाग
Lichens
शैवाक वर्ग, धोंडफुले, शैलेय, लायकेन्स शैवल व कवक यांच्या सहजीवनामुळे बनलेल्या सामायिक कायक वनस्पतींचा गट. सामान्य भाषेत दगडफूल (धोंडफूल) या नावे मसाल्यात काही प्रकार वापरतात. त्यातील भिन्न जातींत भिन्न प्रकारचे शैवल व कवक यांची युति असून एका परंतु भिन्न ज
lid
अपिधान, टोपण, झाकण, पिधान शेवाळींच्या बीजुकाशयावरचे झाकण, नेपेंथस (कलशपर्णी) ह्या कीटकभक्षक वनस्पतींच्या चंबूसारख्या अवयवाचे टोपण, परागनलिका बाहेर येण्यापूर्वी अलग होणारा भाग l.cell अपिधान कोशिका अंदुककलशाच्या टोकावरची कोशिका, यामुळे प्रथम ग्रीवा मार्ग
life
१ जीवन २ जीव ३ सजीवत्व १ व्यक्तीच्या आयुष्यातील क्रिया प्रतिक्रियांचे वर्णन २ जिवंतपणाचे वैशिष्ट्य दर्शविणाऱ्या कोणत्याही कृतीबद्दल जबाबदार असलेला पदार्थ (जीवद्रव्य) ३ जिवंतपणाची लक्षणे असण्याची क्षमता l.cycle जीवनचक्र संपूर्ण जीवनातील प्रमुख घटनांचा
light absorption
प्रकाशग्रहण बाहेरचा संपूर्ण दिनप्रकाश व वनस्पतीभोवतालचा प्रत्यक्ष प्रकाश यांचे गुणोत्तर l.a.duration प्रकाशकाल प्रकाशाच्या उपस्थितीचा काल l.a.energy प्रकाश ऊर्जा प्रकाशातून मिळणारे व अन्नपदार्थात साठविता येण्यासारखे प्रकाशातील शक्तीचे रुपांतर l.a.
light perception
प्रकाशज्ञान, प्रकाशावगम वनस्पतींना प्रकाशाचा तीव्रपणा, मंदपणा, अभाव इ. यांची जाणीव होण्याची प्रक्रिया, प्राण्यांच्या बाबतीत बहुधा ही जाणीव विशेषत्व पावलेल्या अवयवांद्वारे (इंद्रियाकरवी) होते, परंतु वनस्पतीत तसे अवयव फारच क्वचित आढळतात eyespot.
lignification
काष्ठीभवन कोशिकावरणात काष्ठीराचा समावेश, यामुळे ते अपार्य होऊन पुढे कोशिका मृत होते व वनस्पतीस बळकटी येते.
lignin
काष्ठीर, लिग्निन कोशिकावरणात समाविष्ट होऊन काष्ठ (लाकूड) बनण्यास उपयुक्त असा पदार्थ, हा पाणी व ईथर यात न विरघळणारा पण मद्यार्क व क्षार यात विरघळणारा असतो.
Lignosae
काष्ठीय उपवर्ग, लिग्नोसी हचिन्सन यांनी मान्य केलेला द्विदलिकित वनस्पतींच्या वर्गातील दोन्हींपैकी एक गट, यामध्ये मूलतः क्षुप व वृक्ष या काष्ठमय वनस्पतींचा व त्यांचेपासून उद्भवलेल्या (उत्क्रांत झालेल्या) औषधीय वनस्पतींचा अंतर्भाव होतो.
ligulatae
जिव्हिकावंत गट, लिग्युलेटी जिव्हिकायुक्त पाने असलेल्या वनस्पतींचा गट, उदा. सिलाजिनेला, आयसॉएटीस व सिजिलॅरिया आणि लेपिडोडेंड्रॉन ह्या प्राचीन वनस्पती.
ligulate
१ जिव्हिकावंत २ जिव्हिकाकृति १ जिव्हिका असलेला (अवयव) २ लहान जिभेसारखा दिसणारा, उदा. सूर्यफुलातील परिघावरच्या पुष्पकातील पुष्पमुकुट
ligule
जिव्हिका लहान पातळ पट्टीसारखे (जिभेसारखे) उपांग, उदा. गवताच्या पात्याच्या तळाशी असलेले, सिलाजिनेला, आयसॉएटिस ह्या वनस्पतीतही आढळते.
liguliflorous
जिव्हिकापुष्पी जिव्हिकाकृती पुष्पमुकुट असलेल्या पुष्पकांचा फुलोरा, उदा. दुधळ, सहदेवी इ.
Liliaceae
पलांडु कुल, लिलिएसी पलांडु (कांदा), लसूण, शतावरी, घोटवेल, कोरफड, कळलावी, दर्शना, युका, नागीन इत्यादी अनेक उपयुक्त एकदलिकित वनस्पतींचे कुल. याचा समावेश पलांडु गणात (लिलिएलीझमध्ये) केला जातो. प्रमुख लक्षणे- औषधीय वनस्पती, भूमिस्थित खोड (कंद, दृढकंद, मूलक्षोड), पानातील शिरा समांतर, पाने साधी व अनेकदा मूलज, फुलोरे विविध, त्रिभागी, नियमित व द्विलिंगी फुलात सहा केसरदले, ऊर्ध्वस्थ तीन कप्प्यांचा किंजपुट व त्यात अनेक बीजके, मृदुफळात किंवा बोंडात थोड्या किंवा अनेक सपुष्क बिया
Liliales
पलांडु गण, लिलिएलीझ ईकदलित वनस्पतींतील या गणात ज्या कुलांचा समावेश केला जातो त्याबद्दल मतभेद आहेत, लिलिफ्लोरी या गणात एंग्लर यांनी जुंकेसी, लिलिएसी, ऍमारिलिडेसी, डायॉस्कोरिएसी, इरिडेसी इत्यादी नऊ कुले घातली होती, परंतु बेंथॅम व हूकर यांनी या कुलांची व इतर काहींची (गणांची), विभागणी भिन्न श्रेणीत केली. बेसी व हचिन्सन यांनी लिलिएलीझ गणातील कुलांची फेरवाटणी केलेली आढळते, काही कुले (इरिडेलीझमध्ये) केसर गणामध्ये तर काही (ऍमारिलिडेलीझमध्ये) मुसली गटात तर काही अननस गणात व कदली गणात समाविष्ट केली आहेत. पलांडु कुलाचा अंतर्भाव मात्र पलांडु गणात आहे.
limb
१ पाते २ अवयव १ पाकळीचा पसरट भाग, उदा. मोहरी. जुळलेल्या (युक्त) पुष्पमुकुटाचा पसरट भाग २ सामान्यपणे वनस्पती किंवा प्राणी यांच्या शरीराचे विशेष कार्यक्षम भाग
limiting cell
मर्यादक कोशिका मर्यादा घालणारी कोशिका, उदा. नील हरित शैवले l.c. factor मर्यादक घटक, सीमांकन कारक, सीमा कारक अनेक घटकांच्या साहायायने चालू असलेल्या प्रक्रियेच्या (उदा. वाढ, प्रकाशसंश्लेषण इ.) प्रगतीला प्रथम मर्यादा घालणारा घटक (उदा. तपमान, प्रकाश, हवेतील
limnad
तडागवासी तळ्यात वाढणारी वनस्पती उदा. सेरॅटोफायलम, हायड्रिला, नायास इत्यादी, सामान्य भाषेत केंदाळ किंवा केंजाल (पाण्यातील जाळी), कुमुद (Limnanthemum indicum Thw.)
limnodophilous
पंकप्रिय विशेषतः दलदलीत वाढणारी (वनस्पती), उदा. अळू, पाणकणीस, अंबुली (Limnophila indica L.)
Linaceae
अतसी कुल, लायनेसी (लिनेसी) अतसी (जवस, अळशी), रॅडिओला, ह्यूगोनिया इ. द्विदलिकित वनस्पतींचे लहान कुल, याचा अंतर्भाव भांड गणात (जिरॅनिएलीझमध्ये) केलेला आढळतो. प्रमुख लक्षणे- एकाआड एक साध्या पानांच्या औषधीय वनस्पती, द्विलिंगी, नियमित, ४-५ भागी, बिंबहीन फुले,
line transect
रेषा छेद वनश्रीच्या अभ्यासाकरिता वनस्पतींच्या समूहात एका सरळ रेषेच्या आजुबाजुस वाढलेल्या वनस्पतींची नोंद करण्याकरिता दोन निश्चित बिंदूमध्ये काढलेली रेषा
linkage
अनुबंधन, सहलग्नता दोन किंवा अधिक अवैकल्पिक जनुकांचा ते एकाच रंगसूत्रावर असल्यामुळे माळेतील मण्याप्रमाणे असलेले साहचर्य l.group बद्ध संच, सहलग्न संच एका रंगसूत्रावरील अनेक जनुकंचा सहसा परस्परापासून अलग न होणारा गट crossing over
linnean system
लिनियसची पद्धती कार्ल लिनियस या स्वीडिश वनस्पतीशास्त्रज्ञाने वनस्पतींच्या वर्गीकरणाच्या सोयीकरिता बनविलेली, मुख्यतः फुलातील केसरदले, त्यांची संख्या, संघटना व लंआबी यांवर आणि किंजलांच्या संख्येवर विशेषतः आधारलेली, लिंगप्रधान व कृत्रिम पद्धती. यातच द्विपद न
lip
ओष्ठ १ दोन अपूर्ण भाग पडल्याने, तोंडाशी साम्य दर्शविणाऱ्या, संवर्ताच्या अथवा पुष्पमुकुटाच्या प्रत्येक भागास ओठ या अर्थाची संज्ञा. २ आमराच्या (ऑर्किड) फुलातील किंवा गोकर्णाच्या पुष्पमुकुटातील, कीटकास बसण्यास सोयीची अशी मोठी पसरट पाकळी
lipase
वसाभेदक, लायपेज भेदयुक्त (ओषट) पदार्थाचे रुपांतर (रासायनिक अपघटन) घडविणारे कार्बनी निदेशक, तेलबियात हे आढळते. enzyme
lipogenesis
वसाजनन वसा (मेद, स्निग्ध पदार्थ) निर्माण होण्याची रासायनिक प्रक्रिया, ही परिकलात कार्बनी निदेशकांच्या साहाय्याने घडून येते.
lipoxeny
आश्रयत्याग एखाद्या जीवोपजीवी वनस्पतीने आपली आश्रय देणारी वनस्पती सोडून अलग होणे व पूर्वसंचित अन्नावर पुढील विकास स्वतंत्रपणे चालू ठेवणे, हा प्रकार, उदा. अर्गटची जालाश्म अवस्था sclerotium
list quadrat
चौकोन उपस्थिती विशिष्ट मापाच्या चौकोनी जागेत निसर्गतः आढळलेल्या वनस्पतींची नोंद (यादी) quadrat
lithophilus
शिलाप्रिय खडकावर वाडून जगणारी उदा. शैवाकांपैकी काही वनस्पती l.formation शिला समावास खडकावर वाढून विशिष्ट संरचना, आकार इत्यादी दर्शविणाऱ्या वनस्पतींचा नैसर्गिक समुदाय
littoral
सागरतटवर्ती, तटीय समुद्रकिनाऱ्यावर पण पाण्याच्या तळाशी किंवा पाण्यावर (वाढणारी वनस्पती), भरतीच्या सीमेपासून आत समुद्राकडे सुमारे २०० मीटरपर्यंत अंतरावरच्या प्रदेशात, प्रकाश व लाटांच्या अमलाखाली, उदा. सुंद्री चांद (Heritiera littoralis Ait.) l. vegetation
Liverworts
यकृतका, लिव्हरवर्ट्स शेवाळी विभागातील सापेक्षतः साध्या वनस्पती Hepaticae, Bryophyta Hepaticae
loamy
दुमट, चिकण फार बारीक कणांची, पाणी शोषून ते धरुन ठेवणारी कलिलस्वरुप, सुकल्यावर कडक बनणारी (जमीन, माती), यामध्ये, कुजट जीवावशेष असल्याने ही जमीन सुपीक असते व बारीक रेती फार कमी प्रमाणात असते.
lobate
खंडयुक्त, खंडित, पालियुक्त खंड पडलेले, विभागलेले, उदा. वनभेंडीचे (Urena lobata L.) पान, कापसाचे पान lobose
lobe
खंड, पालि कोणत्याही पूर्णपणे न विभागलेल्या अवयवाचा एक विभाग, उदा. पाने, पुष्पमुकुट, किंजलक फळ इ.
locality
स्थान, ठिकाण एखाद्या वनस्पतीचा आढळ दर्शविणारे ठिकाण किंवा तिच्या स्थानाबद्दल निश्चित माहिती (जिल्हा, घाट, तालुका, शहर, टेकडी, नदी इ.), पादपसमुदाय किंवा संगती यांचे भौगोलिक स्थान
locelus
लघुपुटक लहान कप्पा, उदा. परागकोशाच्या एका खंडातील (परागकोटर) दोन्हीपैकी प्रत्येक कप्पा anther
locomotion
चलन, स्थानांतर, गमन एखाद्या सूक्ष्म वनस्पतीचे किंवा सुट्या अवयवांचे (बीजुक, गंतुक इ.) अथवा कोशिकेतील सुट्या भागाचे (हरितकणु, प्रकल इ.) स्थलांतर, उदा. काही शैवले, कवक व त्यांच्या प्रजोत्पादक कोशिका
locular, uni
एकपुटकित एकच कप्पा असलेले, उदा. सूर्यफूल व पपईचा किंजपुट l.bi द्विपुटकित दोन कप्पे असलेले, उदा. कुटकी, अडुळसा व मोहरीचा किंजपुट l.tri त्रिपुटकित तीन कप्यांचा उदा. पलांडु कुलातील वनस्पतींचा किंजपुट, कडुचिंच (Corchorus trilocularis L.)
loculicidally dehiscent
पुटक स्फुटनशील कप्याच्या बाजूने तडकण्याची क्षमता असलेले (फळ), उदा. कापूस, तामण, बोंडारा
Loganiaceae
कुंचल (कुचला) कुल, लोगॅनिएसी कुंचला (काजरा), निर्मळी, पपीटा, काजरवेल व तत्सम इतर द्विदलिकित वनस्पतीचे कुल. याचा अंतर्भाव बेंथॅम व हूकर यांनी किराईत गणात (जेन्शिएनेलिझ) केला असून हचिन्सन यांनी लोगॉनिएलीझ या गणात केला आहे, प्रमुख लक्षणे - समोरासमोर किंवा वर्तुळाकार व साधी व उपपर्णे असलेली पाने, वृक्ष, क्षुपे, औषधी व लता, छदे व छदके असलेली, नियमित, द्विलिंगी, ४-५ भागी फुले, दोन जुळलेल्या किंजदलांच्या ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक किंवा दोन कप्पे व अनेक बीजके, मृदुफळात किंवा बोंडात सपुष्क बिया
loma
शरद शाद्वल, लोमा पेरु देशातील, हिवाळ्यात धुक्याने भिजलेल्या जमिनीवर वाढणारा गवताळ प्रदेश, तृणसंघाताचा एक प्रकार steppe
lomentum
मालाशिंबा मण्यांच्या माळेप्रमाणे दिसणारे व पक्क झाल्यावर अनेक सुट्या मण्यासारखे एकबीजी तुकडे सांध्यातून अलग करणारे शिंबा प्रकारचे फळ, उदा. बाभूळ, लाजाळू इ., legume loment
long day plant
दीर्घदिन पादप बारा तासापेक्षा अधिक मोठ्या दिवसातील प्रकाशाच्या प्रभावाने फुलणारी वनस्पती, उदा. मुळा, लेट्यूस इ. photoperiodism, short day plant
longitudinal section
अनुदैर्घ्य (अन्वायम) छेद, अनुलंब छेद उभा छेद, वस्तूच्या लांबीस समांतर रेषेत असलेला छेद, उत्छेद असे संक्षिप्त रुप
loose
विरल, शिथिल विरळ संरचना असलेले (ऊतक, फुलोरा) l. inflorescence विरल पुष्पबंध विरळ शाखायुक्त फुलोरा, उदा. परिमंजरी, वल्लरी l. soil विरल मृदा भुसभुशीत (शिथिल) जमीन i. tissue विरलोतक हवामार्ग किंवा पोकळ्या असलेला कोशिकासमूह उदा. spongy tissue, aerenchyma
Loranthaceae
बंदाक कुल, लोरँथेसी बांडगुळ (बंदाक), हाडमोड व तत्सम द्विदलिकित वनस्पतींचे लहान कुल. याचा अंतर्भाव चंदन गणात (सॅटॅलेलीझमध्ये) करतात. प्रमुख लक्षणे काष्ठमय अर्धवट जीवोपजीवी, रुपांतरित मुळे (शोषक), पाने असतात (लोरँथस) किंवा नसतात (व्हिस्कम), बहुधा नियमित, २-३ भागी, समपरिदली, द्विलिंगी किंवा एकलिंगी फुले, किंजपुटात एक कप्पा व त्यात बीजकाधानी व बीजक असा भेद नसतो. सपुष्क बीजाभोवती चिकट मगज बांडगुळे (लोरँथस व व्हिस्कम या वंशातील) बहुधा आंबा, निंब इत्यादी वृक्षावर आढळतात.
lucens
चकचकीत उपत्वचेमुळे किंवा गुळगुळीतपणामुळे चमकणारा, उदा. पाने किंवा काही खोडे यांचा पृष्ठभाग lucid
lunate
अर्धचंद्राकृति चंद्रकोरीप्रमाणे, अर्ध्या चंद्राप्रमाणे, उदा. काही पानांचे किंवा बियांचे आकार, Passiflora lunata L. या कृष्णकमळाच्या एका जातीचे पान
Lycoperdales
भूकंदुक गण, लायकोपर्डेलीझ सत्यगदाकवक (युबंएसिडी) उपवर्गातील एक गण. या गणातील कवकांचे शरीर चेंडूसारखे (भूकंदुक) तारकासारखे, पक्ष्यांच्या घरट्यासारखे (नीडकवक), पूतिकवक किंवा दुर्गंधी द्रव्यात रुपांतर होणारे कवक (स्टिंकहॉर्न फंजाय) इत्यादीसारखे व बहुधा जमिनी
Lycopodiinae
मुग्दल शेवाळी वर्ग, लायकोपोडीनी, लेपिडोफायटा नेचाभ पादपांच्या (टेरिडोफायटा) चार वर्गांपैकी एक, यात पाच गण आहेत लायकोपोडिएलीझ, सिलाजिनेलेलीझ, लेपिडोंडेंड्रेलीझ, लेपिडोकार्पेलीझ व आयसॉएटेलीझ. मुग्दलाच्या (गदेच्या) आकाराचे शंकु व काहींत शेवाळीसारखी पाने यावर
Lycopsida
लायकोप्सिडा जेफे या शास्त्रज्ञाच्या मताप्रमाणे लायपोडिएलीझ व सायलोफायटेलीझ या गणांचा समावेश असलेला गट. नेचाभ पादपांपैकी ज्यामध्ये रंभात पर्णविवरांचा अभाव असतो अशा सर्वंआचा (लायकोपोडीनी, एक्किसीटीनी व सायलोफायटीनी) समावेश असलेला गट Pteropsida, Sphenopsida
lyrate
वीणाकृति वीणेच्या आकाराचे, टोकांस मोठे खंड व खाली लहान अपूर्ण खंडे असलेले (उदा. पान, गंगोत्री Cyathocline lyrata Cass).
lysigenous
नाशोद्भूत वनस्पतींच्या शरीरात कोशिकांच्या नाशामुळे बनलेली (पोकळी, नलिका, हवामार्ग इ.) schizogenous